Thursday, 20 May 2021

 







..क्र-361                                                                      दि.20.05.2021

कोविड -19 परिस्थितीबाबत प्रधानमंत्र्यानी  राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद

Ø ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळे धोरण आखण्याचे अधिकाऱ्यांना केले आवाहन

Ø ग्रामीण भारत कोरोनामुक्त करण्यावर भर द्यावा

वर्धा दि 20, (जिमाका):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज  कोविड –19 परिस्थितीबाबत राज्य व जिल्हाधिकाऱ्यांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी अधिकाऱ्यांनी आणि राज्याने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा करून ग्रामीण भाग कोरोनामुक्त करण्यासाठी भर देण्याचे आवाहन केले.

यावेळी महाराष्ट्रातील  वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, बुलडाणा, अहमदनगर, सातारा, सांगली, नाशिक, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, जालना, पालघर इत्यादी जिल्ह्यांचा सहभाग होता. यात अहमदनगर जिल्ह्याधिकारी यांना प्रधानमंत्र्यांशी  संवाद  साधण्याची संधी प्राप्त झाली. यावेळी मंत्रालयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.

 दरम्यान, अधिकाऱ्यांनी कोविड -19  विरुद्धच्या लढाईत पंतप्रधानांनी केलेल्या  नेतृत्वाबद्दल त्यांचे आभार मानले. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना आपापल्या जिल्ह्यातील सुधारत असलेल्या कोविड परिस्थितीची  माहिती दिली.  वास्तविक वेळेत  देखरेख आणि क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या  वापराचा अनुभव त्यांनी सामायिक केला. त्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

या प्रसंगी बोलताना प्रधानमंत्र्यानी प्रत्येकाला महामारीविरोधात लढा देण्यासाठी पूर्ण बांधिलकी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.  ते पुढे म्हणाले, कोरोना विषाणूने  काम अधिक आव्हानात्मक केले आहे. या नवीन आव्हानांच्या दरम्यान, नवीन रणनीती आणि उपाय  आवश्यक आहेत. गेल्या काही दिवसात  देशात सक्रिय रुग्ण  कमी होण्यास सुरवात झाली आहे. परंतु हा संसर्ग किरकोळ प्रमाणातही अस्तित्त्वात असेपर्यंत आव्हान कायम असल्याचे त्यांनी बजावले.

महामारी विरुद्ध लढा देताना राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची प्रधानमंत्र्यानी प्रशंसा केली आणि सांगितले की, या क्षेत्रातील त्यांच्या कामाचे अनुभव व अभिप्रायांची  व्यावहारिक व प्रभावी धोरणे बनवण्यात मदत होते. सर्व स्तरावर  राज्ये व विविध हितधारकांच्या सूचनांचा समावेश करून लसीकरण धोरणही पुढे राबवले जात आहे.

स्थानिक अनुभव आणि देश म्हणून एकत्र काम करण्याची गरज यावर पंतप्रधानांनी भर दिला. रुग्णसंख्या कमी होत असली तरीही गावे  कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आणि कोविड-योग्य वर्तनाचे पालन करण्याचे संदेश प्रसारित करण्याचे त्यांनी आवाहन केले. ग्रामीण व शहरी भागासाठी  विशिष्ट मार्गाने  रणनीती आखून ग्रामीण भारत कोविडमुक्त करण्याची सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केली.

प्रधानमंत्री म्हणाले की, प्रत्येक महामारीने, तिला सामोरे जाण्याच्या आपल्या पद्धतींमध्ये सतत नाविन्यपूर्ण संशोधन  आणि बदल घडवून आणण्याचे महत्त्व आपल्याला शिकवले आहे. महामारीचा सामना करण्यासाठीच्या  पद्धती व धोरणे   गतीशील असावीत कारण विषाणू उत्परिवर्तन आणि स्वरूप बदलण्यात माहीर आहे विषाणू उत्परिवर्तन हा आता  तरुण आणि मुलांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. त्यासाठी त्यांनी लसीकरण मोहिमेला चालना देण्यावर भर दिला.

