Monday, 10 April 2017

नागपूर येथे 15 एप्रिल पर्यंत सैन्‍य भरती                                      
वर्धा दि.10- सिताबर्डी किल्‍ला रेल्‍वे स्‍टेशन समोर नागपूर येथे 118 इन्‍फेंटी बटालीयन, प्रादेशिक सेना(TA) मध्‍ये सोल्‍जर जी डी-, सोल्‍जर टेलर, सोल्‍जर ब्‍लॅकस्मिथ या पदासाठी 15 एप्रिल पर्यंत भरती प्रक्रीया सुरु आहे. या भरतीचा इच्‍छुक तसेच पात्र युवकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी  माजी फ्ला.ले.ध.य. सदाफळ यांनी केले आहे.
  तसेच आर्टरली रेजीमेंट सेंटर, हैद्राबाद येथे आर्टरली रेजीर्मेट मधील सेवारत/ निवृत्‍त सैनिकांचे पाल्‍य व भाऊ / युध्‍द विधवा पाल्‍य करीता युनिट हेडक्‍वॉर्टर कोटयाअंतर्गत विविध ट्रेड्स करीता 1 ते 6 जुन कालावधीत भर्ती आयोजित करण्‍यात आली आहे. अधिक माहितीसाठी  Army Recruiting Office नागपूर येथील 0712 -258020 दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे, जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी यांनी कळविले आहे.

अनुसुचित जमाती आयोगाच्‍या सदस्‍या माया इवनाते बुधवारी वर्धेत
वर्धा, दि.10-राष्‍ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाच्‍या सदस्‍या माया चिंतामन र्इवनाते  12 एप्रिल रोजी जिल्‍हयाच्‍या दौ-यावर येत आहे. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
          12 एप्रिल रोजी केंद्र व राज्‍य संस्‍थाकडुन राबविल्‍या जात असलेल्‍या जिल्‍हयातील आदिवासी विकास कार्यक्रमाचे पुनरावलोकनाबाबत जिल्‍हाधिकारी यांचे समवेत बैठकीस उपस्थिती, दुपारी 3 वाजता आदिवासी विभागातील अधिका-यासह जिल्‍हयातील आदिवासी वस्‍तीगृहांना भेटी देणार आहे. सोईनुसार रामटेकडे प्रयाण करतील.

आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्‍यास पक्षकाराच्‍या
वेळ व पैश्‍याची बचत होते   
-         संध्‍या रायकर
           
196 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली                                     
वर्धा दि.10-राष्‍ट्रीय लोक अदालतीमार्फत आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्‍यास पक्षकारांचा वेळ व पैसा यांची बचत होऊन मानसिक समाधान मिळते असे प्रतिपादन जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण अध्‍यक्ष संध्‍या रायकर यांनी राष्‍ट्रीय लोक अदालत उद्घाटन प्रसंगी केले.
याप्रसंगी सर्व जिल्‍हा न्‍यायाधिश, सर्व दिवाणी नयायाधिश, शासकिय अधियोक्‍ता जी.व्‍ही. तकवाले, अधियोक्‍ता संघाचे अध्‍यक्ष अमोल कोटंबकर व सदस्‍य , न्‍यायालय व्‍यवस्‍थापक सुनिल पिंपळे, विधी व सेवा प्राधिकरणचे सदस्‍य सचिव सु.ना. राजुरकर उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्रीमती रायकर  म्‍हणाल्‍या, राष्‍ट्रीय लोक अदालतीचा मुख्‍य उद्देश म्‍हणजे न्‍यायालयात प्रलंबित प्रकरणांचा आणि वाद दाखलपुर्व प्रकरणांचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात निपटारा करणे हा आहे. लोक न्‍यायालयाच्‍या निवाडया विरुध्‍द अपील नाही. खटल्‍यामध्‍ये साक्षी पुरावा, उलटतपाणी, दिर्घ युक्‍तीवाद टाळला जातो. लोकन्‍यायालयामध्‍ये निकाली निघणा-या प्रकरणामध्‍ये कायदयानुसार कोर्ट फी ची रक्‍कम परत मिळते. आपसी समझोत्‍यामुळे तडा गेलेल्‍या मनांना जोडण्‍याचा प्रयत्‍न लोक अदालतच्‍या माध्‍यमातून केला जातो.  त्‍यामुळे दोन्‍ही कुंटूंबामध्‍ये पारिवारीक व सामाजिक स्‍नेह वाढतो.
या राष्‍ट्रीय लोक अदालत मध्‍ये जिल्‍हयात प्रलंबित प्रकरणापैकी 99  प्रकरणे तर वाद दाखलपूर्व प्रकरणापैकी 97 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्‍यात आले. विशेष म्‍हणजे या लोक अदालतीमध्‍ये निकाली काढण्‍यात आलेल्‍या प्रकरणामध्‍ये तडजोडीच्‍या रकमेचे मुल्‍य 92 लाख 14 हजार 813 इतके होते.
यावेळी जी.व्‍ही. तकवाले, यांनीसुध्‍दा विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे संचालन सु.ना. राजुरकर यांनी केले. कार्यक्रमाला अधिवक्‍ता समाजसेवक आणि न्‍यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Friday, 7 April 2017

