Thursday, 23 March 2017



              महिलांनी लघुउद्योगासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आधार घ्यावा.
                                   
                                     - सभापती गंगाधर कोल्हे
           हिंगणघाट व समुद्रपूर येथील मेळाव्यात 2 कोटी  रुपयांचे कर्ज वितरण
        वर्धा दि 23 (जिमाका ):- महिलांच्या आर्थिक विकासाशिवाय  देशाचा  संपूर्ण  विकास  होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांनी नोकरी सोबतच स्वतःमध्ये असलेल्या कौशल्याच्या आधारे लघु उद्योग उभारावा.त्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन  हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती गंगाधर कोल्हे यांनी केले.  हिंगणघाट येथे कलोडे सभागृहात आयोजित प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
           या कार्यक्रमाला पंचायत समिती  उपसभापती धनंजय रिठे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वामन कोहाड, जिल्हा  माहिती अधिकारी मनीषा सावळे, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे तसेच बँकांचे  व्यवस्थापक  उपस्थित होते.
               
पाणी हे  जीवन समजून त्याचा चांगला उपयोग करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असेही आवाहन श्री कोल्हे त्यांनी जागतिक जलदिनी केले.
                 
यावेळी मार्गदर्शन करताना श्री कोहाड म्हणालेबँका, बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज देतात.त्याचा उपयोग करून  आज ग्रामीण भागात छोटे मोठे गृह उद्योग सुरु आहेत. महिलांनी शिक्षण - प्रशिक्षणाकडे लक्ष देऊन व्यवसाय सुरु करण्यासाठी योग्य ज्ञान आत्मसात करावे. उत्तम कौशल्य गुणांच्या आधारे कोणताही व्यवसाय महिला करू शकतात. मुद्रा योजनेचा लाभ पारंपारिक  व्यवसाय करणा-यांसोबतच नवीन व्यवसाय सुरु करणा-याला सुद्धा होऊ शकतो. कोणतेही तारण न ठेवता या योजनेतुन   कर्ज सहज उपलब्ध होत असल्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेतून कर्ज उपलब्ध होणे साठी  अडचण आल्यास कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही  वामन कोहाड यांनी केले.
                यावेळी बोलताना म. ग्रा. जी. अ. चे व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी सर्व महिलांचे वैयक्तिक खाते बँकेत  उघडून द्यावे, अशी विनंती सर्व बँकांना केली.  महिलाबचत गटाच्या माध्यमातून केलेल्या बचतीमुळे देशाच्या विकासात महत्वाचा  सहयोग देत आहेत.  मुद्रा बँक योजनेतून महिलांनी स्वयंरोजगार करून देशाच्या आर्थिक विकासात भर घालावी. आपल्या योजना या मोबाईल अँप चा वापर करून योजनांचा लाभ घ्यावा  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
असाच मेळावा समुद्रपूर येथेही घेण्यात आला.दोन्ही मेळाव्यात 187 बचत गटांना 2 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज मंजूरीचे पत्र देण्यात आले.
यावेळी बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
                                                            0000

Tuesday, 14 March 2017

शेतक-यांचा माल थेट ग्राहकांच्या दारात बचत गटांच्या वस्तूंसाठी पूरक केंद्र




शेतक-यांचा  माल थेट ग्राहकांच्या दारात
बचत गटांच्या वस्तूंसाठी
   पूरक केंद्र
वर्धा,दि 14:- महिला व शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करण्यात येते.मात्र त्या वस्तुंना पाहिजे त्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होत नाही. अशा  वस्तूंची मागणी वाढावी, लोकांना बचत गटाच्या वस्तूची माहिती व्हावी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील  विविधा केंद्रात पूरक केंद्र सुरू करण्यात आले आहे.
                  या केंद्रामध्ये  महिला व शेतकरी बचत गटाकडून उत्पादित संत्री,  तूरडाळ, वायगाव हळद, मिरची पावडर,  फिनाईल, साबण, शॅम्पू,  पापड, कुरडया, शेवळ्या,  गुळ, मसाले,  अगरबत्ती,  कागदी पिशव्या,  अशा अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे या सर्व वस्तू दर्जेदार आणि भेसळमुक्त आहेत.  बचत गटाच्या वस्तूंची विक्री वाढावी म्हणून जिल्हाधिकारी यांनी  प्रत्‍येक  शासकीय कार्यक्रमात अतिथीना पुष्पगुच्छ देण्याऐवजी बचत गटाच्या उत्पादित वस्तूंनी सजवलेली परडी भेट म्हणून दिली जावी अशा सूचना दिल्यात. त्यामुळे  बचत गटांना अशा कार्यक्रमाकरिता मागणी  मिळत असून त्यामाध्यमातूनही विक्री वाढत आहे.  यामध्‍ये महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणा, केम, शेतकरी उत्‍पादक गट यांचा समावेश  असून त्‍यांच्‍या सर्व उत्‍पादित मालाची विक्री करण्‍याकरिता विविधा मध्‍ये जागा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.
              नुकत्याच सुरु झालेल्या  या पूरक केंद्रातून आतापर्यन्त 25 हजार  रुपयांची विक्री झाली आहे.  दिवसेंदिवस या उत्पादनांना ग्राहकांचा  चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांनी एकदा तरी या केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले आहे. हे पूरक केंद्र  सुरु करण्यासाठी केम प्रकल्पाचे समन्वयक निलेश वावरे आणि त्यांच्या सहका-यांनी परिश्रम घेतले.
000000