लस वाया जाण्याबाबत पंतप्रधान म्हणाले, एका मात्रेचा अपव्यय म्हणजे एका व्यक्तीच्या जीवनाचा प्रश्न आहे.  त्यामुळे त्यांनी लसीचा अपव्यय रोखण्याचे आवाहन केले. 

जीव वाचवताना नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्याला प्राधान्य देण्यावर त्यांनी  भर दिला. गरीबांना  मोफत शिधाची  सुविधा पुरवावी ,  इतर आवश्यक वस्तू पुरविल्या पाहिजेत आणि काळाबाजार थांबवायला हवे, असे ते म्हणाले. हा लढा जिंकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठीही हे उपाय आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी हा युद्धाचा सेनापती असला तरी तेथील स्थानिक प्रशासन,  अनेक  व्यक्ती, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, आणि नागरिकांच्या सहकार्याने ही महामारी थांबवायची आहे त्यामुळे सर्वांच्या सहभाग आणि सहकार्याने आपल्याला पुढील काळात कोरोनाशी लढा देऊन यशस्वी व्हायचे आहे, त्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. तसेच मास्क, शारीरिक दुरीता आणि स्वच्छता या बाबी लोकांच्या सवयीचा भाग  होण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशाची इतर देशांशी तुलनात्मक आकडेवारी सांगताना ते म्हणाले की, आपल्याकडे 10 हजार लोकसंख्येमागे 12 डॉक्टर आहेत तर युरोपियन देशांमध्ये 30- 35 आहेत. आपल्या देशात 10 लक्ष लोकसंख्येमध्ये 18 हजार कोविड रुग्ण आढळून येतात, ऍक्टिव्ह रुग्णांची  संख्या अमेरिकेत 10 लाखामागे 17 हजार आहे तर भारतात 2318 आहे, प्रति 10 लक्ष लोकसंख्येमागे भारतात 204 आहेत तर इटली किंवा ब्राझील मध्ये 2 हजार पेक्षा जास्त आहेत. आपल्याकडे 2 टक्के लोकसंख्या प्रभावित आहे तर अमेरिकेत  हेच प्रमाण 10 टक्के आहे.  त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपली कामगिरी चांगली आहे.

000000

Wednesday, 19 May 2021

 





जिल्ह्यात घरपोच भाजी विक्रीला उत्तम प्रतिसाद

जिल्ह्यातील शेतकऱयांची सुमारे 16 लक्ष  रुपयांची उलाढाल

37 हजार 840 कुटुंबाला घरपोच भाजी

     वर्धा, दि 19:- (जिमाका) घरपोच भाजी विक्रीला शेतकरी आणि ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 37 हजार 840 कुटुंबांपर्यंत घरपोच भाजी पोहचवली असून यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा चांगला नफा झाला आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱयांची जवळपास 16 लक्ष रुपयांची उलाढाल झाली आहे.

कडक संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना भाजीपाला, फळे आणि किराणा घरपोच पोहचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासन, सर्व मुख्याधिकारी, तहसीलदार आणि बीडीओ यांना निर्देश दिलेत. त्यानुसार कृषी विभागाने गुगल फॉर्मच्या माध्यमातून ग्राहक आणि शेतकरी यांना नोंदणी करण्यास सांगितले. याला शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.  जिल्ह्यात 953 ग्राहकांनी ऑनलाईन मागणी नोंदवली तर 232 शेतकऱयांनी कृषी विभागाकडे नोंदणी केली. जिल्ह्यात आतापर्यंत 1682 क्विंटल भाजीपाला विक्री झाली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून तालुकानिहाय शेतकऱ्यांना मिळालेले उत्पन्न असे आहे.

एकूण विक्री  मिळकत -

वर्धा -  रुपये 3, 40,990/-

समुद्रपूर - रुपये 1,28,320/-

आष्टी - रुपये 2,44,180/-

कारंजा घा - 61, 430/-

आर्वी   - 3, 32,965/-

सेलू - 1,35, 490/-

देवळी -  1,23,760/-

हिंगणघाट - 2,13,570/-

एकूण उलाढाल - 15 लक्ष 80 हजार 705 रुपये झाली आहे.

