Tuesday, 11 September 2012

लेक वाचवा अभियाना अंतर्गत लिंगोत्‍तर प्रमाणाबातच्‍या फलकाचे उदघाटन


        वर्धा, दि. 11- स्त्रिभ्रृण हत्‍या होणे हा विषय समाजासाठी चिंतणाचा असून, स्त्रिभ्रृण हत्‍येला आळा बसावा यासाठी लेक वाचवा अभियाना अंतर्गत समाजात  जनजागृती करणे आवश्‍यक आहे. या अभियानाचा एक भाग म्‍हणून लक्ष्‍मी  आली घरा लिंगोत्‍तर प्रमाणा बाबतच्‍या फलकाचे उदघाटन  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांचे शुभहस्‍ते करण्‍यात आले.
      जिल्‍हा परिषद येथील आरोग्‍य विभागाच्‍या आरोग्‍य समितीच्‍या वतीने नुकतेच दिनांक (7 सप्‍टें.) रोजी फलकाचे उदघाटन  उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे , आरोग्‍य सभापती प्रा. उषाकिरण थुटे, जि. सदस्‍य मोरश्‍वर खोडके, मनिषाताई वरकड, उज्‍वलाताई राऊत, व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दिलीप माने, महिला बालकल्‍याण अधिकारी डॉ.एस.जे. निमगडे यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला.
                                                000000

मोफत आयुष निदान व उपचार शिबीर 14 सप्‍टेंबर रोजी


        वर्धा, दि. 11- राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान आयुष कार्यक्रमा अंतर्गत जिल्‍हा सामान्‍य वर्धा येथे दिनांक 14 सप्‍टेंबर 2012 रोजी सकाळी 9 वाजता मोफत आयुष निदान व उपचार शिबीरोच आयेाजन करण्‍यात आले आहे. अशी माहिती जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलिंद सोनवने यांनी दिली.
            या शिबीरामध्‍ये आयुर्वेदिक, होमीऑपॅथीक  व युनानी व योग निसर्ग उपचारावर तज्ञ डॉक्‍टर उपस्थित राहणार असून जुनाट आजार, वातव्‍याधी, स्त्रियांचे आजार, केसांच्‍यासमस्‍या, मुत्ररोग, पाटाचे विकास व मुत्रखडा, तारुण्‍यपिटीका, जुनाट सर्दी, भगंदर , त्‍वचारोग व इतर आजारावर दिनान व उपचार करण्‍यात येणार आहे.
           या शिबीरामध्‍ये आयुर्वेद बालरोग तज्ञ डॉ. रेणू राठी, शल्‍यचिकित्‍सक डॉ. सुभाषचंद्र वर्षने, स्त्रिरोग तज्ञ सोनाली चलाख, कार्य चिकित्‍सक डॉ. अर्चना गुंफेवार, युनानी तज्ञ डॉ. शेख , इब्राहीम वाफीक, होमिओपॅथी तज्ञ डॉ. अनिल लोणारे व डॉ. किशोर टाले, योगतज्ञ डॉ. सुनिता वांगे, रुग्‍णांना तपासून निदान व उपचाराचा सल्‍ला देणार आहेत.
     या  शिबीराला जनतेनी मोठ्या संख्‍येने लाभ घ्‍यावा,असे आवाहन राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य सेवेचे वैद्यकीय अधिकारी संदिप नखाते यांनी केले आहे.
                                                            000000

संजय गांधी समितीची सभा 15 सप्‍टेंबर रोजी


वर्धा, दि.11- संजय गांधी  शहर विभागामध्‍ये अर्जाचे मुजंरीबाबत  समितीची सभा दि. 15 सप्‍टेंबर 2012 रोजी  सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय, वर्धा येथे आयोजित केली आहे. या सभेत येताना  अर्जदारांनी सादर केलेल्‍या कागदपत्राच्‍या  मुळ प्रती घेऊन प्रत्‍यक्ष मुलाखतीकरीता हजर रहावे.
      या कामात नगरसेवक व समाजसेवक यांनी त्‍यांच्‍या प्रभागात राहणा-या लाभार्थ्‍यांना आपल्‍या स्‍तरावरुन  आवाहन करावे. असे संजय गांधी शहर विभाग समितीचे अध्‍यक्ष सुधिर पांगूळ यांनी केले आहे. असे नायब तहसिलदार शहर विभाग, वर्धा कळवितात.
                                                            0000000

