Thursday, 17 November 2011

चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल


नगरपालिका, नगरपरिषद निवडणूक
चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
 वर्धा दि. १७ (जिमाका) नगरपालिका, नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम २०११ अंतर्गत उमेदवार नामनिर्दैशनास सुरूवात झाली असून आज पहिल्या दिवशी चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
वर्धा नगरपालिकेसाठी आज पहिल्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर हिंगणघाट येथे एका उमेदवाराने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून प्राप्त झाली आहे.

Wednesday, 16 November 2011

वर्धा जिल्ह्यात आष्टी येथे १९४२ साली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचं पान लिहीलं गेलं. या घटनेने सारा देश सुन्न झाला. आणि चले जाव चळवळीला गती मिळाली. याची माहिती नव्या पिढीला व सर्वांना व्हावी यासाठी आष्टीचा लढा हे  नवे पान जारी करण्यात आले आहे.  माहितीसाठी त्या पानाला जरूर भेट द्या

प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी वर्धा

निवडणूक पान जारी

वर्धा जिल्ह्यात होणा-या विविध निवडणुकांबाबतची माहिती देण्यासाठी नवे पान जारी करण्यात आले आहे.  माहितीसाठी त्या पानाला जरूर भेट द्या

प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी वर्धा

शासकीय जिल्‍हा ग्रंथालयात 3 दिवसीय दिवाळी अंक प्रदर्शनास आरंभ


                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्‍दी पत्रक   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.16/11/2011
--------------------------------------------------------------------
        वर्धा,दि.16- (जिमाका) – पुस्‍तकं वाचणे ही सवय अंगी बाणवून घेतली तर आयुष्‍यात यश मिळविणं अवघड नाही असे प्रतिपादन जिल्‍हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी शासकीय जिल्‍हा ग्रंथालयात आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्‍या उदघाटन प्रसंगी केले.
    ग्रंथालयातर्फे आयोजित हे प्रदर्शन शुक्रवार 18 नोव्‍हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. नियोजन अधिकारी डायरे यांनी फित कापून व दिप प्रज्‍वलन करुन या प्रदर्शनाचे उदघाटन केले.
     या प्रसंगी अध्‍यक्षस्‍थानी डॉ. कोटेवार हे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर हे होते. व्‍यासपीठावर जिल्‍हा  ग्रंथपाल सुरज मडावी  यांचीही उपस्थिती होती.
या दिवाळी अंकाच्‍या प्रदर्शनात विविध विषयांना वाहिलेले 145 दिवाळी अंक मांडण्‍यात आले आहेत. साहित्‍य, विनोद, मनोरंजन, चित्रपट, उद्योजक, गृहीणी, पाककला, ज्‍योतिष्‍य तसेच बालकांसाठीचे गट यात करण्‍यात आलेले आहेत अशी माहिती जिल्‍हा ग्रंथपाल मडावी यांनी प्रास्‍ताविकात दिली.
     स्‍पर्धेच्‍या या युगात बुध्‍दीच्‍या बळावर आपण यश प्राप्‍त करु शकतो. बुध्‍दी कुशाग्र व्‍हावी यासाठी पुस्‍तकांचं वाचन आवश्‍यक आहे असे उदघाटक डायरे यांनी आपल्‍या भाषणात सांगितले.
     आयुष्‍यात यश प्राप्‍त करण्‍यासाठी प्रचंड मेहनत उपसण्‍याची आणि ध्‍येय्याकडे जाणारे मार्ग शोधण्‍याची गरज आहे असे प्रशांत दैठणकर यांनी आपल्‍या भाषणात सांगितले. वाचक संख्‍या  वाढण्‍यासाठी   शालेय स्‍तरापर्यंत पोहोचून बाल वाचक शोधावे आणि बाल वाचकांची संख्‍या वाढवावी यासाठी प्रयत्‍न झाले पाहिजेत असे डॉ. कोटेवार यांनी अध्‍यक्षीय समारोपात सांगितले.
कार्यक्रमात उपस्थितांचे स्‍वागत जिल्‍हा ग्रंथपाल सूरज मडावी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विजय मुळे यांनी केले.
                    

