Thursday, 13 December 2012

वाळू घाटचा लिलावासाठी ई-टेंडरींग



वर्धा, दि. 13  :  रेतीघाटचा लिलाव ई-निविदाद्वारे करण्यात येणार असून निविदा प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या तंत्राटदारांना वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. निविदा धारकाला http://maharashtra.etenders.in या संकेत स्थळावरुन ऑन लाईन निविदा खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलावासाठी सन 2012-13 करिता दिनांक 31 जुलै 13 पर्यंतच्या मुदतीसाठी ई-निविदाद्वारे शासनाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच wardha.nic.in या संकेतस्थळावरही रेतीघाट लिलावासंबंधीची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ई-निविदेचा नमुना, प्रतिज्ञापत्र, रेतीघाटांची यादी, अटी व शर्ती, 2 हजार रुपयाचा ना परतावा ई-पेमेंट अथवा ऑनलाईन पेमेंटद्वारे खरेदी प्रक्रियेत सहभागी होता येईल. ज्या कंत्राटदाराकडे ई-पेमेंटची सुविधा नाही त्यांनी 31 डिसेंबर रोजी खनिकर्म शाखेत 2 हजार रुपयाचा चालान किंवा डीडीद्वारे जमा केल्यास ऑनलाईन निविदा खरेदी करता येईल.
ई-निविदा प्रक्रियेसंबंधी माहिती करुन देण्यासाठी 15 डिसेंबर रोजी सकाळी 12 ते 2 वाजेपर्यंत विकास भवन येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एन. नविन सोना यांनी दिली.
                                    * * * * * 

रोजगार व स्‍वयंरोजगार अभ्‍यासक्रमासाठी व्‍यवसाय शिक्षण परिक्षा मंडळाकडे अर्ज सादर करावे


