Wednesday, 21 September 2011

प्रतिक्षा यादीवर असलेल्या उमेदवारांना नेमणूका


                        महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 21 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
      
     वर्धा,दि.21-राज्य परिवहन महामंडळामार्फत सन 2009-10 मध्ये वाहक (कनिष्ष्ठ), या पदांकरीता तसेच सन 2008-09 मध्ये लिपिक टंकलेखक (कनिष्ठ) या पदाकरीता सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.         
                        या भरती प्रक्रियेअंतर्गत विभागांमध्ये निवडसूची व्यतिरिक्त अतिरिक्त म्हणून निवड केलेल्या प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांना विभागातील आवश्यकतेनुसार नेमणूका देणेबाबतची कार्यवाही संबंधीत वर्धा विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. तरी प्रतिक्षा यादीवरील संबधित उमेदवारांनी राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, बसस्टँडजवळ, वर्धा येथे संपर्क साधावा. असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन,वर्धा यांनी कळविले आहे.
                       00000                

1 ऑक्टोंबर हा आंतरराष्ट्रीय वयोवृध्द दिन साजरा करण्याचे आवाहन


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 21 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
           
वर्धा,दि.21-संपूर्ण जगात 1 ऑक्टोंबर हा आंतरराष्ट्रीय वयोवृध्द दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा ही थिम ठरवून त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात सदर दिन साजरा करण्यात येणार आहे.
     राज्यात सदर दिन साजरा करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, पंचायत राज, नगरपालिका, नेहरु युवक केंद्र, शैक्षणिक संस्था, (त्यांच्या एनएसएस युनिटसह) आणि विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन जिल्हा व तालुका पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहे. त्यामध्ये आंतराष्ट्रीय वयोवृध्द दिना निमित्त वयोवृध्दांच्या मालमत्तेचे व जीवनाची सुरक्षा, आर्थिक सुरक्षा व स्थैर्य, स्थावर मालमत्तेपासून नियमीतपणे उत्पन्नाची उपलब्धता, वयोवृध्द लोकांचे बचतगट  स्थापून उत्पन्नाची साधने उपलब्ध करुन देणे, सामाजिक सुरक्षा उपलब्ध करुन देणे, वयोवृध्दांना शिक्षणाप्रती जागृती निर्माण करणे तसेच वयोवृध्दांसाठीच्या आरोग्या विषयी विविध उपाययोजना करणे आदीचा समावेश आहे.
     सदर्हू कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,मुख्याधिकारी नगरपालिका, गटविकास अधिकारी पंचायत समिती व त्यांचे आरोग्य अधिकारी, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण अधिकारी गट अ जिल्हा परिषद, वृध्दाश्रम चालविणा-या संस्था, ज्येष्ठ नागरिक क्षेत्रात कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब इत्यादी व इतर सामाजिक संस्था व संघटना यांचे सहकार्याने 1 ऑक्टोंबर रोजी आंतरराष्ट्रीय वयोवृध्द दिन म्हणून साजरा करावा. या निमित्ताने आई,वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 व नियम 2010 च्या तरतुदींची मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी करण्यात यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                           00000

शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 21 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
           
वर्धा, दि.21- शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी जि.प.महात्मा गांधी विद्यालय वर्धा येथे शासकीय रेखाकला परीक्षा 2011 चे परीक्षा केंद्र क्र. 526 देण्यात आले आहे. व उपकेंद्र म्हणून मौलाना आझाद उर्दु हायस्कुल हे राहणार आहे. परीक्षेविषयीची माहिती पुढील प्रमाणे आहे.
     दिनांक 23 ते 24 सप्टेंबर 2011 सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंत एलिमेंटरी या परीक्षेसाठी रोल नंबर 1 ते 329 पर्यंत जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय, वर्धा  परीक्षा केंद्र क्र. 526 व  रोलनंबर 330 ते 460 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी  मौलाना आझाद उर्दु हायस्कुल, वर्धा  उपकेंद्र 526  परिक्षा केंद्र ठरविण्यात आले आहे.
     दिनांक 26,27,28 सप्टेंबर 2011 वेळ सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंत इंटरमिजिएट परिक्षेसाठी रोल नंबर 1 ते 268 पर्यंत  विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय वर्धा परीक्षा केंद्र क्र. 526  व रोल नंबर 269 ते 385 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद उर्दु हायस्कुल, वर्धा  उपकेंद्र 526  परिक्षा केंद्र ठरविण्यात आले आहे.असे जिल्हा परिषद महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कळवितात.
                        00000

नवीन मतदार नोंदणी ओळखपत्राच्या विशेष मोहीमेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन


                       महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.21सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------
    वर्धा,दि.21-जिल्ह्यात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांना नवीन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राच्या विशेष मोहीमेमध्ये सहभागी व्हावयाचे असल्यास त्यांनी आपल्या संपूर्ण माहितीसह प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालय,(निवडणूक विभाग), वर्धा या पत्यावर किंवा दूरध्वनी क्रमांक 07152-249776 वर तात्काळ संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,वर्धा कळवितात.
                      00000000

1 जानेवारी 2012 या दिनांकावर आधारीत विशेष पुनरीक्षणाचा कार्यक्रम



 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 21 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
           
