वर्धाः
दि.9- राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील आज दिनांक 10 फेब्रुवारी,2013 रोजी वर्धेत
सकाळी 9 वाजून 45 मि. नागपूर येथून शासकीय विश्रामगृह वर्धा येथे मोटारीने आगमन
होईल. सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी ग्रेस
पार्टी पदाधिकारी व कार्यकत्यांच्या
भेटी घेतील. सकाळी 11 वाजून 15 मि. वा नागरी सुरक्षा जनजागृती अभियान सोहळ्याचे उदघाटन
कार्यक्रमाला उपस्थित राहतील स्थळ होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्र,वर्धा
दूपारी 12.30 वाजता सेवाग्राम आश्रम वर्धा येथे भेट, दुपारी 1.30 राखीव,
दूपारी 2.45 मि. राष्ट्रभाषा प्रचार
समिती कार्यालय,वर्धा कडे ते मोटारीने प्रयाण करतील दुपारी 3.00 वाजता 23 वे अखिल भारतीय राष्ट्रभाषा
प्रचार समितीचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती.सायंकाळी 5.15 मि. मोटारीने नागपूरकडे
प्रयाण करतील.
Saturday, 9 February 2013
Wednesday, 6 February 2013
मेळघाटात कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सुसज्ज हॉस्पीटल बांधणार - डॉ. श्रीमती एस.छाबडा
उतावली
येथे रोगनिदान व उपचार शिबीर
वर्धा, दिनांक 6 – कस्तुरबा हेल्थ
सोसायटी तर्फे महात्मा गांधी आदिवासी
दवाखाना तसेच माता व शिशु
रुग्णालयाच्या माध्यमातून मेळघाटातील
रुग्णांना सर्व वैद्यकीय सुविधा
एकत्र उपलब्ध करुन
देण्यासाठी उतावली येथे
सुसज्ज रुग्णालय बांधण्यात
येत असल्याची माहिती वर्धा
येथील कस्तुरबा हेल्थ
सोसायटीच्या प्रकल्प प्रमुख
डॉ. श्रीमती एस.छाबडा यांनी
आज दिली.
मेळघाटातील अतीदुर्गम
भागात राहणा-या आदीवासींना
तसेच महिला व बालकांना चांगल्या
वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात
यासाठी महात्मा गांधी
आदीवासी दवाखाना व शिशु रुग्णालय सुरु करण्यात आले असून, उतावली
येथे पंचेवीस खाटांचे
सुसज्ज रुग्णालय बांधण्यासाठी
साडेसात एकर जमीन खरेदी करण्यात
आली आहे. भविष्यात शंभर
खाटांचे सुसज्ज रुग्णालय
कस्तुरबा हेल्थ सोसायटी तर्फे
बांधण्याचा मानस असल्याचेही डॉ. श्रीमती
एस.छाबरा यांनी सांगितले.
मेळघाटातील
अतिदुर्गम अशा गावातील बाल आरोग्यासोबत कुपोषण
दूर करण्यासाठी बावन
गांवे दत्तक घेण्यात येणार असून, वर्धा येथील कस्तुरबा हेल्थ
सोसायटी रुग्णालयातील बारा
तज्ञ डॉक्टरांची चमू
उतावली येथील रुग्णालयात
सेवा देत असल्याचेही त्यांनी
यावेळी सांगितले.
भव्य रोगनिदान व
उपचार शिबीर
महात्मा गांधी
आदीवासी दवाखाना उतावली येथे
दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रेाजी सकाळी 8
वाजतापासून रोगनिदान
व उपचार तसेच शसत्रक्रिया शिबीराचे
आयेाजन करण्यता आले आहे. या शिबीरासाठी
कस्तुरबा सोसायटी हेल्थचे अध्यक्ष
धिरुभाई मेहता , उपाध्यक्ष श्रीपत
हलबे विशेष उपस्थित
राहणार आहेत.
मेळघाटातील
आदिवासींना वैद्यकीय
उपचारासाठी उतावली येथे बांधण्यात येणा-या रुगणालायासाठी मुंबईच्या
ब्रृहत भारतीय समाज या स्वंयसेवी
संस्थेव्दारे तीन कोटी
रुपयाची मदत देण्यात
आली आहे. ब्रृहत भारतीय समाज संस्थेचे
पदाधिकारीही दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रेाजी उपस्थित
राहणार असलयाचे माहिती कस्तुरबा
हेल्थ सोसायटीच्या प्रकल्प
प्रमुख डॉ. एस. छाबडा यांनी दिली.
000000
शास्वत पाणी पुरवठा योजनेमुळे कारंजा तालुका टँकर मुक्त
नारा बावीस प्रादेशिक योजना गुरुत्वा तत्वावर सुरु.
