Saturday, 15 September 2012

शेतकरी आत्‍महत्‍याची चार प्रकरणे पात्र' एक प्रकरण फेरचौकशीसाठी – अप्‍पर जिल्‍हाधिकारी


      वर्धा, दि. 15 – शेतकरी आत्‍महत्‍या आढावा समितीची बैठक आज अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली त्‍यांच्‍या  कक्षामध्‍ये संपन्‍न झाली. यावेळी समितीसमोर नऊ प्रकरणे विचारार्थ ठेवण्‍यात आली. त्‍यापैकी चार प्रकरणे पात्र व एक प्रकरण फेरचोकशीसाठी पाठविण्‍यात आल्‍याची माहिती अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी दिली.
     याप्रसंगी स्‍वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी म्‍हणून डॉ. सोहम पंड्या, शेतकरी  भुषण पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे  व अग्रणी बँकेचे प्रतिनिधी यावेळी   उपस्थित होते.
            शेतकरी आत्‍महत्‍या आढावा समितीच्‍या बैठकीत सर्वानुमते पात्र ठरविण्‍यात आलेल्‍या प्रकरणांमध्‍ये सेलू तालुक्‍यातील महाबळा येथील मानीक नेहारे, आर्वी तालुक्‍यातील मदना येथील महेश  झोटिंग, देवळी तालुक्‍यातील  इंझाळा येथील वर्षा बरडे व वर्धा तालुक्‍यातील पवनार येथील अंतकला हिवरे यांचा समावेश असून प्रकरणाच्‍या फेरचौकशीसाठी वर्धा तालुक्‍यातील पालोती येथील देविदास  उगेमुगे  यांचा समावेश आहे. तीन प्रकरणे अपात्र ठरविण्‍यात आलेली असून, एक प्रकरण आत्‍महत्‍याच्‍या प्रवर्गातून वगळण्‍यात आले आहे.
      यावेळी इतीवृत्‍ताचे वाचन शेतकरी आत्‍महत्‍या कक्षाचे श्री. श्रीवास्‍तव यांनी केले.
                                                              00000

वर्धा येथे राज्‍यस्‍तरीय शालेय सॉफ्टबॉल स्‍पर्धेचे आयोजन


वर्धा, दि. 15- राष्‍ट्रीय स्‍पर्धा राज्‍यस्‍तरीय शालेय सॉफ्टबॉल स्‍पर्धेचे आयोजन जिल्‍हा क्रिडा अधिकारी, वर्धा यांचे विद्यमाने  ऑक्‍टोंबर 2012 च्‍या दुस-या आठवड्यात होणार आहे.
 या स्‍पर्धेत भाग घेणा-या   14,17,19 वर्षे वयोगटातील मुलींसाठी  दिनांक 26 ते 28 सप्‍टेंबर या कालावधीत स्‍पर्धा होत आहे. स्‍पर्धेत सहभागी होणारे आठ विभागातील खेळाडू वर्धा येथे दिनांक 25 सप्‍टेंबर 2012 रेाजी उपस्थित होणार असून, राज्‍यस्‍तर स्‍पर्धेस दिनांक 26 सप्‍टेंबर 2012 रोजी सकाळी 7 वाजता सुरुवात होईल. राज्‍यस्‍तर स्‍पर्धेची निवड चाचणी दि. 27 ते 28 सप्‍टेंबर 2012 या कालावधीत आयोजीत होत आहे. दि. 28 सप्‍टेंबर 2012 रोजी महाराष्‍ट्राचा संघ घोषीत करण्‍यात येणार आहे.
 14,17,19 वर्षे वयोगटातील मुलांसाठी   दिनांक 29 सप्‍टेंबर  ते 1 ऑक्‍टोंबर 2012 होणार असून स्‍पर्धेला 29 सप्‍टेंबर रोजी सकाळी 7 वाजता सुरुवात  होणार आहे.दिनांक    1 ऑक्‍टोंबर 2012 रोजी महाराष्‍ट्राचा संघ घोषीत करण्‍यात येईल.
     या स्‍पर्धेचे आयोजन जी.एस.कॉमर्स कॉलेज, वर्धा चे क्रीडांगणावर करण्‍यात येणार असून खुहाडुंची निवास व्‍यवस्‍था बच्‍छराज धर्मशाळा तसेच  जिल्‍हा क्रीडा संकुलातील मुलामुलींचे वसतिगृह येथे  करण्‍यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मंगेश गुडधे, राज्‍य क्रीडा मार्गदर्शक (सॉफ्टबॉल) तसेच जिल्‍हा क्रीडा अधिकारी, वर्धा यांचेशी संपर्क साधावा.
                                                            000000