वर्धा दि.13- महाराष्‍ट्र राज्‍य व्‍यवसाय शिक्षण परिक्षा मंडळाच्‍या मार्फत 1136 इतके अभ्‍यासक्रम राबविले जातात.हे अभ्‍यासक्रम चालविण्‍यास सन 2012-14 करिता इच्‍छुक संस्‍थाकडून अर्ज मागविण्‍याची प्रक्रिया सुरु असून इच्‍छुक संस्‍थांनी नियमित शुल्‍कासह 31 डिसेंबर,2012 पर्यंत व विलंब शुल्‍कासह 31 जानेवारी,2013 पर्यंत जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय,वर्धा येथे विहित शुल्‍क व डिपॉझिटसह सादर करणे आवश्‍यक आहे.संबंधित अर्ज व माहिती पुस्तिका मंडळाच्‍या संकेतस्‍थळावर (www.msbve.gov.in) उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे.इच्‍छुक संस्‍थांनी अर्ज संकेतस्‍थळावरुन डाऊनलोड करुन त्‍याची प्रिंट काढून परिपूर्ण माहिती भरलेला अर्ज व त्‍यांसोबत आवश्‍यक ते कागदपत्र चलान (अर्ज रक्‍कम व प्रक्रिया शुल्‍क रकमेचे) धनादेश, सहा महिने,एकवर्ष कालावधीच्‍या अभ्‍यासक्रमासाठी रुपये 1 लक्ष व दोन वर्षाच्‍या कालावधीच्‍या अभ्‍यासक्रमासाठी रुपये 2 लक्ष प्रति अभ्‍यासक्रम विहिती कालावधीत जमा करावयाचे आहे.
            मंडळाचे वरील अभ्‍यासक्रम 29 गटात विभागले असून त्‍यापैकी संगणक गटात डाटा एन्‍टी ऑपरेटर,ग्राफीक मिडीया अॅनीमेशन,सी अॅन्‍ड सी अधिक थ्री डी अॅनिमेशन प्राडक्‍शन इत्‍यादि,पॅरामेडीकल गटात-वार्ड असिस्‍टंट,हॉस्‍पीटल रीसेपशन योगा थेपपीस, हॉस्पिटल हाऊस किपींग इत्‍यादि तांत्रीक गट इलेक्‍ट्रानिक्‍स,इलेक्टिक
मेकम्‍निकल,सिवहील,अॅग्रीकल्‍चर,अॅटोमोबाईल, केमीकल इत्‍यादि अतांत्रीक गटात फुड अॅन्‍ड न्‍युट्रेशन, हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरींग टेक्‍नॉलॉजी इत्‍यादि गटात महत्‍वपूर्ण अभ्‍यासक्रम असून प्रत्‍येक गटात काही पूर्ण वेळ तर काही अर्धवेळ अभ्‍यासक्रम आहेत. वरील अभ्‍यासक्रमासंदर्भात अलिकडेच महाराष्‍ट्र शासनाच्‍या उच्‍च व तंत्र शिक्षण विभागाने महत्‍वाचे निर्णय घेतलेले आहे.
            एकवर्ष व दोन वर्ष कालावधीच्‍या पूर्ण वेळ अभ्‍यासक्रमांना औ.प्र. संस्‍थामधील संबंधीत अभ्‍यासक्रमाशी नोकरीसाठी पर्यायी शैक्षणिक अर्हता म्‍हणून निश्चित करण्‍यात आली. दोन वर्ष कालावधीच्‍या अभ्‍यासक्रमांना व 10 वी प्रवेश पात्रता असलेल्‍या पूर्ण वेळ अभ्‍यासक्रमांना  2 स्‍तराची समकक्षता म्‍हणून मान्‍यता देण्‍यात आली आहे.राज्‍यातील उच्‍च माध्‍यमिक मंडळाकडून इयत्‍ता 12(सर्व विद्या शाखा) उत्‍तीर्ण विद्यारूर्थ्‍यांसाठी देण्‍यात येणा-या प्रमाणपत्राशी समतुल्‍य राहील.अधिक माहितीसाठी व्‍यक्‍तीशः जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय,वर्धा अथवा दूरध्‍वनी क्र. 243443 यांचेशी संपर्क साधावा.
000000

महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन मंडळाच्‍या चालक क पदाचा निकाल घोषित


         वर्धा दि.13- महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन मंडळाच्‍या चालक क पदाचा निकाल घोषित झाल्‍यानुसार संबंधित उमेदवारांनी विभागीय पातळीवरील प्राथमिक चालक छाननिकरीता दिनांक 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर,2012 रोजी सकाळी 9 वाजता महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन मंडळ,विभागीय कार्यशाळा प्रशिक्षण केंद्र सेवाग्राम रोड येथे उपस्थित रहावे.मुलाखत पत्राबाबत एम.के.सी.एल. या संस्‍थेच्‍या http//msrtc.mkcl.org.संकेत स्‍थळावरुन उपलब्‍ध करुन घेण्‍यात यावे असे विभाग नियंत्रक एम.व्‍ही.देव यांनी कळविले आहे.  
00000

स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून डिसेंबर 2012 चे शिधावस्‍तूचे वाटप