पंचेवीस गावांना एकत्र पाणी पुरवठा.
कार्यकारी
अभियंता डी.एल.बोरकर यांचा गौरव.
वर्धा,
दिनांक 6 – कारंजा तालुक्यातील टँकरग्रस्त
असलेल्या पंचेवीस
गावांसाठी नारा बावीस या
प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणींवर मात करुन
गुरुत्वाकर्षण तत्वावर आधारीत जिल्ह्यातील
पहिली योजना यशस्वीपणे कार्यान्वीत
झाल्यामुळे कारंजा तालुका हा टँकरमुक्त
झाला आहे.
कारंजा तालुका पिण्याच्या
पाण्याकरीता भूशास्त्रीय व भौतीकदृष्ट्या अती
कठीण असून, तालुक्यात भूजलावर आधारीत कुठेही शास्वत उदभव नसल्यामुळे ब-याच
गावांना टँकरने पाणी पुरवठा
करावा लागत होता. ग्रामीण पाणी पुरवठा
विभागातर्फे कार सिंचन प्रकल्पावरुन भुपृष्ठावरील
पाणी हा उदभव निवडून पंचेवीस
गावांसाठी नारा-बावीस ही योजना
सुरु करण्यात आली होती. परंतू या
योजनेमधील अडचणी दूर करुन
तसेच तांत्रीक बदल करुन तालुक्यात सतत व शास्वत
पाणी पुरवठा सुरु झाल्यामुळे टँकरमुक्त
तालुका झाला असल्याची माहिती
कार्यकारी अभियंता डी.एल. बोरकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेकडून विशेष गौरव
गुरुत्वाकर्षण तत्वावर
आधारीत बिनापंप नारा-बावीस
योजने अंतर्गत बोटोना व
बोरगांव (ढोले) या टँकरग्रस्त
असलेल्या गावांना या योजनेव्दारे पाणी पुरवठा
सुरु करण्यासोबतच कारंजा तालुका
टँकरमुक्त करण्यासाठी विशेष
योगदानाबद्दल ग्रामीण पाणी
पुरवठा विभागाचे कार्यकारी
अभियंता डी.एल. बोरकर यांचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर
ढगे व मुख्य
कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने यांच्या हस्ते
त्यांचा गौरव करण्यात आला.
कारंजा
तालुकयातील पंचेवीस गावांसाठी
प्रादेशिक पाणी पुरवठा
योजना कार्यान्वीत करण्यात
आली होती. परंतू या योजनेमध्ये तांत्रिक
त्त्रुट्या राहील्यामुळे पाणी पुरवठा
होण्यास अडचण निर्माण होत
होती. जानेवारी पासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने
पाणी पुरवठा करावा लागत होता.
नारा-बावीस या प्रादेशिक
पुरवठा येाजनेच्या प्रत्येक
बाबीचा सखोल तांत्रीक
अभ्यास करुन अस्तीत्वात असलेल्या
योजनेमधील त्रुट्या
दूर करुन व विशीष्ट तांत्रीक
बदल करुन ही योजना
दोन भागांमध्ये
विभागण्यात आली. तसेच
योजनेचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल
कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आला. तसेच बोरगाव ढोले
या भागात सुध्दा तांत्रिक बदल
करुन पाणी पुरवठा
नियमीत करण्यात आला.
गुरुत्वाकर्षण तत्वावर जिल्ह्यातील दोन गावांना
जलशुध्दीकरण केन्द्रामधील साठवण टाकीतून
सरळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे या योजनेवरील
विदृयुत खर्चात व देखभाल व दुरुस्ती खर्चावरही फार मोठी बचत होणार आहे. या योजनेच्या
पुर्नरुज्जीवनाचे काम
प्रगतीपथावर असून, एकोनवीस
टंचाईग्रस्त गावांना सुध्दा शासक
पाणी पुरवठा सुरु होईल. असेही
यावेळी कार्यकारी अभियंता
डी.एल. बोरकर यांनी सांगितले. ही
योजना यशस्वीपणे पुर्ण करण्यासाठी
ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे
उपविभागीय अधिकारी संजय बढीये यांचेही
महत्वपूर्ण योगदान आहे.
नारा-बावीस या
योजनेच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण
पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांचा विशेष
गौरव करण्यात आला असून, यावेळी जलव्यवस्थापन व स्वच्छता
समिती तसेच बांधकाम सभापती गोपाळराव कालोरकार , सभापती नंदकिशोर
कंगाले , श्रीमती निर्मलाताई बिजवे, गजानन निकम, सौ. वैशाली गोमासे , मंदाताई चौधरी, आदी यावेळी
उपस्थित होते.
