Sunday, 10 February 2013

जेष्‍ठ गांधीवादी प्रा. ठाकूरदास बंग आयुष्‍यभर निरामय जीवण जगले - आर.आर.पाटील


                                             बंग कुटूंबियांचे गृहमंत्र्याकडून सांत्‍वन
             वर्धा दि.10- जेष्‍ठ गांधीवादी विचारवंत प्रा.ठाकूरदास बंग यांनी आयुष्‍यभर गांधी विचाराला वाहून घेतानांच समाजसेवेच्‍या माध्‍यमातून निरामय जीवन जगले अशा भावना गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज चेतना विकास संस्‍थेच्‍या परिसरातील निवास्‍थानी श्रीमती सुमन बंग यांची भेट घेवून त्‍यांचे सांत्‍वन केले.  त्‍याप्रसंगी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.
          जेष्‍ठ गांधीवादी विचारवंत प्रा. ठाकुरदास बंग यांचे नुकतेच अलोडी येथील अशोक बंग यांच्‍या निवास्‍थानी निधन झाले. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सकाळी बंग कुटूंबियांचे सांत्‍वन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या निवास्‍थानी भेट दिली.स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांच्‍या फोटोस गुलाबपुष्‍प अर्पण करुन आपली भावपूर्ण आदरांजली वाहिली.
 महात्‍मा गांधी यांचे विचार पुढे नेण्‍यामध्‍ये स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांचे महत्‍वाचे योगदान असून संपूर्ण आयुष्‍य समाजसेवेसाठी त्‍यांनी वाहिले असल्‍याची भावनाही यावेळी व्‍यक्‍त केली.
         स्‍वातंत्र्य चळवळी मध्‍ये सक्रीय सहभाग घेतांना आचार्य विनोबा भावे यांच्‍या भुदान चळवळीसोबत सर्वोदय कार्यासाठी  आपले जीवन वाहिले होते. संपूर्ण क्रांती आंदोलन,स्‍वातंत्र्य आंदोलन यामध्‍ये त्‍यांचा सक्रीय सहभाग होता.
        स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांच्‍या पत्‍नी सुमनताई बंग यांचे आशिर्वाद घेतल्‍यानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मृत्‍यूपूर्वी त्‍यांच्‍या प्रकृती स्‍वास्‍थाची माहिती घेतली. तब्‍बल पंचवीसवर्षे मधुमेहासारखा आजार असूनही समाजसेवेत कधीही खंडपडू दिला नाही. महिन्‍यापूर्वी पडल्‍यामुळे पायाला फ्याक्‍चर झाले होते त्‍यामुळे त्‍यांची हालचाल बंद झाली होती. शेवटी आठ दिवस बोलने बंद होते आणि झोपेतच त्‍यांचे निधन झाले. आयुष्‍यात कुठलिही इच्‍छा किंवा अपेक्षा त्‍यांची नव्‍हती असे यावेळी अशोक बंग यांनी सांगितले.
        यावेळी डॉ. आकाश बंग श्रीमती निरंजना बंग व संपूर्ण बंग कुटूंबीय उपस्थित होते. आमदार सुरेश देशमुख, सुनिल राऊत आदिनीही स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांच्‍या प्रतिमेस गुलापुष्‍प अर्पण करुण आदरांजली वाहिली.
0000