चौकट

एखाद्या भागातील ग्राहकाने भाजीची मागणो नोंदवली असेल आणि शेतकरी त्या ग्राहकाकडे भाजी घेऊन गेल्यावर त्या भागातील नोंदणी न केलेल्या नागरिकांनाही त्याने घरपोच भाजी दिलेली आहे. त्यामुळेच ऑनलाईन नोंदणी कमी दिसत असली तरी जिल्ह्यातील सुमारे 37 हजार 840 कुटुंबापर्यंत शेतकऱ्यांनी भाजी विक्री केली आहे. आता ग्राहकांनीही भाजी उत्पादक शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक स्वतःकडे घेतल्यामुळे ग्राहक मोबाईलद्वारे थेट शेतकऱ्याकडे भाजीची मागणी नोंदवत आहे.

डॉ विद्या मानकर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

चौकट

आम्ही 4 मित्रांनी  मागच्या लॉकडाऊन पासून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. सेंद्रिय भाजीपाल्यासाठी आम्हाला विशिष्ट मार्केट नव्हते. मार्च महिन्यात टोमॅटोचे बाजारात भाव पडल्यामुळे ते 1 रू किलो ने विकावे लागले होते. मात्र घरपोच भाजीपाला विक्री सुरू झाल्यामुळे 5 दिवसात 25 हजार रूपयांची विक्री झाली आहे. हे असेच सुरू राहिले तर शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होईल.आमच्यासारख्या नवीन प्रयोग करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकून राहील.

वैभव लोखंडे

तरुण भाजीपाला उत्पादक शेतकरी,

सेलू घोराड

00000


 

           रिलायन्स पेट्रोल पंपकडून कोविड रुग्णवाहिकेसाठी निःशुल्क  इंधन पुरवठा

        वर्धा दि, 19 :- रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचे जिल्ह्यातील पुलगाव आणि हिंगणघाट या दोन पेट्रोल पंप धारकांनी जिल्ह्यात कोविड 19 रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका, मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने या वाहनांकरिता निःशुल्क इंधन देण्याचा उपक्रम सुरू करून केला आहे अशी माहिती आदित्य पाटणी आणि किशोर नायडू यांनी दिली.

रुग्णवाहिका आणि मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी सदर वाहन त्या सेवेसाठी वापरले जाते याचे प्रमाणपत्र जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग किंवा पोलीस विभागाकडून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र असणाऱ्या वाहनाना पुलगाव येथील पाटणी पेट्रोलियम, वर्धा रोड आणि हिंगणघाट येथील रिलायन्स बी पी मोबिलिटी लिमिटेड, एन एच 7 हैद्राबाद - नागपूर हायवे हिंगणघाट या दोन पेट्रोल पंपवर निःशुल्क पेट्रोल- डिझेल उपलब्ध करून देण्यात येईल असे श्री पाटणी आणि श्री नायडू यांनी सांगितले.

                                                            000

 

 

शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे मिळण्यास अडचण

आल्यास कृषी सहय्यकाशी संपर्क साधावा 

                 -जिल्हाधिकारी

Ø कोविड अनुकूल वर्तणूक स्विकारणे आवश्यक

Ø शेतकऱयांनी पीक पद्धतीत बदल करावा

Ø 100 मी मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये



Ø बी जी 3 सारखे अप्रमाणित बियाणे विकत घेऊ नये

Ø सोयाबीनची उगवण शक्ती तपासणे महत्वाचे

Ø कृषी केंद्राने खताचा जुना साठा नवीन दराने विक्री करू नये

          वर्धा दि 19(जिमाका):-  शेतीचा खरीप हंगाम सुरू होत  असल्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे आणि खत बंधावरच पोहचविण्याचा निर्णय घेतला असून हा शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचवणारा आहे. शेतकऱ्यांना खत व बियाणे मिळण्यास काही अडचण असल्यास त्यांनी गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्राधान्य देईल, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. 