पोलीस विभागातर्फे पुरस्‍कार योजना जाहीर एक गांव- एक गणपती , एक वार्ड एक गणपती


वर्धा, दि. 11- जातीय सलोखा योजना अंतर्गत वर्धा जिल्‍ह्यात एक गांव एक गणपती व ज्‍या गणेश उत्‍सव मंडळानी उत्‍कृष्‍ट देखावे तयार केले अशा संस्‍थांना पोलीस विभागातर्फे  शासनहित कार्यक्रम व जनतेच्‍या हिताचे कार्यक्रम राबविणे, जनजागरण, प्रबोधन, गांव स्‍वच्‍छतेबाबत कार्यक्रम घेवून गणेश उत्‍सव दरम्‍यान शहरात, गावांत शांतता व सुव्‍यवस्‍था राखेणेकरीता मदत करावी. सर्व गणेश उत्‍सव मंडळांनी अशा प्रकारचे कार्यक्रम राब‍वून प्रशासनाला मदत करावी.
       त्‍याकरीता आपआपल्‍या पोलीस स्‍टेशन स्‍तरावर शांतता समिती, तंटामुक्‍ती, सामाजिक कार्यकर्ता व सर्व धर्माचे प्रतिष्ठित नागरिक यांना घेवून जातीय सलोखा समिती गठीत करण्‍यात येत आहे.
       समितीतर्फे सर्व गणेश उत्‍सव मंडळाची पाहणी करुन जातीय सलोखा येाजना अंतर्गत क्रमांक 1 व 2 क्रमांकचे गणेश उत्‍सव मंडळाना बक्षीस देवून मंडळाचा सत्‍कार करण्‍यात येणार आहे. तरी निरीक्षणा करीता येणा-या समितीला सर्वोतोपरी मदत करुन व जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राखावी असे  पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक टी.एस.गेडाम यांनी आवाहन केले आहे. 
                                                              00000

परिक्षेच्‍या कालावधीत परिक्षा केंद्रावर 144 कलम लागू


वर्धा, दि. 11- राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळ, नागपूर  , विभागीय मंडळ यांचेमार्फत  दिनांक 4  ते 23 ऑक्‍टोंबर 2012 या कालावधीत उच्‍च माध्‍यमिक प्रमाणपत्र परिक्षा ( 12 वी ची परिक्षा ) आणि दिनांक 4 ते 17 ऑक्‍टोंबर 2012 या कालावधीत माध्‍यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा ( 10 वी ची परिक्षा) आयोजित करण्‍यात आलेली आहे.
     सदर परिक्षांचे संचालन सुयोग्‍य प्रकारे व्‍हावे, परिक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नये यासाठी परिक्षा कालावधीत वर्धा जिल्‍ह्यातील परिक्षा केंद्राचे परिसरात फौजदार प्रक्रिया स‍ंहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्‍यात आले आहे.
       जिल्‍हादंडाधिकारी  जयश्री भोज यांनी  आपल्‍या अधिकाराचा वापर करुन जिल्‍ह्यात होणा-या उच्‍च माध्‍यमिक व माध्‍यमिक परिक्षांसाठी दिनांक 4 ऑक्‍टोंबर ते 23 ऑक्‍टोंबर 2012 पर्यंत  परिक्षांच्‍या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळात जिल्‍ह्यातील सर्व परिक्षा केंद्राचे 100 मीटरचे परिसरात फौजदारी  प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्‍याचा प्रतिबंधात्‍मक आदेश लागू करण्‍यात आले आहे. सदर परिक्षांकरीता वर्धा जिल्‍हयातील  सर्व परिक्षा केंद्रांचे 100 मीटरचे परिसरात  सर्व झोरॉक्‍स, मोबाईल, एसटीडी किंवा आयएसडी, फॅक्‍स, संगणक, ई-मेल इंटरनेट इत्‍यादी ईलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी सुविधा व उपकरणांचे वापरावर व सदरबाबतची केंद्रे सुरु राहण्‍यांवर निर्ब्‍ंध , प्रतिबंध लावण्‍यात आले आहे. सदर आदेशाची  कोटेकारेपणे अंमलबजावणी करण्‍याकरीता सर्व संबंधीतांनी कटाक्षाने दक्षता घ्‍यावी. असे जिल्‍हा दंडाधिकारी यांनी काढलेल्‍या आदेशात नमुद आहे.
                                                           00000 