होमगार्डना आवश्‍यक सुविधा व माणधनात भरीव वाढ -आर.आर.पाटील


                                       नागरी सुरक्षा जागृती अभियानाचे उदघाटन
वर्धा दि.10- राज्‍यातील 40 हजार होमगार्ड यांना अत्‍यंत कमी मानधन मिळत असून त्‍यांना मिळणा-या सुविधा व मानधनात भरीव वाढ करण्‍यात येईल अशी घोषणा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज केली.
          वर्धा गृहरक्षक दलातर्फे नागरी सुरक्षा जनजागृती अभियानाचे उदघाटन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्‍या हस्‍ते झाले त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
          वर्धा येथील होमगार्ड जिल्‍हा प्रशिक्षण केंद्राच्‍या  परिसरात आयोजित कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्‍यक्ष आमदार प्रा. सुरेश देशमुख होते. यावेळी प्रहारचे कर्णल सुनिल देशपांडे,सुनिल राऊत, स‍मीर देशमुख, जिलहा समादेशक प्रा. मोहन गुजरकर, किशोर माथनकर, रामभाऊ सातव,विजय मुळे आदि उपस्थित होते.
          नैसर्गीक आपत्‍ती,कायदा व सुव्‍यवस्‍था आदि आपत्‍ती निवारणासाठी होमगार्ड सदैव पोलीसांच्‍या मदतीसाठी तत्‍पर असल्‍याचे सांगतांना गृहमंत्री आर.आर.पाटील म्‍हणाले की, होमगार्डना दिले जाणारे मानधन अत्‍यंत अपूरे असल्‍यामुळे त्‍यांच्‍या मानधनात व सुविधेत वाढ करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून लवकरच त्‍याला शासनाची मान्‍यता घेण्‍यात येईल. होमगार्डना पोलीस भरतीसाठी प्राधान्‍य असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगीतले.
          जनतेच्‍या जीवनाचे व मालमत्‍तेचे रक्षण करण्‍यासोबतच अतिरेकी हल्‍ल्‍्यासारख्‍या प्रसंगामध्‍येही सतर्कपणे पोलीसांना मदत करतांनाच वृध्‍द नागरीकांनाही सहाय्य करण्‍याचे धोरण स्विकारण्‍याचे आवाहन करतांना गृहमंत्री म्‍हणाले की, वृध्‍द व्‍यक्‍तींच्‍या असहायतेचा लाभ घेवून मुंबईसह मोठ्या शहरामध्‍ये
मालमत्‍तेच्‍या लुटीसोबत खून करण्‍याचेही प्रकरण होत असल्‍यामुळे त्‍यांच्‍या संरक्षणासाठी व त्‍यांना विश्‍वास देण्‍यासाठी मुंबई प्रमाणे महिन्‍यातून एक दिवस अशा वृध्‍दांची भेट घेवून त्‍यांना मदतीचा उपक्रम राबवावा अशा सूचनाही त्‍यांनी यावेळी दिल्‍या.                                        
          प्रारंभी नागरीसुरक्षा जागृती अभियाना अंतर्गत पथसंचलनाची मानवंदना स्विकारुन नैसर्गीक आपत्‍ती बॉम्‍बस्‍पोट आदि परिस्थिती हाताळतांना होमगार्डची भूमिका या विषयाच्‍या अनुषंगाने सादर केलेल्‍या प्रात्‍यक्षिकाची माहिती घेतली.तसेच समाज प्रहरी या स्‍मरणिकेचेही गृहमंत्र्यांनी विमोचन केले.
          होमगार्ड मधून उत्‍तम सेवा बजावणा-या नागरिकांचा यावेळी प्रमाणपत्र देवून गौरव करण्‍यात आला. तसेच निसर्ग सेवा समितीतर्फे स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या स्‍मृती प्रित्‍यर्थ लावण्‍यात आलेल्‍या वृक्षाचे रोपनही गृहमंत्र्यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
          प्रारंभी जिल्‍हा समादेशक मोहन गुजरकर यांनी स्‍वागत करुण प्रास्‍ताविकात नागरी सुरक्षा जनजागृती अभियानाची माहिती दिली. गृहरक्षक दलात सातशे नागरीकांना भर्ती करण्‍यात आले असून त्‍यांना प्रशिक्षणही देण्‍यात आले आहे. बालगृह रक्षक दल,गृह रक्षक मैत्रीनी आदि उपक्रम राबवून नागरी चळवळ उभारण्‍याची संकल्‍पनाही त्‍यांनी यावेळी सांगितली. यावेळी मोठ्या संखेने नागरीक उपस्थित होते.
00000

