Friday, 24 March 2017

              महिलांनी लघुउद्योगासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आधार घ्यावा.
                                   
                                     - सभापती गंगाधर कोल्हे
           हिंगणघाट व समुद्रपूर येथील मेळाव्यात 2 कोटी  रुपयांचे कर्ज वितरण
        वर्धा दि 23 (जिमाका ):- महिलांच्या आर्थिक विकासाशिवाय  देशाचा  संपूर्ण  विकास  होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांनी नोकरी सोबतच स्वतःमध्ये असलेल्या कौशल्याच्या आधारे लघु उद्योग उभारावा.त्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन  हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती गंगाधर कोल्हे यांनी केले.  हिंगणघाट येथे कलोडे सभागृहात आयोजित प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
           या कार्यक्रमाला पंचायत समिती  उपसभापती धनंजय रिठे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वामन कोहाड, जिल्हा  माहिती अधिकारी मनीषा सावळे, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे तसेच बँकांचे  व्यवस्थापक  उपस्थित होते.
               
पाणी हे  जीवन समजून त्याचा चांगला उपयोग करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असेही आवाहन श्री कोल्हे त्यांनी जागतिक जलदिनी केले.
                 
यावेळी मार्गदर्शन करताना श्री कोहाड म्हणालेबँका, बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज देतात.त्याचा उपयोग करून  आज ग्रामीण भागात छोटे मोठे गृह उद्योग सुरु आहेत. महिलांनी शिक्षण - प्रशिक्षणाकडे लक्ष देऊन व्यवसाय सुरु करण्यासाठी योग्य ज्ञान आत्मसात करावे. उत्तम कौशल्य गुणांच्या आधारे कोणताही व्यवसाय महिला करू शकतात. मुद्रा योजनेचा लाभ पारंपारिक  व्यवसाय करणा-यांसोबतच नवीन व्यवसाय सुरु करणा-याला सुद्धा होऊ शकतो. कोणतेही तारण न ठेवता या योजनेतुन   कर्ज सहज उपलब्ध होत असल्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेतून कर्ज उपलब्ध होणे साठी  अडचण आल्यास कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही  वामन कोहाड यांनी केले.
                यावेळी बोलताना म. ग्रा. जी. अ. चे व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी सर्व महिलांचे वैयक्तिक खाते बँकेत  उघडून द्यावे, अशी विनंती सर्व बँकांना केली.  महिलाबचत गटाच्या माध्यमातून केलेल्या बचतीमुळे देशाच्या विकासात महत्वाचा  सहयोग देत आहेत.  मुद्रा बँक योजनेतून महिलांनी स्वयंरोजगार करून देशाच्या आर्थिक विकासात भर घालावी. आपल्या योजना या मोबाईल अँप चा वापर करून योजनांचा लाभ घ्यावा  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
असाच मेळावा समुद्रपूर येथेही घेण्यात आला.दोन्ही मेळाव्यात 187 बचत गटांना 2 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज मंजूरीचे पत्र देण्यात आले.
यावेळी बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

                            शेतकरी आत्‍महत्‍येची 16 प्रकरणे पात्र
     वर्धा दि 23- शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणाची जिल्‍हास्‍तरीय समितीची सभा आज समितीचे अध्‍यक्ष अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजय दैने यांचे अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली. बैठकीत एकुण 28 शेतकरी आत्‍महत्‍येची प्रकरणे ठेवण्‍यात   आली. शासनाच्‍या निर्णयानुसार समितीचे अध्‍यक्ष यांनी सर्वानुमते 16 प्रकरणे पात्र ठरविले. तर 10 प्रकरणे अपात्र ठरविण्‍यात आले. आणि 2 प्रकरणे फेरतपासणीसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांचे कडे पाठविण्‍यात आले.
बैठकीला जिल्‍हा परिषद, जिल्‍हा पोलिस अधिक्षक,जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी, केमचे  प्रतिनिधी, जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाचे डॉ. विनोद वाघमारे, कारंजा पंचायत समितीच्‍या सभापती पंचायत समितीचे सभापती मंगेश खवशी, देवळी पंचायत समितीच्‍या सभापती विद्या भुजाडे उपस्थित होते.
                                                0000

                   भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना विनम्र अभिवादन
     वर्धा दि 23-जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने जिल्‍हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा आज शहिद दिनी त्‍यांच्‍या फोटोला हारअर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                            0000

समृध्‍दी महामार्गाची पारपडली पर्यावरण  जनसुनावणीत
     वर्धा दि 23- नागपूर-मुंबई समृध्‍दी महामार्ग प्रकल्‍पात बाधित  क्षेत्रातील 56 हजार वृक्ष तोडले जाणार आहे. पर्यावरणाचे हे नुकसान  1 लाख 6 हजार वृक्ष लावगवड करुन भरुन काढले जाईल. यामुळे प्रकल्‍पाचा पर्यावरणावर प्रदुषणाचा परिणाम होणार नसल्‍याचे महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण सल्‍लागार नरेद्र टोपे यांनी पर्यावरण विषयक जनसुनावनीत शेतक-यांना सांगितले.
नागपूर-मुबंई प्रस्‍तावित महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गाच्‍या पॅकेज 1 मधील नागपूर ते पिंपळगाव (वर्धा) दरम्‍यानच्‍या प्रकल्‍पात जाणा-या भूधारकांसाठी   पर्यावरण विषयक जनसुनावणीचे  आज विकास भवन येथे  आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी यांचे अध्‍यक्षतेखाली घेण्‍यात आली. यावेळी महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर, उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस व पर्यावरण सल्‍लागार नरेद्र टोपे उपस्थित होते.
 यावेळी प्रकल्‍पातील रस्‍त्‍याच्‍या बांधकामात होणारी वृक्षतोड  व पर्यावरण विषयी इतर बाबीची शेतक-यांनी तक्रारी व आक्षेप नोंदविला. याला उत्‍तर देतांना नरेंद्र टोपे म्‍हणाले, प्रकल्‍पात पर्यावरणातील सद्यस्थिती जाणून प्रकल्‍प भागात हवेतील गुणवत्‍ता, ध्‍वनीचे पातळी, पाण्‍याची व मातीची गुणवत्‍ता विचारात घेतली जाणार आहे. प्रकल्‍पामुळे पर्यावरणाचा होणारा दुष्‍परिणाम लक्षात घेऊन महामार्गाची रचना करण्‍यात येणार आहे. तसेच जमिनीची होणारी धूप कमी करण्‍यासाठी उपाययोजना करण्‍यात येणार आहे. प्रकल्‍पाच्‍या बांधकामात वापरण्‍यात येणारी वाहने प्रदुषण मुक्‍त प्रमाणीत झाल्‍याशिवाय वापरण्‍यात येणार नाही. कोणत्‍याही नैसर्गिक पाण्‍याच्‍या प्रवाहाला बाधा न पोहोचता कामे केल्‍या जाणार आहे. असे पर्यावरण सल्‍लागार नरेद्र टोपे यांनी उपस्थित शेतक-यांना सांगितले.
यावेळी प्रकल्‍पात जाणा-या भूधारकांनी भूसंचयन तसेच भूचयनात शेतीच्‍या मोबदला विषयी तक्रारी मांडल्‍या. रस्‍ते विकास महामंडळाचे अधिकारी,  जनसुनावणीला मोठया प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
                                                0000

Thursday, 23 March 2017