Friday, 14 September 2012

महालोकअदालती समोर 8 हजार 930 प्रकरणे

16 पॅनलव्‍दारे प्रकरणांचा निपटारा
सामंजस्‍याने वाद सोडविण्‍यासाठी महालोकअदालत
  
     वर्धा,दि.14- जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे रविवार दिनांक 16 सप्‍टेंबर रोजी महा-लोकअदालतीचे आयोजन करण्‍यात आले असून, जिल्‍ह्यातील 8 हजार 930 प्रकरणांची सुनावणी  होणार आहे. महा-लोकअदालतचे काम व्‍यवस्‍थीत चालण्‍यासाठी 16 पॅनल तयार करण्‍यात आले असून, या पॅनलवर प्रमुख न्‍यायीक अधिकारी, पॅनल सदस्‍य अधिवक्‍ता व समाजसेवक तसेच न्‍यायीक कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असल्‍याची माहिती प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा जिल्‍हा विधी सेवा प्राधीकरणाचे अध्‍यक्ष न्‍यायमुर्ती  अशोक शिवणकर यांनी केली.
      रविवारी  महा-लोकअदालतीचे  आयोजन जिल्‍हा व सत्र न्‍यायालयामध्‍ये तसेच प्रत्‍येक  तालुक्‍यामध्‍ये आयोजन करण्‍यात आले आहे. न्‍यायालयातील प्रलंबीत प्रकरणांचा  जलद गतीने निपटारा करण्‍यासाठी  जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे महा-लोकअदालतचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये  प्रकरणातील वादी आणि प्रतीवादी  यांच्‍या आपसी सामंजस्‍याने  हा वाद कायदेशीररित्‍या  तडजोड घडवून आणने सुलभ होणार आहे.
       महा-लोकअदालती समोर  8 हजार 930 प्रकरणे  येणार असून, यामध्‍ये  दिवाणी स्‍वरुपातील 196 प्रकरणे, फौजदारी स्‍वरुपाची 524 प्रकरणे, मोटार वाहन अपघात संबंधी 49 पकरणे, भूसंपादनाची 263 प्रकरणे, कामगार न्‍ययालये व सहाय्यक धर्मदाय आयुक्‍तांकडील 45 प्रकरणे व इतर स्‍वरुपातील 1 हजार 915 प्रकरणांचा समावेश आहे. तसेच वाद दाखलपूर्व 5 हजार 633 प्रकरणेही  महालोअदालतीसमोर प्रकरणे येणार असल्‍याची माहिती जिल्‍हा विधी सेवा प्राधीकरणाचे सदस्‍य सचिव स.मायल्‍लट्टी यांनी दिली.                               
       वर्धा येथील जिल्‍हा व सत्र न्‍यायालयाच्‍या परिसरातील महा-लोकअदालती समोर 2 हजार 430 प्रकरणे तसेच तालुका स्‍तरावरील महा-लोकअदालतीसमोर येणा-या प्रकरणामध्‍ये हिंगणघाट – 1801, सेलू – 361, पुलगाव – 1590, आर्वी – 877, आष्‍टी – 592, कारंजा – 572 आणि समुद्रपूर तालुक्‍यातील महालोकअदालतीसमोर 760 प्रकरणांचा समावेश आहे.
         महालोकअदालतीसाठी  जिल्‍हा विधी सेवा प्राधीकरणातर्फे 14 पॅनल राहणार असून,पॅनल क्रमांक 1 समोर  मोटार वाहन अपघात  प्रकरणे, पॅनल 2 दिवाणी व फौजदारी अपिल व विदृयुत कायद्याची प्रकरणे,पॅनल 3 व 4 भुसंपादन प्रकरणे, पॅनल 5 हिंदु विवाह कायदा व दिवाणी दावे, पॅनल 6 फौजदारी व वैवाहिक प्रकरणे,पॅनल 7 ,8 व 9   कलम 138 एन.आय.अॅक्‍ट ची प्रकरणे, पॅनल 10 व 11 मोटार वाहन कायदा, पॅनल 12, 13 बँकाची प्रकरणे, पॅनल 14 बीएसएनएल संबंधी प्रकरणे, तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त व कामगार न्‍यायालय यांचे दोन पॅनल स्‍वतंत्र राहणार आहेत.
       महा-लोकअदालतमध्‍ये न्‍यायालयात प्रलंबीत असलेली व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने झटपट निकाली काढण्‍याची संधी उपलब्‍ध आहे. या महालोकअदालतीचा जनतेने लाभ घ्‍यावा. असे प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तसेच अध्‍यक्ष विधी सेवा प्राधिकरणचे न्‍यायाधीश अशोक शिवणकर यांनी केले आहे.
                                                            00000

