Saturday, 12 January 2013

अण्‍णासाहेब भिसीकर यांच्‍या निरामय जीवनाची शतकपूर्ती


       वर्धा दि.12- पूर्वीच्‍या प्रसिध्‍दी व आताच्‍या माहिती व जनसंपर्क विभागात उपसंचालक पदावरुन निवृत्‍त झाल्‍यानंतरही कॅन्‍सर रिलिफ सोसायटी,ग्राहक संरक्षण मंच आणि मुकबधीर विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणासह सामाजिक कार्यात समरस झालेल्‍या मुकूंद प.ऊर्फ अण्‍णासाहेब भिसीकर यांनी निरामय जीवनाची शतकपूर्ती पूर्ण केली आहे. आज त्‍यांचा 101 वा वाढदिवस साजरा होत आहे.
तेव्‍हाच्‍या मध्‍य प्रांताच्‍या प्रशासनामध्‍ये व त्‍यानंतर महाराष्‍ट्राच्‍या प्रसिध्‍दी संचालनालयात  एक आदर्श प्रसिध्‍दी अधिकारी म्‍हणून आपल्‍या कर्तव्‍याने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रसिध्‍दी विभाग हा पूर्वी महसुल विभागात सौलग्‍न होता आणि वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द झालेल्‍या बातम्‍या इंग्रजीमध्‍ये अनुवादित करुण देण्‍याचे काम होते. 1937 मध्‍ये अनुवादक त्‍यानंतर सहाय्यक प्रसिध्‍दी अधिकारी म्‍हणून अण्‍णासाहेब भिसीकर यांनी प्रसिध्‍दी विभागात आपल्‍या कामाची सुरुवात केली. कुटूंबकल्‍याण,आदिवासी विकास व लॉटरी सारखा विषय विशेष प्रसिध्‍दी मोहिमेच्‍या माध्‍यमातून जनतेच्‍या मनांवर बिंबवण्‍याचं त्‍यांनी या विभागात कार्यरत असतांना यशस्‍वीपणे पूर्ण केले. प्रसिध्‍दी मोहिम कशी राबवावी याचा आदर्श जनसंपर्क क्षेत्रात काम करणा-यासाठी मार्गदर्शकच आहे. अण्‍णासाहेब जानेवारी 1971 मध्‍ये प्रसिध्‍दी उपसंचालक म्‍हणून मुंबई मंत्रालयातून सेवानिवृत्‍त झाले.
अणासाहेब सेवानिवृत्‍तीनंतर विदर्भ कॅन्‍सर रिलिफ सोसायटीचे सलग पाच वर्ष सदस्‍य म्‍हणून तसेच ग्राहक संरक्षण समितीचे अध्‍यक्ष व त्‍यानंतर शंकर नगर मुकबधीर विद्यालयाचे उपाध्‍यक्ष म्‍हणूनही आपल्‍या कामातील वेगळी छाप निर्माण केली आहे.
          वयाची शंभरीपूर्ण केल्‍यानंतरही  सामाजिक कार्यासोबत आरोग्‍य विषयक मार्गदर्शनाचे काम अव्‍याहतपणे सुरु आहे. आज 13 जानेवारी रोजी त्‍यांच्‍या वयाला शंभर वर्ष पूर्ण होऊन 101 व्‍या वर्षात पर्दापण करीत आहे. निरामय जीवनाची शतकपूर्ती ही वृत्‍तपत्र क्षेत्रातील सर्वांसाठी महत्‍वपूर्ण घटना आहे.
00000

