Thursday, 4 August 2011

वर्धा जिल्ह्यात आता पावेतो 396 मि.मी. सरासरी पाऊस


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.4आगस्ट 2011
-------------------------------------------------------------------------

  वर्धा, दि.4- वर्धा जिल्ह्यात आतापावेतो 396.95 मि.मी. सरासरी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली असून, गेल्या चोविस तासास देवळी तालुक्यात 58.06 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तालुकानिहाय कंसातील आकडे हे एकूण पावसाचे असून, कंसाबाहेरील आकडे हे आज पडलेल्या पावसाचे आहे.
     वर्धा 42 (338.08) मि.मी., सेलू 20 (429) मि.मी., देवळी 58.06 (417.94) मि.मी., हिंगणघाट 32.0 (431.06) मि.मी., समुद्रपूर 50 (450.08) मि.मी., आर्वी 17 (444) मि.मी., आष्टी 32.6 (323.6) मि.मी., कारंजा 10.2 (341.9) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
     आज जिल्ह्यात एकूण 261.86 मि.मी. पाऊस पडला असून आतापावेता एकूण 3175.66 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सरासरी पडलेला पाऊस   32.73 मि.मी. असून, आतापर्यंत 396.95 मि.मी. एकूण सरासरी एवढा पाऊस पडला आहे.
                                      000000


राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण पशुपालन अनुदान योजनेसाठी शेतक-यांनी अर्ज सादर करावे


   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.4आगस्ट 2011
------------------------------------------------------------------------
    वर्धा,दि.4-राज्य शासनाच्या  पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2011-12 मध्ये राज्यात पशु आधारीत उत्पादनाला चालना देण्यासाठी दुधाळू संकरीत गायी व म्हशीचे गट वाटप करणे, राज्यामध्ये ठाणबंद पध्दतीने शेळी पालनाव्दारे शेतक-यांना पुरक उत्पन्न मिळवून देणे आणि राज्यामध्ये कंत्राटी पध्दतीने मांसल कुक्कुट पक्षी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी नाविन्यपुर्ण राज्यस्तरीय योजना सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदानावर आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी 75 टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहे.
     दुधाळू संकरीत गायी व म्हशीचे गट वाटप या योजने अंतर्गत 6 गायी किंवा म्हशी, जनावरांचा गोठा, स्वयंचलीत चारा, कटाई यंत्र, खाद्य साठविण्यासाठी शेड आणि 3 वर्षाचा विमा या  बाबीचा समावेश आहे. याची प्रकल्प किंमत एकूण रु. 3,35,184 आहे. त्यात सर्व साधारण प्रवर्गातील लाभार्थींना रु. 1,67,592   (50 टक्के अनुदान) तर अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना रु. 2,51,388 (75 टक्के अनुदान ) अनुज्ञेय राहील.
     अंशत: ठाणबंद पध्दतीने शेळ्यांचे संगोपन करणे या योजने अंतर्गत 10 शेळ्या व 1 बोकड या प्रमाणे 1 गट देण्याचे अभिप्रेत असून, त्यामध्ये शेळी व बोकड खरेदी आणि त्यांचा विमा, शेळ्यांचा वाडा, खाद्याची भांडी, आरोग्य सुविधा व औषधोपचार ईत्यादी बाबीसाठी उसमानाबादी व संगमनेरी शेळ्यांच्या जातीकरीता रु, 87,857 व स्थानिक जातीच्या शेळ्याकरीता रु. 64,884 प्रकल्प किंमत आकारण्यात आली आहे. यात सुध्दा सर्वसाधारण प्रवर्गाकरीता 50 टक्के अनुदान म्हणजेच रु. 43929 (उस्मानाबादी व संगमनेरी                  जातीसाठी) तर रु. 32443 ( अन्य स्थानिक जातीसाठी देयक आहे. यात अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांकरीता 75 टक्के अनुदान म्हणजेच रु. 65893  (उस्मानाबादी व संगमनेरी जातीसाठी तर रु. 48665 अनुदान ( अन्य स्थानिक जातीसाठी अनुज्ञेय आहे.
     राज्यामध्ये कंत्राटी पध्दतीने मांसल कुक्कुट पक्षी पालन व्यवसाय यामध्ये पक्षीगृह व उपकरणे ईत्यादी करीता रु 900000 चा प्रकलप आहे त्यात 50 टक्के म्हणजे रु. 4,50,000 हे सर्वसाधारण प्रवर्गाकरीता आणि 75 टक्के म्हणजे रु. 6,75,,000 मर्यादे पर्यंत अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थींना अनुदान देय राहील.
     या व्यतिरीक्त राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेच्या माध्यमातून कॅपीटल वेचंर फंड योजने अंतर्गत डेअरी उद्योजकता विकास योजना, कुक्कुट पालन योजना व शेळी पालन योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेत सर्वसाधारण लाभार्थीकरीता प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थींना 33.33 टक्के अनुदानाची तरतुद करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थीने स्वत: 10 टक्के मार्जीन रक्कम उभारावयाची आहे व उर्वरीत बँकेच्या नियमा प्रमाणे कर्जाव्दारे रक्कम उभारावयाची आहे.
     उपरोक्त नाविन्यपुर्ण योजना आणि वेचंर कॅपिटल फंड अंतर्गत नाबार्डच्या दुग्ध, कुक्कुट आणि शेळी व मेंढी पालन व्यवसायाच्या योजनेचे अर्ज पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती यांचे मार्फतीने करावयाचे आहे.
     ईच्छूक लाभार्थींनी सदर व्यवसायाकरीता पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती, वर्धा यांचेशी संपर्क साधावे असे आवाहन डॉ. जी.के. उराडे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, वर्धा यांनी केले आहे.
                        00000

अनुसूचीत जाती व जमातीच्या शेतक-यांना अर्थसहाय्य देण्याची योजना


                    महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.4आगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------
      वर्धा,दि.4-जिल्हा परिषद,वर्धा यांचे मार्फत अनु. जाती व नवबौध्द तसेच अनु. जमातीच्या शेतक-यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणेकरीता अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेच्या लाभाचे स्वरुपामध्ये निविष्ठा(एक हेक्टर मर्यादेत) रु. 5,000/- चे मर्यादेत 100 टक्के अनुदानावर, सुधारीत कृषि औजारे रु. 10,000 चे मर्यादते 100 टक्के अनुदानावर, बैलजोडी रु. 30,000 चे मर्यादेत 100 टक्के अनुदानावर, बैलगाडी 15000 रु. मर्यादेत 100 टक्के अनुदानावर , जुनी विहिर रु. 70,000 ते रु. 1,00,000 चे मर्यादेत ( रोहयो अंतर्गत योजनेनुसार ) 100 टक्के अनुदानावर, तुषार किंवा ठिंबक सिंचन संच रु.25,000 च्या प्रती हेक्टर मर्यादेत 100 टक्के अनुदानावर व शेततळे रु. 35,000 मृदसंधारण निकशानुसार 100 टक्के अनुदानावर तसेच जे लाभार्थी नविन विहिर घटकाचा लाभ घेणार नाही त्यांचेसाठी अनुदानाची मर्यादा रु. 50,000 इतकी राहील.
लाभार्थी निवडीच्या  निकषानुसार विशेष घटक व ओटिएसपी योजने अंतर्गत लाभार्थीचे नावे 6 हेक्टर किंवा यापेक्षा कमी जमीन असणे आवश्यक आहे. जमिन धारणेबाबतचा 7/12 व 8 अ मध्ये दाखला आवश्यक व सोबत शेतीचा  नकाशा जोडणे आवश्यक आहे.तसेच जातीचा दाखला (तहसिलदार यांचा), उत्पन्नाचा दाखला रु. 25000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.1 मे 2011 नंतर तिसरे अपत्य असलेला शेतकरी लाभास पात्र नाही. ओटिएसपी योजने अंतर्गत शेतक-यांचे नाव बिपीएल यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे.                                     
          लाभार्थी निवडीची कार्यपध्दती मधे लाभार्थीची निवड करण्यासाठी तालुक्यातील गट विकास अधिका-याने कृषि अधिकारी (विघयो) यांचे मार्फत केलेल्या नमुन्यात पात्र लाभार्थी कडून अर्ज मागवून सदर यादी जिल्हा स्तरावर कृषि विभागाकडे पाठवून नमुद केलेल्या जिल्हा निवड समिती समोर ठेवून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाईल. या योजने अंतर्गत निवड करण्यात येणा-या प्रत्येक लाभार्थीसाठी योजना राबविण्याचा कालावधी दोन वर्षाचा राहील.
लाभार्थीने स्वत:चे अर्जामध्ये संपुर्ण नांव, गांव, संपुर्ण पत्ता, जात,जमिन सर्व्हे नं. व आराजी तसेच उत्पन्न अर्जामध्ये नमूद करुन लाभार्थीने स्वत:च्या सहीनिशी आवश्यक कागदपत्रे जोडून पंचायत समिती स्तरावर अर्ज  सादर करावा. यासाठी या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतक-यांनी पंचायत समिती स्तरावरील गट विकास अधिकारी किंवा कृषि अधिकारी (विघयो) यांचेशी संपर्क साधावा. दि. 10 ऑगस्ट 2011 अखेर पर्यंत प्रस्ताव पंचायत समिती येथे सादर करावेत. असे आर.के.गायकवाड, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा यांनी कळविले आहे.
                   0000

Wednesday, 3 August 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती दि.4/8/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
396.95 मि.मी.

