Thursday, 25 August 2011

चंद्रपूर येथे सैन्यभरती 22 ते 28 सप्टेंबर 2011 पर्यंत


 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.25 ऑगस्ट 2011
--------------------------------------------------------------------------
               

वर्धा, दि. 25- चंद्रपूर येथे दि. 22 ते 28 सप्टेंबर 2011 या कालावधीत सैन्य भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही भरती बुलढाणा जिल्हा वगळून विदर्भातील सर्व जिल्ह्यासाठी आहे. यामध्ये सोल्जर नर्सींग असिस्टंट, सोल्जर जी. डी, सोल्जर टेक्नीकल, सोल्जर ट्रेड्समेन, सोल्जर क्लर्क व ट्रेड्समेन या पदांकरीता होत आहे.
     दि. 22 सप्टेंबर 2011 रोजी चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील युवकांसाठी, दि. 23 सप्टेंबर 2011 रोजी अकोला व वाशीम, 24 सप्टेंबर 2011 रोजी गोंदिया व भंडारा, 25 सप्टेंबर 2011 रोजी नागपूर व वर्धा, 26 सप्टेंबर 2011 रोजी अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यातील युवकांसाठी चाचणी होणार आहे.
     तसेच एनसीसी सर्टिफिकेट धारक, सेवारत सैनिकांचे पाल्य, माजी सैनिकांचे पाल्य, युध्द विधवांचे पाल्य व राज्य पातळीवर व राष्ट्रीय पातळीवर खेळलेले खेळाडू यांचेसाठी 27 सप्टेंबर 2011 रोजी सर्व ट्रेडसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. दि.28 सप्टेंबर 2011 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील युवकांसाठी सोल्जर नर्सींग असिस्टंट व सोल्जर टेक्नीकल पदांकरीता चाचणी होणार आहे. वैद्यकीय परिक्षा 23 सप्टेंबर 2011 पासून सकाळी 6 वा.पासून घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी वैद्यकीय परिक्षेसाठी येण्यापुर्वी कानातील मळ काढून कान स्वच्छ करावेत. उमेदवार हा नॉक नी, हायड्रोसील, कलर आंधळेपणा, कार्डीयक मरमर, ओटिटीए मिडीया, स्टॅमरींग, मेंटल बॅकवर्डनेस, शारिरिक डिफॉर्माटिस, लेप्रोसी या रोगांपासून मुकत असावा.
     सोल्जर जी.डी. (महार), सोल्जर जी.डी.(शेड्युल ट्राईब) साठी वयोमर्यादा 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्षे अशी असून, सोल्जर टेक्नीकल, सोल्जर टेक्नीकल (नर्सींग असिस्टन्ट), सोल्जर (क्लर्क किंवा स्टोअर किपर), सोल्जर (ट्रेड्समॅन) हाऊस किपर व मेस किपर या पदासाठी 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्षे अशी वर्यामर्यादेची अट आहे.
     सोल्जर जी.डी.(महार) करीता शैक्षणिक पात्रता 45 टक्के गुणासह ( 32 टक्के गुण प्रत्येक विषयात) दहावी परिक्षा उत्तीर्ण असने आवश्यक आहे. सोल्जर जी.डी.(शेड्युल ट्राईब) करीता 8 वी पास आवश्यक, सोल्जर नर्सींग असिस्टंट करीता 12 वी उत्तीर्ण       ( फिजीक्स, केमेस्ट्री व बॉयलॉजी मध्ये 50 टक्के सरासरी व 40 टक्के प्रत्ये विषयात) किंवा बि.एस.सी. डिग्री (बॉटनी किंचा झुलॉजी किंवा बायोसायन्स) आणि इंग्रजी पास, सोल्जर टेक्निकल करीता 12 वी उत्तीर्ण( फिजीक्स, केमेस्ट्री व गणीत), सोल्जर क्लर्क व स्टोअरकिपर साठी 12 वी उत्तीर्ण (आर्टस, कॉमर्स किंवा सायन्स मध्ये 50 टक्के सरासरी व 40 टक्के प्रत्येक विषयात), तसेच 10 वी किंवा 12 वी मध्ये गणित आणि ईंग्लीश किंवा अकाऊंट किंवा बुक किपिंग मध्ये 40 टक्के गुण आवश्यक आहे. सफाईवाला व मसालची करीता 8 वी इयत्ता पास, ट्रेंडसमेन (सफाईवाला व मसालची) सोडून इतर ट्रेड करीता 10 वी पास व आयटीआय पात्रता धारकांसाठी एनसीटीव्हिटी चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