Wednesday, 9 January 2013

सिंदी मेघे व पिंपळगांव येथे म्‍हाडाची योजना सूरु करणार




                                                              - सचिन अहिर
        वर्धा दि. 9 – भविष्‍यातील घरांची परिस्थिती बिकट होणार असून या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी वर्धा मालुक्‍यातील सिंदी मेघे व हिंगणघाट तालुक्‍यातील पिंपळगांव येथे नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून लवकरच दोन ठिकाणी गृहनिर्माण योजना सूरु करण्‍यात येतील अशी माहिती गृहनिर्माण, उद्योग, सामाजिक न्‍याय व पर्यावरण राज्‍यमंत्री सचिन अहिर यांनी दिली.
     जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आज उद्योग, सामाजिक न्‍याय पर्यावरण व गृह निमार्ण विभागाच्‍या कामकाजाबाबत आढावा घेण्‍यात आला त्‍या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी एन नवीन सोना, निवासी उपजिल्‍हाधिकारी सुनिल गाडे, उपजिल्‍हाधिकारी मेश्राम, अप्‍पर पोलीस अधिक्षक टी.एस.गेडाम, प्रकल्‍प अधिकारी बी.एम.मोहन, उपविभागीय अधिकारी उमेश काळे, हरीष धार्मीक, समाजकल्‍याण  अधिकारी, जया राऊत, तहसिलदार सुधांशु बन्‍सोड, नगर पालिका मुख्‍याधिकारी आदी मान्‍यवर उपस्थितीत होते.
            शहराच्‍या वाढत्‍या विस्‍तारीकरणामुळे तसेच लोकसख्‍यावाढीमूळे शहरा लगत असलेल्‍या ग्रामीण क्षेत्रामध्‍ये म्‍हाडाची योजना सुरू करण्‍याचा प्रस्‍ताव असल्‍याचे नमूद करून सामाजिक न्‍याय मंत्री सचित अहिर म्‍हणाले की, वर्धा तालूक्‍यातील मौजा सिंदीमेघे येथे सर्व्‍हे कमांक 159 व 160 मधील 8.40 हेक्‍टर आर जमीन व हिंगणघाट तालूक्‍यातील मौजा पिंपळगांव येथील सर्व्‍हे क्र.157/ , 165 ते 168 ,190 ते 192 मधील भुखंड म्‍हाडा योजने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी मिळणार आहे. हया बाबतची प्रक्रीया सुरू झाली असून लवकरच या योजनेला मंजूरी प्रदान करण्‍यात येईल.
            सिंदीमेघे येथील जमिन मंजूरीसाठीच्‍या प्रस्‍तावावर कार्यवाही सूरु आहे. पिंपळगांव येथील प्रस्‍ताव 2008 मध्‍ये म्‍हाडाला सादर करण्‍यात आला होता.तथापी आता मात्र नव्‍याने सिध्र गणक मुल्‍यानूसार म्‍हाडाने महसूल खात्‍याकडे तातडीने रक्‍कम जमा करावी असे आदेश यावेळी त्‍यांनी दिले.
           यावेळी त्‍यांनी शिष्‍यवृत्‍ती व उद्योग विभागाचा आढावा घेतला. पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र गौणखनन  रेती घाटासाठी आवश्‍यक असल्‍याचे सागून रेती घाट व गौण खणणाना बाबत असलेल्‍या आक्षेपाचे निराकरण मंत्रालय सतरावरून करण्‍यात येईल असेही ते म्‍हणाले.
यावेळी जिल्‍हाधिकारी सोना यांनी जिल्‍हयातील आधार कार्ड बाबतची माहिती देवून शाळा व महाविद्यालयातील शिष्‍यवृत्‍ती धारकाचे आधार कार्ड काढण्‍यासाठी कसोशीचे प्रयत्‍न सुरू असल्‍याचे सागून ते म्‍हणाले की, वर्धा जिल्‍हा हा आधार कार्डसाठी पायलट जिल्‍हा  घोषीत झाला आहे. शिष्‍यवृत्‍ती व जननी सुरक्षा योजना हया प्रामूख्‍याने राबवायचे असून जिल्‍हा समाज कल्‍याण विभागात  अपूरा कर्मचारी वर्ग असल्‍यामुळे शिष्‍यवृत्‍ती धारकाचे आधार कार्ड काढण्‍याचे कामे सुरळीत होण्‍यासाठी इतर जिल्‍हयायातून कर्मचारी वर्ग प्रतिनियुक्‍तीवर पाठविण्‍याची विनंती त्‍यांनी केली.
                             0000

