Thursday, 4 October 2012


                                निर्मल भारत यात्रेचा आज शुभारंभ

            वर्धा, दिनांक 4 – निर्मल भारत अभियाना अंतर्गत  भारत स्‍वच्‍छता व दररोज साबुनने हात धुण्‍याची  सवय या संदर्भात जागृती  निर्माण करण्‍यासाठी  वाश युनायटेड आणि क्विकसैंड डिजाइन स्‍टूडिओ  यांच्‍या  सहाय्याने   निर्मल भारत यात्रा  सुरु होत असून,  उद्या  शुक्रवार दिनांक 5 ऑक्‍टोंबर पासून  सेवाग्राम येथून  या यात्रेचा शुभारंभ होत आहे.



          महाराष्‍ट्रासह मध्‍यप्रदेश आदी राज्‍यातून  दोन हजार किलोमीटरच्‍या प्रवासात विविध गावांमध्‍ये  शौचालय व  स्‍वच्‍छतेबाबत  याबाबत  जागृतता  निर्माण करण्‍यात  येणार आहे. या यात्रेचा समारोप  19 नोव्‍हेंबर रोजी विश्‍व शौचालय दिवशी  बिहार राज्‍यातील   बेतीया येथे होणार आहे. महाराष्‍ट्र  , राजस्‍थान, उत्‍तर प्रदेश, बिहार  या राज्‍यातील ग्रामीण भागात  शौचालय तसेच स्‍वच्‍छतेचा प्रसारासाठी  क्रीडापटू  व्‍हॉलीवुडच्‍या  नायिका तसेच प्रभावशाली व्‍यक्‍तींचाही यासाठी सहभाग राहणार आहे.  निर्मल भारत अभियानाव्‍दारे  जागरुकता निर्माण करण्‍यासोबतच  सुलभ शौचालय, शौचालयाचा उपयोग, प्रत्‍येक  घरामध्‍ये शौचालय, वैयक्तिक स्‍वच्‍छता   आदीबाबत विविध उपक्रमाव्‍दारे  माहिती देण्‍यात येणार आहे.
          निर्मल भारत  यात्रेचा शुभारंभ  केन्‍द्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश,  राज्‍याचे पाणी  पुरवठा व स्‍वच्‍छता  मंत्री प्रा. लक्ष्‍मणराव ढोबळे व पालकमंत्री  राजेंद्र मुळक, राज्‍यमंत्री रणजीत कांबळे आदींच्‍या प्रमुख उपस्थितीत  होत आहे.
          हा कार्यक्रम सेवाग्राम येथील हेलीपॅडवर  उभारण्‍यात आलेल्‍या  निर्मल भारत मेळाव्‍यात  होणार आहे.
                                                            0000000

घरात शौचालय, दारात पाणी ही संकल्‍पना प्रत्‍येक गावात पोहचवा - शेखर चन्‍ने


 पाणी  स्‍वच्‍छता मिशन जागृती  मोहीमेचा शुभारंभ

            वर्धा, दिनांक 4 – घरात शौचालय, दारात पाणी  ही संकल्‍पना प्रत्‍येक कुटूंबापर्यंत पोहचविण्‍यासाठी  प्रभावीपणे जनजागृती मोहीम राबवा अश्‍या सुचना  मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी आज दिल्‍यात.
          देवळी  तालुक्‍यातील डिकडोह या गावापासून  निर्मल भारत अभियान व जिल्‍हा पाणी स्‍वच्‍छता मिशन जागृती मोहीमेचा  शुभारंभ मुख्‍य कार्यपालन अधिकारी यांच्‍या हस्‍ते  झाला.  त्‍याप्रसंगी  मार्गदर्शन करताना ते बोलत होत.
           कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष नानाभाऊ  ढगे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, पंचायत समिती सभापती  श्री. धांडे , जिल्‍हा परिषद सदस्‍य सर्वश्री कोरके, श्री. ताडाम, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी आर.एम.भुयार उपस्थित होते.
            वर्धा जिल्‍हा निर्मल भारत अभियाना अंतर्गत हागणदारी मुक्‍त  करण्‍यासाठी  जनजागृती मोहीम राबविण्‍यात येत असून, पाण्‍याची  स्‍वच्‍छता  राखण्‍यासाठी प्रतयेक गावात  शंभर टक्‍क्‍े   शौचालयाचे  बांधकाम करण्‍यासाठी  विविध योजनेमधून   सहाय्य  व मार्गदर्शन देण्‍यात येत आहे. निर्मल अभियानामध्‍ये  महिलांनी  जागृतपणे  आपला सहभाग वाढवावा असे आवाहनही त्‍यांनी  यावेळी  केले.
       अध्‍यक्ष भाषणात जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष   नाना ढगे यांनी  भारत हा कृषीप्रधान देश असल्‍यामुळे  खेड्यातच भारत वसला आहे. परंतू  मुलभूत सुविधांच्‍या अभावी अस्‍वच्‍छतेचा    अभाव  असून  ग्रामस्‍थांनी      लोकसहभागातून  आपल्‍या गावांचा विकास करावा आणि  प्रत्‍येक   घरात   शौचालय बांधावे  असे आवाहनही  त्‍यांनी यावेळी केले.
            महिलांचा  स्‍वयंस्‍फूर्त  सहभाग  असल्‍यामुळे  हागणदारी मुक्‍तीचा संकल्‍प सहज शक्‍य  असल्‍याची  ग्‍वाही यावेळी लोकप्रतीनीधी व ग्रामस्‍थांनी   दिली. गुरुदेव सेवा मंडळाच्‍या सहभागाने  प्रभातफेरी काढून  किर्तनाच्‍या   माध्‍यमातून स्‍वच्‍छतेसंबधी   प्रबोधन करण्‍यात आले.  
            प्रारंभी  राष्‍ट्रसंत  तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, महात्‍मा गांधी यांच्‍या प्रतीमेस पुष्‍पहार अर्पण करुन निर्मल भारत अभियानाचा शुभारंभ झाला.
            यावेळी  उपविभागीय अभियंता  श्री. बेले , श्री. शेंडे, बढीये, गायकवाड, गजघाटे, बिडवाईकर,गटसंशोधन केन्‍द्राचे कर्मचारी सर्वश्री राहूल चावके,अतुल भांदककर, अभिषेक सावळकर, श्री. गायधने व श्री. पाटील यांनी निर्मल भारत  अभियान यशस्‍वी   करण्‍यासाठी   सहकार्य केले.
            कार्यक्रमाचे संचलन सचिन हुंगे यांनी  तर आभार ग्रामसचिव श्री.रुद्रकार  यांनी मानले.
                                                  000000 