         कोविड 19 आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दूरदृश्य माध्यमाद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ विद्या मानकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे जिल्हाधिकारी  कार्यालयातून उपस्थित होत्या, तर पत्रकार ऑनलाईन जुळले होते. 

      कोविड परिस्थितीमुळे आपल्याला यापुढे कोविड योग्य वर्तणूक स्विकारावी लागेल. गर्दी टाळणे हा आपला मुख्य उद्देश आहे. गर्दीमुळे कोविडचे संक्रमण  होते, त्यामुळे आपल्याला काही बंधने घालावी लागतात. पण आपण वारंवार अशी बंधने लावू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला अनेक सेवा घरपोच देणे आणि घरपोच  सेवा स्वीकारणे याची सवय करून घ्यावी लागेल. पुढील काळात हेच आपल्या जिल्ह्यातील कोरोना संक्रमण कमी करण्याचा मार्ग राहील,असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

     शेतकऱ्यांसाठी काही बाबी शिथिल केल्या आहेत. त्यामुळे शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची अडवणूक किंवा त्याला त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. खतांच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे कृषी केंद्राने त्यांच्याकडील जुना साठा शेतक-यांना नवीन दराने विकू नये. असे करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच कृषी केंद्राकडील साठयाची माहिती कृषी विभागाला देणे बंधनकारक केले असून  साठा तपासणीसाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

       जम्बो हॉस्पिटलचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता, मात्र शासनाने आता बदललेल्या धोरणानुसार त्यात काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत. त्या करून त्यासाठी 50 टक्के निधीची तरतूद करून सदर प्रस्ताव पुन्हा शासनाकडे तातडीने सादर करण्यात येईल. तसेच ऑक्सिजन स्वयंपूर्णतेसाठी 11 ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प प्रत्येक ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयाला आपण उभारत आहे. त्याचेही काम लवकरच सुरू होईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. 

       शेतकऱयांनी मागील वर्षीची सोयाबीनची परिस्थिती बघता यावर्षी पीक पद्धतीत बदल करावा, तूर - सोयाबीन, तूर - मूग असे आंतरपीक घ्यावे. तसेच सोयाबीनची उगवण शक्ती तपासल्यानंतरच त्या बियाण्यांची पेरणी करावी. यामुळे निकृष्ट बियाणे पेरणीपूर्वीच ओळखता येईल आणि शेतकऱयांचे नुकसान टळेल. तसेच वर्धेत धूळ पेरणी करण्याची पद्धत आहे. मात्र लवकर पेरणी केल्यामुळे कापूस पिकावर गुलाबी बोन्ड अळी आणि बोन्डसड  रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेत -शिवारात 100 मिली मीटर  पाऊस झाल्याशिवाय कोणतीही पेरणी करू नये, यामुळे दुबार पेरणीचे आणि किडीचे संकट शेतकऱयांना टाळता येईल, असे विद्या मानकर यांनी सांगितले.

        बी जी - 3 हे अप्रमाणित बियाणे आहे, हे बियाणे उगवत नाही. त्यामुळे शेतकऱयांनी हे बियाणे घेऊ नये. शेतकऱयांनी परवानाधारक कृषी केंद्रकडून  बियाणे खरेदी करावे, आणि बियाणे खरेदीची पावती आणि त्याचा पिशवी जपून ठेवावी. असे अप्रमाणित बियाणे आढळल्यास 07152- 250091 या क्रमांकावर तक्रार करावी असेही श्रीमती मानकर म्हणाल्या.

                                              00000000000

 

जिल्ह्यात घरपोच भाजी विक्रीला उत्तम प्रतिसाद

जिल्ह्यातील शेतकऱयांची सुमारे 16 लक्ष  रुपयांची उलाढाल

37 हजार 840 कुटुंबाला घरपोच भाजी

     वर्धा, दि 19:- (जिमाका) घरपोच भाजी विक्रीला शेतकरी आणि ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 37 हजार 840 कुटुंबांपर्यंत घरपोच भाजी पोहचवली असून यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा चांगला नफा झाला आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱयांची जवळपास 16 लक्ष रुपयांची उलाढाल झाली आहे.

