Saturday, 18 August 2012

वर्धा जिल्ह्यात 24 तासात सरासरी 11.58 मि.मि.पाउस


     वर्धा, दिनांक 19 : वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात 11.58 सरासरी मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. आतापावेतो जिल्ह्यात एकूण सरासरी  461.22  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्यात सर्वाधिक पाऊस हिंगणघाट तालुक्यात 41.00 मि.मी. पाऊस झाला आहे.
          जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
          वर्धा- 10.4 मि.मी.(471.6), सेलू- 7 मि.मी.(254.0), देवळी-10.8 (335.7), हिंगणघाट-41.00(556.0), आर्वी-2.00 मि.मी.(540.0),
आष्टी 1.2 मि.मी.(405.4), समुद्रपूर-20.2  मि.मी.(630.7),
आणि कारंजा-निरंक- (496.4 )मि.मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत 461.22   मि.मी. सरासरी एवढा पाऊस झाला आहे.
                                  0000000

वर्धा जिल्ह्यात 24 तासात सरासरी 11.58 मि.मि.पाउस


         वर्धा, दिनांक 11 : वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात 11.58 सरासरी मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. आतापावेतो जिल्ह्यात एकूण सरासरी  461.22  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्यात सर्वाधिक पाऊस हिंगणघाट तालुक्यात 41.00 मि.मी. पाऊस झाला आहे.
          जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
          वर्धा- 10.4 मि.मी.(471.6), सेलू- 7 मि.मी.(254.0), देवळी-10.8 (335.7), हिंगणघाट-41.00(556.0), आर्वी-2.00 मि.मी.(540.0),
आष्टी 1.2 मि.मी.(405.4), समुद्रपूर-20.2  मि.मी.(630.7),
आणि कारंजा-निरंक- (496.4 )मि.मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत 461.22   मि.मी. सरासरी एवढा पाऊस झाला आहे.
                                  0000000

Friday, 17 August 2012

राज्‍य हज समितीवर एका निर्वाचीत मुस्लिम सदस्‍याची निवड


         वर्धा, दि. 17- जिल्‍ह्यातील नगरपरिषद, जिल्‍हा परिषदेवरील सर्व निर्वाचीत मुस्लिम सदस्‍यांना  कळविण्‍यात येते की, नागपूर परिमंडळातुन महाराष्‍ट्र हज समितीवर एका निर्वाचित मुस्लिम सदस्‍यांची निवड करावयाची आहे.
         त्‍याअनुषंगाने निर्वाचित सदस्‍यांची प्रारुप  मतदार दिनांक 15 ऑगस्‍ट 2012 रेाजी जिल्‍हाधिकारी  कार्यालयातील नोटीस बोर्डवर यादी प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे.
       प्रसिध्‍द  केलेल्‍या मतदार यादीवर कोणताही आक्षेप असल्‍यास तसे आक्षेप दिनांक 28 ते 29 ऑगस्‍ट 2012  सायंकाळी 5 वाजे पर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयात (निवासी उपजिल्‍हाधिकारी यांचे दालनात) स्विकारले जातील. प्राप्‍त आक्षेपाची पुर्तता दिनांक 30 ऑगस्‍ट 2012 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पर्यंत करुन दिनांक 31 ऑगस्‍ट 2012 रेाजी सकाळी  11 वाजता जिल्‍हाधिकारी  कार्यालय, वर्धा या ठिकाणी अंतीम मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात येईल. उक्‍त नमुद कालावधी नंतर कोणताही आक्षेप अथवा उजर स्विकारला जाणार नाही असे  निवासी उपजिल्‍हाधिकारी, वर्धा  कळवितात.
                                                00000000      

