Thursday, 5 May 2016

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सज्ज
v जिल्हा तालुकास्तरावर 1 जूनपासून नियंत्रण कक्ष
v आपत्ती निवारण आराखडा वेबसाईटवर
v नदी काठावरील 88 पुराची धोका असणारी गावे
v नगर पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण
            वर्धा, दिनांक 30 – नैसर्गिक आपत्ती तसेच अतिवृष्टी पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून कोणतीही आपत्ती उद्भवल्यास जिल्हास्तरीय यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी दिल्यात.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नैसर्गिक आपत्ती तसेच मॉन्सून पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
               नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी पूरपरिस्थिती करावयाच्या उपाययोजनांसदंर्भात विभागनिहाय जिल्हा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून जिल्ह्याच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी विभागनिहाय अधिका-यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच विभागांच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली आहे.
                        तालुकास्तरावर मान्सूनपूर्व आढावा बैठकीतून नदी नाल्यांमुळे बाधित होणा-या गावांची माहिती घेऊन पूर्व परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आराखडा तयार करावा. अशा सूचना करतानाच जिल्हाधिकारी श्री, नलवडे म्हणाले की  या आराखड्यात ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक प्रमुख व्यक्तींची नावे असलेली दूरध्वनीसह यादी तयार करावी. नगर परिषदा ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमधून धोकादायक इमारतींच्या मालकांना सूचना देण्यात यावी. तसेच नदी नाल्यातील कचरा गाळ काढण्याची मोहीम राबवावी, असे यावेळी त्यांनी सांगितले.
             जिल्ह्यात असणा-या आरोग्य सुविधा त्याअंतर्गत असणा-या गावांची माहिती मोठे मध्यम प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणी साठ्यांसंदर्भात तसेच पूरनियंत्रणांसदंर्भात आपत्तकालीन कृती आराखडा तयार करून जलाशयाची पातळी दररोज जिल्हा नियंत्रण कक्षाकडे उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली. पोलिस विभाग, जिल्हा दूरसंचार यंत्रणा, साबांवि, प्रादेशिक परिवहन विभाग होमगार्ड, जिल्हा परिषद, गटशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, महामंडळ, यांच्यातर्फे मान्सूनपूर्व तयारी संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सादरीकरण केले.

******
बालकांना मिळणार इंजेक्शनव्‍दारे पोलिओ लस
-         डॉ.पुरुषोत्‍तम मडावी
Ø जिल्‍हयात आयपीव्‍ही पोलिओ लसचा शुभारंभ

वर्धा, दि. 25 –  पोलिओची लस यापूर्वी पाच वर्षातील बालकाला पाजली जात. परंतु आता बालकांना इंजेक्शनद्वारे पोलिओ लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी दिली.
             जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय , वर्धा येथे डॉ. मडावी यांचे अध्‍यक्षतेखाली व अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अजय डवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, जिल्‍हा हिवताप अधिकारी डॉ. प्रविण धाकटे यांचे उपस्थितीतजिल्‍हास्‍तरीय आयपीव्‍ही पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्‍यात आला.
            दि.25 एप्रिलपासून नियमित लसीकरण कार्यक्रमात आयपीव्‍ही (इंजेक्‍शन व्‍दारे पोलिओ लस ) देण्‍याची सुरवात करण्‍यात आली आहे. तसेच ट्रायव्‍हंट पोलिओ लसीचे बॉयव्‍हॅलंट पोलिओ लसीमध्‍ये रुपांतर करण्‍यात आले आहे.  दि.24 एप्रिल पर्यंत नियमित लसीकरणामध्‍ये टायव्‍हॅलंट पोलिओ लसीचा वापर करण्‍यात येत होता. ज्‍यामध्‍ये टाईप 1, 2 व 3 प्रकारचे पोलिओ व्‍हॉयरस अस्‍तीत्‍वात होते. परंतु सन 1999 पासून जगातून टाईप 1 व टाईप 3 पोलिओ व्‍हॉयरस असलेले बायव्हॅलंट पोलिओ व्‍हॅक्‍सीन नियमित लसीकरणात समाविष्‍ठ करण्‍यात आले, असल्याचेही श्री. मडावी यांनी सांगितले. 
            तसेच जिल्‍हयात इंजेक्शनव्‍दारे पोलिओ लसीकरण करण्‍यात येणार असुन सदर लस बाळाच्‍या उजव्‍या खांद्यावर बॉयव्‍हॅलंट पोलिओ व पेंटाव्‍हॅलंट लसीच्‍या पहिल्या व तिस-या डोसबरोबर देण्‍यात येणार आहे, असेही ते म्हणाले.  जिल्‍हयात सदर लसीचा साठा सर्व आरोग्‍य केंद्रात उपलब्‍ध करुन देण्‍यात आला असून कर्मचा-यांनी गृहभेटीदरम्‍यान या लसबाबत कार्यक्षेत्रात जनजागृती करावी, असे आवाहन अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी  यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा नगराळे यांनी केले तर आभार रत्ना हिवरकर यांनी मानले.
                                                                        
