Thursday, 21 April 2016

महालोक अदालतीचे संध्या रायकर यांच्याहस्ते उद्घाटन
             वर्धा, दिनांक 09 –   जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष संध्या रायकर यांच्याहस्ते महालोक अदालतीचे जिल्हा न्यायालय परिसरातील नवीन इमारतीच्या सभागृहात उद्घाटन आज, शनिवार, दि.09 रोजी करण्यात आले.
             सकाळी 10 वाजता जिल्हा न्यायालय परिसरातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या नवीन इमारतीत महालोक अदालतीचे उद्घाटन झाले. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष प्र.म. देशपांडे, विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सु.ना. राजूरकर, जिल्हा न्यायाधीश-1 अ.मु.चांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.   
             प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास पोलिस निरीक्षक मुरलीधर बुराडे,  जिल्हा भूसंपादन अधिकारी, सर्व न्यायिक अधिकारी, अधिवक्ता, सामाजिक कार्यकर्ते,  पक्षकार, वित्तीय संस्थांचे सदस्य उपस्थित होते.
       *****




No comments:

Post a Comment