Wednesday, 1 August 2012

मोर्चा निदर्शने करण्‍यासाठी पोलीस अधिका-यांची परवानगी घ्‍यावी


वर्धा, दि. 1- मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 कलम 33,35,42,47 अन्‍वये केलेल्‍या कोणत्‍याही आदेशास हा देश अंमलात असे पर्यंत जिल्‍ह्यात जाहीरसभा, निदर्शने, मोर्चे, शोभायात्रा इत्‍यादि जिल्‍ह्यातील पो.स्‍टे. अधिकारी यांचेकडून तारीख, सभेची जागा, द्यावयाच्‍या घोषणा निश्चित करुन परवाना घेतल्‍याशिवाय आयोजन करु नये. शांततेला व सुव्‍यवस्‍थेला बाधा आणणा-या घोषणा देवू नये.
     नमूद आदेश वर्धा जिल्‍हा स्‍थळ सीमेच्‍या हद्दीत दि. 11 ऑगस्‍ट 2012 चे 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचा भंग केल्‍यास मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 कलम 134 अन्‍वये कार्यवाहीस पात्र राहील. असे पोलीस अधिक्षक अविनाशकुमार कळवितात.
                                                             0000000

सात गुन्‍हेगार दोन वर्षासाठी तडीपार



वर्धा,दि.1- जिल्‍ह्यातील सात गुन्‍हेगारांना दोन वर्षाच्‍या कालावधीसाठी यवतमाळ व अमरावती या तीन जिल्‍ह्यामधून 30 जुले 2012 पासून तडीपार करण्‍यात आले असल्‍याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी हरषि धार्मिक यांनी दिली.
तडीपार करण्‍यात आलेल्‍या सात व्‍यक्‍ती कोणास आढळुन आल्‍यास जवळच्‍या पोलीस स्‍टेशनला किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय, वर्धा यांना कळवावे. असे आवाहनही हरिष धार्मिक यांनी केले आहे.
तडीपार करण्‍यात आलेल्‍या  गुन्‍हेगारामध्‍ये महेंद्र सुखदेव म्‍हैसकर रा. बोरगाव (आ.)ता.देवळी, श्रीमती मनोरमा हरिश्‍चंद्र शेंडे वय 51 वर्षे रा. हिंगणघाट फैल, पुलगाव ता. देवळी, राजेंद्र ऊर्फ राजु महादेवराव बोरकर, रा. देवळी ता. देवळी, संजय भैय्यालाल जयस्‍वाल, रा. सिंदी (रे.) ता. सेलु, सुधाकर महादेवराव खेलकर, रा. तळेगाव (टा.), सुधाकर चिंतामन लेंडे रा. बरबडी, वर्धा, सुधीर चंद्रभान सहारे वय 40 वर्षे रा. समतानगर, वर्धा यांचा समावेश आहे.
                                                            0000000

Tuesday, 31 July 2012

डाकघरामध्‍ये तात्‍काळ मनिआर्डर सेवा उपलब्‍ध


वर्धा दि.31 – वर्धा मुख्‍य डाकघर,हिन्‍दीनगर, वर्धा मार्केट,मानस मंदीर, कारंजा,खरांगणा,पुलगांव,पुलगांव कॅम्‍प,समुद्रपूर, सेलु,वडनेर,आर्वी,आष्‍टी, देवळी ,सेवाग्राम व हिंगणघाट उपडाकघर येथे तात्‍काळ मनिऑर्डरची सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.
          तत्‍काल मनीऑर्डर सेवेमध्‍ये कमीत कमी कमीशन आकारुन तुरंत पैसे पोहचविण्‍यात येतात. त्‍यामुळे जनतेनी या सेवेचा लाभ घ्‍यावा. अधिक माहितीकरीता वरील डाकघरांमध्‍ये संपर्क साधावा असे अधिक्षक,डाकघर वर्धा विभाग,वर्धा यांनी कळविले आहे.
0000

Monday, 30 July 2012

जनतेला लोकाभिमुख व गतीमाण प्रशासनासाठी महसूल दिन


       
·         बुधवार दिनांक 1 ऑगष्‍ट रोजी आयोजन
·         तालुका व जिल्‍हा स्‍तरावर विविध कार्यक्रम
·         विविध प्रकारचे दाखले,सातबारा फेरफार करणार