Saturday, 9 February 2013

गृहमंत्री आर.आर पाटील आज वर्धेत


         वर्धाः दि.9- राज्‍याचे गृहमंत्री आर.आर.पाटील आज दिनांक 10 फेब्रुवारी,2013 रोजी वर्धेत सकाळी 9 वाजून 45 मि. नागपूर येथून शासकीय विश्रामगृह वर्धा येथे मोटारीने आगमन होईल. सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राष्‍ट्रवादी     ग्रेस पार्टी पदाधिकारी  व कार्यकत्‍यांच्‍या भेटी घेतील. सकाळी 11 वाजून 15 मि. वा नागरी सुरक्षा जनजागृती अभियान सोहळ्याचे उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील स्‍थळ होमगार्ड जिल्‍हा प्रशिक्षण केंद्र,वर्धा दूपारी 12.30 वाजता सेवाग्राम आश्रम वर्धा येथे भेट, दुपारी 1.30 राखीव, दूपारी  2.45 मि. राष्‍ट्रभाषा प्रचार समिती कार्यालय,वर्धा कडे ते मोटारीने प्रयाण करतील  दुपारी 3.00 वाजता 23 वे अखिल भारतीय राष्‍ट्रभाषा प्रचार समितीचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती.सायंकाळी 5.15 मि. मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील. 

Wednesday, 6 February 2013

मेळघाटात कस्‍तुरबा हेल्‍थ सोसायटीचे सुसज्‍ज हॉस्‍पीटल बांधणार - डॉ. श्रीमती एस.छाबडा


                               उतावली येथे रोगनिदान व उपचार शिबीर
     वर्धा, दिनांक 6 – कस्‍तुरबा  हेल्‍थ  सोसायटी तर्फे  महात्‍मा गांधी  आदिवासी   दवाखाना  तसेच   माता व शिशु  रुग्‍णालयाच्‍या  माध्‍यमातून  मेळघाटातील  रुग्‍णांना सर्व वैद्यकीय   सुविधा  एकत्र  उपलब्‍ध  करुन  देण्‍यासाठी   उतावली  येथे  सुसज्‍ज   रुग्‍णालय  बांधण्‍यात  येत असल्‍याची  माहिती   वर्धा  येथील  कस्‍तुरबा  हेल्‍थ  सोसायटीच्‍या  प्रकल्‍प  प्रमुख  डॉ. श्रीमती  एस.छाबडा  यांनी  आज दिली.
             मेळघाटातील  अतीदुर्गम  भागात  राहणा-या  आदीवासींना  तसेच  महिला व बालकांना  चांगल्‍या  वैद्यकीय  सुविधा उपलब्‍ध  व्‍हाव्‍यात  यासाठी  महात्‍मा  गांधी  आदीवासी  दवाखाना व शिशु  रुग्‍णालय सुरु करण्‍यात आले असून, उतावली येथे  पंचेवीस  खाटांचे  सुसज्‍ज   रुग्‍णालय  बांधण्‍यासाठी  साडेसात एकर जमीन  खरेदी  करण्‍यात  आली आहे.  भविष्‍यात  शंभर  खाटांचे  सुसज्‍ज  रुग्‍णालय  कस्‍तुरबा  हेल्‍थ  सोसायटी तर्फे  बांधण्‍याचा मानस  असल्‍याचेही   डॉ. श्रीमती  एस.छाबरा यांनी सांगितले.  
            मेळघाटातील   अतिदुर्गम  अशा गावातील  बाल आरोग्‍यासोबत   कुपोषण  दूर   करण्‍यासाठी    बावन  गांवे  दत्‍तक  घेण्‍यात येणार असून, वर्धा येथील कस्‍तुरबा  हेल्‍थ  सोसायटी रुग्‍णालयातील  बारा तज्ञ  डॉक्‍टरांची   चमू   उतावली  येथील   रुग्‍णालयात   सेवा देत असल्‍याचेही   त्‍यांनी यावेळी  सांगितले.
                            भव्‍य रोगनिदान व उपचार शिबीर
महात्‍मा  गांधी  आदीवासी  दवाखाना  उतावली येथे  दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रेाजी   सकाळी  8 वाजतापासून   रोगनिदान  व उपचार  तसेच शसत्रक्रिया  शिबीराचे  आयेाजन करण्‍यता आले आहे. या शिबीरासाठी   कस्‍तुरबा  सोसायटी हेल्‍थचे  अध्‍यक्ष  धिरुभाई  मेहता , उपाध्‍यक्ष  श्रीपत  हलबे  विशेष  उपस्थित  राहणार आहेत.
            मेळघाटातील  आदिवासींना  वैद्यकीय उपचारासाठी  उतावली येथे  बांधण्‍यात येणा-या  रुगणालायासाठी   मुंबईच्‍या  ब्रृहत भारतीय  समाज  या स्‍वंयसेवी  संस्‍थेव्‍दारे  तीन  कोटी  रुपयाची  मदत  देण्‍यात  आली आहे. ब्रृहत भारतीय  समाज  संस्‍थेचे  पदाधिकारीही   दिनांक  8 व 9 फेब्रुवारी रेाजी  उपस्थित  राहणार असलयाचे  माहिती  कस्‍तुरबा  हेल्‍थ  सोसायटीच्‍या  प्रकल्‍प  प्रमुख  डॉ. एस. छाबडा यांनी दिली.
                                                             000000