                    
हिवताप निर्मूलनाकरिता सर्वंकष प्रयत्‍नांची गरज
                                         ---आंबटकर
              वर्धा, दि. 25 –जागतिक स्‍तरावर हिवताप रुग्‍णांची वाढती संख्‍या व या आजाराचे गंभीर स्‍वरुप लक्षातघेता संपूर्ण जगाने हिवताप निर्मूलनासाठी प्रयत्‍न करावे. यासाठी सोवियत संघातील देश पुढाकार घेणार आहे. जागतिक आरोग्‍य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्‍हणुन साजरा करण्‍याचे ठरविले आहे. जिल्‍हयात या दिवशी या आजाबाबत आरोग्‍य विभागाकडून मोठया प्रमाणावर जनजागृती करण्‍यात येणार आहे.
चांगल्‍याकरिता हिवताप समाप्‍त हे या वर्षीच्‍या हिवताप दिनाचे घोषवाक्‍य आहे. हिवताप आजाराचे दुष्‍परिणाम मानव जातीला भोगावे लागू नये, यासाठी हिवताप निर्मूलनासाठी सर्वाच्‍या सामूहिक प्रयत्‍नाची गरज आहे.
हिवताप निर्मूलन कार्यक्रमात मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्‍हा परिषेदेच्‍या आरोग्‍य समितीचे सभापती वसंत आंबटकर , जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. डी.जी.चव्‍हाण , जिल्‍हा हिवताप अधिकारी डॉ. प्रविण धाकटे यांनी केले आहे.
लक्षणे- हिवताप या आजारात अचानक थंडीपासुन ताप येतो, अंग दुखने ,डोके दुखने , उलटी होणे, घाम येऊन ताप कमी होणे, रोग्‍याला थकवा येणे व असा ताप एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड येणे अशा प्रकारचे लक्षणे दिसून येतात. मेंदूच्‍या हिवतापामध्‍ये हि लक्षणे तीव्र स्‍वरुपाची असतात. अशा प्रसंगी हिवतापाचा रोगी बेशुध्‍द होऊ शकतो व प्रसंगी मृत्‍युही होऊ शकतो.
हिवतापाचा प्रसार- हिवताप रोगाचा प्रसार अॅनालिलीस डासाची मादी चावल्‍यामुळे होतो. हिवताप दुषित रोग्‍यास अॅनालिलीस डासाची मादी चावल्‍याबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्‍या शरीरात प्रवेश करतात आणि असा रोगजंतु लाळेबरोबर निरोगी व्‍यक्‍तीच्‍या शरीरात प्रवेश करतात. 8 ते 10 दिवसात हिवतापाचे जंतू माणसाच्‍या श्‍रीरात वाढतात व रक्‍तातील तांबडया पेशी फुटून रोग्‍यास थंडी ताप येते.
प्रतिबंधात्‍मक उपाययोजना व जनतेने घ्‍यावयाची काळजी
ताप आल्‍यास जवळच्‍या केंद्रात जावून औषधोपचार घ्‍यावा. रुग्‍ण बेशुध्‍द पडल्‍यास त्‍याला जवळच्‍या रुग्‍णालयात घेऊन जावे. आरोग्‍य कर्मचा-यांचे फीरतीच्‍या व गृहभेटीच्‍या वेळेस रक्‍त नमुने घेण्‍यास सहकार्य करावे. डॉक्‍टरांच्‍या व आरोग्‍य कर्मचा-यांच्‍या सल्‍ल्‍यानुसार औषधोपचार करावा. उपाशीपोटी उपचार घेऊ नये. हिवताप घोषित केलेल्‍या गावातील प्रत्‍येक घरातील खोल्‍या फवारणी केल्‍यानंतर किमान सहा आठवडे भिंती सारवू नये. परिसर स्‍वच्‍छ ठेवावा. पाणी साचू देवू नये.
                                                                        00000

