Tuesday, 2 October 2018











महात्मा गांधी यांच्या शिकवणीचा अवलंब करण्याचा संकल्प करावा
n  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
       वर्धा, दि 2 :- महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा व शांतता या बाबतचे  विचार सर्वांसाठीच प्रेरणादायी असून या शिकवणीचा अवलंब करण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
            महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती अभियान निमित्त महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्राम येथील सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल,जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आश्रमातील विविध विभागांना भेट  दिली. चरख्यावर सूत कताई केली. यानंतर यात्री निवास येथे महात्मा गांधी यांच्या जीवनावरील विविध आंतराष्ट्रीय चित्रपटांच्या गांधी पॅनोरमा-2018 फील्म फेस्टीवलचे उद्घाटन येथेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि सेवाग्राम डेव्हलपमेंट प्लॅन कमिटी यांचेतर्फे आयोजित सेवाग्राम कार्यांजली उत्सव यामध्ये यशस्वी विविध संघांना पालकमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते पारीतोषीके प्रदान करण्यात आली. चरखागृह, सेवाग्राम रोड येथे नियोजन विभाग व सेवाग्राम विकास आराखडा यांचेतर्फे आयोजित जगातील सर्वांत मोठया चरखा मांडणी शिल्पाचे अनावरण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महात्मा गांधी यांचे जीवन आणि त्यांचे विचार सर्वांसाठीच सदैव प्रेरणादायी आहे.महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व शांतता या संदेशाचा आपल्या जीवनात अवलंब करण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. महात्मा गांधी यांचे शांतता व  अहिंसेबाबतचे  विचार सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन वर्धा येथुन याचा प्रारंभ होत आहे. हे नक्कीच गौरवास्पद असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले, महात्मा गांधी यांचे विचार प्रत्यक्ष कृती आणि कार्यांतून समाजापर्यंत पोहचविण्यासाठी सेवाग्राम कार्यांजली उत्सवाचे 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले. याअंतर्गंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शांतता दौड, खादी वेशभुषा प्रदर्शन, लघुपट प्रदर्शन तसेच विविध समजाप्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सर्वंच कार्यक्रमात विद्यार्थी व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला व महात्मा गांधी यांचे विचार  विविध माध्यमातून समाजापर्यंत पोहचविले.
00000

Saturday, 1 September 2018

स्पर्धा परीक्षेची तयारी प्रामाणिकपणे करा- नितेश कराळे * लोकराज्य वाचक अभियानाचा थाटात शुभारंभ * अभियानात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्धा, दि 2:- बेरोजगारीच्या वातावरणात नोकरी मिळण्यासाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना करा किंवा मरा याप्रमाणे अभ्यास केला तर नक्की यश मिळते. असे प्रतिपादन पुणेरी पॅटर्न या स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक नितेश कराळे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालाया मार्फत लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयच्या वतीने शासकीय ग्रंथालयाच्या सहकार्याने जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला वक्ते पंकज वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे उपस्थित होत्या. जीवन खूप सुंदर आहे. खूप हुशार विद्यार्थीच जीवनात यशस्वी होतात असे नाही. शालेय जीवनात नापास झालेले अनेक विद्यार्थी पुढे मोठे अधिकारी, नेते झाल्याची उदाहरणें आहेत. परिस्थितीचे भान आल्यावर त्यांनी प्रामाणिकपणे झोकून देऊन सर्व शक्तीनिशी प्रयत्न केल्याने त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असल्याचे श्री कराळे यांनी सांगितले. अभ्यासक्रम सोप्या व मनोरंजक पद्धतीने समजून घेतला तर तो रटाळ वाटत नाही. दुसऱ्यांची नक्कल करण्यापेक्षा तुमच्या कल्पना शक्तीला वापर करा. जगात तुमच्यासारखा दुसरा कुणीच नाही याची जाणीव ठेवून तुमचा यशस्वी होण्याचा प्रयत्न निरंतर करत राहा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पंकज वंजारी मार्गदर्शन करताना म्हणाले, मनुष्याच्या यशाचे श्रेय हे त्याच्या ब्रेन प्रोग्रामिंग वर अवलंबून असते. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मुलं जे अनुभवतात, बघतात, शिकतात त्यावरच त्यांचं पुढचं यशापयश अबलंबून असतं. तुमच्या मेंदुला ज्याप्रमाणे आदेश दिले जातात त्याप्रमाणे तो वागत असतो. हे समजावून सांगताना त्यांनी अनेक उदाहरणांचा दाखला दिला. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी मेंदूचे प्रोग्रामिंग व्यवस्थित होणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. मनीषा सावळे यांनी प्रास्ताविकातून लोकराज्य वाचक अभियानाचे महत्व सांगताना स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य मासिक कसे उपयुक्त आहे याबद्दल मार्गदर्शन केले. सर्व महाविद्यालयात असे वाचक मेळावे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रश्न मंजुषा उपक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना लोकराज्य मासिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण वानखेडे यांनी केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी याप्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, मनोज सोयाम, श्री चिटटवार, श्री धमाने आणि जिल्हा ग्रंथालयाच्या कर्मचा-यांनी यासाठी परिश्रम घेतले . 000000


