Friday, 17 August 2012

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सदभावना दिन साजरा


     वर्धा,दि.17- येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयामध्‍ये सदभावना दिन साजरा करण्‍यता आला. याप्रसंगी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्‍या प्रतिमेला जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने  यांनी माल्‍यार्पन अर्पन करुन आदरांजली वाहली.
      या सदभावना दिनानिमित्‍ताने अधिकारी व कर्मचा-यांना प्रतिज्ञा देण्‍यात आली.
       यावेळी परिविक्षाधिन सहाय्यक जिल्‍हाधिकारी पि. शिवशंकर, निवासी उपजिल्‍हाधिकारी विजया बनकर, उपजिल्‍हाधिकारी  बि.एस.मेश्राम यांनी स्‍व. राजीव गांधी यांच्‍या प्रतिमेस पुष्‍प अर्पन करुन आदरांजली वाहीली.    
       यावेळी जिल्‍हाधिकारी  कार्यालयातील कर्मचारी अग्निहोत्री व  श्री.भुसारी  त्‍यांच्‍यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                000000

पाण्‍याचे सुधारीत दर लागू


        वर्धा, दि.17- पिपरी (मेघे) व 10 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अंतर्गत येणा-या 11  गावाला पुरविण्‍यात येणा-या पाणीपट्टीचे दरामध्‍ये सुधारणा करुन  दिनांक  1 जुलै 2012 पासून लागू करण्‍यात आले आहेत. पाण्‍याचे वापराकरीता प्रती 1000 लिटर  करीता सुधारीत दर पुढील प्रमाणे आहेत.
      नगर पालीका हद्दी बाहेरील तथापि शहरीभाग यांच्‍यासाठी घरघुती पाण्‍याचा वापर प्रतिमाह 15000 लिटर पर्यंत हजार लिटर दर 13 रुपये, पाण्‍याचा वापर प्रतिमाह 15001 ते 20000 लिटर पर्यंत हजार लिटर दर 20 रुपये,  पाण्‍याचा वापर प्रतिमाह 20000 ते 25000 लिटर पर्यंत हजार लिटर दर 26 रुपये, पाण्‍याचा वापर प्रतिमाह 25001 लिटर व त्‍यापुढील  वापराकरीता हजार लिटर दर 52 रुपये असेल.
       बिगर घरगुती पाण्‍याचा वापर प्रतिमाह सर्व वापराकरीता हजार लिटर दर 60 रुपये, शाळा,महाविद्यालय, धर्मदाय संस्‍था, सरकारी व निमसरकारी कार्यालय, सरकारी रुग्‍णालय यांच्‍यासारख्‍या ना नफा ना तोटा तत्‍वावर चालणा-या संस्‍थांना केलेला पाणी पुरवठा पाण्‍याचा वापर प्रतिमाह सर्व वापराकरीता हजार लिटर 25 रुपये राहील असे उपविभागीय अभियंता, महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण जलव्‍यवस्‍थापन  उपविभाग, वर्धा कळवितात.

आठ प्रकरणे आर्थिक मदतीसाठी पात्र - संजय भागवत


    वर्धा, दि. 17- नापिकी, तगादा व कर्जबाजारीपणा या शासनाच्‍या निकषानुसार  जिल्‍ह्यात  चवदा शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणापैकी   आठ प्रकरणे समिती सदस्‍याच्‍या  सर्वानुमते पात्र ठरविण्‍यात आल्‍या असल्‍याची  माहिती अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी दिली.
         अप्‍पर जिल्‍हाधिकारी यांच्‍या कक्षामध्‍ये शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणाची आढावा बैठक संपन्‍न झाली  त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समितीच्‍या सदस्‍यामध्‍ये  अग्रणी बँकेचे समन्‍वयक श्री.देवपुजारी, कृषी अधिक्षक कार्यालयाचे उपसंचालक, शेतकरी  स्‍वंयसेवी संघटनेचे प्रतिनिधी डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे तसेच संबधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
          पात्र ठरविण्‍यात आलेल्‍या शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणांमध्‍ये स्‍व. पांडूरंग तुमडाम रा. केळापूर ता. वर्धा, स्‍व. पांडूरंग महाकाळकर रा. वडगांव खुर्द ता. सेलू, स्‍व. सुरेश ठोकळे रा. वाढोणा ता. आर्वी, स्‍व. गोपाल उमराव रा. सावल ता. कारंजा, स्‍व. विठ्ठल जुगनाके रा. हिवरा ता. समुद्रपूर, स्‍व. इश्‍वर मुने  रा. सावळी बु. ता. कारंजा, स्‍व. रामदास हिंगने मु.नारा ता. कारंजा, व स्‍व. विश्‍वनाथ खौशी  रा. नारा ता. कारंजा यांचा समावेश  असून, शासनाकडून  त्‍यांना आर्थिक मदत मिळणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
                                                00000