ध्‍वजदिन निधी संकलन शुभारंभ 10 जानेवारी रोजी



वर्धाः- देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित ठेवणा-या आजी, माजी सैनिक तसेच त्‍यांचे कुटूंबीयांच्‍या व अपंग सैनिकांच्‍या पुनर्वसनासाठी निधीची आवश्‍यकता असेते. त्‍यासाठी सशस्‍त्र सेना ध्‍वजदिन दरवर्षी साजरा करण्‍यात येत असतो. यावर्षी गुरुवार दिनांक.10 जानेवारी 2013 रोजी सकाळी 11 वाजता विकास भवन येथे जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांचे अध्‍यक्षतेखाली सशस्‍त्र सेना ध्‍वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ होत आहे.
            यावेळी जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने यांची प्रमुख उपस्थिती राहील. सदर कार्यक्रमासोबतच माजी सैनिकांच्‍या मेळाव्‍याचे  देखील आयोजन करण्‍यात आले आहे. तरी सदर कार्यक्रमास जिल्‍हयातील आजी व माजी  सैनिक, त्‍यांचे अवलंबित व नागरिकांनी उपस्थित राहुन हा कार्यक्रम यशस्‍वी करावा,असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी वर्धा यांनी केले आहे.
000

Sunday, 6 January 2013

समाजातील दुरावस्‍तेवर आघात करण्‍यासाठी माघ्‍यमांची गरज - डॉ.वेदप्रकाश मिश्रा


                                              वर्धा जिल्‍हा श्रमिक पत्रकार संघाच्‍या
                           चौथा स्‍तंभ पुरस्‍काराचे वितरण 
           वर्धा दि.6-पत्रकार क्षेत्रात काम करीत असतांना अध्‍ययन,आकलन आणि निराकरण या गोष्‍टी महत्‍वाच्‍या असून समाजातील दुराव्‍यवस्‍थेवर आघात करण्‍यासाठी माध्‍यमांची महत्‍वाची भूमिका असल्‍याचे प्रतिपादन दत्‍ता मेघे आयुविज्ञान संस्‍थेचे प्र.कुलगुरु डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.  
         विकासभवन येथे मराठी पत्रकार दिन तसेच बाळशास्‍त्री जांभेकर व्दिजन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त वर्धा श्रमिक पत्रकार संघातर्फे दिल्‍या जाणारा चौथा स्‍तंभ पुरस्‍कार समारंभ प्रमुख वक्‍ते म्‍हणून डॉ.मिश्रा बोलत होते.
          चौथा स्‍तंभ पुरस्‍कार हिंगणघाट  येथील समाजसेवक नामदेवराव  कठाणे यांना यावेळी प्रदान करण्‍यात आला. पुरस्‍कारामध्‍ये शाल,श्रीफळ,स्‍मृतिचिन्‍ह व पाच हजार रोख रुपयाचा समावेश आहे.
अध्‍यक्षस्‍थानी सेवाग्राम आश्रमचे अध्‍यक्ष अॅड मा.म.गडकरी होते तर प्रमुख पाहुणेम्‍हणून  शेतकरी नेते विजय जावंधीया, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, पत्रकार संघाचे अध्‍यक्ष प्रविण धोपटे उपस्थित होते.  