Wednesday, 29 August 2018



महात्मा गांधीचे मुल्य रुजविण्यासाठी  विविध कार्यक्रमाचे आयोजन
Ø जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
Ø ‘रन फॉर पिस मॅराथॉन स्पर्धा

           वर्धा , दि. 28(जिमाका) : महात्मा गांधींचे विचार आणि मूल्य या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये विशेषतः  शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये  रूजावेत म्हणून गांधी जयंतीच्या पर्वावर जिल्हा प्रशासन विशेष कार्यक्रमाचे आयोजनाचे नियोजन करीत  आहे. यामध्ये महात्मा गांधींनी दिलेल्या स्वदेशी आणि श्रमसंस्काराच्या मूल्यांसोबतच त्यांनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा आणि   नई तालिम सारख्या शिक्षण पद्धतीचा समावेश या उपक्रमात असणार आहे. यासाठी आठवडाभर भरगच्च कार्यक्रम राहणार असून 2 ऑक्टोबरला वर्धेकराना  रन फॉर पीस या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.
        महात्मा गांधींची 150 वे जयंती वर्षात भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.  यामध्ये 14 वर्ष वास्तव्य केलेल्या वर्धा जिल्ह्यातही जिल्हा प्रशासन आणि जनतेच्या सहकार्याने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महात्मा गांधींचा सर्वात अमूल्य देणं म्हणजे त्यांनी दिलेला शांती आणि अहिंसेचा संदेश. आजच्या वातावरणात हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी शांती दौड या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 2 ऑक्टोबरला करण्यात येणार. यामध्ये 16 ते 21 वयोगटातील विद्यार्थी आणि खुला गट अशा दोन प्रकारात ही स्पर्धा होईल. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा सहभाग राहावा यासाठी वयस्क लोकांसाठी स्वदेश फेरी ही चालण्याची स्पर्धा ठेवण्यात येणार आहे.
          मूल्य आणि संस्कार रुजविण्याचे वय हे 14 वर्षापर्यंतच असते. आजकाल शाळांमध्ये पाठ्यक्रमावर जास्त भर दिला जातो मात्र जीवन जगण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्य आणि मूल्ये शिकवली जात नाहीत.  महात्मा गांधींनी दिलेला स्वदेशी आणि श्रम संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावा यासाठी चरख्यावर सूत कताई स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळांना चरखा खरेदी करून विद्यार्थ्यांना चरखा चालविण्याचे आणि सूत कताईचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबरला ही स्पर्धा घेण्यात येईल.
         महात्मा गांधींना समजून घेण्यासाठी  त्यांचे आत्मचरित्र वाचण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी हे वाचावे म्हणून विविध स्पर्धाचे आयोजनही करण्यात येत आहे.  गांधींच्या जीवनावर आधारित वक्तृत्व, नाट्य, नृत्य, गीत गायन, चित्रकला, कविता, आणि लेखन स्पर्धेचा यामध्ये समावेश असणार आहे.
          या संदर्भात विकास भवन येथे झालेल्या बैठकिला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व  शाळांचे मुख्याद्यापक यांना तयार करण्याच्या सूचना दिल्यात. या बैठकिला सहायक जिल्हाधिकारी मनोज जिंदाल उपस्थित होते.
                                      0000

