Wednesday 20 July 2011

शेतकरी आत्महत्याचे एक प्रकरण मदतीस पात्र

        महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी  पत्रक                 जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि.20 जूलै  2011
------------------------------------------------------------------
     वर्धा, दि. 20- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी जयश्री भोज यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी आत्महत्या समितीची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्याचे एक प्रकरण मंजूर करण्यात आले.
          याप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष सुनिल राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, मुख्य कार्यपालन अधिकारी बि.एम.मोहन, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले,जिल्हा शल्य चिकित्सक रत्ना रावखंडे, डॉ.नंदकिशोर तोटे, अनिल मेघे आदि मान्यवर उपस्थित होते.
          समिती  पुढे आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे सात प्रकरणे ठेवण्यात आली, त्यापैकी 5 प्रकरणे कर्जबाजारी, कर्जाचा तगादा व नापिकी या शासनाने निर्धारीत केलेल्या कारणाने अपात्र ठरविण्यात आली. कृषि अधिक्षक यांच्या अहवालासाठी रुख्माबाई अंड्रस्कर यांचे प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले असून, कारंजा तालुक्यातील उमरी येथील शेतकरी उमेश डोंगरे यांचे प्रकरण मदतीस पात्र ठरविण्यात आले आहे.
                                                000000

No comments:

Post a Comment