अर्थसहाय्यासाठी 31 ऑगस्‍ट पर्यंत अर्ज करावे


        वर्धा, दि.17- भारत सरकारच्‍या सांस्‍कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठानच्‍या शासनमान्‍य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यान्वित असलेल्‍या अर्थसहाय्याच्‍या समान निधी व असमान निधी योजनांमधून ग्रंथालय संचालनालाय, महाराष्‍ट्र राज्‍य, नगर भवन, मुंबई यांच्‍यामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्‍यातयेते. त्‍या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in  या प्रतिष्‍ठानच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. इच्‍छुकांनी  तो या संकेतस्‍थळावरुन  डाऊन लोड करुन घ्‍यावा.
     समान निधी योजना अंतर्गत राज्‍य शासनाच्‍या 50 टक्‍के व प्रतिष्‍ठानच्‍या 50 टक्‍के अर्थसहाय्यामधून  असणा-या  परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा प्रशिक्षण वर्गाचे आयेाजन व ग्रंथप्रदर्शने  व वाचन संस्‍कृती रुजविण्‍यासाठीचे उपक्रम यासाठी अर्थसहाय्य. सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्‍तार  किंवा बांधणीसाठी अर्थसहाय्य तसेच  फिरते ग्रंथालयासाठी अर्थसहाय्य देण्‍यात येते
      असमान निधी योजना अंतर्गत  ग्रंथालय सेवा देणा-या स्‍वयंसेवी संस्‍थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्‍तार यासाइी असमान निधीतून अर्थसहाय्य (यामध्‍ये प्रतिष्‍ठानचे 75 टक्‍के व इच्‍छुक ग्रंथालय 25 टक्‍के हिस्‍सा (सार्वजनिक ग्रंथालयातील बालविभाग, महिला विभाग, ज्‍येष्‍ठ नागरिक विभाग, नवसाक्षर विभाग, स्‍वतंत्र स्‍पर्धा परीक्षा विभाग इत्‍यादीसाठी  अर्थसहाय्य. (प्रतिष्‍ठानकडून 100 टक्‍के अर्थसहाय्य) . असमान निधी योजनांतर्गत  महोत्‍सवी वर्ष जसे 50, 60,75,100,125 वे किंवा 150 वे वर्ष साजरे करण्‍यासाठी अर्थसहाय्य (प्रतिष्‍ठानकडून 100 टक्‍के अर्थसहाय्य) . शारिरिकदृष्‍ट्या विकलांग व्‍यक्‍तीसाठी विभाग स्‍थापन करण्‍यासाठी ग्रंथालयांना अर्थसहाय्य. (प्रतिष्‍ठानकडून 100 टक्‍के अर्थसहाय्य देण्‍यात येते.
          या योजनांसाठी  विहीत पध्‍दतीत आवश्‍यक त्‍या सर्व कागपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेमधील  प्रस्‍ताव तीन प्रतीत तसेच  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठानच्‍या योजनांबाबत इच्‍छुकांनी   आपल्‍या विभागातील सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयास दिनांक 31 ऑगस्‍ट  2012   पर्यंत  पोहचतील अशा बेताने पाठवावेत. असे आवाहन दि.श्री.चव्‍हाण, संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.
                                                000000

Thursday, 16 August 2012

भारतीय स्‍वातंत्र्याचा वर्धापण दिन पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहन


     
       वर्धा, दि.15 – भारतीय स्‍वातंत्र्य  दिनाच्‍या 65 वा वर्धापन दिनाच्‍या मुख्‍य समारंभात राज्‍याचे वित्‍त व नियोजन राज्‍यमंत्री तथा पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण  झाले.
      जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या  प्रांगणात स्‍वातंत्र्य  दिनाचा मुख्‍य सोहळा आयोजित करण्‍यात आला होता. पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्‍या हस्‍ते सकाळी 9-05 वाजता ध्‍वजारोहण झाले त्‍यानंतर पोलीस दलाची मानवंदना  स्‍वीकारली .
     यावेळी जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने, जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार  उपस्थित होते. ध्‍वजारोहन समारंभानंतर पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी स्‍वातंत्र्य संग्राम सैनिक , लोकप्रतिनिधी तसेच गणमान्‍य व्‍यक्‍तीची भेट घेवून स्‍वातंत्रय दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.  
यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष नानाभाऊ ढगे, नगराध्‍यक्ष आकाश शेंडे, अप्‍पर  जिल्‍हाधिकारी संजय भागवत, जिल्‍हा परिषदेच्‍या वित्‍त व बांधकाम समितीचे सभापती गोपाल कालोरकर, माजी नगराध्‍यक्ष शेखर शेंडे, प्रविण हिवरे तसेच अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
                                                                        000000

विकासाची दृष्‍टी असलेला नेता काळाच्‍या पडदयाआड राजेंद्र मुळक यांच्‍या शोकसंवेदना


       वर्धा,दि.15- केंद्रिय मंत्री व महाराष्‍ट्राचे  माजी मुख्‍यमंत्री  विलासराव देशमुख यांच्‍या निधनामुळे महाराष्‍ट्राची  अपरिमित हाणी झाली असून, विकासाची दृष्‍टी असलेला नेता काळाच्‍या पडद्याआड गेला असल्‍याच्‍या शोकसंवेदना राज्‍याचे वित्‍त व नियेाजन राज्‍यमंत्री तथा वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी व्‍यक्‍त केल्‍या.
      महाराष्‍ट्राचा  सर्वांगिण प्रगतीमध्‍ये तसेच विदर्भाच्‍या विकासामध्‍ये विलासराव देशमुख यांचे मोलाचे योगदान  होते. नागपूर शहराच्‍या विकासासेाबत विदर्भात मोठया प्रमाणात उद्योग  यावेत यासाठी त्‍यांनी सातत्‍याने प्रयत्‍न केले. मिहान प्रकल्‍पामध्‍ये विलासराव देशमुख यांचे योगदान अत्‍यंत मोलाचे राहिले आहे. त्‍यांच्‍या निधनाने मार्गदर्शक हरवला असल्‍याची शोक संदेशात पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी म्‍हटले आहे. आहे.
                              0000000

वर्धा जिल्‍हयात 37 (1) व (३) कलम लागू


       वर्धा,दि.16- वर्धा जिल्‍हयात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी शेखर चन्‍ने यांना प्रदान केलेलया अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (३) लागू केले आहे.
     या कलमाचा अंमल दि.26 ऑगस्‍ट 2012 चे रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यकती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल. असे आदेशात नमूद आहे.
                                00000