Tuesday, 15 November 2011

आता लवकरच येणार 4 जी


     
       तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असते आणि हा बदल यापुढेही सुरुच राहणार आहे. देशात मोबाईल धारकांची संख्‍या 80 कोटी झाली मात्र 3 जी तंत्रज्ञान मोजक्‍या लोकांपर्यंतच पोहोचलं. आता पाठोपाठ आयुष्‍याची दिशा पूर्णपणानं बदलणारं 4 जी तंत्रज्ञान भारताच्‍या वाटेवर आहे. त्‍याबाबत महिती देणारा लेख.
                                 -प्रशांत दैठणकर                                                         


संपर्कात मोबाईल तंत्रज्ञानाने मोठी क्रांती घडवली आणि आता भारतात सर्व ठिकाणी 3 जी तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे. हे तंत्रज्ञान तसं अद्यापही महागडं असल्‍याने समान्‍य जणांना याचा वापर अद्याप आवाक्‍याबाहेरची बाब बनली आहे. त्‍यातलं पुढचं पाऊल म्‍हणजे 4 जी तंत्रज्ञान हे अद्याप भारतात आलेलं नाही मात्र चीन आणि अमेरिका यात अग्रेसर आहेत.

4 जी तंत्रज्ञान आपल्‍या जगण्‍याची पूर्ण पध्‍दतच बदलून टाकेल इतक्‍या ताकदीचं तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने वापरात आल्‍यावर घरातील सर्व यंत्राची किल्‍ली आपल्‍या हातात असणा-या मोबाईल फोनवर एकवटेल इतकेच नव्‍हे तर विद्यूत गतीने माहितीचे वहन करण्‍यासोबतच जगभरातील मनोरंजनाची सर्व साधने आपल्‍या हाती येतील.

इंरटनेट सर्वप्रथम भारतात सुरु झालं त्‍यावेळी त्‍याचा वापर `डायलअप` पध्‍दतीने दूरध्‍वनी आणि मोडेमच्‍या सहाय्याने होत असे. त्‍यावेळी ही सेवा देणारे पुरवठादार देखील मोजके होते. साधारण सात ते आठ मेगाबाईटची फाईल आपल्‍याला डाऊनलोड करायची असेल तर त्‍यासाठी आपणास दोन-दोन तास बसावं लागे असा तो काळ आला होता.

नंतरच्‍या काळात आलेल्‍या ब्रॉडबॅन्‍ड सेवेने गतीची परिमाणे बदलली. सोबत मोबाईलच्‍या तंत्रात विकास झाला. संचारासाठी आवश्‍यक स्‍पेक्‍ट्रम शासनाचे मुक्‍त केल्‍याने आता 3 जी तंत्रापर्यंत आपण आलो आहोत,त्‍यामुळे सात ते आठ मेगाबाईटची फाईल ही आज सेकंदात डाऊनलोड होते. 21 मेगाबाईट प्रतिसेकंद पर्यंतची गती आपणास यात प्राप्‍त होते. त्‍यामुळे रिअल टाईम टिव्‍ही देखील आपण आता मोबाईल फोनवर किंवा संगणकावर सहजरित्‍या बघू शकतो.

वेळेची ही परिमाणं बदलण्‍यात जसा स्‍पेक्‍ट्रमचा वाटा आहे तसाच तो गतीसाठी लागणा-या गतिमान यंत्रांचा अर्थात प्रोसेसर्स, रॅम यात झालेल्‍या विकासाचाही वाटा आहे. अॅपलने आपला आयफोन साधारण 5 वर्षांपूर्वी बाजारात सादर केला होता. अमेरिकेने चांद्रयान पाठवून चंद्रावर पोहोचण्‍याचा प्रयत्‍न केला आणि नील आर्मस्‍टॉंग यांने चंद्रावर पाऊल ठेवलं त्‍या मोहिमेसाठी जितकी मोठी व भव्‍य संगणक शक्‍ती वापरली तितकी किंवा त्‍याहून अधिक शक्‍ती आयफोनच्‍या रुपानं माणसाच्‍या हातात आणि खिशात आली होती. आता याच आयफोन श्रेणीतील पाचवी पिढी बाजारात उतरविण्‍यात आली आहे. त्‍यात वाढ तर नक्‍कीच झाली आहे.

3 जी तंत्रात प्रतिसेकंद कमाल वहन शक्‍ती 30 मेगाबाईट प्रतिसेकंद इतकी आहे. तर 4 जी तंत्रात माहितीच्‍या वहनाची कमाल गती 1 गिगाबाईट प्रतिसेकंदापर्यंत आहे. आपण सध्‍या जे संगणक वापरतो त्‍याची साठवण क्षमता 500 गिगाबाईटपर्यंत असते. या पूर्ण साठवणीचे वहन करायला फक्‍त अधिकाधिक दहा ते बारा मिनिटे पुरेशी होतील.

