Friday 18 August 2017



तीन वर्षात सर्व शेतक-यांचे कृषी पंप सौर उर्जेवर चालविणार
                                                              -चंद्रशेखर बावनकुळे
            वर्धा दि 18 (जिमाका) येत्‍या तीन वर्षात जिल्‍हयातील सर्व शेतक-यांचे कृषिपंप सौर ऊर्जेवर चालविण्‍यात येणार आहे. यासाठी प्रत्‍येक गावामध्‍ये सौर विज प्रकल्‍प उभारण्‍यात येणार आहे. तसेच दलित वस्‍ती सुधार योजने अंतर्गत प्रत्‍येक गावात सौर पथदिवे, ग्रामपंचायत च्‍या नळ योजना आणि जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व शाळांना सौर विज पुरवठा कार्यान्वित करण्‍यात येणार असल्‍याचे  प्रतिपादन राज्‍याचे ऊर्जा व उत्‍पादन शुल्‍क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
आज विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय येथे विविध विद्युत उप केंद्राचे भूमी पूजन, लोकार्पण सोहळा व जनता अदालत  प्रसंगी ते बोलत होते. इंटीग्रेटेड पावर डेवलपमेंट योजने अंतर्गत भारत सरकारच्‍या शहरी विद्युत वितरण प्रणालीच्‍या सशक्‍तीकरणाच्‍या हेतून अल्‍लीपूर, तरोडा, हिंगणघाट, पुलगाव  व कारला चौक वर्धा येथे विद्युत उपकेद्राचे भूमीपूजन व खरांगना, मांडगाव व गिरोली उपकेद्राचे लोकापर्ण सोहळयाचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष नितीन मडावी , नगराध्‍यक्ष अतुल तराळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य पंकज सायंकार, विद्युत विभागाचे विभागीय संचालक श्री.खंडाईत, अधिक्षक अभियंता श्री. देशपांडे उपस्थित होते.
          प्रत्‍येक नागरिकाला घरगुती 24 तास विद्युत पुरवठा देण्‍यात यावा तसेच कृषी पंपासाठीचा 8 तासाचे वर विद्युत पुरवठा खंडीत करु नये, असे निर्देश असतांना काही ग्रामीण भागात 8 तासाचे वर विज पुरवठा ख‍ंडित केल्‍याबाबत यावेळी विद्युत विभागाच्‍या अधिका-याविषयी नाराजी व्‍यक्‍त करुन यापूढे असा प्रकार घडल्‍यास अधिका-यांच्‍या वेतनवाढी थांबविण्‍यात येणार असल्‍याचे यावेळी श्री. बावनकुळे म्‍हणाले. जिल्‍हयातील 68 हजार शेतक-यांना सौर विज कृषिपंप देण्‍यात येणार असून यासाठी शेतक-यांनी अर्ज करावे. वर्दळीच्‍या ठिकाणी असलेल्‍या जागेवरील विद्युत खांब, रोहित्र व तारामुळे सामान्‍य नागरिकांना त्रास होऊन अपघात होण्‍याची शक्‍यता असते यासाठी  विद्युत विभागांनी अपघातस्‍थळावरील विद्युत तारा , रेाहीत्र व खांब तात्‍काळ दुसरीकडे स्‍थानांतरीत करावे.
          प्रत्‍येक नागरिकाला केवळ विज जोडणीचे अनामत रककमच घेऊन विज जोडणी दयावी. विद्युत खांब किंवा विद्युत तारा जोडणीची रक्‍कम घेऊ नये अशाही सुचना यावेळी दिल्‍यात. वर्धा जिल्‍हात 2030 पर्यंत विद्युतीकरण  पुर्ण होईल. यासाठी जिल्‍हयाला 200 कोटी रुपये उपलब्‍ध झाले आहे. यामध्‍ये आणखी 250 रुपये  कोटीची आवश्‍यकता असून लवकरच उपलब्‍ध करुण देण्‍यात येणार आहे. ज्‍या शेतक-याला शाश्‍वत विज दिली जाणार नाही त्‍या अधिका-यांवर कठोर कारवाई करण्‍यात येर्इल असा इशारा त्‍यांनी यावेळी दिला.
          जिल्‍हयात 86 कोटी रुपयाचे देयक शेतक-यांकडे थकित असतांनाही  शेतक-यांची विज कापण्‍यात आली नाही.  जिल्‍हयात दोन वर्षात 9 हजार 500 विज कनेक्‍शन देण्‍यात आले असून केवळ 2 हजार 300 कनेक्‍शन बाकी आहे.   यावेळी विद्युत विभागाशी संबधित 270  नागरिकांनी तक्रारी दाखल केल्‍या. सर्वच तक्रारीचे मं‍त्रीमहोदयानी निराकरण केले. यापुढे प्रत्‍येक शाखा अभियंत्‍यांनी  महिन्‍यातून एकदा ग्राहक मेळाव्‍याचे आयोजन करावे. तसेच कार्यकारी अभियत्‍यांनी ग्राहक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्राहक सेवेचे व्रत जोपासावे, असेही  श्री. बावनकुळे म्‍हणाले.
          कार्यक्रमाला विद्युत विभागाचे अधिकारी , कर्मचारी, नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
                                               