वर्धा दि.30- महसूल विभागातर्फे जनतेला लोकाभिमुख व गतीमान प्रशासन देण्‍यासाठी सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान राबविण्‍यात येत असून बुधवार दिनांक 1 ऑगष्‍ट रोजी तालुका व जिल्‍हा स्‍तरावर महसूल दिनाचे आयोजन करुन सातबारा,फेरफारासह विविध दाखले देण्‍यात येणार असल्‍याची माहिती अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत यांनी दिली.
            जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात महसूल दिन आयोजनाबाबत वरिष्‍ठ महसूल अधिका-यांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती विजया बनकर, उपजिल्‍हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, सर्व तहसिलदार उपस्थित होते.
            महसूल दिनाचे आयोजन करतांना महसूल विभागाशी संबंधित जनतेची सर्व कामे त्‍वरीत निकाली निघतील तसेच सातबारासह इतर आवश्‍यक प्रमाणपत्र या कार्यक्रमामध्‍ये उपलब्‍ध करुन देण्‍यात यावीत अशा सूचना करतांना संजय भागवत म्‍‍हणाले की, महसूल दिनी तालुका व जिल्‍हा स्‍तरावर उत्‍कृष्‍ट काम करणा-या कर्मचा-यांचाही सत्‍कार करण्‍यात येईल.
            महसूल दिना सोबतच सुवर्ण जयंती राजस्‍व अभियानालाही सुरवात होत असून या अभियाना अंतर्गत ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्‍यक असलेले पांदन रस्‍ते,विविध दाखले देण्‍यासाठी विविध शिबीराचे आयोजन करणे जनतेची गा-हाणी तसेच तक्रारी सोडविण्‍यासाठी  चावडी वाचन अर्जाचे सुलभिकरण व ऑनलाईन उपलब्‍ध करुन देणे आदी विविध कार्यक्रमाचेही वर्षभर आयोजन करण्‍यात येणार आहे.
                                        वृक्षारोपण करणार
            महसूल दिनानिमित्‍त जिल्‍ह्यातील सर्व तहसिल कार्यालयाच्‍या आवारात वृक्षारोपण करुन महसूल दिन साजरा करण्‍यात येणार आहे. कार्यक्रमात कुटूंब अर्थसहाय्य योजना, श्रावणबाळ आदी सहाय्याच्‍या योजनासह विविध लाभार्थ्‍यांना अनुदानाचे वाटपही यावेळी करण्‍यात येईल.
            तलाठी साजा स्‍तरावर सकाळी गावक-यांच्‍या सहकार्यांने महसूल दिन आयोजित करण्‍यात येईल. यामध्‍ये जमावबंदी,सातबारा,फेरफार नोंदी घेणे विविध प्रकारचे दाखले देणे व महसूल विभागाची प्रलंबित कामे पूर्ण करण्‍यात येतील.
            जिल्‍हा स्‍तरावरही महसूल दिन आयोजित करण्‍यात येणार असून उप‍िवभागीय, तहसिलदार वर्धा तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या वतीने विकास भवन येथे कार्यक्रम आयोजित करण्‍यात येईल.
                                      जनतेसाठी हेल्‍पलाईन
            महसूल विभागाशी संबंधित असलेली माहिती जनतेला मिळावी यासाठी जिल्‍हा स्‍तरावर हेल्‍पलाईन सुरु करण्‍यात आली आहे, हेल्‍पलाईनसाठी दूरध्‍वनी क्रमांक  07152- 243446 या क्रमांकावर जनतेला माहिती उपलब्‍ध होणार आहे. जनतेनी या हेल्‍पलाईनचा लाभ घ्‍यावा असे आवाहनही अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी केले.
            निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती विजया बनकर यांनी महसूल दिनाच्‍या आयोजनाची माहिती दिली.
            यावेळी तहसिलदार सुशांत बनसोडे (वर्धा) जे.टी.पुरके (हिंगणघाट) जी.एन.करलुके (आर्वी) प्रकाश महाजन (आष्‍टी) एस.जे.मडावी (कारंजा) ए.जी.गावीत (सेलू) सचिन गोसावी (देवळी) आदी यावेळी उपस्थित होते.
                                                           0000

