Friday, 12 August 2011

नि:शुल्क संगणक प्रशिक्षण शिबीर


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा       दि.12 ऑगस्ट 2011
-----------------------------------------------------------------------
                
     वर्धा,दि.12-जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील बेरोजगार युवक व युवती ज्यांना स्वत:चा उद्योग सुरु करण्याची व शासनाच्या विविध कर्ज योजने मध्ये भाग घेवून स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे अश्यांसाठी वर्धा येथे दि. 25 ऑगस्ट 2011 ते 8 ऑक्टोंबर 2011 पर्यंत नि:शुल्क संगणक हार्डवेयर, सॉफ्टवेयर, नेटवर्कींग, लॅपटॉप मेन्टनन्सच्या प्रशिक्षणाचे आयोजन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राव्दारे करण्यात येत आहे.हे प्रशिक्षण जिल्हा उद्योग केन्द्र आणि समाज कल्याण कार्यालयाव्दारे प्रायोजित आहे.
प्रशिक्षणात शिकविण्यात येणारे विषया व्यतीरिक्त व्यक्तीमत्व विकास,वेळेचे नियोजन, बाजारपेठ सर्वेक्षण, बँकेचे कर्ज प्रकरण कार्यपध्दती, जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना आणि विविध मंडळाच्या योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल,ध्येय सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, अकाउंटींग, तसेच व्यवसायाची निवड कशी करावी या विषयांवर तज्ञ व अधिकारी वर्गाव्दारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
     या प्रशिक्षणामध्ये भाग घेण्याकरीता उमेदवार हा सुशिक्षीत बेरोजगार असावा. त्याचे शिक्षण सुरु नसावे व वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. शिक्षण किमान 10 वा वर्ग पास किंवा नापास किंवा आय.टी.आय असावे.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2011 रोजी 5 वाजेपर्यंत आहे.
     अर्ज सादर करु इच्छिणा-यांनी आपल्या सोबत वयाचा दाखला,शैक्षणिक पात्रतेचा दाखला,जातीचा दाखला, सेवायोजन कार्ड, एक फोटो, या सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व सत्यप्रत आणावी.अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी दि.23 ऑगस्ट 2011 रोजी सकाळी 11 वाजता कार्यबल समितीपुढे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा उद्योग केन्द्र, वर्धा येथे हजर राहावे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींची यादी दि. 24 ऑगस्ट 2011 रोजी सुचना फलकावर लावण्यात येईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या प्रशिक्षणार्थींना रु. 1500 विद्यावेतन मिळणार आहे..अधिक माहितीसाठी मालती अडतकर यांचेशी संपर्क साधावे.असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी,विवेक तोंडरे कळवितात. 
                                  00000

पालकमंत्री राजेंद्र मुळक यांचा दौरा कार्यक्रम


    महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.12 ऑगस्ट 2011
------------------------------------------------------------------
          
वर्धा, दि.12- राज्याचे वित्त व नियोजन, उर्जा व जलसंपदा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांचे सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2011 रोजी सकाळी 8.45 वाजता नागपूरहून शासकिय वाहनाने विश्राम भवन वर्धा येथे आगमन होईल.
सकाळी 9 वाजता विश्राम भवन येथून जिल्हा कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी 9.04 वाजता जिल्हा कार्यालयात आगमन, सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहन व मानवंदना व राष्ट्रगीत कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी 9.08 वाजता स्वातंत्र्य दिनानिमीत्ताने शुभसंदेश, सकाळी 9.10 वाजता प्रशस्तीपत्र  वितरण कार्यक्रम, सकाळी 9.15 वाजता परेड विसर्जन,
सकाळी 9.17 वाजता निमंत्रांच्या भेटी, सकाळी 9.20 वाजता विकास भवन येथे चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
 सकाळी 9.50 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आगमन, सकाळी 10 ते 11.55 वाजता पर्यंत पोषण आहार क्लिनीकला भेट, रक्तगट विलगीकरण विभागास भेट, माता व बालिका यांचा सत्कार, नवजात शिसु अतिदक्षता विभागास भेट, टेलीमेडीसीन, सीटी स्कॅन विभागास भेट, अपंग व्यक्तींना साहित्य वाटप कार्यक्रम स्थळ रुग्णालयाचे प्रशिक्षण केंद्र वर्धा. सकाही 11 वाजता शासकिय वाहनाने नागपूरकडे प्रयाण व राखीव राहील.
                        00000

शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्र्याचे हस्ते


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा       दि.12 ऑगस्ट 2011
-----------------------------------------------------------------------
        
वर्धा,दि.12-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 64 वा वर्धापण दिनानिमित्त सोमवार दिनांक    15 ऑगस्ट 2011 रोजी शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ राज्याचे वित्त व नियोजन, उर्जा, जलसंपदा, संसदीय कार्य, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्या शुभहस्ते सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न होईल.
     तरी जनतेनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                               00000

वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मदाय आयुक्ताची परवानगी आवश्यक


                      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा       दि.12 ऑगस्ट 2011
-----------------------------------------------------------------------
               
वर्धा, दि.12- वर्धा जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव साजरा करण्याकरीता वर्गणी गोळा करण्यासाठी या कार्यालयातून मुंबई सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियम 150 चे कलम 41 (क) नुसार परवानगी घेणे आवश्यक आहे.
     यासाठी लागणारा अर्ज दिनांक 16 ऑगस्ट 2011 पासून कार्यालयीन वेळेत या कार्यालयात उपलब्ध आहे. सदरच्या अर्जाची किंमत रु. 3 एवढी आहे.
     अर्जासोबत पुढील प्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. मंडळाचा ठराव ज्या मध्ये मंडळाचे नाव ठरविणे, मंडळाचे कार्यकारी मंडळ ठरविणे,ज्या ठिकाणी मुर्तीची स्थापना करावयाची आहे ती जागा ठरविणे या बाबतचा उल्लेख असावा. मागील वर्षाचा हिशेब, ज्या जागेवर मुर्तीची स्थापना करावयाची आहे त्या जागेच्या मालकाचे मुर्ती स्थापनेसाठी व उत्सव साजरा करण्याबाबतचे ना हरकत प्रमाण पत्र व प्रतिज्ञा पत्र (नमुना वरील कार्यालयाचे नोटीस बोर्डावर लावण्यात आला आहे).
     वरील प्रमाणे अर्जासोबत कागदपञे सादर केल्यानंतर परवानगी अर्ज मंजूर करुन परवानगी देण्यात येईल. तसेच कार्यालयाने कुठल्याही त्रयस्त इसमास या कामासाठी नेमलेले नाही. अधिक माहितीसाठी  सहाय्यक धर्मदाय आयुक्त, सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय, एल.आय.सी. कार्यालया जवळ, वर्धा येथे संपर्क साधावे.
                         000000

स्वाभिमान योजने अंतर्गत शेतजमीन खरेदीसाठी आवाहन


प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा             दि.12 ऑगस्ट 2011
   
     वर्धा,दि.12-वर्धा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन लाभार्थ्यांना आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाचे वतीने राबविण्यात येणा-या आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत सन 2011-12 मध्ये शेतजमीन खरेदी करुन वाटप करावयाची आहे.
     आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत ज्या शेतमालकांना जिरायती व बागायती जमीन शासकीय दराने भूमिहीन न होता विकण्यास इच्छूक असल्यास त्यांनी जमीनीचा 7/12 , नमुना आठ अ, नकाशा तसेच शासकीय बोजा व गहाण नसलयाचे आणि जमिनीवर कोणत्याही व्यक्तीचे वा संस्थेचे अतिक्रमण नसल्याचे तलाठी यांचे प्रमाणपत्रासह अर्ज कार्यालय, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गिरीपेठ, नागपूर येथे सादर करण्याबाबत आवाहन प्रकल्प अधिकारी ए.आ. वि.प्र. नागपूर यांनी केले आहे.
                           0000

अनैतिक व्यापारात गुंतलेल्या महिलांसाठी व्यवसायिक प्रशिक्षणाची विशेष योजना


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.12 ऑगस्ट 2011
------------------------------------------------------------------
                           वर्धा,दि.12- वर्धा जिल्ह्यातील अनैतिक व्यापारात गुंतलेल्या महिलांसाठी त्या व्यवसायातून परावृत्त होण्याच्या दृष्टीने त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
वर्धा जिल्ह्यातील अनैतिक व्यापारात गुंतलेल्या महिलांनी व्यवसायिक प्रशिक्षणाबाबत प्रसिध्दी करण्यात आलेल्या अर्जाच्या नमुन्यात अर्ज करुन प्रसिध्दी झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, विद्यानगर, आरती टॉकीज चौक, नागपूर रोड, वर्धा येथे सादर करावा. अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वर्धा या कार्यालयात उपलब्ध आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा कळवितात.
                   00000

Thursday, 11 August 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती, शुक्रवार दि..12/8/2011,



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
457.47 मि.मी.

निरंक.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा  -420.15 (निरंक) मि.मी.
2)सेलू - 461(निरंक) मि.मी.
3)देवळी -480.16 (निरंक) मि.मी.
4)हिंगणघा -508.02(निरंक)मि.मी.
5)आर्वी - 466 (निरंक) मि.मी.
6)आष्टी -358.28 (निरंक) मि.मी. 7)समुद्रपूर -508.15(निरंक) मि.मी
8)कारंजा- 398.05(निरंक) मि.मी.