सफाई कर्मचा-यांच्या उन्नतीसाठी शासकिय योजनाचा लाभ मिळवून दयावा
-         दिलीप हाथीबेड
वर्धा , दि. 28 : सफाई कर्मचा-यांच्या सर्वार्गिन उन्नती साठी त्यांच्या साठी असलेल्या शिक्षण, आरोग्य, व रोजगार उपलबध करुन देणा-या योजनाची माहिती संबंधित विभागांनी त्यांच्या परसिरात जाऊन जनजागृती व्दारे दयावी अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी आज संबधित विभाग व सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकां-याच्या बैठकित दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कामगाराच्या प्रश्नासंदर्भात विभाग प्रमुख आणि सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांची आढावा  बैठक आयोजित करण्यात आली  होती. यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, सर्व नगर परिषेदेचे मुख्याधिकारी , महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, सफाई कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी  व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
नगर परिषदे अंतर्गत श्रमश्राफल्य योजनेमध्ये सफाई कर्मचा-यांना देण्यात येणा-या सदनिकेचे जेवढे मुल्य होत असेल तेवढया मुल्यांचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. वर्धा नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचा-यांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याचे  श्रीमती वाघमळे यांनी सांगितले. तसेच कर्मचा-यांचा आरोग्य विमा काढण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी नगर परिषदेने सर्व समावेषक विमा योजना सुरु करावी, अशा सूचना श्री हाथीबेड यांनी केल्या. 
सफाई कर्मचा-यांच्या वस्तीत देण्यात येणा-या मुलभूत सुविधांसाठी नगर परिषदेने दुर्बल घटकांसाठीचा निधी वापरावा. सफाई कर्मचा-यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी सुध्दा हा निधी वापरण्यात यावा. सफाई कर्मचा-यांच्या वेतना संदर्भात त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते पुस्तक कत्राटदाराकडून  कर्मचा-यांना पुरविण्यात यावे. तसेच कत्राटदार भविष्य निवार्ह निधीची कपात करतो किंवा नाही हे तपासावे त्याचबरोबर किमान वेतन नियमाचे पालन करण्यात येते की नाही याची सुध्दा तपासणी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आंजी मोठी या ग्राम पंचायत मध्ये एकमेव सफाई कर्मचा-याला कामावरुन काढून टाकले अशी तक्रार सदर सफाई कर्मचा-यांनी केल्यावर या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले.
सफाई कर्मचा-यांना देण्यात येणारे व्यावसायिक प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार करण्यासाठी राष्ट्रीय अनुसुचित जाती  आर्थिक विकास महामंडळातून कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे तसेच महात्मा फुले विकास महामंडळाच्या योजनांची माहिती सफाई कर्मचा-यांचे  मेळावे शिबिर घेऊन देण्यात यावी. स्वच्छता निरिक्षकांचे पद सरळ सेवेने न भरता 50 जागा पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Thursday, 16 August 2018

ग्रामीण भागात  शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी
युवा माहिती दूत मोलाची भूमिका बजावणार
 
                                            - प्रकाश महेता
      *माहिती व जनसंपर्क महासंचालनालायच्या युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ

वर्धा दि 15 :-
  शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शासनाच्या या योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत  पोहोचविण्यात युवा माहिती दूत मोलाची भूमिका बजावतील,  असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता  यांनी  केले. 

       शासकिय मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात शासनाच्या 'युवा माहिती दूत' उपक्रमाचा शुभारंभ आज श्री महेता यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करून करण्यात आले. त्यानंतर
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या उपक्रमाची ध्वनिचित्रफीत उपस्थितांना  दाखविण्यात आली.  यावेळी श्री महेता  बोलत होते. या कार्यक्रमाला  जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार डॉ पंकज भोयर,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अजय गुल्हाणे, पोलीस अधीक्षक बसवराज तेली,  सहायक जिल्हाधिकारी श्री जिंदाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्षमी शाह, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे  प्रकल्प संचालक डॉ करुणा जुईकर,  माजी खासदार सुरेश वाघमारे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, प्रशासकीय अधिकारी व नागरिक  उपस्थित होते.