सोल्जर जी.डी.महार या ट्रेड करीता शारिरीक पात्रता उंची 168 सें.मी. वजन 50 कि.ग्रॅ. छाती 77 सें.मि. (फगवून 82 सें.मि.) आवश्यक आहे. सोल्जर जी.डी. (शेड्युल ट्राईब) साठी उंची 162 सें.मी. वजन 48 कि.ग्रॅम, छाती 77 से.मी. (फूगवून 82 से.मि.) तर सोल्जर टेक्नीकल, सोल्जर नर्सींग असिस्टंट साठी उंची 167 सें.मी. छाती 77 सेंमि. फूगवून 82 सें.मी.) तर सोल्जर टेक्नीकल, सोल्जर नर्सींग असिस्टंट या पदासाठी उंची 167 सें.मी. छाती 77 सें.मी (फूगवून 82 से.मी.) वजन 50 कि.ग्रॅ. तसेच सोल्जर क्लर्क व स्टोअरकिपरसाठी उंची 162 सें.मी. वजन 50 कि.ग्रॅ. छाती 77 सें.मी ( फूगवून 82 सें.मी.) ट्रेड्समेन ( सफाईवाला व मसालची) व इतर ट्रेडमेन करीता उंची 168 सें.मी., वजन 48 कि.ग्रॅ. छाती 76 सें.मी. (फूगवून 81 से.मी.) आवश्यक आहे.
     सैन्य भरतीसाठी उमेदवारांनी दोन प्रतीमध्ये एस.एस.सी., एच.एस.सी. व पदवी परिक्षेच्या मुळ गुणपत्रिका व बोर्डाचे प्रमाणपत्र दोन प्रतीमध्ये (एम. सी. व्ही. सी.) चे प्रमाणपत्र सैन्य भरतीसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही. चारित्र्याचे प्रमाणपत्र, शाळा सोडलयाचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, 10 वी पेक्षा कमी शिक्षण घेणारे उमेदवारांचा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी प्रतिस्वाक्षरी केले असणे आवश्यक आहे. सरपंचाकडून रहिवाशी दाखला (दाखला मिळालेच्या तारखेपासून सहा महिन्यापर्यंत वैध), जातीचे प्रमाणपत्र सर्व जातीसाठी आवश्यक आहे, डोमीसाईल प्रमाणपत्र तीन प्रतीमध्ये, पोलिस पाटलांकडून प्रमाणपत्र, डिप्लोमा प्रमाणपत्र, खेळाडू व एनसीसी
अ, ब, क सर्टिफिकेट धारक फक्त आंतरिक कँप प्रमाणपत्र ग्राहय धरल्या जाणार नाही. माजी सैनिक अथवा सेवारत सैनिक पाल्य आदिंचे दाखले, कुटूंबातील सर्व व्यक्तींची जन्म तारखेसमवेत माहिती ( वडिल, आई, भाऊ व बहिण, वरील सर्व कागदपत्रांचा गॅझेटेड ऑफिसर कडून साक्षांकित केलेला एक संच, याशिवाय पासपोर्ट आकाराचे एकाच निगेटिव्ह वरुन काढलेले   16 रंगीत अद्यावत फोटो ( बिना टोपी लावलेले) आणावेत. काळे किंवा पांढरे फोटो चालणार नाही. फोटोमध्ये दोन्ही कान दिसने आवश्यक असून, सदरहू प्रमाणपत्र सोबत घेवून यावे.
     भरतीसाठी येणारा उमेदवार जर 18 वर्षापेक्षा लहान असतील तर त्यांनी आपल्या वडील किंवा गार्डियन कडून सैन्यामध्ये जाण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र आणावयास विसरु नये. भरतीसाठी येणा-या उमेदवारांनी पिण्याचे पाणी, धावण्यासाठी बुट तसेच लेखी परिक्षेचे सर्व साहित्य सोबत आणावे. रात्री राहण्यासाठी स्वत: व्यवस्था करावी लागेल. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा कळवितात.
                        000000