समतादूत प्रकल्‍पामार्फत ग्रामपंचायतींना
 मोफत प्रबोधनात्मक पुस्‍तकांचे वाटप
              वर्धा, दि. 25 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 125 व्‍या जयंतीनिमित्‍ताने बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) समातादूत प्रकल्पामार्फत जिल्‍हयातील सर्व ग्रामपंचायतींना मोफत प्रबोधनात्मक पुस्‍तकांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प संचालक प्रियदर्शनी डोंगरे यांनी दिली आहे. तसेच या उपक्रमांतर्गत समतादूत ग्राम उदय से भारत उदय या उपक्रमाला यशस्‍वी करत असल्याचेही  त्यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी अनिता तेलंग यांच्या मागदर्शनाखाली समतादूत विशाखा पोराटे, प्रिया ठाकरे, रुपाली ठाकरे, अनिता दाढे,जरीन पठाण, नंदा प्रजापती, अर्चना भगत, स्‍वप्‍नील चोरे, शीतल मोरे, विक्‍की बिजवार, बंशी परतेती, विनायक भांगे  या समतादुतांनी ग्रामपंचायतींना भेटी देऊन संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक यांची भेट घेतली. तसेच ग्रामसभेत सर्वोत्तम भूमिपूत्र गोतम बुद्ध, समाधीमार्ग, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय संविधान, संत गाडगेबाबा, अंधश्रद्ध निर्मुलन व जादूटोणाविरोधी कायदा या पुस्तकांबाबत मार्गदर्शन करून त्यांना पुस्तकांचे वाटप केले. तसेच प्रबोधनात्मक जाणीवजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे श्रीमती डोंगरे यांनी सांगितले. 
                                                            000

                         महाराष्‍ट्र दिन समारंभ पूर्व तयारी बैठक
वर्धा, दि.25 - महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा 56 वा वर्धापन दिन आयोजनाबाबत सर्व संबंधित अधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत महाराष्‍ट्र दिनाच्‍या पूर्वतयारी करिता पोलीस विभागाकडे परेड संचलन सराव व रंगित तालीम, ध्‍वज लावणे व उतरवणे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मैदानाची व्‍यवस्‍था, आदींसह विद्युत व्‍यवस्‍था, रुग्‍णावाहिकाची व्यवस्था करण्याबाबत संबंधित अधिका-यांना सूचना देण्यात आल्या. तसेच कार्यालय प्रमुखांनी बक्षीस, गौरव प्राप्त पात्र धारकांची यादी दोन दिवसांमध्ये निवासी उपजिल्‍हाधिकारी यांचेकडे सुपूर्द करावी, अशा सूचनाही दिल्यात.                                                        0000

हिवताप निर्मूलनासाठी सर्वांनी मच्‍छरदानीचा वापर करावा
-         त्रिवेणी कुत्‍तरमारे
Ø सायकल व रॅलीला हिरवी झेंडी दाखवून केला शुभारंभ
   वर्धा, दि. 25-हिवताप निर्मूलनसाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. हिवतापाची लक्षणे आढळल्‍यास तात्‍काळ रुग्‍णालयात जाऊन उपचार घ्‍यावा. तसेच या आजारापासुन बचावासाठी सर्वांनी मच्‍छरदानी वापरावी , असे आवाहन नगराध्‍यक्ष त्रिवेणी कुत्‍तरमारे यांनी केले.
जागतिक हिवताप दिनामित्‍त आज जिल्‍हा हिवताप अधिकारी, वर्धा कार्यालयाने सायकल व रॅलीचे आयोजन सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा येथे केले होते.    यावेळी नगराध्‍यक्ष त्रिवेणी कुत्‍तरमारे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली यावेळी त्या बोलत होत्या.  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी, अतिरिक्‍त जिल्‍हा आ‍रोग्‍य अधिकारी डॉ. अजय डवले, रमन लालवाणी, मुस्‍तफाभाई, अख्‌तर कुरेशी, डॉ. सिद्धार्थ बुटले, श्री. दुधाने, जिल्‍हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे यांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्‍हयातील लॉयन्‍स क्‍लब गांधी सिटी व खासगी वैद्यकीय व्‍यावसायिक डॉ. सरोदे, डॉ.पावडे डॉ.वाडीभस्‍मे, डॉ.विश्‍वास, डॉ.आनंद गाढवकर, डॉ. ढगे, डॉ.ताम्‍हण, डॉ.महेंद्र भगत, डॉ. अजय निंबलवार व  वैद्यकीय जनजागृती मंच यांच्या संयुक्‍त विद्यमाने सायकल व रॅलीचा प्रारंभ करण्‍यात आला.
रॅलीमध्‍ये हिवताप जनजागृती त्‍यात विशेषतः हिवतापाची लक्षणे जसे थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येवू शकतो. डोके दुखी ,मळमळ, घाम येवून अंग गार पडणे, व हिवताप कसा टाळवा, डासाची पैदास केंद्र  नियंत्रण व औषधापचार इत्‍यादी बाबत कशा दक्षता घ्‍यायच्‍या याबाबत संदेश जनतेस रॅलीच्‍या माध्‍यमातून देण्‍यात आला.
रॅलीच्‍या यशस्‍वीतेसाठी डॉ. पी.आर.धाकटे यांचे मार्गदर्शनात अरविंद लोंखडे, श्‍याम नंदनवार, सुरेश काळसर्पे , श्रीमती कुंभारे, जांगड, दिलीप रहाटे, अरविंद बोटकुले, सुधीर पोळ, राजेंद्र मुंढे, रवींद्र चंद्रे, वैभव तायवाडे, भारत पंडित, संजय चौधरी, संजय जाधव, प्रकाश मानकर, प्रशांत गावंडे, ज्ञानेश्वर ढगे, रंगराव कुमरे, श्री. लोखंडे, आकाश भेंडे आदींनी पुढाकार घेतला.
                                                            ०००
                                                       