000000000
Saturday, 2 February 2013
यशवंतरावांनी दिलेला सहकाराचा मुलमंत्र महाराष्ट्राला नवी दिशा देणारा - उल्हास पवार
·
यशवंत दाते स्मृती रोप्यमहोत्सवी
व्याख्यानमाला
वर्धा दि.2-
महाराष्ट्र मराठ्यांचे नव्हेतर मराठी माणसाचे राज्य व्हावे तसेच सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राची
सर्वांगिण प्रगती व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला सहकाराचा मूलमंत्र दिला. त्यांनी
विकासाची जी दिशा दिली त्यानुसार महाराष्ट्राची सर्वांगिण प्रगती शक्य असल्याचे
प्रतिपादन यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित बदलता
महाराष्ट्र आणि आपण या विषयावर सामाजिक
विचारवंत उल्हास पवार यांनी केले.
यशवंतराव
दाते स्मृती रोप्यमहोत्सवी व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुफतांना ते बोलत
होते. सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात दाते स्मृती संस्थेचे पुरस्कार
वितरणाचे आयोजनही करण्यात आले. यावेळी आद्य कादंबरीकार बाबा पद्मंजी साहित्य पुरस्कार
सोलापूरच्या टेंभुर्णे येथील प्राचार्य महिंद्र कदम, संत भगवान बाबा,काव्यसंग्रह
पुरस्कार लातुरचे रमेश चिल्ले , अंजनाबाई इंगळे, स्मृती स्त्रिवादी साहित्य पुरस्कार मुंबईच्या
श्रीमती संध्या नरे पवार,62 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. किशोर
सानत यांचाही यावेळी स्मृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राचे
पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात आयोजित व्याख्यानात
सामाजिक,राजकीय, सांस्कृतीक, महाराष्ट्रातील स्थित्यंतरे मांडतांना उल्हास
पवार म्हणाले की, संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राला फुले,शाहू,आंबेडकर यांच्या
विचाराने सत्य शोधतीय चळवळीचा वारसा लाभला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यावर सत्यशोधक
चळवळीचा प्रभाव असला तरी महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनी केलेले
कार्य कदापिही विसरता येणार नाही. पुरोगाती चळवळीला नवी दिशा देण्यासोबतच
सार्वभैमत्व स्विकारणारा विचार रुजवून
अधिक चांगले वातावरण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे आवाहनही त्यांनी
यावेळी केले.
यावेळी यशवंत
दाते स्मृती संस्थेच्या साहित्य पुरस्काराचे मानकरी श्रीमती संध्या नरे
पवार, महेन्द्र कदम,रमेश चिल्ले, डॉ. किशोर सानप यांनीही यावेळी मार्गदर्शन
केले.
प्रारंभी
उल्हास पवार यांनी दिप प्रज्वलित करुण व्याख्यानमालेचे उद्घाटन केले. प्रास्ताविकात
संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी व्याख्यानमालेच्या पंचवीस वर्षाचा आढावा
मांडला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.स्मिता वानखडे यांनी तर आभार संजय इंगळे तिगावकर
यांनी मानले. मानपत्राचे वाचन प्रा. राजेंद्र मुंडे व रंजना दाते यांनी केले.
यावेळी मोठ्या संखेने साहित्यप्रेमी उपस्थित होते.
000000
सात फेब्रुवारी रोजी माजी सैनिकांची आरोग्य तपासणी
वर्धा दि. 2 – ग्रामिण रुग्णालय पुलगांव
येथे गुरुवार दि. 7 फेब्रु. रोजी सकाळी 11 वाजेपासून लायंन्स क्लब वर्धा व्दारा
मोफत वैद्यकिय तपासणी व एक रँक एक पेंशन योजने अंतर्गत सूधारीत वेतन वाढ मिळण्यासंबधी
फॉर्म्स भरुन घेण्यात येणार आहे.
सर्व
माजी सैनिकांनी व विधवांनी त्यांचे सर्व पीपीओ, सेवापुस्तक, ओळखपत्र, अद्यावत
केलेले बँकेचे पासबुक व ई. सी. एच. एस. कार्ड व विधवा असल्यास जन्म तारखेचा व
पतीचे मृत्यु प्रमाणपत्र या सर्व कागदपत्राची झेरॉक्स घेवून ग्रामिण रुग्णालय,
पुलगांव येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा
यांनी केले आहे.