मानवी मेंदूने या सा-या यंत्राना अस्तित्‍वात आणले मात्र त्‍याची आजची प्रगती खरोखर मेंदूच्‍या क्षमतेपलीकडची ठरली आहे. मेंदूने शोधलेलं तंत्र त्‍यामुळे येत्‍या काळात अधिकाधिक मनं जवळ आणेल. अशी अपेक्षा आपण बाळगायला हरकत नसावी.
                                     - प्रशांत दैठणकर

      आता लक्ष द्यावंच लागेल ... 

    स्त्री भ्रुण हत्‍त्‍या हा सामाजिक कलंक आहे. हा प्रकार सोनोग्राफी यंत्राचा शोध लावणा-या आणि त्‍याहीपेक्षा प्रगत तंत्र वापरणा-या विकसित देशांमध्‍ये होत नाही हे विशेष. विकसित देशात मुलींचे दरहजारी प्रमाण एक हजार पेक्षा अधिक आहे. आपल्‍याला आता यावर विचार करावाच लागेल.
                                 -प्रशांत दैठणकर                                                        
      भारतात दरहजारी मुलींचे प्रमाण घटतच आहे. विज्ञानाने प्रगती साधली मात्र त्‍या प्रगतीचा गैरवापर आपण केल्‍यामुळे अनेक तोटे होत आहेत. त्‍यापेकी हा सर्वात मोठा तोटा असून ही सर्वात गंभीर बाब आहे. ज्‍या देशांमध्‍ये संशोधन झाले त्‍यांनी याचा गैरवापर कधीही केलेला नाही असे आकडेवारीवरुन स्‍पष्‍ट होते. हे तंत्र अर्थात अल्‍ट्रासोनोग्राफीचे आहे.
     ध्‍वनीलहरींच्‍या सहाय्याने पाण्‍याच्‍या आत अस्तित्‍व लपविणा-या पाणबुडी शोधण्‍याच्‍या या ध्‍वनीलहरीच्‍या यंत्राचा शोध दुस-या महायुध्‍दाच्‍या काळात लागला. समुद्राच्‍या पाण्‍यात ध्‍वनीलहरी सोडल्‍यानंतर त्‍या लहरी अडथळा असतील तेथून परत येतात त्‍या आधारे शत्रू पक्षाच्‍या पाणबुडीचा पत्‍ता लागायचा. या तंत्राने युध्‍दात जितके जीव घेतले नसतील त्‍यापेक्षा अधिक जीव नंतरच्‍या काळात प्रगत अवस्‍थेतील सोनोग्राफी यंत्राच्‍या मदतीने घेण्‍यात आले ही खचितच दुर्दैवी बाब आहे.
     कोणतेही शास्‍त्र मानवाच्‍या प्रगतीसाठी वापरले गेले पाहिजे पण प्रत्‍यक्षात काही ठिकाणी याच्‍या विपरित घडताना दिसते. याला कारण अर्थात भारतात असणारा वंशाचा दिवा पेटविण्‍याचा पगडा होय. हा पगडा पिढ्या-न-पिढ्या याच पध्‍दतीने असला तरी पूर्वी मूलगा होण्‍याची वाट बघितली जात होती आता मात्रा तसं न करता मुलगाच होईल यासाठी सोनोग्राफीचा गैरवापर केला जात आहे. त्‍यामुळे मुलींचे प्रमाण झपाट्याने घसरले आहे. 
काही विकसित देशांमधील दरहजारी मुलींचे प्रमाण बघितल्‍यावर आपण खरच किती मागे आहोत हे कळतं रशियात हजार मुलांमागे मुलींच्‍या जन्‍माचे प्रमाण 1165 इतके आहे तर फ्रान्‍समध्‍ये हेच प्रमाण 1056  इतके असून जपान 1054, जर्मनी 1038, इंग्‍लंड  1037, ब्राझील  1031 , द. आफ्रीका 1028, अमेरिका 1026, कोरिया 1020, ऑस्‍ट्रलिया 1011, इथिओपिया 1010 आणि इंडोनेशिया 1003 इतके सशक्‍त आहे.
     जगात मुलींचे दर हजारी प्रमाण कमी असणा-या देशांमध्‍ये भारतासह (940), नायजेरिया (995), मलेशिया (970), इराण (968), चीन (927) आणि सौदी अरेबिया (927), पाकिस्‍तान (943), बांगला देश (978) असे आहे.
     सार्क देशांचा विचार करताना श्रीलंका (1034), नेपाळ (1014) या देशांमध्‍येही स्‍त्री भ्रुण हत्‍त्‍या होत नाहीत हे स्‍पष्‍ट होते. भारतात घटलेले प्रमाण आकडेवारीत 940 हा आकडा दाखवत असले तरी आपली लोकसंख्‍या 120 कोटी असल्‍याने ही स्थिती खूपच गंभीर आहे असेच म्‍हणावे लागेल. चीनमध्‍ये एका कुटुंबाला एक अपत्‍य असा कायदा आहे मात्र इतकी लोकसंख्‍या वाढल्‍यानंतरही भारतात असा कायदा झालेला नाही याचीही आपणास स्‍वतंत्रपणे नोंद घ्‍यावी लागेल.
     स्‍त्री आणि पुरुष यांच्‍या शिवाय संसारच सुरु होत नाही ही बाब सर्वांना माहिती आहे परंतु केवळ मुलाच्‍या अट्टहासापायी जन्‍माला येणा-या मुलीला जन्‍म घेण्‍याचा हक्‍क आपण नाकारतोय हे कितपत योग्‍य आहे यावर सर्वांनी विचार करावा.
                                     - प्रशांत दैठणकर