ग्रामीण संस्‍कृती व परंपरांच्‍या संवर्धनासाठी सण व उत्‍सवाची परंपरा जोपासा - रणजित कांबळे




* पोळ्यातील बैलजोडी सजावट स्‍पर्धेतील शेतक-यांना बक्षीस
* रोठा येथील ऐतिहासीक देवस्‍थानाला पर्यटनाचा दर्जा
* गावांना  जोडणा-या  रस्‍त्‍यांची प्राधान्‍याने दुरुस्‍ती

         वर्धा, दि. 14- ग्रामीण भागात पोळ्यासह विविध उत्‍सव व सणांच्‍या माध्‍यमातून ग्रामीण संस्‍कृती  व परंपरा जोपासण्याचे काम होत असून, ही परंपरा कायम ठेवण्‍यासाठी  स्‍वंयसेवी  संस्‍थांच्‍या  माध्‍यमातून विविध उपक्रम  आयोजीत करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व पाणी पुरवठा विभागाचे राज्‍यमंत्री  रणजित कांबळे यांनी कले.
       रोठा येथे  पोळ्या निमित्‍त शेतक-यांसाठी आयोजित  सुदृढ बैलजोडी  व बैलांच्‍या सजावटीसाठी  विविध  पुरस्‍कारांचे  वितरण केले. त्‍याप्रसंगी आयेाजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
       अध्‍यक्षस्‍थानी  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वराव ढगे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून सभापती धैर्यशिलराव जगताप, वर्धा लायन्‍स क्‍लबचे अनिल मिश्रा, सरपंच डॉ. विजय चौधरी, छोटू चांदूरकर, विजय नरांजे, दिनकरराव लोखंडे,श्रीमती हेमलता मेघे आदी  उपस्थित होते.
          नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्‍यामुळे  ग्रामीण भागातील सण व उत्‍सवाची परंपरा कमी होत असल्‍याचे सांगताना राज्‍यमंत्री रणजित कांबळे म्‍हणाले की, पोळ्यानिमीत्‍त वर्षभर  शेतक-यांसोबत  शेतीवर राबणा-या  बैलांची  आपण पुजा करतो तसेच गायीसह पशुधनाचेही  आपण पुजन करतो. शेती व शेतीवर राबणारा कष्‍टकरी  समृध्‍द व्‍हावा तसेच ग्रामीण भागातील संस्‍कृतीचे  संवर्धन व्‍हावे यासाठी  बैलजोडी सजावट स्‍पर्धासारखे विविध उपक्रम राबवावे. अशी सुचनाही त्‍यांनी यावेळी केली.
          रानूमाता देवस्‍थानला पर्यटनाचा दर्जा
      वर्धा जिल्‍ह्यातील रोठा येथील  सुप्रसिध्‍द  रानूमाता मंदीराच्‍या विकासाला प्राधान्‍य देण्‍यात येणार असून येथे येणा-या यात्रेकरुंना मुलभूत सुविधा उपलब्‍ध व्‍हाव्‍यात यासाठी क वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्‍यात येईल. तसेच जिल्‍हा नियेाजन विकास निधीमधून या देवस्‍थानाचा विकास करण्‍यात येईल अशी घेाषणाही रणजित कांबळे यांनी केली.
