Thursday, 22 November 2012

संकटात सापडलेल्‍या महिलांच्‍या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 1091


         वर्धा, दिनांक 22- महिलांवर होणा-या अत्‍याचारांना प्रतिबंध घालण्‍यासाठी तसेच अकस्‍मात सापडलेल्‍या  महिलांच्‍या मदतीसाठी वर्धा  जिल्‍हा  पोलीस दलातर्फे पोलीस नियंत्रण कक्ष वर्धा येथे टोल फ्री  हेल्‍प लाईन सेवा सुरु करण्‍यात आली.
            संकटात सापडलेल्‍या  महिलांनी व पिडीत महिलांनी मदतीकरीता 1091 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे पोलीस उपअधिक्षक वर्धा कळवितात.   
                                                                   000000

वर्धा जिल्‍ह्यात कलम 36 लागू



            वर्धा, दिनांक  22- जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था कायम राहण्‍यासाठी जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार  यांनी 1 डिसेंबर 2012 चे रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 पोटकलम अ ते फ  पर्यंतचा आदेश जारी केला आहे.
            या आदेशाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरिफध्‍द मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 कलम 134 अन्‍वये कार्यवाहीस पात्र राहील.
                                                            0000000

पालकमंत्री राजेंद्र मुळक यांचे शनिवारी आगमन जिल्‍हा नियोजन समितीची बैठक


         वर्धा, दिनांक 22- राज्‍याचे  वित्‍त व नियोजन  राज्‍यमंत्री  तथा  जिल्‍ह्याचे  पालकमंत्री  राजेंद्र मुळक यांचे शनिवार दिनांक 24 नोव्‍हेंबर रोजी  सकाळी   11  वाजता  नागपूर येथून  शासकीय मोटारीने आगमन होईल.
          जिल्‍हाधिकारी  कार्यालयाच्‍या सभागृहात  सकाळी  11 वाजता  जिल्‍हा  नियोजन  समितीच्‍या  बैठकीस  पालकमंत्री   राजेंद्र मुळक  उपस्थित  राहून , विविध योजनांचा आढावा घेतील.  दुपारी  1.30 ते 2 वाजेपर्यंतचा  वेळ  शासकीय विश्रामगृह येथे राखीव असून, दुपारी  2 वाजता  जिल्‍हाधिकारी   कार्यालयाच्‍या सभागृहात पाणी आरक्षण समितीच्‍या बैठकीस  उपस्थित राहतील.  व दुपारी 3 वाजता येथून   मोटारीने  नागपूरकडे प्रयाण करतील.
                                                            000000

ग्रामपंचायत निवडणूकीची आचार संहिता लागू



वर्धा दिनांक 22-  जिल्‍ह्यात  जानेवारी  ते मार्च पर्यंत  मुदत संपत असलेल्‍या तीन ग्रामपंचायत व सात ग्रामपंचायत पोट निवडणूकीसाठी  राज्‍य   निवडणूक  आयोगाने  निवडणूकीचा   कार्यक्रम  जाहीर केला असून, ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता  लागू झाली असल्‍याची  माहिती  जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांनी  आज दिली.  
            जिल्‍ह्यातील   तीन ग्रामपंचायती च्‍या सार्वत्रिक निवडणूका व सात पोटनिवडणूका  23 डिसेंबर रोजी  होणार आहेत.  त्‍यामुळे  याच ग्रामपंचायतींच्‍या  क्षेत्रात  तसेच संबधीत प्रभागाच्‍या  क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्‍यात आली आहे. आचारसंहिता   निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत  अस्तित्‍वात  राहील.  आचारसंहितेचा भंग होणार नाही याची  दक्षता  घ्‍यावी  असे आवाहनही  जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांनी केले आहे.
0000

शनिवारी जिल्‍हा नियोजन समितीची बैठक


        वर्धा, दिनांक 22 – वर्धा जिल्‍हा  नियोजन समितीची बैठक  शनिवार दिनांक 24 नोव्‍हेंबर रोजी सकाळी 11 वाजता  विकासभवन येथे  आयोजीत करण्‍यात आली आहे. नियोजन समितीची बैठक पालकमंत्री राजेंद्र  मुळक यांच्‍या   अध्‍यक्षतेखाली   होणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी   एन.नविन  सोना यांनी   आज दिली.
        जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीत सर्व विभागांच्‍या अधिका-यांनी   उपस्थित राहून, सर्वसाधारण, अनुसूचित जाती  उपयोजना, आदिवासी उपयोजना  यासंबंधी   विभागाचे प्रसताव  तसेच ऑक्‍टोंबर  2012 अखेरपर्यंत  झालेल्‍या खर्चाची माहितीसह उपस्‍थीत  रहावे, अशा सुचना  जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांनी  दिली आहे.
                                                            0000000

26 नोव्‍हेंबर संविधान दिन संविधानाच्‍या प्रास्‍ताविकेचे वाचन


       वर्धा, दिनांक 22-----        26 नोव्‍हेंबर   हा दिवस संविधान दिन म्‍हणून पाळण्‍यात येतो. भारताच्‍या संविधानाबाबत जनजागृती व्‍हावी यादृष्‍टीने अनेक विविध  कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी शाळा, महाविद्यालयामध्‍ये करावयाचे आहे. संविधान दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्‍यासाठी   भारतीय संविधानाच्‍या प्रास्‍ताविकेचे  होर्डिग शासकिय कार्यालयाच्‍या परिसरात दर्शनी  भागात लावायचे आहे.
  दिनांक 26 नोव्‍हेंबर 2012 ला भारतीय संविधानाबाबत समाजात जागृती  निर्माण व्‍हावी या उद्देशाने या विभागामार्फत समाजकार्य  महाविद्यालय व शासकिय वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थींनींसह उद्देशपत्रिकाकेचे वाचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी  10 वाजता करण्‍यात येणार आहे. वर्धा जिल्‍ह्यातील  सर्व शाहा व माहविद्यालयामध्‍ये उद्देशपत्रिकेचे वाचन आपल्‍या  शाळा, महाविद्यालयामध्‍ये  करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण , वर्धा यांनी केले आहे.
                                                            000000           

Monday, 19 November 2012

राष्‍ट्रीय प्रज्ञाशोध,शिष्‍वृत्‍ती परीक्षा आता 21 नोव्‍हेंबरला


       वर्धा दि.19- 2012-13 मधील वर्ग दहावीसाठी होणारी राष्‍ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) आठवीसाठी होणारी राष्‍ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्‍यवृत्‍ती  योजना परीक्षा (NMMS) या दोन्‍ही परीक्षांचे आयोजन आता बुधवारी 21 नोव्‍हेंबर 2012 रोजी जिल्‍ह्यातील 9 केन्‍द्रावर करण्‍यात आले आहे. यापूर्वी ही परीक्षा 18 नोव्‍हेंबरला होणार होती.
        आता ही परीक्षा यापूर्वी दिलेल्‍या  परीक्षा केन्‍द्रांवर व नियोजित वेळेत घेण्‍यात येणार आहे. याची  सर्व मुख्‍याध्‍यापक, शिक्षक, पालक व संबंधित विद्यार्थ्‍यांनी नोंद घेवून परीक्षेला उपस्थित राहावे असे आवाहन वर्धा जिल्‍हा परिषदेचे माध्‍यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्‍मीनारायण सोनवणे यांनी केले आहे.
                                      0000000