वर्धा जिल्‍ह्यातील नगर परिषद निवडणूक कार्यक्रम


                महाराष्ट्र शासन
प्रसिध्‍दी पत्रक   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.15/11/2011
--------------------------------------------------------------------
        वर्धा  नगर पालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम
वर्धा,दि.15- महाराष्‍ट्र नगर पालिका निवडणूक नियमान्‍वये जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन वर्धा  नगर पालिकेसाठी घेण्‍यात   येणा-या सार्वत्रिक निवडणूकीच्‍या संबधात नेमणूका व तारखा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत.
     सार्वत्रिक निवडणूक नगरपरिषद वर्धा करीता निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी (पूनर्वसन) संजय दैने यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून नगर परिषद वर्धेचे मुख्‍याधिकारी विजय खोराटे व तहसिलदार सुशांत बन्‍सोडे यांची निवड करण्‍यात आली आहे. नामनिर्देशन पत्र देण्‍याचा व स्विकारण्याची मुदत बुधवार दिनांक 16 नोव्‍हेंबर 2011 ते  मंगळवार दि. 22 नोव्‍हेंबर 2011 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. रविवार दि.20 नोव्‍हेंबर 2011 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्‍यामुळे या दिवशी नामनिर्देशन पत्रे देण्‍यात येणार नाहीत वा स्विकारल्‍या जाणार नाहीत.
     नामनिर्देशनपत्र सादर करण्‍याचा शेवटचा दिनांक मंगळवार दि. 22 नोव्‍हेंबर 2011 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. नामनिर्देशनपत्र सादर करण्‍याचे ठिकाण तहसिलदार वर्धा यांचे कार्यालयीन कक्षात होईल. नामनिर्देशन पत्रांची  छाननी करण्‍याची तारीख बुधवार दिनांक 23 नोव्‍हेंबर 2011 सकाळी 11 वाजल्‍या पासून होईल. नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व मागे घेणे यासाठी निश्चित केलेले ठिकाण तहसिलदार वर्धा यांचे कार्यालयीन कक्ष असेल.
     वैधरित्‍या नामनिर्देशित झालेल्‍या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक 23 नोव्‍हेंबर 2011 (बुधवार) सकाळी 11 वाजल्‍या पासून राहणार असून उमेदवारी मागे घेण्‍याची शेवटची दिनांक  29 नोव्‍हेंबर 2011 (मंगळवार) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
     निवडणूक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच अंतिमरीत्‍या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी 30 नोव्‍हेंबर 2011 (बुधवार) ला प्रसिध्‍द करण्‍यात  येईल. मतदान दिनांक 8 डिसेंबर 2011 (गुरुवार) ला सकाळी 7.30 वाजता पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. मतमोजणीची तारीख व वेळ दिनिांक 9 डिसेंबर 2011 (शुक्रवार) रोजी सकाही 10 पासून ते मतमोजणीचे प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत  पर्त राहील. मतमोजणीचे ठिकाण तहसिल कार्यालय, वर्धा असेल. असे जिल्‍हाधिकारी वर्धा कळवितात.
      हिंगणघाट नगर पालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम
वर्धा,दि.15- महाराष्‍ट्र नगर पालीका निवडणूक नियमान्‍वये जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन हिंगणघाट नगर पालिकासाठी घेण्‍यात  येणा-या सार्वत्रिक निवडणूकीच्‍या संबधात नेमणूका व तारखा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत.
     सार्वत्रिक निवडणूक नगरपरिषद हिंगणघाट  करीता निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून उपविभागीय अधिकारी,हिंगणघाट चे उमेश काळे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून,  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून नगर परिषद हिंगणघाटचे मुख्‍याधिकारी प्रशांत रसाळ आणि जी.टी.पुरके, तहसिलदार,हिंगणघाट यांची निवड करण्‍यात आली आहे. नामनिर्देशन पत्रे देण्‍याचा व स्विकारण्‍याची बुधवार दिनांक 16 नोव्‍हेंबर 2011 ते  मंगळवार दि. 22 नोव्‍हेंबर 2011 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. रविवार दि.20 नोव्‍हेंबर 2011 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्‍यामुळे या दिवशी नामनिर्देशन पत्रे देण्‍यात येणार नाहीत व स्विकारल्‍या जाणार नाहीत.