      वर्धा, दि.13- जिल्ह्यातील सर्व कौटुंबिक शिधा पत्रिका धारकांना माहे   डिसेंबर  2012 महिण्याकरीता स्वस्त धान्य दुकानातून शिधा वस्तु वाटपाचे परिणाम पुढील प्रमाणे निश्चीत करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष  धान्य साठा साखरेच्या उपलब्धतेनुसार वितरण करण्यात येईल.पाम तेल (खाद्य तेल) प्रतिशिधापत्रिका दरमहा 1 लिटर 45  प्रति लिटर या दराने वितरीत करण्‍यात येईल.
            दारिद्र्य  रेषेखालील लाभार्थी बीपीएल कार्ड धारकांना 20 किलो गहू प्रतीकिलो 5 रु. दराने, तांदूळ 15 किलो, अतिरिक्‍त तांदूळ 5 किलो प्रतीकिलो 6 रु. दराने, साखर प्रत व्यक्ती 500 ग्राम, अतिरिक्‍त प्रति व्‍यक्‍ती 160 ग्रॅम  13.50  रुपये प्रती किलो दराने मिळेल.
 अंत्योदय कार्ड    धारकांना  20 किलो गहू 2 रु. प्रती किलो दराने, 15किलो तांदुळ , अतिरीक्‍त 5 किलो तांदूळ प्रती किलो   3 रु. दराने, प्रती व्यक्ती 500 ग्राम साखर, अतिरिक्‍त प्रति व्‍यक्‍ती 160 ग्रॅम साखर 13.50 रुपये प्रती किलो दराने मिळेल.  
 अन्नपूर्णा कार्ड धारकांना 5 किलो गहू 5 किलो तांदूळ विनामुल्य दराने मिळेल. एपीएल कार्ड    धारकांना 10 किलो गहु 7.20 रुपये दराने, 5 किलो तांदूळ 9.60 रुपये   दराने मिळेल.
            तालुकानिहाय खापरी डेपोतून वितरीत झालेल्या केरोसीनचे किरकोळ विक्री दर प्रत लिटरचे दर कंसाबाहेर दिले असून, बोरखेडी डेपोतून वितरीत होणारे केरोसीनचे दर कंसामध्ये पुढील प्रमाणे दर्शविण्यात आले आहे.
            वर्धा 14.89 (14.82),देवळी 15.15 (15.12), सेलू 15.01 (14.63),आर्वी 15.08(15.03),आष्टी 15.29 (15.33),कारंजा 15.18 (15.30),हिंगणघाट 15.09(14.99),समुद्रपूर 14.83 (14.74) आहे.
            नगर परिषद क्षेत्रामध्‍ये केरोसीन  प्रत व्यक्ती 2 लिटर प्रमाणे जास्तीत जास्त 20 लिटर,  ग्रामीण भागात 2 लिटर प्रमाणे जास्‍तीत जास्‍त 15  लिटर  तसेच 1 सिलेंडर धारकाला 4 लिटर केरोसिनचे उपलब्‍धतेनुसार वाटप करण्‍यात येईल. 2 सिलेंडर धारकांना केरासिन देय नाही.असे  जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                                      00000

Friday, 7 December 2012

सन 2013 साठी सार्वजनिक सुट्या जाहीर


 सन 2013 मध्ये शासकीय कार्यालयीन कामकाजातील सार्वजनिक सुट्टया शासन निर्णयाद्वारे जाहीर केल्या आहेत. यंदा शासकीय कार्यालयांना 18 नियमित व अतिरिक्त एक अशा एकूण 19 सुट्या जाहीर केल्या आहेत.         
सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव रा.तु.जाधव यांच्या स्वाक्षरीने 5 डिसेंबर रोजी हा शासन निर्णय जारी झाला आहे.
सुट्यांची यादी खालील प्रमाणे.
ईद-ए-मिलाद          25 जानेवारी      शुक्रवार
प्रजासत्ताक दिन             26 जानेवारी      शनिवार        
छत्रपती शिवाजीमहाराज जयंती    19 फेब्रुवारी       मंगळवार
होळी (दुसरा दिवस)     27 मार्च         बुधवार
गुडफ्रायडे              29 मार्च              शुक्रवार
गुढीपाडवा             11 एप्रिल        गुरुवार
रामनवमी             19 एप्रिल        शुक्रवार
महावीरजयंती           24 एप्रिल        बुधवार
महाराष्ट्र दिन          1 मे           बुधवार
बुध्द पौर्णीमा           25 मे          शनिवार
रमझानईद             9 ऑगस्ट        शुक्रवार
स्वातंत्र्य दिन           15 ऑगस्ट       गुरुवार
गणेश चतुर्थी           9 सप्टेंबर        सोमवार
महात्मा गांधी जयंती      2 ऑक्टोंबर       बुधवार
बकरी ईद             16 ऑक्टोंबर      बुधवार
दिवाळी पाडवा          4 नोव्हेंबर        सोमवार
मोहरम               14 नोव्हेंबर       बुधवार
ख्रिसमस              25 डिसेंबर       गुरुवार