Wednesday, 8 March 2017

-         नयना गुंडे
Ø प्रधानमंत्री मुद्रा बँक मेळावा
वर्धा , दि.8 मार्च – महिला आर्थिकदृष्‍ट्या सक्षम असल्‍यास की, त्‍यांच्‍यामध्‍ये वेगळाच आत्‍मविश्‍वास निर्माण होवून त्‍या मनाने सुदधा खंबीर होतात. त्‍यामुळे महिलांनी आर्थिक सक्षमतेवर भर देण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना मुंडे यांनी केले.
आतरराष्‍ट्रीय महिला दिना निमित्‍त प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची जनजागृती आणि कर्ज वितरण करण्‍यासाठी जिल्‍हा स्‍तरीय मुद्रा बँक योजना समन्‍वय समिती आणि महाराष्‍ट्र राज्‍य ग्रामीण जीवन्‍नौनती अभियान यांच्‍या सयुक्‍त विद्यमाने सावंगी मेघे येथील दत्‍ता मेघे आयुर्विज्ञान संस्‍थेच्‍या सभागृहात महिला मेळावा अयोजित करण्‍यात आला होता. यावेळी महिलांना मार्गदर्शन करतांना श्रीमती गुंडे बोलत होत्‍या. या कार्यक्रमाला उपजिल्‍हाधिकारी एन. के. लोणकर, जिल्‍हा अग्रणी बँक व्‍यवस्‍थापक वामन कोहाड, महिला सुरक्षा पथकाचे शिल्‍पा बरडे, जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, नाबार्डच्‍या  जिल्‍हा व्‍यवस्‍थापक स्‍नेहल बनसोड, तहसिलदार मनोहर चव्‍हाण, ग्रामीण जीवन्‍नौनती अभियानचे  देवकुमार कांबळे, स्‍टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्‍यवस्‍थापक, मावीमच्‍या श्रीमती देशमुख उपस्थित होत्‍या.
ग्रामपंचायतमध्‍ये महिलांना स्‍वतंत्रपणे वेगळी जागा देण्‍यात यावी. यासाठी महिलांनी मागणी केली असून 35 ग्रामपंचायतीने महिलांची मागणी मान्‍य करुन स्‍वतंत्रपणे जागा दिली आहे. यामध्‍ये महिलांसाठी प्रशिक्षण, महिलांद्वारे उत्‍पादित वस्‍तुची विक्री तसेच त्‍यांना स्‍वतंत्रपणे काम करण्‍यासाठी ही जागा उपयोगी ठरणार आहे. यासाठी जिल्‍हाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. पुर्वी महिलांनी मतदानाच्‍या हक्‍कासाठी लढा उभारला होता.  स्वित्‍झर्लड 1972 मध्‍ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारतातील महिलांना हा अधिकार मिळविण्‍यासाठी कोणताही लढा उभारावा लागला नाही. राज्‍य घटनेने आपल्‍याला हा अधिकार दिलेला आहे. त्‍यामुळे महिलांनी मतदानाचा हक्‍क बजावला पाहिजे, असे आवाहन श्रीमती गुंडे यांनी केले.  
या कार्यक्रमात जिल्‍हा अग्रणी बँक व्‍यवस्‍थापक कोहाड यांनी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना तसेच बँकेच्‍या इतर योजना संदर्भात माहिती दिली. यावेळी 118 बचत गटाना 1 कोटी 70 लाख रुपयाचे कर्ज वितरण करण्‍यात आले. नाबार्डच्‍या  स्‍नेहल बनसोड यांनी  नाबार्ड मार्फत बचत गटाना दिला जाणा-या  सुविधा आणि योजनाची माहिती दिली. महिला सुरक्षा केंद्राच्‍या शिल्‍पा बरडे यांनी महिलांची सुरक्षतेसंदर्भात मार्गदर्शन केले. उपजिल्‍हाधिकारी लोणकर यांच्‍या हस्‍ते नविन मतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटप करण्‍यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात बचत गटाच्‍या महिलांची उपस्थिती होती.
00000000