कडक संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना भाजीपाला, फळे आणि किराणा घरपोच पोहचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासन, सर्व मुख्याधिकारी, तहसीलदार आणि बीडीओ यांना निर्देश दिलेत. त्यानुसार कृषी विभागाने गुगल फॉर्मच्या माध्यमातून ग्राहक आणि शेतकरी यांना नोंदणी करण्यास सांगितले. याला शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.  जिल्ह्यात 953 ग्राहकांनी ऑनलाईन मागणी नोंदवली तर 232 शेतकऱयांनी कृषी विभागाकडे नोंदणी केली. जिल्ह्यात आतापर्यंत 1682 क्विंटल भाजीपाला विक्री झाली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून तालुकानिहाय शेतकऱ्यांना मिळालेले उत्पन्न असे आहे.

एकूण विक्री  मिळकत -

वर्धा -  रुपये 3, 40,990/-

समुद्रपूर - रुपये 1,28,320/-

आष्टी - रुपये 2,44,180/-

कारंजा घा - 61, 430/-

आर्वी   - 3, 32,965/-

सेलू - 1,35, 490/-

देवळी -  1,23,760/-

हिंगणघाट - 2,13,570/-

एकूण उलाढाल - 15 लक्ष 80 हजार 705 रुपये झाली आहे.

चौकट

एखाद्या भागातील ग्राहकाने भाजीची मागणो नोंदवली असेल आणि शेतकरी त्या ग्राहकाकडे भाजी घेऊन गेल्यावर त्या भागातील नोंदणी न केलेल्या नागरिकांनाही त्याने घरपोच भाजी दिलेली आहे. त्यामुळेच ऑनलाईन नोंदणी कमी दिसत असली तरी जिल्ह्यातील सुमारे 37 हजार 840 कुटुंबापर्यंत शेतकऱ्यांनी भाजी विक्री केली आहे. आता ग्राहकांनीही भाजी उत्पादक शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक स्वतःकडे घेतल्यामुळे ग्राहक मोबाईलद्वारे थेट शेतकऱ्याकडे भाजीची मागणी नोंदवत आहे.

डॉ विद्या मानकर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

चौकट

आम्ही 4 मित्रांनी  मागच्या लॉकडाऊन पासून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. सेंद्रिय भाजीपाल्यासाठी आम्हाला विशिष्ट मार्केट नव्हते. मार्च महिन्यात टोमॅटोचे बाजारात भाव पडल्यामुळे ते 1 रू किलो ने विकावे लागले होते. मात्र घरपोच भाजीपाला विक्री सुरू झाल्यामुळे 5 दिवसात 25 हजार रूपयांची विक्री झाली आहे. हे असेच सुरू राहिले तर शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होईल.आमच्यासारख्या नवीन प्रयोग करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकून राहील.

वैभव लोखंडे

तरुण भाजीपाला उत्पादक शेतकरी,

सेलू घोराड

00000

Monday, 17 May 2021

 

वर्धा नगर परिषदतर्फे घरपोच सेवेसाठी  MY WARDHA अँप सुरू

वर्धा दि, 17 (जिमाका):-  वर्धा जिल्हामध्ये सुरू असलेल्या कडक संचारबंदी काळात बाजारात व दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ नये व नागरिकांना घरपोच अत्यावश्यक सेवा मिळाव्या याकरिता वर्धा नगर परिषदेने माय वर्धा मोबाईल अँप कार्यान्वित केले आहे. शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा पुरवठादार यांचे

संपर्क व पुरवित असलेल्या सेवा याची माहिती या अँप मध्ये आहे. पहिल्याच दिवशी शहरातील 180 पूर्वठादारांनी  या अँप मध्ये नोंदणी केली आहे. याचे लोकार्पण आज नगराध्यक्ष अतुल तराळे व नगर परिषद मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

जिल्हाधिकारी  यांचे संकल्पनेनुसार  नगरपरिषदने माय वर्धा (MY WARDHA) हे अँप विकसित केले आहे. सदर अँप वर्धा शहरातील नागरिकांकरिता आज दि. 17 मे रोजी नगरपरिषद येथील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी सभागृह येथून लोकार्पण (Launching) लोकार्पण करण्यात आले. 