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सदभावना दिन साजरा


     वर्धा,दि.17- येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयामध्‍ये सदभावना दिन साजरा करण्‍यता आला. याप्रसंगी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्‍या प्रतिमेला जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने  यांनी माल्‍यार्पन अर्पन करुन आदरांजली वाहली.
      या सदभावना दिनानिमित्‍ताने अधिकारी व कर्मचा-यांना प्रतिज्ञा देण्‍यात आली.
       यावेळी परिविक्षाधिन सहाय्यक जिल्‍हाधिकारी पि. शिवशंकर, निवासी उपजिल्‍हाधिकारी विजया बनकर, उपजिल्‍हाधिकारी  बि.एस.मेश्राम यांनी स्‍व. राजीव गांधी यांच्‍या प्रतिमेस पुष्‍प अर्पन करुन आदरांजली वाहीली.    
       यावेळी जिल्‍हाधिकारी  कार्यालयातील कर्मचारी अग्निहोत्री व  श्री.भुसारी  त्‍यांच्‍यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                000000

पाण्‍याचे सुधारीत दर लागू


        वर्धा, दि.17- पिपरी (मेघे) व 10 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अंतर्गत येणा-या 11  गावाला पुरविण्‍यात येणा-या पाणीपट्टीचे दरामध्‍ये सुधारणा करुन  दिनांक  1 जुलै 2012 पासून लागू करण्‍यात आले आहेत. पाण्‍याचे वापराकरीता प्रती 1000 लिटर  करीता सुधारीत दर पुढील प्रमाणे आहेत.
      नगर पालीका हद्दी बाहेरील तथापि शहरीभाग यांच्‍यासाठी घरघुती पाण्‍याचा वापर प्रतिमाह 15000 लिटर पर्यंत हजार लिटर दर 13 रुपये, पाण्‍याचा वापर प्रतिमाह 15001 ते 20000 लिटर पर्यंत हजार लिटर दर 20 रुपये,  पाण्‍याचा वापर प्रतिमाह 20000 ते 25000 लिटर पर्यंत हजार लिटर दर 26 रुपये, पाण्‍याचा वापर प्रतिमाह 25001 लिटर व त्‍यापुढील  वापराकरीता हजार लिटर दर 52 रुपये असेल.
       बिगर घरगुती पाण्‍याचा वापर प्रतिमाह सर्व वापराकरीता हजार लिटर दर 60 रुपये, शाळा,महाविद्यालय, धर्मदाय संस्‍था, सरकारी व निमसरकारी कार्यालय, सरकारी रुग्‍णालय यांच्‍यासारख्‍या ना नफा ना तोटा तत्‍वावर चालणा-या संस्‍थांना केलेला पाणी पुरवठा पाण्‍याचा वापर प्रतिमाह सर्व वापराकरीता हजार लिटर 25 रुपये राहील असे उपविभागीय अभियंता, महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण जलव्‍यवस्‍थापन  उपविभाग, वर्धा कळवितात.

आठ प्रकरणे आर्थिक मदतीसाठी पात्र - संजय भागवत


    वर्धा, दि. 17- नापिकी, तगादा व कर्जबाजारीपणा या शासनाच्‍या निकषानुसार  जिल्‍ह्यात  चवदा शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणापैकी   आठ प्रकरणे समिती सदस्‍याच्‍या  सर्वानुमते पात्र ठरविण्‍यात आल्‍या असल्‍याची  माहिती अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी दिली.
         अप्‍पर जिल्‍हाधिकारी यांच्‍या कक्षामध्‍ये शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणाची आढावा बैठक संपन्‍न झाली  त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समितीच्‍या सदस्‍यामध्‍ये  अग्रणी बँकेचे समन्‍वयक श्री.देवपुजारी, कृषी अधिक्षक कार्यालयाचे उपसंचालक, शेतकरी  स्‍वंयसेवी संघटनेचे प्रतिनिधी डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे तसेच संबधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
          पात्र ठरविण्‍यात आलेल्‍या शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणांमध्‍ये स्‍व. पांडूरंग तुमडाम रा. केळापूर ता. वर्धा, स्‍व. पांडूरंग महाकाळकर रा. वडगांव खुर्द ता. सेलू, स्‍व. सुरेश ठोकळे रा. वाढोणा ता. आर्वी, स्‍व. गोपाल उमराव रा. सावल ता. कारंजा, स्‍व. विठ्ठल जुगनाके रा. हिवरा ता. समुद्रपूर, स्‍व. इश्‍वर मुने  रा. सावळी बु. ता. कारंजा, स्‍व. रामदास हिंगने मु.नारा ता. कारंजा, व स्‍व. विश्‍वनाथ खौशी  रा. नारा ता. कारंजा यांचा समावेश  असून, शासनाकडून  त्‍यांना आर्थिक मदत मिळणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
                                                00000

