Tuesday, 4 September 2012

आधार नोंदणी मध्‍ये वर्धा जिल्‍हा आघाडीवर

वर्धा दि.4-  आधार नोंदणीमध्‍ये राज्‍यात वर्धा जिल्‍ह्याने उकृष्‍ट कार्य केले असून जिल्‍ह्यातील एकूण 12 लाख 99 हजार 592 लोकसंखेपैकी 10 लाख 54 हजार 743 लोकांनी आधरची नोंदणी केली आहे.
          जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी राबविलेल्‍या नियोजनबध्‍द  अभियानामुळे वर्धा जिल्‍ह्यातील आठ तालुक्‍यात  आधार नोंदणीला जनतेनेही उत्‍फूर्त  प्रतिसाद दिला आहे.जिल्‍ह्यात केवळ 2 लाख 44 हजार 849 आधारची नोंदणी शिल्‍लक असून सप्‍टेंबर पासून पुन्‍हा नोंदणी साठी तालुका व ग्रामस्‍तरावर विशेष कॅम्‍प आयोजित करण्‍यात येत आहेत.
            आधार नोंदणीसाठी  जनतेमध्‍ये केलेल्‍या विशेष जागृती व अभियानामुळे हा कार्यक्रम यशस्‍वी ठरला आहे. जिल्‍ह्यात तालुका निहाय आधार नोंदणी व कंसात लोकसंख्‍या पुढील प्रमाणे आहे.
            वर्धा तालुका 2,89,635 (3,57,437) सेलू 1,12,876 (1,29,579) देवळी 1,29,803 (1,59,706) हिंगणघाट 1,85029 (2,23,411) समुद्रपूर 93,560 (1,16,991) आर्वी 1,15,236 (1,45,887) आष्‍टी 63,236 (76,186) व कारंजा घाडगे तालुक्‍यात  65,368 आधाराची नोंदणी झाली आहे.
            जिल्‍ह्यात 2 लाख 44 हजार 849 आधारची नोंदणी अद्याप शिल्‍लक असून सप्‍टेंबर व ऑक्‍टोंबर या तीन महिन्‍यात विशेष अभियानाव्‍दारे ही नोंदणी पूर्ण करण्‍यात येत आहे.आधार नोंदणी साठी जिल्‍ह्यातील जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
0000

आष्‍टी व वर्धा तालुक्‍यात जोरदार पाऊस जिल्‍ह्यात 14.4 टक्‍के पाऊस

            वर्धा दि. 4 – वर्धा जिल्‍ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाने सर्वत्र हजेरी दिल्‍यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. तसेच सिंचन प्रकल्‍पामधेही विक्रमी वाढ झाली आहे.
            वर्धा जिल्‍ह्यात मागील 24 तासात 114.8 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पडलेल्‍या 14.4 टक्‍के पावसामुळे जिल्‍ह्यात आजपर्यन्‍त 54.5 टक्‍के पाऊस पडला आहे.अद्याप पावसाने सरासरी ओलांडली नाही.
तालुका निहाय पडलेल्‍या पावसामुळे सर्वाधिक आष्‍टी तालुक्‍यात 47.2 मिलीमिटर वर्धा, 36.6 मिलीमिटर, तसेच इतर सहा तालुक्‍यात सरासरी 5 ते 6 मिलीमिटर पाऊसाची नोंद झाली आहे. 
                                          0000

नवे निवासी उपजिल्‍हाधिकारी सुनिल गाढे

          वर्धा दि.4-  निवासी उपजिल्‍हाधिकारी पदावर सुनिल गाढे यांनी नियुक्‍ती झाली असून त्‍यांनी नव्‍या पदाची सुत्रे स्विकारली आहेत.यापूर्वी ते नासिक जिल्‍ह्यातील सुरगाणा येथे तहसिलदार पदावर कार्यरत होते.
सुनिल गाढे यांची महाराष्‍ट्र  लोकसेवा आयोगातर्फे 2002 मध्‍ये तहसिलदार या संवर्गात निवड झाली असून तळोदा (नंदुरबार),सटाणा (नासिक), नेवासा (अहमदनगर),नांदगांव (नासिक) येथे कार्यरत होते. सुनिल गाढे हे राहूरी तालुक्‍यातील कणगट येथील असून बी.एस.सी.एम.ए. परिक्षा उतीर्ण असून वृत्‍तपत्र पदविका परिक्षा पास केली आहे. भूमी अभिलेख विभागात सर्वेक्षक पदाचाही त्‍यांना अनुभव आहे.
          सुरगांव येथे घरपोहोच धान्‍य वितरण अंतर्गत 108 ठिकाणी यशस्‍वीपणे योजना राबविली असून स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, लोकसभा व विधानसभा निवडणूक विषयक कामे यशस्‍वीपणे हाताळली आहेत.
00000

