Wednesday 8 March 2017

-         नयना गुंडे
Ø प्रधानमंत्री मुद्रा बँक मेळावा
वर्धा , दि.8 मार्च – महिला आर्थिकदृष्‍ट्या सक्षम असल्‍यास की, त्‍यांच्‍यामध्‍ये वेगळाच आत्‍मविश्‍वास निर्माण होवून त्‍या मनाने सुदधा खंबीर होतात. त्‍यामुळे महिलांनी आर्थिक सक्षमतेवर भर देण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना मुंडे यांनी केले.
आतरराष्‍ट्रीय महिला दिना निमित्‍त प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची जनजागृती आणि कर्ज वितरण करण्‍यासाठी जिल्‍हा स्‍तरीय मुद्रा बँक योजना समन्‍वय समिती आणि महाराष्‍ट्र राज्‍य ग्रामीण जीवन्‍नौनती अभियान यांच्‍या सयुक्‍त विद्यमाने सावंगी मेघे येथील दत्‍ता मेघे आयुर्विज्ञान संस्‍थेच्‍या सभागृहात महिला मेळावा अयोजित करण्‍यात आला होता. यावेळी महिलांना मार्गदर्शन करतांना श्रीमती गुंडे बोलत होत्‍या. या कार्यक्रमाला उपजिल्‍हाधिकारी एन. के. लोणकर, जिल्‍हा अग्रणी बँक व्‍यवस्‍थापक वामन कोहाड, महिला सुरक्षा पथकाचे शिल्‍पा बरडे, जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, नाबार्डच्‍या  जिल्‍हा व्‍यवस्‍थापक स्‍नेहल बनसोड, तहसिलदार मनोहर चव्‍हाण, ग्रामीण जीवन्‍नौनती अभियानचे  देवकुमार कांबळे, स्‍टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्‍यवस्‍थापक, मावीमच्‍या श्रीमती देशमुख उपस्थित होत्‍या.
ग्रामपंचायतमध्‍ये महिलांना स्‍वतंत्रपणे वेगळी जागा देण्‍यात यावी. यासाठी महिलांनी मागणी केली असून 35 ग्रामपंचायतीने महिलांची मागणी मान्‍य करुन स्‍वतंत्रपणे जागा दिली आहे. यामध्‍ये महिलांसाठी प्रशिक्षण, महिलांद्वारे उत्‍पादित वस्‍तुची विक्री तसेच त्‍यांना स्‍वतंत्रपणे काम करण्‍यासाठी ही जागा उपयोगी ठरणार आहे. यासाठी जिल्‍हाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. पुर्वी महिलांनी मतदानाच्‍या हक्‍कासाठी लढा उभारला होता.  स्वित्‍झर्लड 1972 मध्‍ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारतातील महिलांना हा अधिकार मिळविण्‍यासाठी कोणताही लढा उभारावा लागला नाही. राज्‍य घटनेने आपल्‍याला हा अधिकार दिलेला आहे. त्‍यामुळे महिलांनी मतदानाचा हक्‍क बजावला पाहिजे, असे आवाहन श्रीमती गुंडे यांनी केले.  
या कार्यक्रमात जिल्‍हा अग्रणी बँक व्‍यवस्‍थापक कोहाड यांनी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना तसेच बँकेच्‍या इतर योजना संदर्भात माहिती दिली. यावेळी 118 बचत गटाना 1 कोटी 70 लाख रुपयाचे कर्ज वितरण करण्‍यात आले. नाबार्डच्‍या  स्‍नेहल बनसोड यांनी  नाबार्ड मार्फत बचत गटाना दिला जाणा-या  सुविधा आणि योजनाची माहिती दिली. महिला सुरक्षा केंद्राच्‍या शिल्‍पा बरडे यांनी महिलांची सुरक्षतेसंदर्भात मार्गदर्शन केले. उपजिल्‍हाधिकारी लोणकर यांच्‍या हस्‍ते नविन मतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटप करण्‍यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात बचत गटाच्‍या महिलांची उपस्थिती होती.
00000000





No comments:

Post a Comment