सदर APP च्या माध्यमातून व्यापारी , अत्यावश्यक सेवा पुरवठा करणारे व नागरिक यांचे करिता सुविधा झाली आहे. तसेच या APP च्या माध्यमातून पूरवठा करणारे दुकानदार , कामगार, डिलिव्हरी बॉय यांचे ओळखपत्र उपलब्ध होतील जेणेकरून शासनाच्या पथकांनी तपासणी केल्यास सेवा देण्यास अडचण

जाणार नाही.सदरचे ॲप हे नागरिकांना

परिषद वर्धाचे संकेतस्थळ

http//wardhamahaulb.maharashtra.gov.in / येथून डाऊनलोड करता येईल तसेच लवकरच गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. याबाबत काही अडचण असल्यास 8530006063 या व्हाट्स अँप क्रमांकावर संदेश पाठवावा.

नगराध्यक्ष  अतुल तराळे यांनी कोरोनाच्या तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी व

नागरिकांनी घराबाहेर न पडता अत्यावश्यक सेवा उपलब्ध होण्यासाठी हे अँप उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले.

यावेळी उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, गटनेता  निलेश खोंड, गटनेता प्रदीपभाऊ ठाकरे ,  आशिष वैद्य शिक्षण सभापती , नगरसेवक कैलास राखडे,

सचिन पारधे, गोपी त्रिवेदी  यांच्या ऑनलाईन उपस्थितीत करण्यात आला.

00000

 

जिल्हयात  लॉकडाऊनला पुन्हा मुदत वाढ

1 जून पर्यंत निर्बंध लागू

अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना शहरी भागात केवळ घरपोच सुविधेची परवाणगी

ग्रामीण भागात शिथिलता

     वर्धा, दि.17 (जिमाका):  जिल्ह्या प्रशासनाने कोविड रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात लावलेले कडक निर्बंध 18 मे पासून ग्रामीण भागात थोडे शिथिल करत शहरी भागात पूर्वीप्रमाणेच 1 जून सकाळी 7 वाजता पर्यंत वाढवले आहेत. शहरी भाग आणि शहराला लागून असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती यांच्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने घरपोच सेवा पुरविण्यासाठी सकाळी 7 ते 1 या कालावधीत चालू ठेवता येणार आहे. तसेच  कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक  वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

1 शहरी भाग

वर्धा नगर पालिका व लगतच्या मोठ्या 11 ग्रामपंचायती पुलगाव व लगतच्या 2 ग्रामपंचायती, सिंदी रेल्वे ,हिंगणघाट नगर परिषद व लगतच्या 4 ग्रामपंचायती आर्वी, देवळी सेलू, नगरपालिका व समुद्रपूर कारंजा आष्टी या नगरपंचायत क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने ठरलेल्या दिवशी सकाळी 7 ते 1 पर्यंत घरपोच सेवेसाठी सुरु राहतील

सोमवार- बुधवार -शुक्रवार

1 सर्व किराणा माल, डेअरी,बेकरी, मिठाई अंडे, मटन, पोल्ट्री, कोंबडी, मासे, पिठाची गिरणी तसेच खाद्य पदार्थाची सर्व दुकाने

 मंगळवार,गुरूवार व शनिवार

 या दिवशी  सर्व भाजीपाला व फळ विक्रेते यांची दुकाने घरपोच सेवा पुरविण्यासाठी सकाळ 7 ते दुपारी 1 वाजपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील.

ग्रामीण भाग

नगरपरिषदेला लागून असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती वगळता जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.

ग्रामीण भागातील आधार केंद्र शेतकऱ्यांकरिता सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू राहतील.

