Wednesday 21 September 2016

         शेतक-यांना तुती लागवडीचे बेणे उपलब्‍ध
            वर्धा दि. 21- तुती लागवडीस जिल्‍हयात वातावरणपोषक असून  तुती बेणे मुबलक प्रमाणात उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे शेतक-यांनी तुती बेणे जिल्‍हा रेशीम कार्यालय तसेच संबंधित तालुक्‍यातील रेशीम कर्मचा-यांकडे तुती बेण्‍याची मागणी करावी व तुतीची लागवड करावी. चालू वर्षापासुन तुती लागवड कार्यक्रम मनरेगा अंतर्गत करण्‍यात येत असून त्‍यानुसार आवश्‍यक कागदपत्र जिल्‍हा रेशीम कार्यालयाकडे जमा करावे असे रेशीम विकास अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                            0000000
प्र.प.क्र-659                                                                                 21 सप्‍टेंबर, 2016
         ग्रंथालयाच्या योजनेसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन
वर्धा,दि.21- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठान, कलकत्‍ता अंतर्गत  येणा-या समान व असमान अर्थसहाय्याच्‍या विविध योजनांच्‍या  व ग्रंथालय संचालनालयाकडून राबविण्‍यात येणा-या योजना व उपक्रमांची माहिती सार्वजनिक ग्रंथालयांना होण्‍यासाठी 23 सप्‍टेंबर रोजी विकास भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

            कार्यक्रमाचे उदघाटन अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजय दैने यांचे हस्‍ते ग्रंथालय उपसंचालक सु.हि.राठोड यांचे अध्‍यक्षतेखाली संपन्‍न होणार आहे. कार्यक्रमाला कलकत्‍त्याच्‍या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठान चे सहाय्यक संचालक दिपांजन चॅटर्जी , निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, प्र. सहाय्यक ग्रंथालय , संचालक वि.मु.डांगे , जिल्‍हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे , राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठ नागपूरच्‍या ग्रंथालय व माहितीशास्‍त्र विभाग प्रमुख डॉ. मंगला हिरवाडे, जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे , विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक डॉ. गजानन कोटेवार व जिल्‍हा ग्रंथालय संघाचे अध्‍यक्ष मदन मोहता यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यशाळेला सार्वजनिक ग्रंथालयाच्‍या पदाधिका-यांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन जिल्‍हा ग्रंथालय अस्मिता मंडपे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment