Tuesday, 8 June 2021

 






प.क्र- 425                                                                    दि.8.06.2021

राज्यात आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती

Ø विर्यमात्रा फक्त ८१ रुपयांना उपलब्ध

Ø लिंग विनिश्चित वीर्यमात्रांचे उत्पादन व पुरवठा कार्यक्रमाचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते उद्घाटन

   मुंबई, दि. ८ : राज्यात शेतक-यांकडील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित विर्यमात्रा (Sex Sorted Semen) वापर करून उच्च अनुवंशीकतेच्या कालवडी / पारड्यांची निर्मिती करण्यात येणार असून यामध्ये राज्यात आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार आहे. ही विर्यमात्रा फक्त ८१ रुपयांना उपलब्ध होणारा क्रांतिकारी निर्णय         घेण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

        लिंग विनिश्चित वीर्यमात्रांचे उत्पादन व पुरवठा कार्यक्रमाचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास  मंत्री सुनील केदार यांच्या  हस्ते मंत्रालयात उद्घाटन झाले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची उपस्थिती होती. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह,अतिरीक्त आयुक्त धनंजय परकाळे हे आँनलाईन उपस्थित होते. तर सह सचिव मानिक गूट्टे,अवर सचिव शैलेश्‍ केंडे यांचीही उपस्थिती होती.

         श्री.केदार  ऑनलाईन माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले , या उपक्रमुळे ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे. त्यांचे जीवनमान उंचावणारा हा पशुसंवर्धन विभागाचा निर्णय आहे. फिरते पशुचिकित्सालयांद्वारे व पशुसंवर्धन विभागाच्या प्रत्येक अधिकारी- कर्मचारी यांच्या मार्फत या उपक्रमाची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा अशा सुचनाही त्यांनी यावेळी त्यांनी दिल्या.

       सन 2017च्या 20 व्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये  निसर्गनियमानुसार सरासरी ५० टक्के नर व ५० टक्के मादी वासरांचे प्रमाण होते. राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. तसेच, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण यामध्ये वाढ झाल्याने शेती कामाकरिता उपयोगी असलेल्या बैलांची आवश्यकता कमी झालेली आहे. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास येणा-या अतिरिक्त नर वासरांचे संगोपन करण्यासाठी पशुपालकांना अनावश्यक खर्च सोसणे भाग पडत होते ते आता अत्यल्प होणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

        यापार्श्वभूमीवर नर वासरांची पैदास न्युनतम पातळीवर ठेवण्याच्या हेतूने पारंपारिक वीर्यमात्राऐवजी  लिंगविनिश्चीत वीर्यमात्रा या नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेल्या वीर्यमात्रांचा क्षेत्रिय स्तरावर गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमाअंतर्गत वापर केल्यास जवळपास ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.

          लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यमात्रांची किंमत हजार ते  १ हजार २०० रु प्रती लिंगविनिश्चीत वीर्यमात्रा एवढी असल्याने पशुपालकांमध्ये त्याबद्दल उत्साह आढळून येत नव्हता. तंत्रज्ञानामुळे खाजगी संस्थांकडून काही काळापासून अवलंब करूनही क्षेत्रीय स्तरावर गाई-म्हशींच्या कृत्रिम रेतनासाठी वापर करणे शक्य होत नव्हते.

           पशुसंवर्धन विभागाच्या महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने  लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यमात्रा  Genus Breeding India Pvt. Ltd. (ABS India) यांच्याकडून ५७५ रूयांना प्रती मात्रा  दराने खरेदी करून ५ वर्षात एकूण ६ लाख ८० हजार रेतमात्रांचा वापर राज्यातील शेतकरी / पशुपालक गाई-म्हशींना कृत्रिम रेतनासाठी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची (कालवडी/पारड्या) निर्मीती होवून भविष्यात राज्याचे दुध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.

             एका लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यमात्रेची किंमत रु.५७५ असून २६४ रू केंद्र शासनाचा हिस्सा,१७४रू राज्य शासनाचा हिस्सा असून उर्वरित १४०/- पैकी रु.१००/- दूध संघामार्फत व जेथे दुध संघ कार्यरत नाही, अशा ठिकाणी सदरचा खर्च महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ करणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या शेतक-यांच्या गाई  / म्हशींमध्ये लिंगविनिश्चीत केलेल्या वीर्यमात्रा वापरून कृत्रिम रेतन केलेले आहे. अशा शेतक-यास उर्वरित रु.४० अधिक कृत्रिम रेतनासाठी शासनास देय असलेले सेवाशुल्क रु.४१/- असे फक्त ८१/- अदा करावे लागणार आहेत. म्हणजेच शेतक-यांना ज्या लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यमात्रा रु.१,०००/- ते १,२००/- दरांमध्ये उपलब्ध होत  होत्या. त्याचवीर्यमात्रा आता रु.८१ ला उपलब्ध होणार आहेत.

            राज्यातील सहकारी व  खाजगी दूध संघाच्या सभासदाकडील  गाई / म्हशीमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर करण्यासाठी संबंधित दूध संघांना लिंगविनिश्चित वीर्यमात्रा मागणीप्रमाणे रु १८१  प्रति वीर्यमात्रा या दराने उपलब्ध करून देण्यात याव्यात.गाई-म्हशींमधील कृत्रिम रेतनापोटी शेतकरी / पशुपालकांकडून कोणत्याही परिस्थितीत प्रति मात्र रु. ८१पेक्षाजास्त सेवाशुल्क आकारणी दूध संघाना करता येणार नाही. असे श्री केदार यांनी यावेळी सांगितले.

                                                            00000

 



प.क्र- 423                                                                    दि.8.06.2021

      स्वयंसेवी संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या पहिल्या

      लसीकरण केंद्राचे जिल्हाधिका-यांचे हस्ते लोकार्पण

        नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने लसीकरण करुन घ्यावे

-          जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार

 

      वर्धा दि.8जुन (जिमाका)  मागील वर्षीपेक्षा यावर्षी कोविड 19 च्या कठीण परिस्थितीचा सामना  जिल्हयाला करावा लागत आहे. अशा परिस्थितीत  नागरिकांच्या व स्वयंसेवी संस्थानी कोरोना चाचणीसाठी केलेल्या  सहकार्यामुळे जिल्हयाचा पॉझिटिव्ह  दर कमी करण्यास मदत झाली आहे.   नागरिकांना लसीकरणासाठी  प्रवृत्त करण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी असेच सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले . 

          अनेकांत स्वाध्याय मंदिर व रोटरी क्लबच्या वतीने अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे  सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केद्राच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी  मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे,   उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे,  वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले,  मुख्याधिकारी विपीन पालीवाल,  तहसिलदार रमेश कोळपे , तालुका आरोग्य अधिकारी,  रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित गांधी, आदी उपस्थित होते.

          स्वयंसेवी संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेले  जिल्हयातील हे पहिले लसीकरण केद्र असून या लसीकरण केंद्राव्दारे शहरातील नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळेल. लसीकरणाच्या पहिल्या टप्यात जिल्हयाने चांगला उच्चाक गाठला असून 44 वर्षावरील नागरिकांना  लसीकरण करण्यात येत असून सध्याचा लसीकरणाचा वेग 10 पटीने वाढविल्यास  जिल्हयाचे 70 लसीकरण लवकर पूर्ण होईल. यामुळे तिसऱ्या लाटेचा जास्त परिणाम जिल्ह्यात होणार नाही असे प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या. येत्या दोन आठवडयात जास्तीत जास्त लसीकरण करण्यास  नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

          कार्यक्रमाला  रोटरी क्लबचे  सचिव गजानन पडोळे,  प्रकल्प संचालक  आसिफ भाई, प्रकल्प मार्गदर्शक महेश मोकलकर,  राजेश नरहरशेट्टीवार,   नितीन शिंदे,  डॉ. पाटणी, महाविर पाटणी, रवि पडोळे यांची उपस्थिती होती.

                                                0000

 






प.क्र- 422                                                                    दि.8.06.2021

आवास दिनाच्या निमित्ताने गृह प्रवेश" कार्यक्रम संपन्न

Ø  जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण 

       वर्धा दि.8(जिमाका)  ५ जून या आवास दिन व जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेल्या आवासचे  अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजित बढे व माजी सभापती मुकेश भिसे यांचे हस्ते लाभार्थ्याना चावी देऊन गृहप्रवेश करण्यात आला.  यावेळी देवळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज भोयर, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रविण कु-हे, विस्तार अधिकारी श्री. राठोड,सरपंच  सचिन बिरे, तालुका समन्वयक सचिन निकम, ग्राम विकास अधिकारी पी.एम. चौधरी,  रवी वाके आदी ची उपस्थिती होती.

यावेळी सत्यजीत बडेनी आज पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास याबद्दल  व ते टाळण्यासाठी                           ग्रामीण भागामध्ये करावे लागणारे उपाय यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

          महाआवास अभियानातंर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून ग्राम देवळी तालुक्यातील ग्राम पंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सौ शालूबाई हरिभाऊ गुलफोडे व शबरी आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेले सुरेश कवडुजी करपते व शरद कवडुजी करपते या लाभार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते  घराची चावी देऊन गृह प्रवेश" करण्यात आला तसेच घरकुल बांधकाम मिळणारे अनुदाना मध्ये लाभार्थ्यांनी त्यामध्ये स्वतःपैसे खर्च करून उत्तम प्रकारचे घर बांधले आहे. तसेच शासनाच्या विविध योजनाच्या कृती संगमातून जसे स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शौचालय बांधकाम पूर्ण झाले, उज्वला योजनेच्या माध्यमातून LPG गॅस मिळाला, सौभाग्य योजनेच्या माध्यमातून लाईट ची सोय व जल जीवन मिशन अंतर्गत ग्रा.पं ने नळ कनेक्शन देऊन स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली.पोषणा साठी घरकुल लाभधारकांना यावेळी महिंद्रा प्रेरणा सीएसआरच्या माध्यमातून परसबागेत लावण्यासाठी २० प्रकारचे भाजीपाला बियाणे किट देण्यात आले. तसेच उमेद अभियान अंतर्गत महिलांना बचत गटाशी जोडण्यात आले असल्याचे उमेद संघटिका यांनी संगितले यावेळी CSC सेंटर ला भेट देऊन त्यांच्या कामा विषयी माहिती घेण्यात आली.

                    ग्राम पंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या      निमित्ताने "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" या उक्तीप्रमाणे ग्रामपंचायत आवारात वृक्षरोपण करण्यात आले.

                                                00000

 

Monday, 7 June 2021

 

प.क्र- 420                                                                    दि.7.06.2021

                   कोरोनामुक्त गावासाठी जागरुकता निर्माण करा

                 आशा सेविकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Ø  कोरोनाकाळातील कामाबद्दल आशा सेविकांना मुख्यमंत्र्यांकडून मानाचा मुजरा

        मुंबई, दि. ७ : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी ‘आशा सेविकांची  भूमिका महत्वाची आहे. पालकांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करतानाच कोरोनामुक्त गावासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. गावातील वस्तीची जबाबदारी घेऊन कोरोनामुक्तीसाठी त्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन करतानाच आशा सेविकांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.

        मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, बालरोग तज्ञांच्या टास्फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर यांच्यासह राज्यभरातील सुमारे ७० हजार आशा सेविका या ऑनलाईन परिषदेत सहभागी झाले होते.

  अन्य साथीच्या आजाराची माहिती प्रशासनाला तातडीने कळवावी

          बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सने ज्या सूचना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करतानाच कोरोना व्यतिरिक्त एखाद्या आजाराची साथ, लक्षणे आढळल्यास त्याची तातडीने माहिती प्रशासकीय यंत्रणेला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशा सेविकांना केले. बालकांची काळजी घेण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करावे त्यांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करण्याचे काम आशा सेविकांनी करावे. कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातूनच बालकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे

        कोरोना व्यतिरिक्तही कुपोषणाचे संकट आहे त्याला सामोरे जाताना कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाच्या कोरोना मुक्त गाव मोहिमेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा. गावातील वाड्या वस्त्यांची जबाबदार घेऊन त्यांना कोरोनामुक्तीसाठी मार्गदर्शन करा, असे सांगितले.

आशा शब्दाला साजेस काम

आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला मिळालेल्या यशाचे तुम्ही शिलेदार आहात असे गौरवपूर्ण उद्गार काढतानाच राज्यातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण केले जात असून या सुविधांची आपण मुळं आहात ती मजबूत करण्याचं काम केले जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. आपल्याला जगवते ती आपल्यातली ‘आशा हा शब्द ज्याप्रकारे तयार झाला आहे त्याला साजेसं काम आशा ताई करीत आहेत. ते असेच कायम ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

संभाव्य तिसरी लाट रोखण्यात आशाताईंची महत्वाची भूमिका

          मुख्यमंत्री म्हणाले, आशा, अंगणवाडी सेविका प्रशासनाचा पाठकणा असून स्वताची प्रकृती, कुटुंब याकडे लक्ष न देता ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत आहात. त्यासाठी मी  मानाचा मुजरा करतो. आशा, अंगणवाडी सेविकांच्या ज्या व्यथा, अपेक्षा आहेत त्याची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. आपले ऋण विसणार नाही. आपल्या व्यथांवर मार्ग काढला जात आहे त्याला थोडा अवधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशाताईंना केले. महाराष्ट्राच कुटुंब आपण तळ हाताच्या फोडासारखं जपत आला आहात तज्ञांच्या मतानुसार कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये जाणवणार असून ती रोखण्यासाठी आशा ताईंची भुमिका महत्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

        यावेळी टास्क फोर्समधील डॉ. प्रभू, डॉ. येवले, डॉ. किणीकर, डॉ. दलवाई यांनी सोप्या भाषेत कोरोना प्रतिबंध व उपचार, लहान मुलांसाठी पौष्टीक आहार, मानसिक आजार याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी मुरबाड येथील रोहीणी भोंदिवले, पातोंडा जि. नंदूरबार येथील साधना पिंपळे, भंडारा येथील भुमिका बंजारी, हिंगोली येथील सुनिता कुरवडे या आशा सेविकांनी मनोगत व्यक्त केले.

                                                                        00000

Sunday, 6 June 2021

 






पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारली शिवशक राजदंड गुढी

शिवस्वराज्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा

 

     वर्धा, दि 6 जून (जिमाका):-  महाराष्ट्राच्या जनतेला एका चैत्यन्य सूत्रात बांधून महाराष्ट्राचे सत्व आणि स्वत्व जोपासणाऱ्या राजकीय इतिहासाची पायाभरणी  छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. दीर्घकाळ परकीयांची राजवट आणि अनागोंदी अनुभवणाऱ्या महाराष्ट्राच्या रयतेला स्वातंत्र्य आणि सुबत्ता मिळवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. हा सुवर्ण दिवस राज्यशासनाने शिवस्वराज्य दिन म्हणून संपूर्ण राज्यात साजरा करण्याचे ठरवले. आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी शिवशक राजदंड गुढी उभारून जनतेला शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगित आणि महाराष्ट्र गीताने सांगता झाली. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषद उपाध्यक्षा वैशाली येरावार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अरीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा परिषद सदस्य व इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रत्येक पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मध्ये आज स्वराज्याची गुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

11 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

राज्यशासनाच्या निधीतून प्राप्त झालेल्या 11 रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते रुग्णवाहिका चालकाला गाडीची कागदपत्रे व किल्ली देऊन करण्यात आले. या 11 रुग्णवाहिका आंजी, वायफळ, सारवाडी, खरंगाणा गोडे, अंतोरा आणि जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला तसेच देवळी, पुलगाव ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट  आणि दोन  सामान्य रुग्णालय वर्धा येथे देण्यात आल्यात. दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्यामुळे रुग्णांसाठी  खाजगी रुग्णवाहिका अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. या 11 रुग्णवाहिका पुढे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

00000

 

प.क्र- 416                                                                    दि.6.06.2021

 

कोरोना नियमांचे पालन करूनच नागरिकांनी व्यवहार सुरू ठेवावेत

                                      -  पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

 

Ø  कोविड परिस्थितीचा घेतला आढावा

Ø  नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे

Ø  लसच आपल्याला तिसऱ्या लाटेपासून वाचवेल.

 

     वर्धा, दि 6 जून (जिमाका):- आपला जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषातील तिसऱ्या टप्प्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात  सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली असली तरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून व्यवसाय आणि व्यवहार करणे आवश्यक आहे. अति उत्साहामुळे आपल्या कुटुंबाला आणि जिल्ह्याला आपण पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घेऊन जाणार नाही याची काळजी प्रत्त्येक नागरिकाने घ्यावी असे आवाहन करून प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचना  पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा  जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संसर्ग परिस्थितीचा आढावा घेताना श्री केदार बोलत होते. यावेळी आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, सेवाग्राम आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ नितीम गंगणे, सावंगी रुग्णालयाचे डॉ अभ्युदय मेघे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, मुख्याधिकारी विपीन पालिवाल उपस्थित होते.

कोविड चाचणी करण्यात जिल्हा सहाव्या स्थानावर असल्याबाबत समाधान व्यक्त करतानाच श्री केदार यांनी जिल्ह्यात टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना केल्यात. तसेच कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना चाचण्या वाढवल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. 

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला मधल्या काळात चांगला वेग मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यात 45 ते 60 व त्यापुढील वयोगटातील लोकांचे 40 टक्के लसीकरण झाले याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र लसीच्या तुटवडयामुळे तो वेग कमी झाला. आता पुन्हा जिल्ह्याला 41 हजार लसी प्राप्त असून ग्रामीण भागात जनतेला लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. जुलै महिन्याच्या अखेरीस आपल्या जिल्ह्यातील 50 टक्केपेक्षा जास्त लसीकरण व्हायला पाहिजे. लसीकरणच आपल्याला तिसऱ्या लाट पासून वाचवू शकेल. लस घेतल्यामुळे शरीरात कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही किंवा झाला तरी त्याची लक्षणे अगदी सौम्य असतात. यामुळे लोकांचे प्राण, वेळ आणि पैसा दोन्हीची पुढील काळात बचत होईल. त्यामुळे  ग्रामीण भागातील नागरिकानी त्यांचा पहिला आणि दुसरा डोज पूर्ण करावा असे आवाहन यावेळी श्री केदार यांनी केले.आरोग्य विभागाने याबाबत जनजागृती करावी अशा सूचना त्यांनी दिल्यात.

शासनाने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका खरेदी करून जिल्ह्याला पाठविल्या आहेत. आपल्या जिल्ह्याला 11 रुग्णवाहिका मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना यामुळे लवकर रुगणालायात पोहचविणे सोपे होईल.