            रोठा ही ग्रामपंचायत 1960 मध्‍ये स्‍थापन झाली असून, ग्रामपंचायतीची ईमारत जिर्ण झाल्‍यामुळे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणे, नागठाणा ते सिंदी मेघे तसेच वायफळ पर्यंतचा रस्‍ता तात्‍काळ दुरुस्‍त करण्‍यात येईल. पावसामुळे अंतर्गत खराब झालेल्‍या रस्‍त्‍यांची कामेही प्राधान्‍याने पूर्ण करण्‍यात येईल. अशी ग्‍वाही  सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री  रणजित कांबळे यांनी केली.                 
              जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष  ज्ञानेश्‍वर ढगे यांनी  वर्धा जिल्‍ह्यात  टंचाईग्रस्‍त  गावांमध्‍ये  पिण्‍याचे पाण्‍यासह रस्‍ते विकासाला प्राधान्‍य दिल्‍यामुळे  जिल्‍ह्याचा सर्वांगीन विकास झाला आहे.
      लायन्‍स, लॉयनेस लिओ क्‍लब  यांच्‍या वतीने  रोठा येथे  पोळ्याच्‍या दिवशी   शेतक-यांसाठी सुदृढ बैलजोडी व बैलजोडी सजावट स्‍पर्धा आयेाजीत करण्‍यात आली होती. या स्‍पर्धेमध्‍ये गावातील मोठ्या संख्‍येने शेतकरी कुटूंब सहभागी झाले होते. स्‍पर्धेमध्‍ये  प्रथम आलेल्‍या  हरीभाऊ एकनाथ सावळे या शेतक-यांचा शाल, श्रीफळ भेट वस्‍तू  तसेच बैलांच्‍या गळ्यातील आकर्षक घंट्याची माळा  राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांच्‍या हस्‍ते वितरीत करण्‍यात आल्‍या.
     बैलजोडी सजावट स्‍पर्धेमध्‍ये  व्दितीय क्रमांक रामभाऊ सावळे, तृतीय महादेव लक्ष्‍मण जांभुळकर तसेच दिलीप गाडगे, नारायण पुरषोत्‍तम ढगे, महादेवराव पिटकुले, नरेंद्र काळे, या शेतक-यांनाही त्‍यांच्‍या बैलजोड्यासाठी केलेल्‍या उत्‍कृष्‍ट सजावटीसाठी शाल,श्रीफळ, भेट वस्‍तू देऊन सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. परिक्षक म्‍हणून  दिनकरराव लोखंडे यांनी काम बघितले.
       प्रारंभी लायन्‍स क्‍लबचे अनिल मिश्रा यांनी  प्रासताविकात स्‍पर्धा आयोजनाची भुमीका सांगितली.  सरपंच डॉ. विजय चौधरी यांनी स्‍वागत करुन ऐतिहासीक रानुमाता देवस्‍थानला पर्यटनाचा दर्जा, ग्रामपंचायत भवन, गावात सिमेंट रस्‍ते, तसेच नागठाणा येथील रस्‍त्‍याचा प्रश्‍न सोडविण्‍याची मागणी केली.
            यावेळी  हेमलता मेघे, महंमद अक्‍तार कुरैशी, श्रीमती गौतमी  मेश्राम, अंजुभाऊ वरडकर, महेन्‍द्र तेलरांधे, हरीष वाघ, मनिश गंगमवार, ग्रामसेवक संदीप भोसले, अक्‍तर कुरैशी आदी उपस्थित होते.
                                                               0000

नागठाणा व रोठा येथे राज्‍यमंत्री रणजित कांबळे


यांच्‍या हस्‍ते  विकासकामांचे भुमिपूजन       

वर्धा, दि. 14-नागठाणा  येथे सुमारे  5 लक्ष 50 हजार    खर्च करुन बांधण्‍यात येणा-या अंगणवाउी ईमारतीच्‍या  बांधकामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांच्‍याहस्‍ते  झाला.
13 व्‍या वित्‍त आयोगामधून  नागठाणा येथे  अंगणवाडी  बांधकामाला मंजूरी मिळाली असून, इमारतीच्‍या बांधकामासोबत  लहान मुलांसाठी आवश्‍यक सुविधाही येथे उपलब्‍ध  होणार आहेत.      
यावेळी  पंचायत समितीचे सभापती  धैर्यशिल जगताप, जि.प. सदस्‍य छोटूभाऊ चांदूरकर, पंचायत समिती सदस्‍य विजय नरांजे, दिनकरराव लोखंडे, ग्रामसेवक संदीप भोसले आदी  उपस्थित होते.
सरपंच डॉ. विजय चौधरी यांनी  स्‍वागत करुन  नागठाणा येथे बांधण्‍यात येत असलेल्‍या अंगणवाडी संदर्भात प्रास्‍ताविकात उल्‍लेख केला. अंगणवाडी भूमीपुजन समारंभा निमित्‍त बसविण्‍यात आलेल्‍या कोनशिलेचे अनावरण राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांचे हस्‍ते झाले.
                           रोठा येथे दलित वस्‍ती  सुधार कामांचा शुभारंभ
रोठा ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्‍त्‍यांमध्‍ये  सिमेंट रसत्‍यांच्‍या  बांधकामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री  रणजित कांबळे यांच्‍या हस्‍ते आज झाला.
      यावेळी  जि.प.चे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वराव ढगे, सभापती  धैर्यशिलराव जगताप, सरपंच डॉ. विजय चौधरी आदी उपस्थित होते.
       दलित वस्‍ती सुधार कार्यक्रमा अंतर्गत रोठा या गावात सुमारे 1 लक्ष रुपये खर्च करुन सिमेंटच्‍या रस्‍त्‍याचे बांधकाम करण्‍यात येणार आहे.  सिमेंट रस्‍त्‍याच्‍या बांधकामाचा दर्जा उत्‍तम राहील याकडे लोकप्रतिनीधीनीही लक्ष देण्‍याची सुचना यावेळी राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी दिली.
                                              000000   