विविध खेळांचे मे महिन्यात उन्‍हाळी प्रशिक्षण शिबिर
             वर्धा, दि.25 – स्‍थानिक जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा तथा विविध संघटनाच्‍या संयुक्‍त विद्यमाने जिल्‍हा क्रीडा संकुल, वर्धा येथे दिनांक 1 मे ते 31 मे, 2016 या कालावधीत बॉक्सिंग, सॉफ्टबॉल, रायफल व पिस्‍तुल शुटींग, फुटबॉल, बॅडमिंटन या खेळांचे उन्‍हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्‍यात येत आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर यांनी सांगितले आहे. 
            जिल्‍ह्यात प्रथमच रायफल व पिस्‍तुल शुटींग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्‍यात येत असून, यासाठी 25 मीटरची शुटींगरेंज तयार करण्‍यात आलेली आहे. तसेच सैन्‍य दलातील निवृत प्रशिक्षक विद्यार्थ्‍यांना नियमित प्रशिक्षण व फिजीकल फिटनेसकरीता शिस्‍तबध्‍द पध्‍दतीने सराव घेणार आहे. जिल्‍हा क्रीडा संकुल येथे बांधण्‍यात आलेल्‍या बॉक्सिंग रिंगवर बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण होणार आहे. तसेच फुटबॉल, सॉफ्टबाल आणि बॅडमींटन या खेळाचे प्रशिक्षणही आयोजित करण्‍यात येत आहे.
            अधिक माहिती करीता  बॉक्सिंग क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे  (9545858975),  सॉफ्टबॉल क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडधे  (9403866755), रायफल व पिस्‍तुल शुटींग क्रीडा मार्गदर्शक विवेक ठाकरे(8856961096), व्‍यवस्‍थापक रविंद्र काकडे(8007900867), बॅडमिंटन संघटनेचे मोहन शहा  (9421237742), श्री. भाईजान(982223789) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. रेवतकर यांनी केले आहे.
*****



महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा 56 वा वर्धापन दिन
जिल्‍हाधिका-यांच्‍याहस्‍ते ध्‍वजारोहन
          वर्धा, दि. 27 – महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा 56 वर्धापन दिन रविवार, दिनांक 1 मे 2016 रोजी सकाळी 8 वाजता जिल्‍हा क्रीडा संकुल येथे होत असून प्रभारी जिल्‍हाधिकारी दीपक नलवडे  यांच्‍याहस्‍ते ध्‍वजारोहन होईल.
          महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा मुख्‍य समारंभ जिल्‍हा क्रीडा स्‍टेडियम होणार असून प्रभारी जिल्‍हाधिकारी दीपक नलवडे संयुक्‍त पथ संचलनाची पाहणी करून मानवंदना स्‍वीकारतील. पोलिस दल, सशस्‍त्र पोलिस दल, महिला पोलिस दल, गृहरक्षक दल आदी पथसंचलनात सहभागी होतील. त्‍यानंतर उत्‍कृष्‍ट कार्य करणा-या संस्‍था व व्‍यक्‍तींचा यावेळी गौरव करण्‍यात येईल.
             जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या प्रांगणात प्रशासकीय भवन येथील महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा वर्धापन दिन सकाळी 7.30 वाजता साजरा करण्‍यात येईल. सकाळी 7.15 वाजता शिक्षण विभागातर्फे प्रभात फेरी काढण्‍यात येईल. महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा वर्धापन दिन समारंभ स्‍वातंत्र्यसंग्राम सेनानी, लोकप्रतिनिधी, वरिष्‍ठ प्रशासकीय अधिकारी व जनतेने उपस्थित राहावे, असे निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.
तालुकास्‍तरावर लोक‍प्रतिनिधींच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहन करण्‍यात येणार असून या समारंभासही सर्वांनी उपस्थित राहून महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा वर्धापन दिन जिल्‍हयात उत्‍साहाने साजरा करण्‍यात येत आहे.