शास्‍वत पाणी पुरवठा योजनेमुळे कारंजा तालुका टँकर मुक्‍त


                    नारा बावीस प्रादेशिक योजना गुरुत्‍वा तत्‍वावर सुरु.
              पंचेवीस  गावांना एकत्र पाणी पुरवठा.
              कार्यकारी अभियंता डी.एल.बोरकर यांचा गौरव.
       वर्धा, दिनांक 6 – कारंजा  तालुक्‍यातील  टँकरग्रस्‍त  असलेल्‍या   पंचेवीस  गावांसाठी  नारा बावीस  या  प्रादेशिक  पाणी पुरवठा  योजनेतील तांत्रिक अडचणींवर  मात करुन  गुरुत्‍वाकर्षण  तत्‍वावर   आधारीत   जिल्‍ह्यातील   पहिली  योजना यशस्‍वीपणे   कार्यान्‍वीत  झाल्‍यामुळे   कारंजा तालुका  हा   टँकरमुक्‍त  झाला आहे.  
          कारंजा  तालुका  पिण्‍याच्‍या  पाण्‍याकरीता  भूशास्‍त्रीय  व भौतीकदृष्‍ट्या   अती कठीण  असून, तालुक्‍यात   भूजलावर आधारीत  कुठेही शास्‍वत  उदभव नसल्‍यामुळे  ब-याच  गावांना  टँकरने  पाणी पुरवठा  करावा  लागत होता. ग्रामीण  पाणी पुरवठा  विभागातर्फे  कार सिंचन प्रकल्‍पावरुन  भुपृष्‍ठावरील  पाणी  हा उदभव निवडून  पंचेवीस  गावांसाठी  नारा-बावीस  ही योजना  सुरु करण्‍यात  आली होती.   परंतू  या योजनेमधील  अडचणी दूर  करुन  तसेच    तांत्रीक बदल करुन   तालुक्‍यात  सतत व शास्‍वत  पाणी  पुरवठा  सुरु झाल्‍यामुळे  टँकरमुक्‍त  तालुका  झाला असल्‍याची  माहिती  कार्यकारी  अभियंता  डी.एल. बोरकर यांनी दिली.
                             जिल्‍हा  परिषदेकडून विशेष  गौरव
          गुरुत्‍वाकर्षण  तत्‍वावर आधारीत  बिनापंप   नारा-बावीस  योजने अंतर्गत  बोटोना   व बोरगांव  (ढोले) या  टँकरग्रस्‍त  असलेल्‍या    गावांना या योजनेव्‍दारे  पाणी पुरवठा  सुरु करण्‍यासोबतच  कारंजा  तालुका  टँकरमुक्‍त  करण्‍यासाठी   विशेष  योगदानाबद्दल   ग्रामीण  पाणी  पुरवठा  विभागाचे  कार्यकारी  अभियंता डी.एल. बोरकर  यांचा  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष  ज्ञानेश्‍वर  ढगे  व   मुख्‍य  कार्यपालन अधिकारी   शेखर चन्‍ने    यांच्‍या  हस्‍ते   त्‍यांचा  गौरव  करण्‍यात आला.                                                       