माजी सैनिक / पत्‍नी तसेच त्‍यांच्‍या पाल्‍यांना विशेष गौरव पुरस्‍कार


       वर्धा, दि.11- जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालयातर्फे माजी सैनिक / पत्‍नी  तसेच त्‍यांच्‍या पाल्‍यांना विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्यासाठी विशेष गौरव पुरस्‍कार  योजने अतर्गत राज्‍यातून 40 पाल्‍यांना  गुणवत्‍ता यादीनुसार  पुरस्‍कृत करण्‍याची तरतूद आहे.
          ज्‍या माजी सैनिकांची पाल्‍ये वर्ष 2011-12 सत्रात  इयत्‍ता दहावी मध्‍ये 90 टक्‍के  किंवा त्‍यापेक्षा जास्‍त गुण प्राप्‍त  करणे, ईयत्‍ता बारावी मध्‍ये 90 टक्‍के किंवा त्‍यापेक्षा जास्‍त गुण प्राप्‍त करणे, विविध खेळ, साहित्‍य, संगित, गायन, वादन व नृत्‍य यामध्‍ये राष्‍ट्रीय किंवा आंतरराष्‍ट्रीय पातळीवर पुरस्‍कार प्राप्‍त करणे, नैसर्गीक आपततीमध्‍ये बहुमोल कामगीरी करणे व सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्‍कार मिळविणे, कृषी क्षेत्रात भरघोस उत्‍पादन काढणा-या शेतक-यास शासनातर्फे पारितोषिक व गौरवपत्र पुरसकाराने सन्‍मानीत करण्‍यात  येते.
            अधिक माहितीसाठी  व अर्जदारांनी कागदपत्रासह दिनांक 20 सप्‍टेंबर 2012 पर्यंत
जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, वर्धा यांचे कार्यालयात संपर्क करावे.
                                                            000000

स्‍टार स्‍वयंरोजगार प्रशिक्षण संस्‍थेतर्फे फोटोग्राफी व व्हिडीओ शुटींगचे निःशुल्‍क प्रशिक्षण


 वर्धा, दि. 11- सुशिक्षित बेरोजगार युवकांना  रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात  तसेच त्‍यांना  विविध विषयाचे प्रशिक्षण देण्‍यासाठी  ग्रामविकास मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन तसेच बँक ऑफ इंडिया यांच्‍या संयुक्‍त विदृयमाने डेरीफार्मी फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी तसेच खाद्य उद्योगा संदर्भात  निःशुल्‍क प्रशिक्षण  आयोजित करण्‍यात आले आहे.
       बँक ऑफ इंडियाच्‍या नालवाडी येथे प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये  दिनांक 21 नोव्‍हेंबर पासून या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्‍यात आले आहे. फोटोग्राफी  व व्हिडीओ शुटींग या संदर्भातील तीन आठवड्याचे प्रशिक्षण असून दिनांक 21 सप्‍टेंबरपासून  प्रशिक्षण सत्राला सुरुवात होणार आहे. प्रशिक्षणासाठी   दहावी पास अथवा नापास , ग्रामीण भागातील युवकांची निवड करण्‍यात  येणार असून, उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे असावे. प्रशिक्षणार्थिची निवड प्राथमिक चर्चा करुन करण्‍यात येणार असून, प्रवेश अर्ज निःशुल्‍क असून, सात  दिवस आधी प्रशिक्षणासाठी  अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे.
       प्रशिक्षण कालावधी , निवास व्‍यवस्‍था, तसेच चहा, नास्‍ता  व भोजन विनामुल्‍य असून प्रशिक्षण पुर्ण झाल्‍यानंतर  स्‍वःताचा   व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी बँकेत कर्ज प्रस्‍ताव सादर करण्‍यासाठी मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
      प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करताना शाळा सोडल्‍याचा  दाखला, रहिवासी दाखला, दारिद्रय रेषेखालील असल्‍यास  तसे प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट छायाचित्र सादर करावे.
           खाद्यपदार्थ व प्रक्रिया उद्योगाचेही दोन आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दि. 10 ऑक्‍टोंबर पासून सुरु होत आहे. प्रशिक्षण निशुल्‍क असून निवास व भोजनाची व्‍यवस्‍था संस्‍थेतर्फे विनामुल्‍य आहे.  वर्धा जिल्‍ह्यातील युवक व युवतींनी  या प्रशिक्षण सत्रामध्‍ये सहभागी होऊन आपला उद्योग सुरु करावा. प्रभारी अधिकारी , स्‍टार स्‍वरोजगार प्रशिक्षण संस्‍था,न्‍यु आर्टस कॉमर्स कॉलेज , गर्ल्‍स हॉस्‍टेल, नालवाडी, वर्धा येथे स्विकारण्‍यात येतील. अधिक माहितीसाठी दूरध्‍वनी क्रमांक  07152- 250250 वर संपर्क साधता येतील.
                                                                      0000