Thursday 18 August 2016

कापूस ते कापड प्रकल्प राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार
                        -ना. दीपक केसरकर 
*
चंद्रपुर जिल्ह्याची प्रायोगिक  स्तरावर निवड. 
*
एम गिरी करणार तांत्रिक सहकार्य 
*5
वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ
वर्धा, दि.17 :- महात्मा गांधीनी चरख्याचा उपयोग कापसापासून कपड़ा तयार करुन त्याकाळी विदर्भाच्या विकासाला चालना देण्याचे काम केले होते. आजही महात्मा गांधींची ही विचारधारा विदर्भासाठी लागू होते. कापूस हे विदर्भातील शक्तिस्थान असून कापूस  उत्पादक शेतकऱ्यांच्या  कापसाचे मूल्य वर्धन करुन विदर्भात कापूस ते कापड  अशी मूल्यवर्धित साखळी  विकसीत करण्याची योजना राबवतोय. ज्यामुळे पुढील 5 वर्षात शेतकऱ्यांचे  उत्पन्न दुप्पट होईल. हा प्रायोगिक प्रकल्प  चंद्रपुर  जिल्ह्यात  राबवण्याचा निर्णय घेतला असून एम गिरी यामधे महत्वाची भूमिका बजावेल असे वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. एम गिरी येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 
         यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, लीना बनसोड, एम गिरी चे संचालक डॉ प्रफुल्ल काळे,राहुल ठाकरे,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, नियोजन अधिकारी उपस्थित होते. 
          महाराष्ट्रात रिसोर्स बेस प्लानिंग चा प्रयोग राबवण्यात येतोय.  यामधे  त्या- त्या  जिल्ह्यातील शक्तिस्थानावर काम करुन तेथील जनतेच्या  उत्पन्नात वाढ कशी करायची याचा विचार या प्रकल्पात करण्यात येईल. यामधे वस्तुच्या मूल्यवर्धनाला  खुप महत्व आहे. विदर्भात कापूस पिकवणारया  शेतकऱ्यांच्या घरामधे जर सूत तयार झाले तर मोठा आर्थिक बदल घडू शकतो.  असे काही प्रकल्प या आधी राबवले गेलेत. पण ते पायलट मॉडेल आहेत. त्या प्रायोगिक प्रकल्पांना मोठ्या स्तरावर एखाद्या  जिल्ह्यात राबवून यशस्वी झालोत तर विदर्भातील सर्व कापूस उत्पादक जिल्ह्यात हा प्रकल्प राबवता येईल. असेही ते यावेळी म्हणाले. यासाठी एमगिरि या  भारत सरकारच्या अधीनस्थ संस्थेने  या प्रकल्पासाठी तांत्रिक सहकार्य  करावे. या संस्थे ने याविषयावर बरेच काम केले आहे.  सौर उर्जेवर आधारित चरखे बनवले आहेत. अशाच प्रकारची सौर उर्जेवर चालणारे लूम आणि रोमिंग मशीन्स त्यांनी  तयार कराव्यात. 
         तसेच सामूहिक सुविधा केंद्र तयार करावे. जिथे शेतकरी आपला कापूस देवून त्यापासून लळया किंवा सूत तयार करुन घेऊ शकेल. अर्थातच सुताची कींमत कापसापेक्षा जास्त असेल. याशिवाय कापड़ तयार करण्याच्या प्रक्रिएमधे सुद्धा शेतकऱ्यांचा सहभाग कसा राहील याचा विचार करुन प्रकल्प तयार करण्यासाठी एम् गिरी ने सहकार्य करावे यावर सुद्धा चर्चा झाली. विदर्भात कापसावर प्रक्रियेची अशी संपूर्ण साखळी विकसित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नत वाढ करता येईल. यासाठी शासनाने प्रायोगिक स्तरावर यावर्षी चंद्रपुर जिल्ह्यात हा प्रयोग  राबविन्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण विदर्भात याची अमलबजावणी करण्यात येईल यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.  डॉ काळे यांनी या प्रकल्पात एमगिरि संपूर्ण सहकार्य करण्याची हमी केसरकर यांना  दिली.  यावेळी एम गिरीचे अधिकारी उपस्थित होते. श्री केसरकर यांनी एमगिरि ने विकसित केलेले लूम रोमिंग मशीन्स आणि सूत कताई मशीन्स तसेच सोलर वर चालणाऱ्या मशीन्सची पाहणी केली. प्रथम  त्यांनी महात्मा गांधी आणि कस्त्तुरबा यांच्या पुतळ्यास कापूस माला घालून अभिवादन केले.
0000


No comments:

Post a Comment