Thursday, 26 January 2017

देश सेवेची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने काम करावे -ना. महादेव जानकर
 भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
वर्धा, दि.26- चरख्याच्या माध्यतमातून महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात गरिबाच्यां हाताला काम दिले खादीच्या या धाग्याने देशाला स्वावलंबन आणि स्वााभिमानाने जगण्या ची प्रेरणा दिली. तर विनोबांनी हाती घेतलेल्या भूदान यज्ञाने लाखो हेक्टेर जमिन भूमिहिनांना उर्दनिवाहासाठी मिळाली. आज हिच देश सेवेची प्रेरणा घेऊन प्रत्ये‍काने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ा् विकास आणि मत्य्ह विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
भारतीय प्रजासत्तााकाचा 67 वा वर्धापण दिनाचे मुख्य शासकिय ध्व जारोहण ना.महादेव जानकर यांचे हस्ते झाले. जिल्हा क्रिडा संकुल येथे संपन्न झालेल्या् या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त‍ जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.शेरखाने, अतिरिक्ति जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी तसेच स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते. यावेळी ना. महादेव जानकर यांनी सर्व स्वा तंत्र्य संग्राम सैनिक आणि शहिदांना विनम्र अभिवादन करुन उपस्थित नागरिकांना शुभेच्छाा दिल्या्. गृह विभाग, होमगार्ड, एन.सी.सी. स्का‍ऊट, गाईड पथकांनी पथसंचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच सामान्य. रुग्णालयातर्फे तंबाखू नियंत्रणासाठी जनजागृती करणारी उत्त म झॉंकी , आपात कालीन वैद्यकिय सेवा, आरोग्य विभागाची विविध योजनाची माहिती देणारा चित्ररथ तसेच गृह विभागाचे सायबर क्राईम, दंगल नियंत्रण, वज्र अशा विविध चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती पर संदेश देण्याात आला.
यावेळी मंत्रीमहोदयांचे हस्तेी जिल्हयाने सशस्त्रच सेना ध्वज निधी संकलन 44 लाखांपेक्षा अधिक केल्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान प्रकाश थोटे यांनी आंतकविरोधी अभियानामध्येच उत्तसम कामगिरीबजावल्या बद्दल शासनाच्यात वतीने 17 व्या कारगीर विजय दिनानिमित्तम ताम्रपट प्रदान करण्यात आले. रोकडरहित व्यवहाराअंतर्गत उत्कृहष्ट् कार्यकरणारे प्रकल्प व्ययवस्थापक अमोल रघाटाटे, नेहरु युवा केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, केम प्रकल्प्, महा ई-सेवा केंद्र, एम.एस.आर.एल.एम. मधील कर्मचा-यांचा प्रमाणपत्र देऊन सत्का र करण्याृत आला. महात्मा गांधी तंटामुक्तत गाव मोहिम प्रभावी व यशस्वीेरित्या. राबविण्यामसाठी बातम्यां च्यां माध्य‍मातून प्रसिध्दी देणा-या उत्कृ‍ष्टि बातमीदारांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्येह विभागस्तरीय तृतीय पुरस्कास प्रविण होणाडे , जिल्हा सतरीय प्रथम पुरस्का र ओमप्रकाश अग्रवाल तर तृतीय पुरस्कार मालती गांवडे यांना प्रदान करण्यात आला.
भारतीय स्काकउट गाईड्स कार्यालयाचे वतीने राष्ट्र्पती पुरस्कार चाचणीमध्ये यशस्वी झालेल्या् वर्धा जिल्हयातील सात स्का ऊट-गाईड्सचा प्रमाणपत्र देऊन गौर करण्याकत आला. वनविभागाच्याव वन्यशजिव सप्ताहाअं‍तर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्परर्धा मध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्कार प्राप्तव विद्यार्थ्यांाचा मान्ययवरांचे हस्तेक प्रमाणपत्र देऊन सत्का र करण्याथत आला.
यावेळी केसरीमल कन्या विद्यालय, न्युे इंग्लीश हायस्कुल, लोकमहाविद्यालय, भरत ज्ञान मंदिर, रत्नीीबाई विद्यालय, हिमंतसिंगका विद्यालय, आनंदराव मेघे विद्यालय आणि नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यां नी विविध सांस्कृीतिक कार्यक्रम सादर केले.
मुख्य कार्यक्रमाचे संचालन डॉ. अजय येते, ज्यो,ती भगत यांनी तर सांस्कृ तिक कार्यक्रमाचे संचालन संजय सुकळकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शासकिय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठया संख्येेने उपस्थित होते.