रोजगार हमी योजनेतून प्रत्‍येक गावात


जलसंधारणासह उत्‍पादक कामे घ्‍या-         शेखर चन्‍ने
       वर्धा, दि. 14- महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामीण भागात जलसंधारणासह विविध उत्‍पादक  कामांची  निवड करताना गावांच्‍या स्‍थानिक गरजानुसार कामांचे नियेाजन करा. अशा सुचना जि.प.चे मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी आज केले.
      विकास भवन येथे मग्रारोहयो  अंतर्गत जिल्‍ह्यात  कामांच्‍या नियोजपपूर्व तांत्रिक अधिकारी  यांचेसाठी आयोजीत कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
            अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हाधिकारी श्रीमती  भोज होत्‍या तर प्रमुख पाहुणे म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी  श्री. संगीतराव , उपमुख्‍य कार्यपालन अधिकारी श्री. भुयार, उपविभागीय अभियंता सुनिल गहाणे, संजय उगेमुगे, सहायक भुवैज्ञानिक नितीन महाजन आदी उपस्थित होते.
           केंद्र शासनाने  महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गावांचे स्‍थानिक गरजेनुसार कामाची निवड करण्‍यासाठी  शिवारफेरी  हा उपक्रम सुरु केला आहे. वर्धा जिल्‍ह्यात या उपक्रमानुसार प्रत्‍येक  गावामध्‍ये  कामाचे नियेाजन करावे व गावांमध्‍ये स्‍थायी मालमत्‍ता निर्माण करावी अशा सुचनाही यावेळी  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी अधिका-यांना दिलयात.
            रोजगार हमी योजने अंतर्गत कामाची निवड करताना स्‍थानिक दर्जा त्‍यानुसार उपलब्‍ध होणारा रोजगार  अशा कामांचे  अंदाजपत्रक तयार करुन  कामांची  प्रत्‍यक्ष अंमलबजावणी करावी . मजूरांकडून झालेल्‍या   कामांचे मोजमाप घेऊन त्‍यांना लवकरात लवकर मजुरी प्रदान करण्‍याच्‍या दृष्‍टीने   प्रयत्‍न करावेत असेही त्‍यांनी सांगितले.
            उपजिल्‍हाधिकारी जे.बी. संगीतराव यांनी  मग्रारोहयो अंतर्गत  गुणवत्‍तापूर्ण  व स्‍थायी  मालमत्‍ता  तयार करण्‍यास प्राधान्‍य देत असल्‍याचे सांगताना सर्व अभियंत्‍यांनी  मार्गदर्शक सुचनानुसार   त्‍वरीत प्रत्‍यक्ष कामाला सुरुवात करावी , कामाचे नियोजन करताना  प्रशासकीय अडचणी अथवा  जेथे गरज भासेल तेथे  संपूर्ण मार्गदर्शन करण्‍यात येईल असेही त्‍यांनी  यावेळी स्‍पष्‍ट केले.
        या कार्यशाळेत 300 तांत्रिक अधिकारी  उपस्थित असून, त्‍यांना तज्ञ मार्गदर्शक श्री.मेघावत,श्री.कोरान्‍ने, श्री.भागवतकर, अभय तिजारे, सहायक लेखाधिकारी श्री. बोरकर आदींनी मार्गदर्शन केले.
      उत्‍कृष्‍ट कार्याबद्दल रोहयोचे उपविभागीय अभियंता सुनील रहाणे, उपअभियंता संजय उगेमुगे, सहायक भुवैज्ञानिक नितीन महाजन, शाखा अभियंता अभय क-हाडे, सहायक उपवनसंरक्षक विनोद देशमुख यांना प्रशस्‍ती पत्र देऊन गौरविण्‍यात आले.
            उपमुख्‍यकार्यपालन अधिकारी श्री. भुयार यांनी स्‍वागत करुन प्रास्‍तावी केले. तर कार्यक्रमाचे संचलन अजय धर्माधिकारी यांनी केले.
                                                              00000

Thursday, 13 September 2012

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे मंगळवारी आगमण


          वर्धा दि.13- केंद्रीय कृषी व अन्‍न प्रक्रीया, उद्योग मंत्री शरद पवार यांचे मंगळवार दिनांक 18 सप्‍टेंबर रोजी रात्रौ 8 वाजता अमरावती येथून मोटारीने आगमण होईल. व वर्धा येथे मुक्‍काम राहील.
         बुधवार दिनांक 19 सप्‍टेंबर रोजी सकाळी 10 वाजता यंशवंत ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या सुवर्ण महोत्‍सवी कार्यक्रमास केंद्रीय कृषीमंत्री उपस्थित राहतील. दुपारी 12.15 ते 2 वाजेपर्यन्‍तचा वेळ राखीव असून दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने नागपूरसाठी प्रयाण करतील.
0000

                             श्री.शिवाजीराव मोघे

         वर्धा दि.13- राज्‍याचे सामाजिक न्‍यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचे शनिवार  दिनांक 15 सप्‍टेंबर रोजी  सकाळी 10 वाजता यवतमाळ येथून भिडी (देवळी) येथे आगमण होईल.    
        भिडी येथील बाल विकास प्रशिक्षण शिबीराचे सामाजिक न्‍याय मंत्री शिवाजीराव मोघे उद्घाटन करतील व सकाळी 11 वाजता वरोरा साठी मोटारीने प्रयाण करतील.
0000