जिल्‍हास्‍तरीय बॉक्सिंग स्‍पर्धा गुरुवार पासून

   वर्धा दि.4- जिल्‍हास्‍तरीय शालेय बॉक्सिंग स्‍पर्धाचे आयोजन गुरुवार दिनांक 6 सप्‍टेंबर पासून जिल्‍हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्‍यात आले आहे.बॉक्सिंग स्‍पर्धामध्‍ये 14 ते 19 वयोगटातील मुले व मुलींचा समावेश आहे.
            क्रीडा व युवक सेवा संचालनालय,तसेच जिल्‍हा क्रीडा अधिकारी,कार्यालया अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय शालेय बॉक्सिंग स्‍पर्धाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.
            शालेय बॉक्सिंग स्‍पर्धेत नव्‍याने 14 वर्षे मुले,17 व 19 वर्षे मुले व मुली हे वयोगट समाविष्‍ट करण्‍यात आलेले आहेत. जिल्‍हास्‍तरीय शालेय बॉक्सिंग स्‍पर्धेत जिल्‍ह्यातील सर्व शाळांनी आपला सहभाग नोदवावा. अधिक माहिती करीता राज्‍य क्रीडा मार्गदर्शक बॉक्सिंग विजय डोबाळे व जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे कळविले आहे.
0000

Sunday, 2 September 2012

हातमाग पध्‍दतीचे थाटात उदघाटन हातमाग कापड प्रदर्शनी तालुका स्‍तरावरही -आकाश शेंडे

वर्धा दि.2 -  ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगार मिळून देण्‍यासाठी हातमाग उद्योग व्‍यवसाय महत्‍वाची कामगीरी बजावत असते, या व्‍यवसायाला गौरवशाली परम्‍परा असून या व्‍यवसायाची व्‍याप्‍ती  वाढवून देण्‍यासाठी प्रत्‍येक तालुक्‍यात हातमाग कापड प्रदर्शनी लावण्‍यात यावी असे प्रतिपादन येथील नगराध्‍यक्ष आकाश शेंडे यांनी केले.    
          येथील सार्वजनिक वाचनालय येथे विकास आयुक्‍त हातमाग वस्‍त्रोद्योग विभाग, भारत सरकार व वस्‍त्रोद्योग विभाग, महाराष्‍ट्र शासन यांनी प्रायोजित केलेल्‍या जिल्‍हास्‍तरीय हातमाग कापड प्रदर्शनीचे त्‍यांचे ह्रस्‍ते उदघाटन झाले.त्‍या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्‍हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर व जिल्‍हा माहिती अधिकारी पी.जे.गडेकर व वस्‍त्रोद्योग विभागाचे प्रदर्शनी प्रमुख वासुदेव मेश्राम आदि मान्‍यवर उपस्थित होते.
कृषी उद्योगानंतर हातमाग हा देशातील जास्‍तीत जास्‍त बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा व्‍यवसाय असल्‍याचे सांगून नगराध्‍यध्‍य शेंडे म्‍हणाले की, एकेकाळी हातमाग कापड हा सर्व सामान्‍य लोकांचा आवडणारा कापड होता आता नव्‍या यंत्रयुगात या उद्योगाला कमी महत्‍व प्राप्‍त होत आहे. या उद्योगाच्‍या वाढीसाठी व गेलेली वैभवशाली परंपरा पुन्‍हा स्‍थापित करण्‍यासाठी शासन पुरेशा उपाय योजना करण्‍या सोबत  हातमाग कापडाचे प्रदर्शन प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या ठिकाणी लावण्‍याची गरज आहे असेही ते म्‍हणाले.
याप्रसंगी उपनिबंधक ठाकूर यांनी हातमाग उद्योगामुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळते तसेच ग्रामीण लोकांच्‍या कलागुणांना सुध्‍दा मोठया प्रमाणावर वाव मिळतो असेही ते म्‍हणाले .
         यावेळी बोलतांना जिल्‍हा माहिती अधिकारी गडेकर म्‍हणाले की, विदर्भातील नागपूर हे हातमाग कापड व साड्यांसाठी प्रसिध्‍द होते. आता कापड उद्योगात स्‍पर्धा वाढली आहे.या स्‍पर्धेला तोंड देण्‍यासाठी हातमाग उद्योगांनी पुरेशा उपाय योजना करुन ग्राहकांच्‍या मागणीनुसार कापड उत्‍पादित करुन या उद्योगाला चालना द्यावी असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
            हातमाग कापड प्रदर्शनी 10 सप्‍टेंबर,2012 पर्यन्‍त सकाळी  11 ते रात्री 8.30 वाजेपर्यन्‍त उघडी राहणार असून या प्रदर्शनात महाराष्‍ट्रातील कानाकोप-यातील विणकर संस्‍थांनी भाग घेतला आहे. सुंदर कला कुसरीच्‍या पारंपारीक कापडाचे वैभवशाली उत्‍पादन विक्रीस ठेवण्‍यात आले आहे.सदर प्रदर्शनीमध्‍ये बेडशिट,चादर ,टावेल, नॅपकीन, कर्टन क्‍लाथ, टसर सिल्‍क व कॉटन साड्या ड्रेस मटेरियल इत्‍यादी  माल विक्रीसाठी उपलब्‍ध असल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले.
            कार्यक्रमाचे संचालन व आभार वासुदेव मेश्राम यांनी केले.   
0000