      नामनिर्देशनपत्र सादर करण्‍याचा शेवटचा दिनांक मंगळवार दि. 22 नोव्‍हेंबर 2011 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. नामनिर्देशन पत्र सादर करण्‍याचे ठिकाण उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांचे कार्यालयीन कक्षात होईल. नामनिर्देशन पत्र छाननी करण्‍याची तारीख बुधवार दिनांक 23 नोव्‍हेंबर 2011 सकाळी 11 वाजल्‍या पासून होईल. नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व मागे घेणे यासाठी निश्चित केलेले ठिकाण उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांचे कार्यालयीन  कक्ष असेल.
      वैधरित्‍या नामनिर्देशित झालेल्‍या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक 23 नोव्‍हेंबर 2011 (बुधवार) सकाळी 11 वाजल्‍या पासून राहणार असून उमेदवारी मागे घेण्‍याची शेवटची दिनांक  29 नोव्‍हेंबर 2011 (मंगळवार) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
     निवडणूक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच अंतिमरीत्‍या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी 30 नोव्‍हेंबर 2011 (बुधवार) ला प्रसिध्‍द करण्‍यात  येईल. मतदान दिनांक 8 डिसेंबर 2011 (गुरुवार) ला सकाळी 7.30 वाजता पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. मतमोजणीची तारीख व वेळ दिनांक 9 डिसेंबर 2011 (शुक्रवार) रोजी सकाळी 10 पासून ते मतमोजणीचे प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत  पर्त राहील. मतमोजणीचे ठिकाण कलोडे सभागृह संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट असेल. असे जिल्‍हाधिकारी वर्धा कळवितात.
   आर्वी नगर पालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम
वर्धा,दि.15- महाराष्‍ट्र नगर पालिका निवडणूक नियमान्‍वये जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन आर्वी नगर पालिकासाठी घेण्‍यात येणा-या सार्वत्रिक निवडणूकीच्‍या संबधात नेमणूका व तारखा निश्चित करण्‍यात आल्‍या  आहेत.
     सार्वत्रिक निवडणूक नगरपरिषद आर्वी करीता निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून उपविभागीय अधिकारी,आर्वीचे सुनील कोरडे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून नगर परिषद आर्वीचे  मुख्‍याधिकारी राहूल सुर्यवंशी व तहसिलदार जी.एन.करलुके यांची निवड करण्‍यात आली आहे. नामनिर्देशन पत्रे देण्‍याचा व स्विकारण्‍याची बुधवार दिनांक 16 नोव्‍हेंबर 2011 ते  मंगळवार दि. 22 नोव्‍हेंबर 2011 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. रविवार दि.20 नोव्‍हेंबर 2011 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्‍यामुळे या दिवशी नामनिर्देशन पत्रे देण्‍यात येणार नाहीत व स्विकारल्‍या जाणार नाहीत.
     नामनिर्देशनपत्र सादर करण्‍याचा शेवट मंगळवार दि. 22 नोव्‍हेंबर 2011 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. नामनिर्देशन पत्र सादर करण्‍याचे ठिकाण तहसिलदार,आर्वी यांचे कार्यालयीन खोली क्र.5 येथे होईल. नामनिर्देशन पत्र छाननी करण्‍याची तारीख बुधवार दिनांक 23 नोव्‍हेंबर 2011 सकाळी 11 वाजल्‍या पासून होईल. नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व मागे घेणे यासाठी निश्चित केलेले ठिकाण तहसिलदार आर्वी यांचे कार्यालयीन खोली क्र. 5 असेल.
     वैधरित्‍या नामनिर्देशित झालेल्‍या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक 23 नोव्‍हेंबर 2011 (बुधवार) सकाळी 11 वाजल्‍या पासून राहणार असून उमेदवारी मागे घेण्‍याची शेवटची दिनांक  29 नोव्‍हेंबर 2011 (मंगळवार) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
     निवडणूक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच अंतिमरीत्‍या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी 30 नोव्‍हेंबर 2011 (बुधवार) ला प्रसिध्‍द करण्‍यात  येईल. मतदान दिनांक 8 डिसेंबर 2011 (गुरुवार) ला सकाळी 7.30 वाजता पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. मतमोजणीची तारीख व वेळ दिनांक 9 डिसेंबर 2011 (शुक्रवार) रोजी सकाळी 10 पासून ते मतमोजणीचे प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत  राहील. मतमोजणीचे ठिकाण नगर परिषद गांधी विद्यालय, ड्राईंग हॉल, आर्वी असेल. असे जिल्‍हाधिकारी वर्धा कळवितात.