32.73
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा  -338.08 (42) मि.मी.
2)सेलू - 429(20) मि.मी.
3)देवळी-417.94(58.06) मि.मी.
4)हिंगणघा -431.06(32)मि.मी.
5)आर्वी -444(17) मि.मी.
6)आष्टी -323.6(32.6) मि.मी. 7)समुद्रपूर -450.08(50) मि.मी
8)कारंजा-341.9 (10.2) मि.मी.

संपूर्ण स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा


                      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.3आगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------
        वर्धा,दि.3- महाविद्यालयीन युवा शक्तीला पाणी पुरवठा व स्वच्छता या विषयामध्ये सहभागी करुन घेण्याकरीता  तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय स्पर्धा दिनांक 8 व 9 आगस्ट 2011 रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये 8 आगस्टला पंचायत समिती वर्धा, देवळी, आष्टी व हिंगणघाट तसेच 9 आगस्टला पंचायत समिती सेलू, आर्वी, कारंजा व समुद्रपूर या तालुक्यामध्ये सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा 12 ऑगस्ट रोजी यशवंत महाविद्यालय,वर्धा येथे घेण्यात येणार आहे.
     महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पाणी पुरवठा, पाणी गुणवत्ता व स्वच्छता या बाबींची जागृती करणे. पाणी व स्वच्छतेबाबत प्रत्येक महाविद्यालयातून संदेश वाहक व अभ्यासू वक्ते तयार करुन जागृती करणे हा शासनाचा  उद्देश आहे. स्पर्धेसाठी कनिष्ट महाविद्यालयीन व वरिष्ठ महाविद्यालयीन असे दोन गट तयार करण्यात आले आहे. कनिष्ट महाविद्यालयीन युवकासाठी पाणी पट्टी नळ योजनेची जाणीव जबाबदारी , जोश तरुणायीचा जागर स्वच्छतेचा, शुध्द पाणी पिण्याचे आरोग्य सांभाळी गावाचे, माझ्या स्वप्नातील स्वच्छ निर्मल गाव, आलं पाणी आपली योजना हे विषय ठेवण्यात आलेले आहेत. वरिष्ठ महाविद्यालयीन युवकासाठी राखु पाण्याची गुणवत्ता मिळेल. आरोग्याची सुबत्ता, लोकसहभाग गावाचा पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा , तरुणाईच्या हाती स्वच्छतेची ज्योती, मी निर्मल गावचा सरपंच बोलतोय, स्वच्छतेतून समृध्दीकडे हे विषय ठेवण्यात आलेले आहेत. दोन्ही गटातून प्रथम, व्दितीय आणि तृतीय विजेत्यांना रोख स्वरुपात बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तालुकास्तरीय दोन्ही गटातील प्रथम आणि व्दितीय क्रमांकांचे विजते जिल्हास्तरासाठी पात्र ठरणार आहे. तर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतून दोन्ही गटातून प्रथम येणा-या विजेत्यास राज्यस्तरीय वकृत्व सपर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
     तालुकास्तरीय विजेत्या प्रथम क्रमांकासाठी रु. 5000, व्दितीय क्रमांकासाठी रु. 3000 तर तृतीय क्रमांकासाठी रु. 2000 अशी रोख स्वरुपातील बक्षिसे दोन्ही गटामधून देण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाला रु. 11,000 , व्दितीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाला रु. 7,000 तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाला रु. 5,000 मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
     जिल्ह्यामध्ये आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी आपआपल्या महाविद्यालयामध्ये किंवा संपूर्ण स्वच्छता अभियान कक्षाशी संपर्क साधावा व मोठ्या संख्येने भाग घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयभाऊ जयस्वाल व मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी केले आहे.
                    000000

Tuesday, 2 August 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती दि.3/8/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
365.78 मि.मी.

1.7
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा  -296.8 (निरंक)
2)सेलू - 409(निरंक) मि.मी.
3)देवळी -360.88(निरंक) मि.मी.
4)हिंगणघा-399.6(निरंक)मि.मी.
5)आर्वी -427(निरंक) मि.मी.
6)आष्टी -291(निरंक) मि.मी. 7)समुद्रपूर-400.08(8.05) मि.मी
8)ारंजा-331.7 (निरंक) मि.मी.