म्युकर मायकोसिस आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत 93 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला तर 21 रुग्ण बरे झाले आहेत. उर्वरित 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  कोविड मधून बऱ्या झालेल्या रुग्णांनी या आजाराबाबत दक्ष असावे. काहीही लक्षणे वाटल्यास तात्काळ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. त्यासाठीचे औषधी आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आहेत असेही श्री केदार यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कोविड संदर्भात माहिती देताना जिल्ह्याचा आज संपलेल्या आठवड्याचा पॉझिटिव्हीटी दर 4.59 टक्के असल्याचे सांगितले. तसेच मृत्युदर 1. 89 असून  रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा 200 दिवस असल्याची माहिती दिली.

 

000000000

 

 

 


Friday, 4 June 2021

 

प.क्र- 408                                                                    दि.4.06.2021

                     म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा

Ø खासगी रुग्णालयांना उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही

Ø मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी

     मुंबई, दि. 4  : - राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंजूरी दिली. दरनिश्चीती करतांना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.

        राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहिर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. 

 

खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसीसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात आरोग्य मंत्री श्री. टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता.  त्याला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंजूरी दिली असून ही अधिसूचना आजपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहील.

         संबंधित रुग्णालयाने रुग्णाला पुर्वलेखापरिक्षीत देयक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

          म्युकरमायकोसीसवरील उपचाराचे दर याप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.

वॉर्डमधील अलगीकरण: अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला असून त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च  व जेवण यांचा समावेश. मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.

     व्हेंटीलेटरशिवाय आयसीयू व विलगीकरण: अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये

       व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण : अ वर्ग शहरांसाठी ९००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये

अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( मीरा भाईंदर मनपा, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर मनपा क्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर,पनवेल महापालिका),  पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी) यांचा समावेश आहे.

ब वर्ग शहरांमध्ये नाशिक,  अमरावती, औरंगाबाद,  भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालये यांचा समावेश आहे.

क वर्ग गटात अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरे यांचा समावेश करण्यात आला आहे.

           विशेष म्हणजे म्युकरमायकोसीस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने २८ प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी १ लाख रुपयांपासून ते १० हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ७५ हजार रुपयांपासून ते ७५०० रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी ६० हजार रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.

                                                00000

 




प.क्र- 407                                                                    दि.4.06.2021

सानेन बकरीचे राज्यात पैदास केंद्र उभारणार

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती

       पंढरपूर, दि. 04:-  शेतकऱ्यांचे  जीवनमान उंचवण्यासाठी शेळी व मेंढी पालन व्यवसायास  चालना देणे आवश्यक आहे. यासाठी जगात जास्त दुध देणारी सानेन बकरीचे पैदास केंद्र महाराष्ट्रात उभारणाण्यासाठी  प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

       पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी  विकास प्रक्षेत्र, महुद ता.सांगोला येथे भेट देवून पाहणी केली . यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.एन.ए.सोनवणे,  प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एस.बोरकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी  विकास प्रक्षेत्राचे संचालक डॉ.शशांक कांबळे, सहाय्यक आयुक्त डॉ.एस.एस.भिंगारे, तसेच परिसरातील शेळी, मेंढी पालक उपस्थित होते.

         यावेळी श्री. केदार म्हणाले,  शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी उच्च प्रतीच्या शेळया व मेंढयाची पैदास करुन देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.  पशुधन निरोगी  रहावे, आजारी  पशुधनाला जागेवरच उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय पथकासह फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना पशुधनावरील उपचाराची सुविधा दारातच मिळणार आहे.

          मेंढीच्या माडग्याळ जातीचे वजन लवकर वाढत असल्याने  जातीचे पैदास केंद्र उभारण्यासाठी  आवश्यकती कार्यवाही करावी. विमा काढलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाई तात्काळ मिळेल याची दक्षता घ्यावी. अशा सूचनांही  पशुसवंर्धन मंत्री केदार यांनी यावेळी दिल्या. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी  विकास प्रक्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.कांबळे यांनी प्रकल्पातील शेळी, मेंढी पालन, वैद्यकीय सुविधा, चारा आदी सुविधेबाबत माहिती दिली. 

                                                      00000