सेवाग्राम विकास आराखडयातील कामाचे लवकरच भूमिपूजन                                                                      शैलेश नवाल
वर्धा, दि.7- सेवाग्राम विकास योजने अंतर्गत 266 कोटी 53 लाख 75 हजार रुपयाच्‍या सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्‍यात आलेला आहे. यासाठी  मुख्‍यमंत्र्यांनी 144 कोटी 99 लाख 75 हजार रुपयास मान्‍यता दिली आहे. यामध्‍ये पहिल्‍या टप्‍पयातील 34 कोटी 98 लाख 91 हजार रुपयांच्‍या विविध विकास कामाचे लवकरच भूमीपूजन करुन कामाला प्रारंभ करण्‍यात येईल. असे जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी  नुकतीच सेवाग्राम विकास आराखडया सबंधित घेण्‍यात आलेल्‍या जिल्‍हा स्‍तरीय कार्यकारी  समितीच्‍या बैठकित सांगितले.
यावेळी बैठकीला जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे , सेवाग्राम विकास आराखडयाच्‍या प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक सल्‍लागार निराअडारकर, अरुण काळे, पी.पी. पांडे सेवाग्राम आश्रमाचे अध्‍यक्ष जयवंत मठकर, सचिव जाधव, मगन संग्रहालयाच्‍या विभा गुप्‍ता, नयी तालीमच्‍या सुरष्‍मा शर्मा, प्रभाकर पुसदकर, एमगीरीच्‍या प्रगती गोखे, जिल्‍हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. मुन, नगर परिषदेच्‍या मुख्‍यकार्यकारी अधिकारी आश्विनी वाघमळे , सेवाग्रामच्‍या सरपंच रोशना जायलेकर उपस्थित होत्‍या.
यामध्‍ये आश्रमपरिसरातील सभागृह बांधकाम, यात्री निवास येथील पाण्‍याच्‍या टाकीचे बांधकाम, आश्रम व यात्रीनिवाच्‍या सरंक्षण भिंतीचे बांधकाम, पवनार येथील आश्रम सुशोभिकरण व बांधकाम व यात्रीनिवास येथिल सुविधा अशा विविध कामाचा समावेश असणार आहे.
           यावेळी श्री नवाल म्‍हणाले ग्राम पंचायतींनी रस्‍त्‍यावरील अतिक्रमीत हॉकर्स यांना रस्‍त्‍याच्‍या काही अंतरावर जागा उपलब्‍ध करुन  दुकाने बांधुन दयावी. यामुळे  रस्‍त्‍याचे अतिक्रमण हटविण्‍यास मदत होईल. तसेच  रस्‍त्‍याचे सौदर्यीकरण करुन पादचारी मार्गाचे बांधकाम करणे सोईचे होईल. अशा सुचना सेवाग्रामच्‍या सरपंच यांना दिल्‍यात. पवनार ते सेवाग्राम रस्‍त्‍याचे चौपद्रीकरण करण्‍यात येणार आहे. सेवाग्राम ते गांधी चौक पर्यंत रस्‍त्‍याच्‍या  दुतर्फा सौदर्यीकरण करुन पादचारी वाट तयार करण्‍यात येणार आहे. तसेच सेवाग्राम येथील अण्‍णा तलावाचे सुशोभीकरण करण्‍यात येणार आहे.असेही जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
यावेळी बैठकीत श्रीमती अराडकर यांनी  सेवाग्राम येथे येणा-या पर्यंटकांसाठी सेवाग्राम – गांधी चौक- बाबासाहेब आं‍बेडकर चौक- बसस्‍टॅड-रेल्‍वे स्‍टेशन – मगनसंग्रहालय- एमगीरी- लक्ष्‍मीनारायन मंदिर – पोष्‍ट ऑफीस चौक- गांधी ज्ञान मंदिर गांधी चौक या रस्‍त्‍यावर दुतर्फा सौदर्यीकरण पादचारी वाट करण्‍याच्‍या पॉवर पॉईंट  व्‍दारे सादरीकरण केले.