00000
                  खरीप हंगामात शेतक-यांना खते, बियाने व
                         पिक कर्ज सहजपणे उपलब्‍ध करुन देणार
                                                सुधीर मुनगंटीवार
Ø  शेतकरी स्‍वाभीमानी वर्ष म्‍हणून साजरे करणार
Ø
Ø  4 लाख 14 हजार 550 हेक्‍टरवर खरीपाचे नियोजन
Øमागेल त्‍याला शेततळे कार्यक्रम प्रभावीपणे राबविणार
Ø  700 कोटीचे खरीप पिक कर्ज नियोजन
Ø7 हजार 625 क्विंटल बियाण्‍यांची उपलब्‍धता
Ø  सोयाबीन ऐवजी तूर,ज्‍वारी मुग पिकांना नियोजनात प्राधान्‍य 
वर्धा, दि.23-खरीप हंगामासाठी शेतक-यांना बियाने व खतांची कुठल्‍याही प्रकारे अडचण जाणार नाही त्‍यांना सहजपणे बियाण्‍याची उपलब्‍धता होईल या दृष्टीने नियोजन करतांनाच पिक कर्जासाठी सातशे कोटी रुपयाचे नियोजन करण्‍यात आले असून शेतक-यांना त्‍यांच्‍या मागणीनुसार 15 मे पर्यंत सहज व सुलभपणे पत पुरवठा करण्‍याच्‍या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्‍या.
          विकास भवन येथे जिल्‍हयाच्‍या खरीप हंगाम आढावा बैठक राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आले  त्‍यावेळी ते मार्गदर्शन करतांना ते  बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस , आमदार सर्वररणजित कांबळे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, जिल्‍हा परिषेदेच उपाध्‍यक्ष विलास कांबळे, सभापती श्रीमती श्‍यामला अग्रवाल, श्रीमती चेतनाताई मानमोडे, वंसतराव आंबटकर, प्रभारी जिल्‍हाधिकारी दिपक नलावडे ,मुख्‍यकार्यपालन अधिकारी संजय मीना, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती, कृषी उपसंचालक, श्री. राऊत आदी उपस्थित होते.
खरीप हंगामासाठी 4 लाख 14 हजार 550 हेक्‍टर पिक पेरणीचे नियोजन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये 2 लाख 27 हजार हेक्‍टर कापूस 1 लाख हजार हेक्‍टर सोयाबिन 70 हजार हेक्‍टर तूर 4 हजार 500 हेक्‍टर ज्‍वारी , भूईमुग , उडीद व तीळ आदीचा समावेश आहे. कापूस व तूर या बियान्‍यांमध्‍ये वाढ अपेक्षित असल्‍याने 67 हजार 825 क्विटंल बियाण्‍याची मागणी करण्‍यात आली असून यामध्‍ये 27 हजार 377 क्विंटल बियाने महाबिज तर्फे तर 40 हजार 448 क्विंटल बियाणे खासगी क्षेत्रातून उपलब्‍ध होणार खताच्‍या मागणीनुसार 1 लाख 24 हजार 400 मे.टनाचे आवंटन मंजुर झाले आहे.
जिल्‍हयात मागील वर्षी सरासरी पाऊस पडला असला तरी शेतक-यांना उत्‍पादन कमी झाले आहे. पीकाची उत्‍पादकता वाढण्‍याच्‍या काळामध्‍येच पावसाने दडी मारल्‍यामुळे मोठया प्रमाणात शेतकरी विवंचणेत सापडला आहे. यावर्षी चांगल्‍या पावसाचे संकेत असल्‍यामुळे खरीप हंगामात शेतक-यांना कुठल्‍याही प्रकारे बियाणे व खताची कमतरता पडणार नाही असे नियोजन करण्‍यात आले असल्‍याचे पालकमंत्री सूधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
हे वर्ष शेतकरी स्‍वाभीमानी वर्ष म्‍हणुन साजरे करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असल्‍याचे सांगताना पालकमंत्री पुढे म्‍हणाले की, शेतकरी अस्‍मानी संकटाचा सामना करत असतांना शासन खंबीरपणे शेतक-यांच्‍या पाठीशी उभे असल्‍याचे सांगतांना  पंतप्रधान कृषी पिक विमा योजना सर्वच पिकांना विम्‍याचे संरक्षण देणार आहे. पावसाचा खंड पडल्‍यामुळे नुकसान झाले असल्‍यास त्‍याचाही लाभ्‍ या योजनेतून मिळणार आहे.
शेतक-यांना विजेचे कनेक्‍शन देतांना कालबध्‍द कार्यक्रम तयार करा तसेच पावसाळयात देखभाल दुरुस्‍तीच्‍या दृष्‍टीने तालुका व झोन निहाय कृती आराखडा तयार करुन त्‍याचे नियोजन करण्‍याच्‍या सुचना देतांना वर्धा जिल्‍हा शेतकरी आत्‍महत्या ग्रस्‍त जिल्‍हा असल्‍यामुळे मागेल त्‍याला शेततळे या कार्यक्रमामध्‍ये आवश्‍यक शेततळे निर्माण करण्‍यात येतील यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. जिल्‍हयातील शेतकरी खासगी सावकारांकडे जाणार नाही यासाठी बॅकांनी सहज व सुलभ्‍पणे कर्ज पुरवठा करावा. सिंचनासाठी पाणी उपलब्‍ध करुन देण्‍यासंदर्भात तात्‍काळ नियोजन करावे अशा सुचनाही बैठकीत त्‍यांनी दिल्‍या.
शेतकयांना बियाण्‍यांचा पुरवठा करतांना चागल्‍या प्रतीचे व उगवण होणारे बियाणे उपलब्‍ध करुन दया जर खराब बियाणे दिल्‍यास संबंधिविरुध कडक करवाई करा अशी सुचना आमदार समिर कुणारवार यांनी केली. सिंचनासाठी उपलब्‍ध निधी खर्च होत नसल्‍याबाबत तात्‍काळ कारवाई करण्‍याच्‍या सुचना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी करताच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्‍याचे निर्देश पालकमंत्रयानी बैठकीत दिले. सोयाबिनचे उत्‍पादन कमी झाल्‍यामुळे यावर्षी पर्यायी पीक म्हुणुन तूर इतर पिकासंर्दभात शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍याच्‍या सुचना आमदार रणजित कांबळे यांनी केले.
प्रांरभी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती यांनी स्‍वागत करुन प्रास्‍ताविका खरीप हंगामात पिकांचे नियोजनाची माहिती दिली.  कृषी विभागातर्फे तयार करण्‍यात आलेल्‍या घडी पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्‍ते झाले.
रण्‍याच्‍या भ् सहज व सुलभ्‍पणे                 सन 2016-17 मधील अभियान
       राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान, राष्‍ट्रीय गळीत धान्‍य तेलताड व वृक्ष आधारित तेलबिया अभियान, जमीन आरोग्यपत्रिका वितरण अभियानातंर्गत 31 हजार आरोग्‍य पत्रिकेचे लक्ष्‍य, राष्‍ट्रीय शाश्‍वत  शेती अभियान, कृषी यांत्रिकिकरण उप‍अभियान, सोयाबीन बियानाचे घरगुती वापराबाबत गावनिहाय प्रशिक्षण व प्रसिध्‍दी, बियाणे खते व किटकनाशके यांचे गुणवत्‍ता नियंत्रणाबाबत तालुका व जिल्‍हास्‍तरावर भरारी पथकाची निर्मिती, मनरेगा अंतर्गत वैयक्तिक शेतकरी लाभार्थीकरिता फळबाग योजना, ईस्‍त्राईल पध्‍दतीने संत्रा लागवड, शेतकरी गटामार्फत सोयाबीन बिजोत्‍पादन कार्यक्रम राबविणे.

                                         0000