या खेरीज राज्य शासकीय कार्यालयांना 5 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेची अतिरिक्त सुटी राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, पारशी नववर्ष दिन, दसरा, दिवाळी आमावस्या आणि गुरुनानक जयंती हे 6 सण रविवारी येत आहेत.
केवळ बँकासाठी रोखे पूर्ण करण्यासाठी 1 एप्रिल 2013 (सोमवार) आणि 30 सप्टेंबर 2013 (सोमवार) या सुट्या असतील त्या शासकीय कार्यालयांना लागू राहणार नाहीत.
ही अधिसूचना www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

-----

सन 2013 साठी सार्वजनिक सुट्या जाहीर



        बुलडाणा, दि. 7 : सन 2013 मध्ये शासकीय कार्यालयीन कामकाजातील सार्वजनिक सुट्टया शासन निर्णयाद्वारे जाहीर केल्या आहेत. यंदा शासकीय कार्यालयांना 18 नियमित व अतिरिक्त एक अशा एकूण 19 सुट्या जाहीर केल्या आहेत.         
सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव रा.तु.जाधव यांच्या स्वाक्षरीने 5 डिसेंबर रोजी हा शासन निर्णय जारी झाला आहे.
सुट्यांची यादी खालील प्रमाणे.
ईद-ए-मिलाद          25 जानेवारी      शुक्रवार
प्रजासत्ताक दिन             26 जानेवारी      शनिवार        
छत्रपती शिवाजीमहाराज जयंती    19 फेब्रुवारी       मंगळवार
होळी (दुसरा दिवस)     27 मार्च         बुधवार
गुडफ्रायडे              29 मार्च              शुक्रवार
गुढीपाडवा             11 एप्रिल        गुरुवार
रामनवमी             19 एप्रिल        शुक्रवार
महावीरजयंती           24 एप्रिल        बुधवार
महाराष्ट्र दिन          1 मे           बुधवार
बुध्द पौर्णीमा           25 मे          शनिवार
रमझानईद             9 ऑगस्ट        शुक्रवार
स्वातंत्र्य दिन           15 ऑगस्ट       गुरुवार
गणेश चतुर्थी           9 सप्टेंबर        सोमवार
महात्मा गांधी जयंती      2 ऑक्टोंबर       बुधवार
बकरी ईद             16 ऑक्टोंबर      बुधवार
दिवाळी पाडवा          4 नोव्हेंबर        सोमवार
मोहरम               14 नोव्हेंबर       बुधवार
ख्रिसमस              25 डिसेंबर       गुरुवार

या खेरीज राज्य शासकीय कार्यालयांना 5 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेची अतिरिक्त सुटी राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, पारशी नववर्ष दिन, दसरा, दिवाळी आमावस्या आणि गुरुनानक जयंती हे 6 सण रविवारी येत आहेत.
केवळ बँकासाठी रोखे पूर्ण करण्यासाठी 1 एप्रिल 2013 (सोमवार) आणि 30 सप्टेंबर 2013 (सोमवार) या सुट्या असतील त्या शासकीय कार्यालयांना लागू राहणार नाहीत.
ही अधिसूचना www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

-----

राज्‍यमंत्री रणजित कांबळे आज वर्धेत


 वर्धा दि.7- पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता व सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री रणजित कांबळे शनिवार दिनांक 8 डिसेंबर,2012 रोजी दूपारी 2.30 वाजता वर्धा येथे आगमण, राखीव व मुक्‍काम राहील.
00000