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्‍हणाले की, समाजात प्रगल्‍पता निर्माण करण्‍याचे कार्य महत्‍वाचे आहे. श्रमिक पत्रकार संघाच्‍या वतीने करण्‍यात आलेला सत्‍कार हा उदारतेचा आणि मानवतेचा सत्‍कार आहे. विद्यमान परिस्थितीत चेतना निर्मितीचा बोध आज चिंतनाचा विषय झाला आहे. समाजातील दुरावस्‍तेवर आघात करण्‍यासाठी चौथ्‍या स्‍तंभाची गरज आहे
पत्रकार क्षेत्रात काम करीत असतांना अध्‍ययन आकलन आणि निराकरण या गोष्‍टी महत्‍वाच्‍या असतात हे त्‍यांनी पटवून दिले. समाज सतप्रवृत्‍तीवर टिकूण आहे असे त्‍यांनी सांगितले समाज स्‍वार्थावर जगू शकत नाही त्‍याला परमार्थाची जोडही असावी लागते असे ते म्‍हणाले स्‍वतःला भुक लागली त्‍यासाठी अन्‍न मिळविणे ही प्रकृती आहे. दुस-याचे अन्‍न हिसकावणे ही विकृती तर स्‍वतःहा भुके राहून दुस-याला अन्‍न देणे ही संस्‍कृती असल्‍याचे ते म्‍हणाले.
 आपण वैद्यकीय शास्‍त्राचे अध्‍यापक असल्‍याने दुस-याचे दुःख आपण  घेवू शकत नाही ते आपल्‍याला चांगल्‍या प्रकारे ठावूक आहे. परंतु भावनेनी त्‍या गोष्‍टी समजून घ्‍याव्‍या लागतात. पत्रकार संघाने या गोष्‍टी समजून घेवून नामदेवराव कठाणे यांनी केलेल्‍या कामाच्‍या भावना समजून त्‍यांचा जो सत्‍कार केला ही बाब गौरवाची आहे असे सांगून नामदेवराव कठाणे यांच्‍या कार्यास शुभेच्‍छा दिल्‍या.
 जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी पत्रकारासाठी   स्‍वर्गीय  शंकरराव चव्‍हाण पत्रकार कल्‍याण निधीची स्‍थापना करण्‍यात आली असून यामधून पत्राकारांना सहाय्य करण्‍याचे काम केल्‍या जाते या योजनेचा लाभ पत्रकारांनी घ्‍यावा असे आवाहन केले. वर्धेतील पत्रकार सकारात्‍मक बाजू मांडणारे असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगून त्‍यांनी पत्रकार दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
          कार्यक्रमाचे अध्‍यक्ष मा.म.गडकरी यांनी महात्‍मा गांधी यांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्‍याचे काम पत्रकारांनी करावे असे आवाहन केले. तसेच हिंगणघाट येथील समाजसेवक नामदेवराव कठाणे यांचा केलेला सत्‍कार अभिमानाची बाब असल्‍याचे सांगितले. प्रास्‍ताविकातून प्रविण धोपटे यांनी चौथा स्‍तंभ पुरस्‍कारा मागील भूमिका विषद केली. संचालन आनंद इंगोले यांनी तर आभार चेतन कोवळे यांनी मानले.
कार्यक्रमाला संजय इंगळे तिगावकर,पंकज भोयर, बुध्‍ददास मिरगे, प्रमोद गिरडकर,गुणवंत ठाकरे, आदिंची उपस्थिती होती.
00000

Saturday, 5 January 2013

रोजगार हमी योजनेतील मजुरांची रक्‍कम यापुढे मजुरांच्‍या बँक खात्‍यात जमा - आयुक्‍त