जयराम रमेश यांचे आज आगमण निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ


      
              

             वर्धा, दिनांक  4 – केन्‍द्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश  यांचे शुक्रवार दिनांक  5 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी  9 वाजता  वर्धा येथे आगमण होत असून,  सकाळी 10 वाजता निर्मल भारत  यात्रेचा  शुभारंभ करतील.
         निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ  सेवाग्राम  येथील  हेलीपॅड ग्राऊंड येथे आयोजीत   समारंभात  होणार आहे. केन्‍द्रीय ग्राम विकास मंत्री  दुपारी  4 वाजता येथून नागपूरकडे प्रयाण करतील  व  रात्रौ  8.05 वाजता विमानाने  दिल्‍लीला जातील.
                                                             00000

प्रा. लक्ष्‍मण ढोबळे


                             

      वर्धा दिनांक 4 -पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे  मंत्री प्रा. लक्ष्‍मण ढोबळे यांचे शुक्रवार दिनांक 5 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 9.20 वाजता नागपूर येथून  आगमण होईल.
          सकाळी 10 वाजता सेवाग्राम येथील निर्मल भारत यात्रा कार्यक्रमास उपस्थित राहून सायंकाळी 5 वाजता येथून कारने  नागपूरकडे प्रयाण करतील.
                                                000

पालकमंत्री राजेंद्र मुळक



     वर्धा, दिनांक  4 - राज्‍याचे वित्‍त व नियोजन राज्‍यमंत्री  तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री  राजेंद्र मुळक यांची शुक्रवार दिनांक 5 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 8 वाजता नागपूर येथून आगमण होईल. 
    सकाळी 10 वाजता सेवाग्राम येथे आयोजीत  निर्मल भारत  यात्रेस उपस्थित राहतील व सकाळी 11 वाजता येथून वणीकडे प्रयाण करतील.
                                                000000

Wednesday, 3 October 2012

जयराम रमेश यांचे उपस्थितीत निर्मल भारत यात्रेला शुक्रवार पासून शुभारंभ



          

             वर्धा, दिनांक  3 – केन्‍द्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश  यांचे शुक्रवार दिनांक  5 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी  9 वाजता  वर्धा येथे आगमण होत असून,  सकाळी 10 वाजता निर्मल भारत  यात्रेचा  शुभारंभ करतील.
         निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ  सेवाग्राम  येथील  हेलीपॅड ग्राऊंड येथे आयोजीत   समारंभात  होणार आहे. केन्‍द्रीय ग्राम विकास मंत्री  दुपारी  4 वाजता येथून नागपूरकडे प्रयाण करतील  व  रात्रौ  8.05 वाजता विमानाने  दिल्‍लीला जातील.
                                                             00000


ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 5 ऑक्‍टोंबर पर्यंत जाती पडताळणी- जयश्री भोज





वर्धा दिनांक 3 – वर्धा जिल्‍ह्यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या  राखीव प्रभागातील निवडणूक लढवू इच्छिणा-या मागासवर्गीय ऊमेदवारांच्‍या जाती दावा पडताळणी बाबत ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऊमेदवारांची  जात पडताळणीचे अर्ज शुक्रवार दिनांक  5 ऑक्‍टोंबर 2012 पर्यंत स्विकारल्‍या जातील. अशी माहिती  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
           इच्‍छूक  मागासवर्गीय  ऊमेदवारांची जात पडताळणीचे अर्ज शुक्रवार दिनांक            5 ऑक्‍टोंबर  2012 पर्यंत  जिल्‍हाधिकारी कार्यालयात स्विकारण्‍यात येणार आहेत.
                                                              00000