अर्थसहाय्यासाठी 31 ऑगस्‍ट पर्यंत अर्ज करावे


        वर्धा, दि.17- भारत सरकारच्‍या सांस्‍कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठानच्‍या शासनमान्‍य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यान्वित असलेल्‍या अर्थसहाय्याच्‍या समान निधी व असमान निधी योजनांमधून ग्रंथालय संचालनालाय, महाराष्‍ट्र राज्‍य, नगर भवन, मुंबई यांच्‍यामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्‍यातयेते. त्‍या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in  या प्रतिष्‍ठानच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. इच्‍छुकांनी  तो या संकेतस्‍थळावरुन  डाऊन लोड करुन घ्‍यावा.
     समान निधी योजना अंतर्गत राज्‍य शासनाच्‍या 50 टक्‍के व प्रतिष्‍ठानच्‍या 50 टक्‍के अर्थसहाय्यामधून  असणा-या  परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा प्रशिक्षण वर्गाचे आयेाजन व ग्रंथप्रदर्शने  व वाचन संस्‍कृती रुजविण्‍यासाठीचे उपक्रम यासाठी अर्थसहाय्य. सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्‍तार  किंवा बांधणीसाठी अर्थसहाय्य तसेच  फिरते ग्रंथालयासाठी अर्थसहाय्य देण्‍यात येते
      असमान निधी योजना अंतर्गत  ग्रंथालय सेवा देणा-या स्‍वयंसेवी संस्‍थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्‍तार यासाइी असमान निधीतून अर्थसहाय्य (यामध्‍ये प्रतिष्‍ठानचे 75 टक्‍के व इच्‍छुक ग्रंथालय 25 टक्‍के हिस्‍सा (सार्वजनिक ग्रंथालयातील बालविभाग, महिला विभाग, ज्‍येष्‍ठ नागरिक विभाग, नवसाक्षर विभाग, स्‍वतंत्र स्‍पर्धा परीक्षा विभाग इत्‍यादीसाठी  अर्थसहाय्य. (प्रतिष्‍ठानकडून 100 टक्‍के अर्थसहाय्य) . असमान निधी योजनांतर्गत  महोत्‍सवी वर्ष जसे 50, 60,75,100,125 वे किंवा 150 वे वर्ष साजरे करण्‍यासाठी अर्थसहाय्य (प्रतिष्‍ठानकडून 100 टक्‍के अर्थसहाय्य) . शारिरिकदृष्‍ट्या विकलांग व्‍यक्‍तीसाठी विभाग स्‍थापन करण्‍यासाठी ग्रंथालयांना अर्थसहाय्य. (प्रतिष्‍ठानकडून 100 टक्‍के अर्थसहाय्य देण्‍यात येते.
          या योजनांसाठी  विहीत पध्‍दतीत आवश्‍यक त्‍या सर्व कागपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेमधील  प्रस्‍ताव तीन प्रतीत तसेच  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठानच्‍या योजनांबाबत इच्‍छुकांनी   आपल्‍या विभागातील सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयास दिनांक 31 ऑगस्‍ट  2012   पर्यंत  पोहचतील अशा बेताने पाठवावेत. असे आवाहन दि.श्री.चव्‍हाण, संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.
                                                000000