कृषि विभागातील शिपाई पदाकरीता लेखी परिक्षा 31 ऑगस्ट रोजी


                     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.25 ऑगस्ट 2011
--------------------------------------------------------------------------
           
     वर्धा,दि.25- कृषि कार्यालया अंतर्गत शिपाई पदा करिता अर्ज मागविण्यात आले होते. त्याची लेखी परिक्षा दिनांक 31 ऑगस्ट 2011 रोजी बुधवारी आयोजीत केलेली आहे.
ज्या उमेदवारांनी शिपाई पदाकरीता आवेदन सादर केली होती त्यांना लेखी परिक्षेचे प्रवेश पत्र पाठविण्यात आलेले आहे. ज्यांना लेखी परिक्षेचे प्रवेश पत्र प्राप्त झाले नाही त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रेल्वे स्टेशन समोर, वर्धा येथे दि. 30 ऑगस्ट 2011 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत संपर्क साधावा.
     परिखा केंद्र व बैठक क्रमांक पुढील प्रमाणे आहे. अग्रग्रामी शाळा, आर्वी रोड, वर्धा रोल नं. 1001 ते 1500, भारत ज्ञान मंदीर कान्व्हेंट वर्धा 1501 ते 1750, न्यु ईंग्लिश हायस्कूल, ठाकरे मार्केट, वर्धा 1751 ते 2150, केसरीमल कन्या शाळा, नागपूर रोड वर्धा 2151 ते 2450, लोकमहाविद्यालय बॅचरल रोड, वर्धा 2451 ते 3850, यशवंत महाविद्यालय, सेवाग्राम रोड वर्धा 3851 ते 4195, जानकीदेवी बजाज सायन्स कॉमर्स, वर्धा 4196 ते 4595, न्यु आर्ट कॉमर्स आणि सायन्स कॉलेज वर्धा     4596 ते 4921 व 5001 ते 5375 असा आहे असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा कळवितात.
                        000000

Wednesday, 24 August 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती, गुरुवार दि.25/8/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
615.7 मि.मी.

9.55 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा -539.90 (14.4) मि.मी.
2)सेलू - 595(निरंक) मि.मी.
3)देवळी -721.76(51) मि.मी.
4)हिंगणघाट-614.20(निरंक) मि.मी.
5)आर्वी -654(11) मि.मी.
6)आष्टी -525.60 (निरंक) मि.मी.
7)समुद्रपूर -667 (निरंक) मि.मी
8)कारंजा-608.14(निरंक) मि.मी.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय बुधवार, २४ ऑगस्ट, २०११

१८ सहकारी साखर कारखान्यांना पूर्व हंगामी कर्ज आणि
त्यावरील व्याजास शासन थकहमी देण्याचा निर्णय


चालू वर्षीच्या गाळप हंगामात राज्यातील १८ सहकारी साखर कारखान्यांना पूर्व हंगामी कर्ज, अल्प मुदत कर्ज आणि त्यावरील व्याजास शासन थकहमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 
५० टक्क्यांपेक्षा अधिक ऊस उपलब्धता व नक्त मुल्य उणे असलेल्या तसेच पूर्व हंगामी, अल्प मुदत कर्ज व ऊस दराची देय बाकी नसलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडील ८ व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील १० अशा एकूण १८ कारखान्यांना २७.८८ कोटी रुपये पूर्व हंगामी कर्ज व ११८.९५ कोटी रुपये अल्पमुदत कर्ज अशा एकूण १४६.८३ कोटी रुपये कर्जास आणि त्यावरील व्याजास शासन थकहमी देण्यात येईल. 
५० टक्क्यांपेक्षा ऊसाची उपलब्धता कमी असलेले व नक्त मूल्य अधिक असलेल्या कारखान्यांना तसेच, भाडेतत्वावर / भागिदारी तत्वावर, चालविण्यास दिलेल्या, विक्री झालेल्या व अवसायनातील कारखान्यांना पूर्व हंगामी कर्जास थकहमी देण्यात येऊ नये असाही निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
अटींची पूर्तता काही कारखान्यांनी भविष्यात केल्यास या कारखान्यांच्या प्रस्तावास थकहमी देण्याचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात यावेत असेही यावेळी निश्चित करण्यात आले.
जीवन संजीवनी योजनेला मुदतवाढ

ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या अदायगीसाठी सुरु करण्यात आलेल्या जीवन संजीवनी योजनेला दि.३१ मार्च २०१२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांच्या अदायगीसाठी जीवन संजीवनी योजना दि. १५ जून, २००९ च्या शासन निर्णयान्वये राज्यात सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या वीज ग्राहक संस्थांनी थकीत वीज बिलांच्या मूळ रकमेपैकी ५० टक्के रक्कम एकरकमी भरल्यानंतर उर्वरित थकीत ५० टक्के रक्कम येणाऱ्या पुढील विद्युत देयकांसोबत सहा समान हप्त्यात एक वर्षात भरावयाची आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या पाणी पुरवठा संस्थाना थकीत वीज बिलावरील व्याजाची ७५ टक्के रक्कम महावितरण कडून माफ करण्यात येते व उर्वरित २५ टक्के व्याजाची रक्कम राज्य शासनाकडून महावितरण कंपनीस अदा करण्यात येते. 
या योजनेस मिळालेला प्रतिसाद विचारात घेऊन या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी संधी न मिळालेल्या ग्रामपंचायतींना देखील या योजनेचा लाभ घेता यावा, या दृष्टीकोनातून, दि.२३ मार्च,२०१० च्या शासन निर्णयान्वये या योजनेला दि.३१ ऑक्टोबर,२०१० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ४१६८ तर दुसऱ्या टप्प्यामध्ये १०६५ याप्रमाणे एकूण ५२३३ ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांनी सहभाग घेतला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत रु.२६.७८ कोटी थकीत वीज बिलाची रक्कम वसुल झाली असून महावितरण कडून रु.१२.७८ कोटी इतकी व्याजाची रक्कम माफ करण्यात आली आहे. महावितरण कंपनीस शासनाने रु.४.०६ कोटी इतकी व्याजाची रक्कम अदा केली आहे.
या योजनेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात येत होती. तसेच या योजनेला पुन्हा मुदतवाढ दिल्यास ज्या ग्राहक संस्थांना या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळाली नसेल, त्यांना या योजनेचा लाभ घेण्याची आणखी एक संधी उपलब्ध व्हावी यासाठी या योजनेला दि.३१ मार्च २०१२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

२ ऑक्टोबरपासून राज्यात दोन टप्प्यात सामाजिक-आर्थिक व जातनिहाय जनगणना

बुधवार, २४ ऑगस्ट, २०११
सामाजिक-आर्थिक व जातनिहाय जनगणना राज्यात २ ऑक्टोबर ते डिसेंबर २०११ पर्यंत २ टप्प्यात करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. प्रत्येक टप्पा ४५ दिवसांचा राहील. 

केंद्र शासनाने २०११ मध्ये सामाजिक-आर्थिक व जातनिहाय जनगणना करण्याचे ठरविले आहे. भारत सरकारच्या वित्तीय आणि तांत्रिक सहाय्याने ही जनगणना करण्यात येईल. ग्रामीण आणि शहरी भागात प्रथमच एकाच वेळी सुरु करण्यात येणाऱ्या जनगणनेचे Enumeration Block (EB) निहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सुमारे २.२४ लक्ष Enumeration Blocks (EB) तसेच एक प्रगणक (Enumerator) ४ EB चे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी सुमारे ६२ हजार प्रगणकांची आवश्यकता भासणार आहे. ६ प्रगणकांवर १ पर्यवेक्षक (Supervisor) असेल, त्यासाठी सुमारे ११ हजार पर्यवेक्षकांची आवश्यकता भासेल. या कामासाठी प्रगणक / पर्यवेक्षक, तलाठी, ग्राम सेवक, कृषी सहाय्यक इ. जिल्हा परिषद व शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांमधून निवडण्यात येतील. Paperless सर्वेक्षण, माहिती प्रथमच Hand Head Devise वर भरण्यात येतील. त्यासाठी Tablet P.C. व Data Entry Operator Bharat Electronics Limited (BEL) मार्फत पुरविण्यात येणार आहेत. प्रगणक / पर्यवेक्षक यांना प्रतिदिन ३०० रुपये मानधन देण्यात येईल.

राज्यातील कामाचे संनियंत्रण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तर उप विभाग (Sub Division) स्तरावर उप विभागीय अधिकारी, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.

Hand Head Devise वर भरलेली माहिती रोज तालुक्याच्या Server वर up load करण्यात येणार असून ती केंद्र शासनाच्या महासंगणकाशी जोडण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री / पालक सचिव या कामावर देखरेख करतील

वर्धा जिल्ह्यात कलम 36 जारी

                    महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.24 ऑगस्ट 2011
--------------------------------------------------------------------------
           
     वर्धा, दि. 24- जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये वर्धा जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 पोटकलम अ ते फ पर्यंत लागू करण्यात आला असून, या आदेशाचा अंमल दिनांक  31 ऑगस्ट 2011 चे 24 वाजता पर्यंत आहे.
     या आदेशाचा भंग करणा-या व्यक्तीविरुध्द मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 134 अन्वये कार्यवाहीस पात्र राहील.
                            00000

अन्नदात्रीच ॲनिमिक... ?