बँक खाते उघडण्‍यासाठी युध्‍द पातळीवर प्रयत्‍न करा - जिल्‍हाधिकारी

वर्धा दि.2 – जिल्‍ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणा-या प्रत्‍येक 18 वर्षावरील व्‍यक्तिींना शासकीय योजनेचा लाभ देण्‍यासाठी राष्‍ट्रीयकृत बँकेमध्‍ये स्‍वतःचे  खाते उघडणे गरजेचे असून या कार्यासाठी जि.प.मध्‍ये कार्यरत आशा वर्कर व आंगणवाडी सेविकांचे  सहकार्य घेण्‍यात येणार आहे. अपूरा वेळ व अधिक कामे करण्‍यासाठी कार्याचे  नियोजन करुन युध्‍द पातळीवर प्रयत्‍न करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले.
          विकास भवन येथे आज बँकेत खाते उघडण्‍यासंबंधाने एका कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. याप्रसंगी उपआयुक्‍त संजयसिंग गोतम, बँक ऑफ इंडियाचे विभागीय अधिकारी अजित कोरडे,जिल्‍हा अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक मोहन मशानकर ,नाबार्डच्‍या स्‍नेहल बनसोडे, उपजिल्‍हाधिकारी जया बनकर आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
          राष्‍टीयकृत बँकेत खाते उघडण्‍यासाठी  18  वर्षावरील सर्व लाभार्थ्‍यांना अनेक लाभ बँकेमार्फत शासनाकडून मिळणार असल्‍याचे नमूद करुन जिल्‍हाधिकारी भोज म्‍हणाल्‍या की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे शून्‍य रकमेवर स्‍वतःचे खाते उघडण्‍यात येणार असून अपू-या कालावधीत अधिकतम कामे येत्‍या 2 ऑक्‍टोंबर पर्यन्‍त पूर्ण करावी लागणार आहे. त्‍यासाठी ज्‍या पध्‍दतीने निवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्‍यात येते त्‍याच प्रमाणे या कार्यासाठी सुध्‍दा  झोनल अधिकारी व केंद्र अधिकारी नियुक्‍त करण्‍यात येणार आहे.त्‍यांचे या  कामावर लक्ष ठेवून आढावा घेण्‍यात येणार आहे.खाते उघडण्‍यासाठी ग्रामीण क्षेत्रातील आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांचे सहकार्य घेवून त्‍यांच्‍याकडून प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे अर्ज भरुन घेण्‍यात येतील या आशा व अंगणवाडी सेविकांना तलाठी व ग्राम सेवक मदत करणार आहे. स्‍थायी रहिवाशी पत्‍यासाठी ग्रामसेवकांनी दिलेला रहिवासी दाखला ग्राह्य धरण्‍यात येणार असून आधार कार्डाचा क्रमांक व नाव लिहीलेले दोन फोटो अर्जासोबत लागणार आहे. त्‍यासाठी महसूल विभाग आवश्‍यक ती उपाय योजना करणार आहे. या कार्यासाठी  अग्रणी बँक ऑफ इंडिया यांच्‍या कडून बृहत आराखडा तयार करण्‍याचे काम सुरु झाले असून निवडणूकीच्‍या  मतदार यादीची मदत या कार्यासाठी घेण्‍यात येणार असल्‍यारचे त्‍यांनी सांगितले.
          याप्रसंगी उपायुक्‍त गौतम यांनी राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते काढणा-या लाभार्थ्‍यांना शासनाकडून मिळणा-या योजनेच्‍या लाभाची माहिती दिली. यावेळी बँकेचे अधिका-यांनी येणा-या अडचणीबाबत कशा पध्‍दतीने त्‍याचे  निराकरण करावे याची माहिती सांगितली. यावेळी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, मनोज काळे, सुनिल कोरडे, तहसिलदार सुशांत बनसोड, सचिन गोस्‍वामी, व इतर तहसिलदार, संवर्ग विकास अधिकारी व सर्व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.