आपत्‍ती निवारणासाठी प्रशासन सज्‍ज



·         लाईफ जॅकेट, रोप अॅण्‍ड रेक्‍युकीट
·         पूरग्रस्‍त गावासाठी आवश्‍यक साहित्‍य रवाना
·         पोलीस व महसूल विभागासाठी आधुनिक साहित्‍य

            वर्धा दि.30 – अतिवृष्‍टी,पूर तसेच जिल्‍ह्यातील  उदभवना-या  नैसर्गीक आपत्‍तीचा सामना करण्‍यासाठी लाईफ जॉकेट सह रोप अॅण्‍ड रेक्‍युकीट, मेगाफोन ,सर्च लाईटसह आवश्‍यक साहित्‍य उपलब्‍ध झाले आहे. आपत्‍ती निवारणार्थ आवश्‍यक असलेले सर्व साहित्‍य जिल्‍हा व तालुका स्‍तरावरील नैसर्गीक आपत्‍ती निवारण कक्षामध्‍ये सज्‍ज असल्‍याची माहिती अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी दिली.
            आपत्‍ती निवारणासाठी  जिल्‍ह्यास आवश्‍यक असलेले साहित्‍य उपलब्‍ध झाले असून आज संपूर्ण साहित्‍य आपत्‍ती निवारण कक्षाकडे रवाना करण्‍यात आले.
            जिल्‍ह्यास नैसर्गीक आपत्‍ती नियंत्रणासाठी प्राप्‍त झालेल्‍या साहित्‍यामध्‍ये 160 लाईफ जॅकेट, 25 मेघाफोन, 24 फोल्‍डींग स्‍ट्रेचर, दोन रोप अॅण्‍ड रेक्‍यु किट, 25 सर्च लाईट, 280 ड्रम व 280 ट्युब आदी साहित्‍याचा समावेश आहे.
            सर्व साहित्‍य तालुकास्‍तरावर ज्‍या गावांना पुरांचा धोका आहे अशा गावासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असून आपत्‍ती निवारणाचा सामना करण्‍यासाठी अधिका-यांना व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.
            जिल्‍हा पोलीस अधिक्षक व सर्व तहसिल कार्यालयामध्‍ये लॉईफ जॅकेटसह आवश्‍यक साहित्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. जिल्‍हा स्‍तरावर नैसर्गीक आपत्‍तीचा सामना करण्‍यासाठी यंत्रणा सज्‍ज ठेवण्‍यात आली आहे.
            यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी सुश्री विजया बनकर, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, तहसिलदार सुशांत बनसोडे, सचिन गोसावी, ए.जी.गावीत, जी.एन.करलुके, अनिल दलाल, राहुल सारंग, एस.जे.मडावी,जी.टी.पुरके, यु.एस.तोडसाम, आदींनी आपदा  प्रबोधनासाठी साहित्‍यांच्‍या  उपयोगाबाबत माहिती घेतली.
            आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्ष प्रमुख किशोर सोनटक्‍के यांनी नैसर्गीक आपत्‍ती निवारणासाठी उपलब्‍ध सुविधांची माहिती दिली.
0000