युनिसेफच्या सहयोगाने तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती
  लाभार्थींपर्यंत थेटपणे पोहचविणे हे ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ तसेच पारंपारिक लोककलेच्या माध्यमातून
  केला जातो.  ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत न पोहचणाऱ्या शासकीय योजना माहिती थेट त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे साहाय्य घेण्याचा ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत तयार करण्यात आलेली माहिती दूत उपक्रमाबाबत माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.
                                                            00000





Monday, 9 July 2018


प्रधानमंत्री आवास योजनेतून वर्ध्यात अतिरिक्त 11 हजार घरे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मुख्यमंत्र्यांनी घेतला वर्धा जिल्ह्याचा आढावा  लोकसहभागातून पांदन रस्त्यांसाठी भरीव निधी  ग्रामविकास आराखडा, ‘मुद्रा शक्ती’ डीव्हीडीचे प्रकाशन नागपूर,दि. 9 : सन 2022 पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याचा केंद्र आणि राज्य शासनाचा मानस आहे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात उत्कृष्टपणे होत आहे. घरापासून एकही गरजू कुटुंब वंचित राहू नये, यासाठी वर्धा जिल्ह्याची वाढीव मागणी लक्षात घेता अतिरिक्त 11 हजार घरे उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधान भवन येथील सभागृहात वर्धा जिल्हा आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, नागो गाणार, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, अमर काळे, मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस अधीक्षक निर्मलादेवी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे उपस्थित होते. जिल्ह्यात पालकमंत्री अतिक्रमणमुक्त पांदन रस्ता योजना लोकसहभागातून चांगल्या पध्दतीने राबविण्यात येत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत 200 किमीचे पांदन रस्ते पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांची मागणी पाहता पांदन रस्त्यांसाठी उपलब्ध निधी खर्च होताच तात्काळ अतिरिक्त निधी देण्यात येईल. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत येणारे सर्व रस्ते तात्काळ दुरुस्त करावे. या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे रस्त्याची कामे दर्जेदार होतील, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. धडक सिंचन विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अहवालानुसार कामे करावीत. अनेक वर्षांपासून रखडलेल्या देवळी पाणी पुरवठा योजनेच्या दहा किलोमीटरच्या पाईपलाईनचे कार्य दीड महिन्यात पूर्ण करून योजना कार्यान्वित करावी. तसेच सध्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. नदी आणि नाल्यांच्या काठावरील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पूर नियंत्रण कार्यक्रमासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. धाम नदीच्या स्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी यांनी सादरीकरण केले असता या मोहिमेत हिंगणघाट येथील वणा नदीचा समावेश करावा, तसेच कपंनी सामाजिक दायित्वमधून निधी उपलब्ध करून घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाबत विशेष बैठक : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सद्यस्थितीत प्रशासक नेमण्यात आला आहे. या बँकेतील दोन लाख 19 हजार 409 ठेवीदारांचे 364 कोटी 22 लाख रुपये देणे आहे. या बँकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनीकरणाबाबतचा प्रस्ताव आमदार डॉ. पंकज भोयर आणि लोकप्रतिनिधींनी ठेवला. यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी सहकार मंत्री आणि सहकार सचिव यांच्या उपस्थितीत विशेष बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी हमी दिली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपासाठी वीज पुरवठा, स्वच्छता अभियान, पोलिस गृहनिर्माण योजना, पीककर्ज आढावा, पीक विमा योजना आदींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील लोकाभिमूख आणि नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. यात सौरऊर्जा जलउपसा प्रकल्प, गुन्हे माहिती व्यवस्थापन प्रणाली, लोकसहभागातून पांदन रस्ते, धाम नदी पुनर्जीवन, स्वयंसहायता बचतगट उद्योगिक सशक्तीकरण, टोल फ्री हेल्पलाईन, लघु प्रकल्प कालव्यांची दुरुस्ती व नुतणीकरण (दहेगाव, गोंडी), आपला आधार आपली बँक या उपक्रमांचा समावेश होता. तत्पूर्वी बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेला ग्रामविकास आराखडा आणि जिल्हा माहिती कार्यालय निर्मित प्रधानमंत्री मुद्रा योजनेवरील ‘मुद्राशक्ती’ या माहितीपटाच्या डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात आले. *****