          कारंजा  तालुकयातील  पंचेवीस  गावांसाठी   प्रादेशिक  पाणी पुरवठा  योजना  कार्यान्‍वीत  करण्‍यात  आली होती.   परंतू    या योजनेमध्‍ये    तांत्रिक  त्त्रुट्या  राहील्‍यामुळे  पाणी पुरवठा  होण्‍यास  अडचण निर्माण  होत  होती.  जानेवारी पासून  पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी   टँकरने  पाणी पुरवठा  करावा लागत  होता.
          नारा-बावीस  या  प्रादेशिक  पुरवठा  येाजनेच्‍या  प्रत्‍येक   बाबीचा  सखोल  तांत्रीक  अभ्‍यास  करुन अस्‍तीत्‍वात  असलेल्‍या  योजनेमधील   त्रुट्या  दूर करुन  व विशीष्‍ट  तांत्रीक  बदल करुन   ही योजना   दोन  भागांमध्‍ये   विभागण्‍यात  आली.  तसेच  योजनेचा समावेश  राष्‍ट्रीय  ग्रामीण पेयजल  कार्यक्रमा अंतर्गत   करण्‍यात आला.  तसेच   बोरगाव ढोले  या भागात सुध्‍दा  तांत्रिक  बदल  करुन  पाणी   पुरवठा  नियमीत  करण्‍यात  आला.  
          गुरुत्‍वाकर्षण  तत्‍वावर   जिल्‍ह्यातील  दोन गावांना  जलशुध्‍दीकरण  केन्‍द्रामधील  साठवण टाकीतून  सरळ पाणी पुरवठा  होत असल्‍यामुळे  या योजनेवरील   विदृयुत  खर्चात  व देखभाल व दुरुस्‍ती खर्चावरही फार मोठी  बचत होणार आहे.  या योजनेच्‍या  पुर्नरुज्‍जीवनाचे    काम  प्रगतीपथावर  असून,  एकोनवीस  टंचाईग्रस्‍त  गावांना सुध्‍दा   शासक  पाणी पुरवठा   सुरु होईल.  असेही  यावेळी  कार्यकारी  अभियंता  डी.एल. बोरकर यांनी   सांगितले. ही योजना यशस्‍वीपणे  पुर्ण  करण्‍यासाठी   ग्रामीण  पाणी पुरवठा  योजनेचे  उपविभागीय  अधिकारी संजय बढीये  यांचेही  महत्‍वपूर्ण  योगदान आहे.
          नारा-बावीस  या योजनेच्‍या  यशस्‍वीतेसाठी   ग्रामीण  पाणी पुरवठा   विभागातील अधिका-यांचा  विशेष  गौरव करण्‍यात आला असून, यावेळी जलव्‍यवस्‍थापन  व स्‍वच्‍छता  समिती तसेच   बांधकाम सभापती गोपाळराव कालोरकार , सभापती  नंदकिशोर  कंगाले , श्रीमती निर्मलाताई बिजवे, गजानन निकम, सौ. वैशाली  गोमासे , मंदाताई चौधरी, आदी  यावेळी  उपस्थित  होते. 
                                                000000000