Wednesday 16 August 2017

लोकसहभागातून मोठे काम उभे होऊ शकते
-महादेव जानकर
 स्वाेतंत्र दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
वर्धा दि.16 (जिमाका) – जिल्हरयात मागील तीन वर्षात शासन, सामाजिक संस्था व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे 3 लक्ष 50 हजार दक्षलक्ष घन मीटर पाणी साठा क्षमता निर्माण झाली आहे. ही जिल्हयासाठी समाधानाची बाब असून जल-जंगल- जमीन या तीन बा‍बींवर शासन आणि लोकसहभागातून मोठे काम उभे होऊ शकते, हेच जिल्हयातील नागरिकांनी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धपविकास व मत्य्या विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
स्वा्तंत्र दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकिय ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महादेव जानकर यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यंक्ष नितीन मडावी , जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक निर्मलादेवी एस. ,मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे उपस्थित होते.
पाणी फाऊंडेशनच्या् वतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत काकडदरा या गावाने राज्यातून पहिले 50 लक्ष रुपयांचे बक्षिस मिळविले यासाठी श्री जानकर यांनी गावक-यांचे अभिनंदन केले. पर्यावरणाचा ढासळणारा समतोल सावरण्यासाठी वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्पं केला. हा संकल्पा पूर्ण करण्यासाठी वर्धेरांनी उत्फुर्तपणे सहभाग देऊन रेकार्डब्रेक 12 लक्ष 38 हजार वृक्ष लागवड केली. यासाठी शासकिय विभागासोबतच शैक्षणिक संस्था , सामाजिक संस्थाा आणि नागरिकांचे अभिनंदन केले.
स्वच्‍छ भारत अभियानातर्गत वर्धा जिल्हयातील सर्व 513 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या‍ आहेत. तसेच प्रगतशैक्षणिक महाराष्ट्र् कार्यक्रमातर्गत जिल्हाा परिषदेच्या 90 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. यासाठी विशेष सहकार्य करणा-या जानकीदेवी बजाज संस्थेचे आभार व्यक्त करुन विकासाच्या प्रक्रियेत जनतेने यापूढेही असेच सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हयातील संक्षिप्त माहिती देणारी आपला जिल्हा् वर्धा ही पुस्तिका तसेच प्रधानमंत्री मुद्रा योजना पुस्तिका जिल्हा माहिती कार्यालयाचे वतीने तयार करण्याात आल्या् या पुस्तकेचे प्रकाशन यावेळी मंत्री महोदयांचे हस्तेा करण्यात आले.
पोलिस उपअधिक्षक सुभाष सावंत यांना गुणवत्ता पुर्ण सेवेबद्दल 2017 चे राष्ट्रपती पदक जाहिर झाले. याबद्दल श्री. सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच विश्वनाथ वसंत मोहुर्ले (पो.नि.), सुधिर कोडापे (स.पो.नि.) , गोविंद रेहपाडे , दिलीप चरडे यांनी नक्षलग्रस्त भागात सलग दोन वर्ष खडतर सेवा केली याबद्दल त्यांना महाराष्ट. राज्याचे विशेष सेवा पदक जाहिर झाले यासाठी त्यांचे मंत्रीमहोदयाचे हस्ते सत्कार करण्या त आला.
4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात विशेष सहभाग दिलेल्या व्यक्ती् व संस्था् तसेच राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्का र प्राप्त गावांचा गावचे सरपंच व सचिव तसेच आय.एस.ओ. मानांकन प्राप्त शाळाच्या मुख्याकद्यापकांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यायत आला.
यावेळी परिविक्षाधिन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण् पांचाळ अतिरिक्त, जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, उपविभागीय अधिकारी संगिता राठोड, उप वनसंरक्षक दिंगाबर पगार, अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा पुनर्वसन अधिकारी राजलक्ष्मी शहा, पत्रकार, अधिकारी ,कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.