                   वर्धा दि.5 – केंद्र पुरस्‍कृत महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्‍यातील चार जिल्‍हे प्रायोगिक तत्‍वावर घेण्‍यात आली असून त्‍यामध्‍ये पुणे,नंदुरबार,अमरावती व वर्धा या जिल्‍ह्याचा समावेश आहे.या योजनेअंतर्गत  अमरावती व वर्धा जिल्‍ह्यातील तालुका निहाय दोन गावांची निवड करण्‍यात आली आहे. या गावातील काम करणा-या मजुरांची रक्‍कम थेट त्‍यांच्‍या बँक खात्‍यामध्‍ये येत्‍या 26 जानेवारी पासून जमा करण्‍यात येणार असल्‍याची माहिती महात्‍मा गांधी रोजगार हमी योजनेचे आयुक्‍त एस.संकरनारायण यांनी दिली.
ईलेक्‍ट्रानिक निधी व्‍यवस्‍थापन पध्‍दतीवर आज विकास भवन येथे तहसीलदार,गटविकास अधिकारी,सहाय्यक लेखाधिकारी यांची कार्यशाळा संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी त्‍यांनी माहिती दिली. यावेळी उपसचिव आर.विमला,रोहयोचे उपजिल्‍हाधिकारी सानियार, उपजिल्‍हाधिकारी जे.बी.संगितराव व अमरावतीचे उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) बावणे आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
महाम्‍मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत ग्रामीण भागात मागेल त्‍या हाताला काम देण्‍याचा संकल्‍प केंद्र शासनाने यापूर्वीच जाहीर केला असल्‍याचे सांगून संकरनारायण म्‍हणाले की, आता अमरावती व वर्धा जिल्‍ह्याने आधार कार्ड व बॅक खाते उघडण्‍यासाठी नेत्रदिपक अशी कामगिरी केलेली आहे.त्‍यामुळे विदर्भातील अमरावती व वर्धा जिल्‍ह्याची निवड करण्‍यात आली आहे. ईलेक्‍ट्रानिक निधी व्‍यवस्‍थापन पध्‍दतीनुसार रोहयो अंतर्गत काम करणा-या मजुरांची मजुरी थेट त्‍यांच्‍या खात्‍यामध्‍ये जमा केली जाणार आहे. कामाचे मुल्‍यमापण केल्‍यानंतर त्‍या-त्‍या तालुक्‍याचे तहसीलदार व संवर्गविकास अधिका-या मार्फत मजुरीची रक्‍कम बँकेत जमा करण्‍यात येणार आहे.
मजुरांची मजुरी देण्‍यासाठी होणारा विलंब या पध्‍दतीने संपुष्‍टात येणार आहे. यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्‍यात येणार असून ग्रामसेवकांकडून गावातील मजुराचे नांव  कोणत्‍या बँकेत त्‍यांचे खाते आहे.तसेच त्‍यांचे खाते क्रमांक अचूक आहेत किंवा कसे याबाबत ग्रामसेवक खात्री करतील.
         वर्धा जिल्‍ह्यातील तालुकानिहाय माहितीनुसार तहसीलदार व संवर्गविकास अधिकारी यांनी  निवड केलेल्‍या गावामध्‍ये कंसाबाहेरील गावे ही संवर्गविकास अधिकारी यांनी तर तहसिलदार यांनी निवड केलेली गावे ही कंसामध्‍ये दर्शविली आहे.
         वर्धा तालुका येसंबा (आंजी मोठी) सेलू तालुका खापरी (केळझर) देवळी तालुका कोल्‍हापूर (नाचणगाव) आर्वी तालुका पिंपळखुटा(नांदोरा) आष्‍टी तालुका मोही
 (लहानआर्वी) कारंजा तालुका बोरी (जसापूर) हिंगणघाट तालुका कातगांव (कळाजता) समुद्रपूर तालुका दसोडा (दहेगांव) आदि आहेत.