विशेष लेख          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि. 24 ऑगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------
 अन्नदात्रीच निमिक... ? 
     कुटुंबातील सर्वजण जेवल्यावर आपण जेवावं या मनाचा पगडा स्त्रियांच्या मनावर मोठया प्रमाणावर आहे. काळ झपाटयाने बदललाय मात्र त्यात बदल नाही झाला. यामुळे महिलांमध्ये आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झालीय.काळाच्या सोबत महिलांनी आहारही बदलण्याची वेळ आता आली आहे.                                            - प्रशांत दैठणकर
समाजात ज्या वाईट रुढी परंपरा आहेत त्यात अनुनयाची परंपरा महिला वर्ग पुढे चालवतोय आणि त्यातून त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे हे अतिशय गंभीर असं प्रकरण आहे. कुटुंबात सगळयांची जेवणं झाल्यानंतर घरच्या त्या अन्नदात्रीनं जेवायचं अशी एक विचित्र परंपरा आपण पाळतोय त्यामुळे मोठया प्रमाणात कमजोरी अर्थात निमियाची वाढ होताना दिसत आहे.
घरात कर्ता पुरुष जेवल्यानंतर त्या घरातल्या गृहिणीने जेवण करावं ही परंपरा आहे. या रुढीला जुन्या काळातल्या पध्दती प्रमाणे आजही बघितलं जाते असं नव्हे तर तो प्रत्येक स्त्री च्या मनावर कायम स्वरुपी बिंबलं आहे. पूर्वीच्या काळातील जीवनशैली आणि आजची जीवनशैली यात खूप मोठा फरक आहे. त्यावेळी जवळपास सगळा भारत हा ग्रामीण भागातच वसलेला होता आणि सायंकाळी आठ वाजेपूर्वी जेवणं व्हायची.
आज कालानुरुप परिस्थिती बदलली आहे. मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. सोबतच स्त्री देखील नोकरीसाठी घराबाहेर पडली आहे. त्यामुळे शहरी भागात सकाळी विविध कामासाठी सुटं झालेलं कुटुंब एकत्र यायलाच रात्रीचे नऊ वाजत असतात. त्यानंतर जेवणं होतात असा साधारण शहरी राहणीचा बाज आहे. या सर्व धावपळीत स्त्रियांना देखील पुरुषांइतकीच धावपळ करावी लागते. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक धावपळ करावी लागत असते.                             
 शरीराला सातत्याने ऊर्जा लागते आणि जितकी धावपळ तितकी अधिक ऊर्जा असं गणित आहे. मात्र जुन्या समजुतीतून महिला ऊर्जेचा स्त्रोत असणा-या सकस आहारापासून वंचित राहतात आणि त्यामुळे समाजात निमियाची समस्या  मोठ्या प्रमाणावर दिसते. लोह आणि इतर जीवनावश्यक घटक हे नियमितपणे आपल्या आहारात नसतील तर निमिया होतो. गर्भवती स्त्रियांना याबाबत अधिक काळजी घ्यावी लागते. ती काळजी घेतली गेली नाही तर ती माता आणि तिच्या पोटी जन्माला येणारं बालक या दोघांनाही प्राणाचं संकट असतं.
नोकरदार महिलांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण बहुतांश वेळा त्यांना बैठ्या स्वरुपाचे काम असते. यामुळे शारिरीक मेहनती अभावी येणारा लठ्ठपणा आणि त्यासोबतच ॲनिमिया  असे  दुहेरी  संकट  त्यांच्या समोर येते. लठ्ठपणा आहे याचा अर्थ धडधाकट असणं असा होत नसतो.
वयानुसार सकाळी नाश्ता घेणे ज्यात दुध किंवा अंडी असणं महत्वाचं असतं. वयाची चाळीशी ओलांडल्यावर शरीरात कॅल्शिअमचा साठा होत नाही. त्यामुळे कॅल्शिअम दररोज जेवणातूनच मिळवावे लागते. त्यासाठी नाश्ता हा कॅल्शिअमने संपन्न असणं गरजेचं आहे. अन्यथा सांधेदुखी आणि गुडखेदुखी अशा समस्या सुरु होतात.
शहरी भागात दुचाकीचा वापर करणा-या महिलांनाही मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. वाहतुकीचा ताण झेलण्यासाठी आणि पाठीचे दुखणे टाळण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम यांची गरज मोठ्या प्रमाणावर असते.   
महिलांची आणखी एक सवय म्हणजे शिळं उरलेलं अन्न खाण्याची. या शिळ्या अन्नाने पोट भरत असले तरी त्यात आवश्यक तितका सकसपणा नसतो. परिणामी निमिक होण्याची शक्यता दाट असते. खेरीज शिळ्या अन्नाने विषबाधा होण्याचाही धोका मोठ्या प्रमाणात असतो. बदलत्या जीवन शैली प्रमाणे महिलांनी आपल्याही आहाराच्या पध्दतीत बदल करणं त्यामुळेच आवश्यक ठरतं.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           
                                 - प्रशांत दैठणकर
                          ०००००