   पुलगाव नगर पालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम
वर्धा,दि.15- महाराष्‍ट्र नगर पालीका निवडणूक नियमान्‍वये जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन पुलगाव नगर पालिकासाठी घेण्‍यात येणा-या सार्वत्रिक निवडणूकीच्‍या संबधात नेमणूका व तारखा निश्चित करण्‍यात आल्‍या  आहेत.
     सार्वत्रिक निवडणूक नगरपरिषद पुलगांव करीता निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी भुसंपादन (सामान्‍य) वर्धा चे शैलेश मेश्राम  यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून नगर परिषद पुलगावचे  मुख्‍याधिकारी एच.डी.टाकरखेडे व नायब तहसिलदार राजेश सरवदे यांची निवड करण्‍यात आली आहे. नामनिर्देशन पत्रे देण्‍याचा व स्विकारण्‍याची मुदत बुधवार दिनांक 16 नोव्‍हेंबर 2011 ते  मंगळवार दि. 22 नोव्‍हेंबर 2011 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. रविवार दि.20 नोव्‍हेंबर 2011 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्‍यामुळे या दिवशी नामनिर्देशन पत्रे देण्‍यात येणार नाहीत वा स्विकारल्‍या जाणार नाहीत.
     नामनिर्देशनपत्र सादर करण्‍याचा शेवटचा दिनांक मंगळवार दि. 22 नोव्‍हेंबर 2011 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. नामनिर्देशन पत्र सादर करण्‍याचे ठिकाण नगरपरिषद कार्यालय, पुलगाव मुख्‍याधिकारी यांचे  कार्यालयीन कक्षात होईल. नामनिर्देशन पत्र छाननी करण्‍याची तारीख बुधवार दिनांक 23 नोव्‍हेंबर 2011 सकाळी 11 वाजल्‍या पासून होईल. नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व मागे घेणे यासाठी निश्चित केलेले ठिकाण नगरपरिषद कार्यालय पुलगांव मुख्‍याधिकारी यांचे  कक्षात असेल.
     वैधरित्‍या नामनिर्देशित झालेल्‍या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक 23 नोव्‍हेंबर 2011 (बुधवार) सकाळी 11 वाजल्‍या पासून राहणार असून उमेदवारी मागे घेण्‍याची शेवटची दिनांक  29 नोव्‍हेंबर 2011 (मंगळवार) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
     निवडणूक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच अंतिमरीत्‍या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी 30 नोव्‍हेंबर 2011 (बुधवार) ला प्रसिध्‍द करण्‍यात  येईल. मतदान दिनांक 8 डिसेंबर 2011 (गुरुवार) ला सकाळी 7.30 वाजता पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. मतमोजणीची तारीख व वेळ दिनांक 9 डिसेंबर 2011 (शुक्रवार) रोजी सकाळी 10 पासून ते मतमोजणीचे प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत  राहील. मतमोजणीचे ठिकाण पुलगाव नगर परिषद कार्यालय नविन इमारत (पश्चिमेकडील भाग) असेल. असे जिल्‍हाधिकारी वर्धा कळवितात.
               देवळी नगर पालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम
वर्धा,दि.15- महाराष्‍ट्र नगर पालीका निवडणूक नियमान्‍वये जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन देवळी  नगर पालिकासाठी घेण्‍यात येणा-या सार्वत्रिक निवडणूकीच्‍या संबधात नेमणूका व तारखा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत.
     सार्वत्रिक निवडणूक नगरपरिषद देवळी करीता निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून उपविभागीय अधिकारी,वर्धा चे हरिश धार्मिक यांची नियुक्‍ती  करण्‍यात आली असून, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून नगर परिषद देवळीचे  मुख्‍याधिकारी राजेश भगत व तहसिलदार सचिन गोसावी यांची निवड करण्‍यात आली आहे. नामनिर्देशन पत्रे देण्‍याचा व स्विकारण्‍याची मुदत बुधवार दिनांक 16 नोव्‍हेंबर 2011 ते  मंगळवार दि. 22 नोव्‍हेंबर 2011 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. रविवार दि.20 नोव्‍हेंबर 2011 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्‍यामुळे या दिवशी नामनिर्देशन पत्रे देण्‍यात येणार नाहीत वा स्विकारल्‍या जाणार नाहीत.