गुणवंत गरीब विद्यार्थ्‍यांना समाजाने मदत करावी - संजय देवतळे


वर्धा दि.30- स्‍पर्धेच्‍या युगात समाजातील गरीब विद्यार्थी उच्‍च शिक्षणापासून वंचित राहू नये त्‍या विद्यार्थ्‍यांना भविष्‍यात शिक्षण सेवे विविध  क्षेत्रामध्‍ये महत्‍वाची कामगिरी बजावता यावी यासाठी गुणवंत  गरीब व होतकरु विद्यार्थ्‍यांना समाजाने मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन पर्यावरण व सांस्‍कृती विभागाचे मंत्री संजय देवतळे यांनी केले आहे.
हिंगणघाट येथे निखाडे सभागृहात काल खैरी कुणबी समाजाच्‍या वतीने समाज भूषण पुरस्‍कार जेष्‍ठ नागरीक व 10 वी व 12 विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार व गुण गौरव पर्यावरण मंत्री देवतळे यांचे हस्‍ते संपन्‍न झाला त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी  रमेशचंद्र बोमाटे हे होते तर प्रमुख पाहुने म्‍हणून आमदार सुभाष थोटे, जिल्‍हा परिषदेचे सभापती प्रा. उषाकिरण थुटे प्रबोधनकार भाऊसाहेब थुटे, माजी आमदार देवराव लडके माजी जि.प.अध्‍यक्ष कलावतीबाई वाकोडकर आदी मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
            शिक्षण व विविध क्षेत्रामध्‍ये मोठया प्रमाणावर स्‍पर्धा निर्माण झाली असून प्रतिष्‍ठीत नागरीकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांचे उज्‍वल  भविष्‍य घडविण्‍याचा प्रयत्‍न करावा असे सांगून  पर्यावरण मंत्री देवतळे म्‍हणाले की, गेल्‍या दोन वर्षापासून खैरे कुणबी समाजाच्‍या वतीने समाज भूषण पुरस्‍कार, जेष्‍ठ नागरिक व 10 वी  12 वी च्‍या विद्यार्थ्‍यांनी मिळविलेल्‍या उल्‍लेखनिय यशाबाबत गुण गौरव केला जातो ही बाब गौरवरस्‍पद अशीच आहे.या कार्यक्रमातून जेष्‍ठ नागरीकांनी केलेली उल्‍लेखनिय कामगिरी नव्‍या पिढीला माहिती होणार असून त्‍यांनी केलेल्‍या कार्याची प्रेरणा सुध्‍दा मिळत असते. हिंगणघाट, समुद्रपूर व वरोरा गावामध्‍ये हा समाज सधन समजल्‍या जातो. त्‍या कारनाने हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यामध्‍ये समाजाच्‍या वतीने उकृष्‍ट असे सभागृहाची निर्मिती  करण्‍यात यावी.सभागृहामध्‍ये सामाजिक विषयाची चर्चा व अडिअडचणीवर चर्चा करुन समाजाला  योग्‍य दिशादर्शक मार्ग मिळत असतो. होतकरु व गरीब विद्यार्थ्‍यासाठी स्‍पर्धात्‍मक परिक्षेचे वर्ग चालवून त्‍यांचे उज्‍वल भविष्‍य घडविण्‍याचा प्रयत्‍न करावा असेही ते म्‍हणाले.
यावेळी बोलतांना आमदार धोटे म्‍हणाले की कृषी क्षेत्रावर हा समाज विसंबून असल्‍यामुळे अनेकांना गरीबीचा सक्ष्‍मता करावा लागतो.या समाजाच्‍या उन्‍नतीसाठी सामुहिकरित्‍या प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे.या क्षेत्रामध्‍ये अनेक शैक्षणिक संस्‍थावर समाजाचे वर्चस्‍व आहे. त्‍या संस्‍थाचालकांनी  शैक्षणिक क्षेत्रासाठी स्‍पर्धेचे वर्ग उघडून गुणवंत विद्यार्थी निर्माण करावे असे आवाहन केले.
यावेळी व्‍यासपिठावरुन अनेक मान्‍यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उल्‍लेखनिय व वैशिष्‍ठयपूर्ण काम करणा-या व्‍यक्‍तींचा मान्‍यवरांचे हस्‍ते समाजभूषण पुरस्‍कार देवून  गौरविण्‍यात आले.तसेच 37 जेष्‍ठ नागरीक व 75 प्रतिशनाच्‍या वर 10 वी मध्‍ये गुण प्राप्‍त करणारे 30 विद्यार्थी तसेच 12 वी मध्‍ये गुण प्रापत करणारे 12 विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार व गुणगौरव करण्‍यात आला.
            या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक वसंत पाल यांनी केले तर संचालन प्रा. उमेश बोबडे व आभार गजानन नांदूरकर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी मोठया संखेने हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यातील नागरीक व ग्रामस्‍थ उपस्थित होते.
                                                       00000

वर्धा जिल्ह्यात सर्वत्र पाऊस


        वर्धा, दिनांक 30 : वर्धा जिल्ह्यात पाऊस पडत असल्याने पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात एकूण 8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
       जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे              
       वर्धा- 9.8 मि.मी.(307.7), सेलू-11.00 मि.मी.(162.00), देवळी-6.00 (249.6), हिंगणघाट-10.00 मि.मी.(417.4), समुद्रपूर-4.3 मि.मी. (457.00), आष्टी 7.6 मि.मी.(214.0), आर्वी 3.3 मि.मी.(393.3) आणि कारंजा-11.3 ( 303.8) पावसाची नोंद झाली आहे.
                                  ***