            अमरावती जिल्‍ह्यातील तालुका निहाय निवड केलेली गावे तहसिलदारांनी निवडलेली गावे कंसाबाहेर व संवर्गविकास अधिकारी यांनी निवडलेली गावे कंसामध्‍ये आहे. अमरावती तालुका सिराड (आंजणगाव बारी) भातकुटी तालुका खार तळेगांव (वायगांव) नादगाव खंडेश्‍वर तालुका माहुली (खुमगांव) वरुड तालुका सातनुर (चांदस) मोर्शी  तालुका पिंपळखुटा (भिबी) तिवसा तालुका शिवणगाव (सार्सि) अचलपूर तालुका उपालखेडा (रामपूर बद्रुक) चांदूर बाजार तालुका सिरसगाव (निमखेडा) चांदूर रेल्‍वे तालुका सिरोडी (येरड बाजार) अंजणगाव तालुका सातेगांव (पांढरी) धारणी तालुका झिलपी (विजूधावडी ) चिखलदरा तालुका गांगरखेडा (सेमाडोह) दर्यापूर तालुका टिलोरी (डोंगरगांव) धामणगाव तालुका अशोकनगर (जुना धामणगाव) यांची निवड केलेली आहे.या गावामध्‍ये लोक प्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी यांच्‍या हस्‍ते या योजनेचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी करण्‍यात यावा अशा सूचनासुध्‍दा त्‍यांना देण्‍यात आल्‍या आहे. ई मस्‍टर  च्‍या नोंदी अद्यावत करण्‍याचे सूचना देवून संगणकाचा डाटा सुध्‍दा अद्यावत करण्‍यात यावा जी कामे अपूर्ण राहिलेली आहेत त्‍याला प्राधान्‍याने पूर्ण करुण संगणक प्रणालीत आवश्‍यक ते बदल करण्‍यात यावे. अपूर्ण कामे पूर्ण करतांना त्‍यावरील झालेला खर्च संगणकातून कमी होणार नाही याची दक्षता घेवून संबंधित संगणक चालकाला सूचना द्यावी अशा सूचना यावेळी करण्‍यात आल्‍या.        
यावेळी बोलतांना उपसचिव आर.विमला यांनी महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेतील अडी-अडचणीचे निराकरण करुण संगणकावर माहिती कशा पध्‍दतीने भरावी याचे प्रात्‍यक्षिक करुण सांगितले. प्रायोगिक तत्‍वावर विदर्भातील अमरावती व वर्धा ही दोन जिल्‍हे असल्‍यामुळे ही कार्यपध्‍दती यशस्‍वी ठरल्‍यानंतर क्रमा-क्रमाने संपूर्ण महाराष्‍ट्रात राबविल्‍या जाईल या प्रणालीमुळे कर्मचा-यांचे श्रम व कागदाची बचत होईल तसेच निधीच्‍या गैरवापराला आळा बसेल. पुरुष व महिला मजुरासाठी बँकेत वेग-वेगळे खाते उघडावयाचे आहे. त्‍यांची खाती भारतीय डाकघरामध्‍ये आहे त्‍यांनासुध्‍दा मजुरीची रक्‍कम त्‍यांच्‍या खात्‍यावर थेट जमा होईल.यासाठी संगणकावर कार्यप्रणाली समजावून सांगितली.
जिल्‍हास्‍तरावर एक खाते व त्‍यानंतर तालुकास्‍तरावरील अधिका-याचे नावे प्रत्‍येकी एक खाते राहणार असून या खात्‍यामधूनच संबंधित मजुरांच्‍या खात्‍यामध्‍ये इलेक्‍ट्रानिक निधी व्‍यवस्‍थापन प्रणालीव्‍दारे रक्‍कम जमा होईल.
         महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेमध्‍ये निधीची कमतरता नाही मात्र कार्यान्वित यंत्रणेने त्‍यांचे वार्षिक उद्दिष्‍ट ठरवून त्‍यानुसार आगामी काळात निधीची मागणी करावी. अवास्‍तव मागणी केल्‍यास त्‍यांची कारणे त्‍यांना द्यावी लागतील असेही त्‍या म्‍हणाल्‍या.
या कार्यक्रमाला अमरावती व वर्धा जिल्‍ह्यातील तहसीलदार व संवर्गविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक उपजिल्‍हाधिकारी जे.बी.संगितराव यांनी तर संचलन व आभार अजय धमाधिकारी यांनी केले.
000000