     नामनिर्देशनपत्र सादर करण्‍याचा शेवटचा दिनांक मंगळवार दि.22 नोव्‍हेंबर 2011 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. नामनिर्देशन पत्र सादर करण्‍याचे ठिकाण नगरपरिषद कार्यालय, देवळी येथे राहील. नामनिर्देशन पत्र छाननी करण्‍याची तारीख बुधवार दिनांक 23 नोव्‍हेंबर 2011 सकाळी 11 वाजल्‍या पासून होईल. नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व मागे घेणे यासाठी निश्चित केलेले ठिकाण नगरपरिषद कार्यालय,देवळी येथे होईल.
वैधरित्‍या नामनिर्देशित झालेल्‍या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक 23 नोव्‍हेंबर 2011 (बुधवार) सकाळी 11 वाजल्‍या पासून राहणार असून उमेदवारी मागे घेण्‍याची शेवटची दिनांक  29 नोव्‍हेंबर 2011 (मंगळवार) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
     निवडणूक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच अंतिमरीत्‍या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी 30 नोव्‍हेंबर 2011 (बुधवार) ला प्रसिध्‍द करण्‍यात  येईल. मतदान दिनांक 8 डिसेंबर 2011 (गुरुवार) ला सकाळी 7.30 वाजता पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. मतमोजणीची तारीख व वेळ दिनांक 9 डिसेंबर 2011 (शुक्रवार) रोजी सकाळी 10 पासून ते मतमोजणीचे प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत  राहील. मतमोजणीचे ठिकाण  नगर परिषद कार्यालयाचे सभागृह (मिटींग हॉल) असेल. असे जिल्‍हाधिकारी वर्धा कळवितात.
 सिंदी (रे.) नगर पालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम
वर्धा,दि.15- महाराष्‍ट्र नगर पालिका निवडणूक नियमान्‍वये जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन सिंदी (रे.) नगर पालिकासाठी घेण्‍यात येणा-या सार्वत्रिक निवडणूकीच्‍या संबधात नेमणूका व तारखा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत.
     सार्वत्रिक निवडणूक नगरपरिषद सिंदी (रे.)  करीता निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी भुसंपादन (उ.व प्र.)वर्धा चे रमण  जैन यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून नगर परिषद सिंदी (रे.) चे  मुख्‍याधिकारी किशोर गांधी व  सेलू चे तहसिलदार अनिल गावीत यांची निवड करण्‍यात आली आहे. नामनिर्देशन पत्रे देण्‍याचा व स्विकारण्‍याची मुदत बुधवार दिनांक 16 नोव्‍हेंबर 2011 ते  मंगळवार दि. 22 नोव्‍हेंबर 2011 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. रविवार दि.20 नोव्‍हेंबर 2011 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्‍यामुळे या दिवशी नामनिर्देशन पत्रे देण्‍यात येणार नाहीत वा स्विकारल्‍या जाणार नाहीत.
     नामनिर्देशनपत्र सादर करण्‍याचा शेवटचा दिनांक मंगळवार दि.22 नोव्‍हेंबर 2011 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. नामनिर्देशन पत्र सादर करण्‍याचे ठिकाण नगरपरिषद कार्यालय,      सिंदी (रे.) येथे राहील. नामनिर्देशन पत्र छाननी करण्‍याची तारीख बुधवार दिनांक 23 नोव्‍हेंबर 2011 सकाळी 11 वाजल्‍या पासून होईल. नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व मागे घेणे यासाठी निश्चित केलेले ठिकाण नगरपरिषद सभागृह, सिंदी (रे.)  येथे असेल.
     वैधरित्‍या नामनिर्देशित झालेल्‍या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक 23 नोव्‍हेंबर 2011 (बुधवार) सकाळी 11 वाजल्‍या पासून राहणार असून उमेदवारी मागे घेण्‍याची शेवटची दिनांक  29 नोव्‍हेंबर 2011 (मंगळवार) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
     निवडणूक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच अंतिमरीत्‍या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी 30 नोव्‍हेंबर 2011 (बुधवार) ला प्रसिध्‍द करण्‍यात  येईल. मतदान दिनांक 8 डिसेंबर 2011 (गुरुवार) ला सकाळी 7.30 वाजता पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. मतमोजणीची तारीख व वेळ दिनांक 9 डिसेंबर 2011 (शुक्रवार) रोजी सकाळी 10 पासून ते मतमोजणीचे प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत  राहील. मतमोजणीचे ठिकाण  नगर परिषद  सभागृह, सिंदी (रे.)असेल. असे जिल्‍हाधिकारी वर्धा कळवितात.
          