000000
Friday, 1 February 2013
बीबीएफ पध्दतीमुळे एक हजार हेक्टर क्षेत्रातील कापसाच्या उत्पादनात भरीव वाढ
* विदर्भ प्रवाही सिंचन विकास कार्यक्रम
* 54 गावातील 1 हजार 150 हेक्टरवर
यशस्वी प्रयोग
* जिल्ह्यात पंन्नास हजार हेक्टर पर्यंत क्षेत्रात वापर
* शेतकरी समुहाला 48 बेडमेकरचे
वाटप
वर्धा दि.1- विदर्भ प्रवाही सिंचन विकास कार्यक्रमा अंतर्गत
रुंद सरी वरंभा पध्दत (बीबीएफ) तंत्रज्ञानाव्दारे जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर
54 गावातील 1 हजार 150 हेक्टर क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेण्यात आले असून
परंपरागत पध्दतीमध्ये बदल केल्यामुळे कापसाच्या उत्पादनात एकरी 3 ते 5
क्विंटलपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
बीबीएफ
हे तंत्रज्ञान उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्यामुळे शेतक-यांना
प्रशिक्षण देवून सुमारे 50 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात पुढील हंगामात
वापर करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा
अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली. तूर पिकासाठीही हे तंत्रज्ञान
उपयुक्त ठरले आहे.
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार वर्धा येथील कार्यक्रमासाठी आले
असता वर्धा जिल्ह्यातील बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुन कापूस उत्पादन वाढीच्या
उपक्रमाची माहिती घेतली. उत्पादन वाढीसाठी व कापसाला आवश्यक पाणी उपलब्ध करुण
देणा-या उपक्रमाची माहिती सर्व शेतक-यांना देवून या उपक्रमामध्ये सहभागी करुन
घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
वर्धा जिल्ह्यात सुमारे 1 लाख 65 हजार हेक्टर क्षेत्रात
कापसाची पेरणी केल्या जाते निर्सगाच्या अनियमिततेमुळे उत्पादनावरही त्याचा
विपरीत परिणाम होतो परंतु बीबीएफ तंत्रज्ञानाव्दारे पडलेल्या पावसामुळे बेडमेकर
यंत्राव्दारे तयार केलेला बेड ओला झाल्यानंतर पेरणी केल्या जाते. दोन बेडमध्ये
अंतर असल्यामुळे अतिपाऊस झाल्यास पाणी साचत नाही तसेच कमी पाऊस झाल्यास बेडमध्ये
पाणी शोसून ठेवता येते त्यामुळे पिकाच्या वाढीलाही मदत होते.
जिल्ह्यात शेतकरी समुहाला 48 बेडमेकर कृषी विभगातर्फे उपलब्ध करुण देण्यात
आले असून टॅक्टरला हे यंत्र जोडून शेतामध्ये बेड सहजपणे तयार करता येतात या
यंत्रामध्ये बदल करण्यात आला असून सरीच्या माथ्यावर पाणी अडविण्यासाठी तसेच
खत पेरणीही सुविधा उपलब्ध झाली आहे. बेडमेकरच्या माध्यमातून माती व शेणखत एकत्र
करुण बेड तयार करणे सहज सुलभ झाले आहे. बेडमेकरची किंमत 23 हजार 800 रुपये असल्यामुळे
शेतकरी समुह वैयक्तिकरित्यासुध्दा खरेदी करु शकतो.
50
हजार हेक्टर वर बीबीएफ
बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुण कापूस
उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्ह्यातील एक हजार हेक्टरवर उत्पादन
घेणा-या शेतक-यांचे अनुभव इतर शेतक-यापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच या तंत्राचा
प्रसार व्हावा म्हणून शेतकरी प्रशिक्षणाचे कार्यक्रम 15 मे पासून सुरु करण्यात
येत आहे.
बीबीएफ तंत्रज्ञान अभियाना अंतर्गत शंभर शेतक-यांचा गट करुण
प्रत्येक तालुक्यात या उपक्रमाची माहिती प्रत्यक्ष शेतक-यांना देण्यात येणार
आहे. या तंत्रज्ञानामुळे हेक्टरी 20 हजार रुपयापेक्षा जास्त उत्पादन घेणे सुलभ
असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी सांगीतले.
विदर्भ प्रवाही सिंचन कार्यक्रमा अंतर्गत शेतीला विशेषतः
कापूस उत्पादनासाठी सरासरी 750 ते 800 मि.मिटरी पावसाची गरज आहे. जिलह्यात प्रत्यक्ष
सरासरी एक हजार मि.मिटर पाऊस पडतो परंतु पाऊस कधी जास्त तर कधी कमी पडत असल्यामुळे
पावसाने विश्रांती दिली तर येणारे पीकही घेणे शक्य होत नाही. परंतु रुंद सरी
वरंभा पध्दतीमुळे शेतातील पाणी शेतातच साठवून ठेवणे शक्य होते. त्यामुळे
पिकानाही आवश्यकतेनुसार ओलावा मिळतो. असेही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
भाऊसाहेब ब-हाटे यांनी यावेळी सांगीतले.