मिटकॉन तर्फे उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन



वर्धा दि.5- वर्धा जिल्‍ह्यातील बेरोजगार युवक व युवती करीता विज्ञान व तंत्रज्ञान विभाग,भारत सरकार,नवी दिल्‍ली यांनी पुरस्‍कृत केलेला प्रशिक्षण उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन वर्धा येथे दिनांक 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी,2013 पर्यंत केलेले आहे. सदर प्रशिक्षणामध्‍ये विविध कार्यक्रमात मुख्‍यतेकरुण शिकविले जातील उद्योजकतेचा परिचय, उद्योजकतेची प्रक्रीया, व्‍यवसाय संकल्‍पना, संधीचा शोध आणि विल्‍शेषण, उद्योजकीय व्‍यक्‍तीमत्‍व विकास(दोन दिवसीय निवासी) बाजार पेठेविषयी पाहणी व माहितीचे संकलन, संभाषण कौशल्‍य, नविन व्‍यवसाय करण्‍यासाठी विविध योजनांची माहिती प्रकल्‍प अहवाल तयार करणे, पॅकेजिंग व गुणवत्‍तेचे नियंत्रण, विपणन आणि विक्रीपत्रात सेवा तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक तसेच संभाव्‍य उद्योजकांना माहिती, प्रेरणा व मार्गदर्शन देवून स्‍वतःचा व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी प्रोत्‍साहित करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्‍ट आहे.  
            सदर प्रशिखणामध्‍ये ज्‍यांना निर्मितीचा उद्योग क्षेत्रामध्‍ये व्‍यवसाय करण्‍याची तीव्र इच्‍छा आहे. त्‍याचबरोबर असे विद्यमान उद्योजक की ज्‍यांची आपल्‍या क्षेत्रामध्‍ये उद्योजकता विकास कार्यक्रमाव्‍दारे विस्‍तार आणि आधुनिकता आणण्‍याची र्इच्‍छा आहे. याशिवाय विज्ञाण आणि तंत्रज्ञान पदविधर तसेच पदविधारक सध्‍या नोकरीत असलेले व स्‍वतःचा व्‍यवसाय सुरु करु इच्छिणारे विज्ञान शाखेतील युवक व युवती करीता स्‍वतःचा उद्योग सुरु करु इच्छित,व्‍यक्‍तींनी प्रशिक्षणाचा लाभ ध्‍यावा प्रशिक्षणासाठी वयाची किमान पात्रता 18 ते 50 वर्ष वयोगटातील बेरोजगार व युवक-युवती फक्‍त 30 प्रशि‍क्षणार्थींना प्रवेश देण्‍यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क मिटकॉन जिल्‍हा कार्यालय, नासरे सभागृहाच्‍या समोर, आर्वी नाक्‍याजवळ, इंदिरा नगर वर्धा किंवा जिल्‍हा प्रशिक्षण समन्‍वयक 9552701150 यांना संपर्क करुण प्रशिखणासाठी नाव नोंदणी करावी.
000

अल्‍पमुदतीच्‍या अभ्‍यासक्रमातील प्रवेश



वर्धा दि.5- वर्धा नगर परिषद अंतर्गत येणा-या दारिद्र रेषेखालील वर्ग 5 वा व वर्ग 8 वा उत्‍तीर्ण असणा-या विद्यार्थ्‍यांसाठी सुवर्ण जयंती रोजगार योजने अंतर्गत शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळा केंद्र,गणेश टॉकीज जवळ,हॉस्पिटल रोड,वर्धा येथे अल्‍प मुदतीचे अभ्‍यासक्रमामध्‍ये प्रवेश देणे सुरु आहे.त्‍यामध्‍ये काम्‍प्‍युटर सेक्‍टर,ऑटोमोबाईल सेक्‍टर, ईलेक्‍ट्रीकल सेक्‍टर,मशीन सेक्‍टर या अभ्‍यासक्रमाचा समावेश आहे. हे अभ्‍यासक्रम मान्‍यता प्राप्‍त असून या अभ्‍यासक्रमाच्‍या रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध आहेत.अंतिम प्रवेश घेण्‍याची तारीख 15 जानेवारी,2013 आहे.
अधिक माहितीसाठी संस्‍थेचे समन्‍वयक आर.एन.गिरीपुंजे पूर्णवेळ शिक्षक यांचेशी संपर्क साधावा असे मुख्‍याध्‍यापक शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळा केंद्र तथा कनिष्‍ठ महाविद्यालय,वर्धा कळवितात.
00000