Saturday, 2 February 2013

यशवंतरावांनी दिलेला सहकाराचा मुलमंत्र महाराष्‍ट्राला नवी दिशा देणारा - उल्‍हास पवार



·        यशवंत दाते स्‍मृती रोप्‍यमहोत्‍सवी व्‍याख्‍यानमाला
वर्धा दि.2-  महाराष्‍ट्र मराठ्यांचे नव्‍हेतर मराठी माणसाचे राज्‍य  व्‍हावे तसेच सहकाराच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्राची सर्वांगिण प्रगती व्‍हावी यासाठी यशवंतराव चव्‍हाण यांनी  महाराष्‍ट्राला सहकाराचा मूलमंत्र दिला. त्‍यांनी विकासाची जी दिशा दिली त्‍यानुसार महाराष्‍ट्राची सर्वांगिण प्रगती शक्‍य असल्‍याचे प्रतिपादन यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त आयोजित बदलता महाराष्‍ट्र  आणि आपण या विषयावर सामाजिक विचारवंत उल्‍हास पवार यांनी केले.
            यशवंतराव दाते स्‍मृती रोप्‍यमहोत्‍सवी व्‍याख्‍यानमालेत पहिले पुष्‍प गुफतांना ते बोलत होते. सार्वजनिक जिल्‍हा ग्रंथालयाच्‍या सभागृहात दाते स्‍मृती संस्‍थेचे पुरस्‍कार वितरणाचे आयोजनही करण्‍यात आले. यावेळी  आद्य कादंबरीकार बाबा पद्मंजी साहित्‍य पुरस्‍कार सोलापूरच्‍या टेंभुर्णे येथील प्राचार्य महिंद्र कदम, संत भगवान बाबा,काव्‍यसंग्रह पुरस्‍कार लातुरचे रमेश चिल्‍ले , अंजनाबाई इंगळे, स्‍मृती  स्त्रिवादी साहित्‍य पुरस्‍कार मुंबईच्‍या श्रीमती संध्‍या नरे पवार,62 व्‍या विदर्भ साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष डॉ. किशोर सानत यांचाही यावेळी स्‍मृती चिन्‍ह देवून गौरव करण्‍यात आला.
            महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षात आयोजित व्‍याख्‍यानात सामाजिक,राजकीय, सांस्‍कृतीक, महाराष्‍ट्रातील स्थित्‍यंतरे मांडतांना उल्‍हास पवार म्‍हणाले की, संत परंपरा लाभलेल्‍या महाराष्‍ट्राला फुले,शाहू,आंबेडकर यांच्‍या विचाराने सत्‍य शोधतीय चळवळीचा वारसा लाभला आहे. यशवंतराव चव्‍हाण यांच्‍यावर सत्‍यशोधक चळवळीचा प्रभाव असला तरी महाराष्‍ट्राच्‍या सर्वांगिण विकासासाठी त्‍यांनी केलेले कार्य कदापिही विसरता येणार नाही. पुरोगाती चळवळीला नवी दिशा देण्‍यासोबतच सार्वभैमत्‍व  स्विकारणारा विचार रुजवून अधिक चांगले वातावरण करण्‍याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.
            यावेळी यशवंत दाते स्‍मृती संस्‍थेच्‍या साहित्‍य पुरस्‍काराचे मानकरी श्रीमती संध्‍या नरे पवार, महेन्‍द्र कदम,रमेश चिल्‍ले, डॉ. किशोर सानप यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
            प्रारंभी उल्‍हास पवार यांनी दिप प्रज्‍वलित करुण व्‍याख्‍यानमालेचे उद्घाटन केले. प्रास्‍ताविकात संस्‍थेचे अध्‍यक्ष प्रदीप दाते यांनी व्‍याख्‍यानमालेच्‍या पंचवीस वर्षाचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.स्मिता वानखडे यांनी तर आभार संजय इंगळे तिगावकर यांनी मानले. मानपत्राचे वाचन प्रा. राजेंद्र मुंडे व रंजना दाते यांनी केले. यावेळी मोठ्या संखेने साहित्‍यप्रेमी उपस्थित होते.  
000000

सात फेब्रुवारी रोजी माजी सैनिकांची आरोग्‍य तपासणी



वर्धा दि. 2 – ग्रामिण रुग्‍णालय पुलगांव येथे गुरुवार दि. 7 फेब्रु. रोजी सकाळी 11 वाजेपासून लायंन्‍स क्‍लब वर्धा व्‍दारा मोफत वैद्यकिय तपासणी व एक रँक एक पेंशन योजने अंतर्गत सूधारीत वेतन वाढ मिळण्‍यासंबधी फॉर्म्‍स  भरुन घेण्‍यात येणार आहे.
 सर्व माजी सैनिकांनी व विधवांनी त्‍यांचे सर्व पीपीओ, सेवापुस्‍तक, ओळखपत्र, अद्यावत केलेले बँकेचे पासबुक व ई. सी. एच. एस. कार्ड व विधवा असल्‍यास जन्‍म तारखेचा व पतीचे मृत्‍यु प्रमाणपत्र या सर्व कागदपत्राची झेरॉक्‍स घेवून ग्रामिण रुग्‍णालय, पुलगांव येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                                                          000000