0000
Tuesday, 29 January 2013
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शालेय परिवहन समितीचे गठण करणार - विजय चव्हाण
वर्धा दि.29- शालेय विद्यार्थी ये-जा करण्यासाठी आटो किंवा स्कुल बसने वापर
करतात विद्यार्थ्यांना अपघात होवू नये यासाठी शासनाने आटो व स्कूल बससाठी एका
परिपत्रकाव्दारे निर्देश जारी केलेले असून या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसाठी जिल्हास्तरावर शालेय
परिवहन समितीचे गठण करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
विजय चव्हाण यांनी आज दिली.
पोलीस मुख्यालयाच्या आशिर्वाद सभागृहात आज शाळेचे मुख्याध्यापक/प्राचार्य,
वाहतूक निरिक्षक, शिक्षण निरिक्षक, बसचे कत्राटदार व प्राधिकरणाचा प्रतिनिधी यांची
आढावा सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होत. यावेळी उपशिक्षणाधिकारी संजय यादजिरे,वाहतुक
निरिक्षक शशिकांत भंडारे मंचावर उपस्थित होते.
स्कूल बस व अॅटोच्या अपघातामध्ये शालेय
विद्यार्थी जखमी किंवा प्रसंगी प्राण त्यागू नये यासाठी शासनाने गांभिर्यपूर्वक
विचार केला असल्याचे नमूद करुन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण म्हणाले की 3
फेब्रुवारी,2013 पासून अवैधरित्या चालविण्यात येत असलेल्या स्कूलबस अथवा
अॅटोमध्ये क्षमतेनुसार वाहतूक होते अथवा नाही याची शहानिशा करण्यात येईल. तसेच
ज्या स्कूलबस व ऑटो नियमानुसार वाहतूक
करणार नाही त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल.प्रसंगी वाहतूकीच्या परवान्याचे
निलंबनसुध्दा करण्यात येईल.विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी
विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे मुख्याध्यापक
किंवा प्राचार्य , बसचालक,अॅटोचालक यांनी समन्वय ठेवण्याची गरज आहे. क्षमतेच्या
अधिक शालेय विद्यार्थी बसणार नाही यासाठी वाहतूक विभागाकडून लक्षठेवण्यात येणार
आहे.
वाहतूक विभागाचे निरिक्षक प्रत्येक शाळेसमोर आकस्मिकरित्या उभे
राहून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूकीबाबत खात्री करण्यात येईल. शासनाच्या
निर्देशानुसार शालेय परिवहन समितीचे गठण करण्यात येणार असून त्या समितीचे अध्यक्ष,
मुख्याध्यापक किंवा प्राचार्य सदस्य म्हणून पालक व शिक्षक संघटनेचा एक
प्रतिनिधी, ज्या परिसरात शाळा असेल त्या
भागातील वाहतूक निरिक्षक,शिक्षण निरिक्षक, बस कंत्राटदार, किंवा त्यांचा
प्रतिनिधी, स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी व सहाय्यक मोटर वाहन निरिक्षक यांचा
समावेश असेल. या समितीची बैठक तीन महिन्यातून एकदा घेण्यात येणार असून शाळेचे
सत्र सुरु होण्यापूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या समितीचे कर्तव्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची
सुरक्षितता, ने-आण यावर देखरेख ठेवणे, परिवहन शुल्क आकारणेबाबत धोरण निश्चित
करणे,स्कूलबस करीता भाडे निश्चित करणे, वाहनाच्या कागदपत्राची पडताळणी करणे अग्नीक्षमण यंत्रणा वाहनामध्ये बसविल्याची खात्री करणे,
वाहनामध्ये प्रथोमपचार आहे किंवा नाही याची खात्री करणे, आदि बाबींचा समावेश आहे.
या निर्देशामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूकीवर सकारात्मक परिणाम दिसून
येवून भविष्यातील घडणा-या अपघाताला निश्चितच आळा बसेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी वाहतूक पोलीस निरिक्षक शशिकांत भंडारे व उपशिक्षणाधिकारी यादगीरे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित
संघटनेच्या पदाधिका-यांनी शंकेचे निरासरन
करुन घेतले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार वाहतूक निरिक्षक संजय पाटील
यांनी केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक व पालक उपस्थित
होते.
000000
Subscribe to:
Posts (Atom)