2 पाळीव  प्राण्याच्या खाद्यपदार्थाची दुकाने, पावसाळयाच्या हंगामात व्यक्तीसाठी  तसेच संस्थासाठी  सबंधीत  असणा-या साहित्याच्या  निगडीत  दुकाने सोमवार ते शनिवार फक्त घरपोच सेवा सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत राहील.

3.गॅस एजन्सी सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत राहील.

4.हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन  थाळी सकाळी 11 ते रात्री 8

5.दुध संकलन केंद्रे व घरपोच  दुध वितरण  व्यवस्था सकाळी 7 ते 1 1 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहिल

6. कृषि उत्पन्न बाजार समित्या, कृषी अवजारे  व शेतातील  उत्पादनाशी सबंधीत  दुकाने.सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्याकरीता सुरू राहील.  मात्र शेतक-यांना  आवश्यक  त्या वस्तुचा पुरवठा  घरापर्यंत  तसेच बांधापर्यंत  करण्याची जबाबदारी  ग्रामपंचायत स्तरावर  संबधीत  कृषी सेवक,  तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी यांची राहील

7.सार्वजनिक , खाजगी क्रिंडागणे, मोकळया जागा, उद्याने, बगिचे पुर्णता बंद राहील.

8.केशकर्तनालय, सलुन,  स्पा, ब्युटीपार्लर , शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद. तथापी ऑनलाईन शिक्षण सुरु राहील.

9.लग्न समारंभ , स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल, चित्रपट गृहे, व्यायामशाळा, , जलतरण तलाव, करमणुक  व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र, प्रेक्षकगृह, सभागृह बंद राहील. अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांनाच परवानगी राहील.

5. चष्म्याची दुकाने  बंद राहिल, मात्र आपातकालीन  परिस्थितीत रुग्णांस  डोळयांच्या डॉक्टरांनी  त्यांच्या दवाखान्याला  जोडण्यात आलेल्या चष्मा दुकानातुन चष्मा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राहील.

6.नागरी भागातील  पेट्रोलपंप सकाळ 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहतील.  परंतु  रुग्णवाहिका, शासकिय वाहने,  अत्यावश्यक सेवेतील  कर्मचारी यांचे वाहनाकरीता  पेट्रोल डिझेल  उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी  कंपनीचे अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिका-यांची राहिल.

7.सर्व शासकिय , निमशासकिय, खाजगी  कार्यालये व आस्थापना, वित्त व्यवसायाशी निगडीत  सर्व कार्यालयीन वेळेनूसार 15 टक्के क्षमतेने सुरू राहील.

8. सर्व बँका, पतसंस्था, पोष्ट  ऑफिस ही कार्यालये नेहमी प्रमाणे सुरू राहतील. बँकांच्या शाखामध्ये गर्दी टाळण्याकरीता योग्य ते नियोजन करण्यात यावे.

9. सार्वजनिक तसेच खाजगी  बस वाहतुक , रिक्षा, चारचाकी, व दुचाकी वाहन यांची वाहतुक  पुर्णपणे बंद राहील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना  ओळखपत्र  सोबत बाळगणे  बंधनकारक राहील.

सुरु राहणारे व्यवसाय व संस्था

10.खाजगी व सार्वजनिक  वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा

11.मेडीकल स्टोअर्स व दवाखाने  तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु राहील.

12.अत्यावश्यक  सेवा व कोरोना  प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याशी संबधित शासकिय, निमशाकिय कार्यालये 

12. एमआयडीसी,  उद्योग, कारखाने, सतुगिरणी  सुरू ठेवण्यासाठी  केवळ कंपनीच्या परिसरात राहणाऱ्या कामगार व कर्मचारी यांनाच परवानगी राहील.

13.शासकिय यंत्रणा मार्फत  मान्सुपुर्व  विकासकामे  आवश्यक पाणीपुरवठा  व टंचाई विषयक  कामे चालु राहिल. यंत्रणांना वेगळया परवाणगीची आवश्यकता राहणार नाही. घरपोच सेवा पुरविणाऱ्यांना आर. टी. पी. सी. आर. आवश्यक तसेच संबंधित दुकानाचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक

या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 नुसार कारवाई करण्यात येईल.

 

0000