Monday, 14 November 2011

गर्भजल चिकित्‍सा रोखण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय दक्षता पथक


महाराष्ट्र शासन
प्रसिध्‍दी पत्रक      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.14/11/2011
--------------------------------------------------------------------
          गर्भजल चिकित्‍सा रोखण्‍यासाठी
            जिल्‍हास्‍तरीय दक्षता पथक
     वर्धा,दि.14-स्‍त्रीभ्रुण हत्‍या रोखण्‍यासाठी असलेल्‍या गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 2003 ची कडक अंमलबजावणी व्‍हावी यासाठी वर्धा येथे जिल्‍हास्‍तरीय दक्षता पथक स्‍थापन करण्‍यास शासनाने मंजूरी प्रदान केली आहे.
     जिल्‍हास्‍तरावरील दक्षता पथकाची रचना खालीलप्रमाणे आहे.
     या जिल्‍हाधिकारी अध्‍यक्ष असून, आयुक्‍त, महानगरपालिका (जिल्‍ह्यात महापालिका असल्‍यास) सह अध्‍यक्ष, मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि  पोलीस अधीक्षक सदस्‍य आहेत. जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक सदस्‍य सचिव म्‍हणून असणार आहे. सदस्‍यांमध्‍ये वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी, मनपा, सर्व समुचित प्राधिकारी, जिल्‍हा शासकीय अभिभोक्‍ता, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हा माहिती अधिकारी, शिक्षण अधिकारी (माध्‍यमिक किंवा प्राथमिक), उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (बालकल्‍याण), समाज     कल्याण अधिकारी, पत्रकार संघ प्रतिनिधी, स्‍त्री भ्रुण हत्‍येविरोधात काम करणा-या स्‍वयंसेवी संस्‍थाचे प्रतिनिधी, जिल्‍हाधिका-यांना योग्‍य वाटतील असे इतर सदस्‍यांचा समावेश राहणार आहे.
     दक्षता पथकाच्‍या कार्यकक्षेमध्‍ये  जिल्‍ह्यातील सर्व समुचित प्राधिकारी यांनी केलेल्‍या कामाचा आढावा घेणे, जिल्‍हा  व तालुका सल्‍लागार समितीच्‍या कामाचा आढावा घेणे, F फॉर्म ऑनलाईन कामाचा आढावा घेणे, टोल फ्री नंबर, आमची मुलगी डॉट कॉम वेबसाईट व इतर       माध्‍यमातून प्राप्‍त  झालेल्‍या  तक्रारीवर करण्‍यात आलेल्‍या कार्यवाहीचा आढावा घेणे. स्‍त्री भ्रुण हत्‍या टाळण्‍याच्‍या अनुषंगाने सामाजिक संस्‍थाच्‍या सहभागाने प्रबोधनात्‍मक जनजागृती कार्यक्रम राबविणे. जिल्‍ह्यातील व तालुक्‍यातील सोनोग्राफी केंद्र, एमटीपी केंद्र यांची नोंदणी व नुतनीकरण याबाबत आढावा घेणे.
     गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याचा प्रसार, प्रचार व प्रभावी अंमलबजावणी करुन स्‍त्री भ्रुण हत्‍या रोखण्‍यासाठी राबविण्‍यात येणा-या विविध उपाय योजनेचा भाग म्‍हणून जिल्‍हाधिकारी यांच्‍या नेतृत्‍वाखाली जिल्‍हास्‍तरीय दक्षता पथक कार्यरत राहील. त्‍याची बेठक दर महिन्‍याचा 5 तारखेस (सुट्टी असल्‍यास लगतच्‍या कामकाजाच्‍या दिवशी) घेण्‍यात येईल व त्‍याचा कार्यवृत्‍तात दरमहा अतिरिक्‍त संचालक, कुटुंब कल्‍याण , पुणे यांना सादर करण्‍यात येईल. असे आदेश नमूद करण्‍यात आले आहे.
                   000000