     वर्धा,दि.21-भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार वर्धा जिल्ह्यातील 44-आर्वी, 45 देवळी, 46-हिंगणघाट, 47-वर्धा, विधानसभा मतदार संघातील दिनांक 1 जानेवारी 2012 या दिनांकावर आधारीत मतदार याद्याचे विधानसभा मतदार संघानुसार विशेष पुनरिक्षणाचा कार्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित केलेला आहे.
     पुनर्रचित विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची प्रारुप प्रसिध्दी दि. 1 ऑक्टोंबर 2011 (शनिवार), दावे व हरकती स्विकारणे दि. 1 ऑक्टोंबर (शनिवार) ते दि. 1 नोव्हेंबर 2011 (मंगळवार), विशेष मोहीम दि. 9 ऑक्टोंबर 2011 (रविवार), दि. 16 ऑक्टोंबर 2011 (रविवार) व 23 ऑक्टोंबर 2011 (रविवार).दावे व हरकती निकालात काढणे दिनांक 1 डिसेंबर 2011 (रविवार) पुरवणी मतदार यादी तयार करणे व छायाचित्र मतदार याद्यांची छपाई  दि. 1 डिसेंबर 2011 (गुरुवार) पासून दि. 31 डिसेंबर 2011 (शनिवार) पर्यंत. छायाचित्र मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी दि. 5 जानेवारी 2012 (गुरुवार) रोजी होईल.
     भारताचे नागरीक जे दिनांक 1 जानेवारी 2012 रोजी आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण करतील व ते त्या मतदार संघातील कायमचे रहीवासी आहेत असे नागरीक आपली नावे मतदार यादीमध्ये नोंदवू शकतात.
     44-आर्वी मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी उप विभागीय अधिकारी, आर्वी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार, आर्वी, तहसीलदार, आष्टी, तहसीलदार कारंजा हे राहतील.
     45- देवळी मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी उप विभागीय अधिकारी, वर्धा, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार, देवळी राहतील.                       
        46-हिंगणघाट मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी उप विभागीय अधिकारी हिंगणघाट, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी  तहसीलदार हिंगणघाट, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार समुद्रपूर हे राहतील.
47-वर्धा मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी उप विभागीय अधिकारी, वर्धा व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार, वर्धा    तहसीलदार सेलू राहतील.
संबंधीत मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या पदनिर्देशित    अधिका-याकडे मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक 1 ऑक्टोंबर 2011 ते 1 नोव्हेंबर 2011 पर्यंत कार्यालयीन वेळेत आणि दिनांक 9 ऑक्टोंबर 2011,    16 ऑक्टोंबर 2011 व 23 ऑक्टोंबर 2011 या विशेष मोहीमेच्या तारखांना सर्व मतदान केंद्रावर दावे व हरकती दाखल करण्यासाठी व चुकीच्या नोंदीची दुरुस्ती करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज विनामुल्य उपलब्ध असतील.
मतदार याद्या जास्तीत जास्त अचूक व अद्यावत बनविण्याच्या दृष्टीने सक्रिय भाग घेवून या कामामध्ये निवडणूक यंत्रणेला सहकार्य द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                    000000

नवीन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहीम


           महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक              जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 21 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------------

वर्धा,दि.21-नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्रा- बाबतची विशेष मोहीम दिनांक 1 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2011 या कालावधीत होणार आहे. नवीन मतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना 6 मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदारांनी अर्ज करावेत. मतदार यादीतील नावाबाबत आक्षेप व नाव गाळण्याकरीता नमुना क्र.7 भरावा. मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलमध्ये करावयाच्या दुरुस्ती करीता नमुना क्र.8 भरावा. मतदार यादीतील नोंदीचे एका ठिकाणावरुन दुस-या ठिकाणी स्थलांतर करण्याकरीता नमुना क्र. 8 अ भरावा.
अर्जदारांनी नमुना 6,7,8 व 8 अ चा अर्ज विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात नियुक्त पदनिर्देशित अधिका-याकडे मतदान केंद्राच्या ठिकाणी दिनांक 1 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2011 दरम्यान सादर करावेत.
     44- आर्वी विधानसभा मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी उपविभागीय अधिकारी,आर्वी दूरध्वनीक्र. 07157-222028, 45-देवळी विधानसभा मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी  उपविभागीय अधिकारी,वर्धा दूरध्वनी क्र.07152-242561,46-हिंगणघाट विधानसभा मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी उपविभागीय अधिकारी,हिंगणघाट दूरध्व.क्र.07153-244080, 47-वर्धा विधानसभा मतदार संघासाठी उपविभागीय अधिकारी,वर्धा दूरध्व.क्र.07152-242561 असा आहे.
     मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे नमुना 6,7,8 व 8 अ सादर करताना काही अडचणी आल्यास उपरोक्त वर नमूद केलेल्या मतदार नोंदणी अधिका-याकडे संपर्क साधावा.   
                           000000

परिक्षा केंद्रावर 144 कलम लागू


      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक           जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 21 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
             
वर्धा,दि.21-महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या विक्री कर निरीक्षक पदाच्या पूर्व परिक्षा दि.25 सप्टेंबर 2011 रोजी जी.एस.कॉमर्स कॉलेज, वर्धा, यशवंत महाविद्यालय वर्धा, केसरीमल गर्ल्स हायस्कुल वर्धा, सुशिल हिंमतसिंघका विद्यालय,वर्धा आणि अग्रगामी विद्यालय,वर्धा या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
परिक्षा सुरळीतपणे पार पडाव्या यासाठी जिल्हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्राप्त अधिकारान्वये या परिक्षा केंद्रावर पि.सी.आर. 144 कलम लागू करण्यात आले असून 25 सप्टेंबर 2011 रोजी सकाळी 6 पासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत परिक्षा केंद्राच्या 100 मिटर वरील परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रीत येण्यावर प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच झेरॉक्स, फॅक्स, मोबाईल, फोन, ई-मेल व इंटरनेट आदी सेवेवर प्रतीबंध करण्यात आले आहे.
                    00000