Wednesday, 18 July 2012

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी - डॉ. सोनोने


         वर्धा, दि. 18- गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमा अंतर्गत जिल्‍ह्यात खाजगी रुगणालयात सोनोग्राफी केंद्र  कार्यरत असून या रुग्‍णालयामध्‍ये  या कायद्याचा भंग होऊ नये यासाठी  प्रभावीपणे अंमलबजावणी  करण्‍याचा  मनोदय जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलिंद सोनोने यांनी व्‍यक्‍त केला.
येथील सामान्‍य  रुग्‍णालयातील जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकाच्‍या कक्षेमध्‍ये सल्‍लागार समितीची बैठक काल संपन्‍न झाली त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. धामट, डॉ.जे.एल.शर्मा, सल्‍लगार समितीचे सदस्‍य हेमलता मेघे, प्रविण हिवरे, बि.ना.साबळे, आशाताई लोहे, अॅड. कांचन बडवाने आदी मान्‍यवर उपस्थित होते.
गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम 2003 च्‍या आढावा बैठकीत सोनोग्राफी केंद्रातील तपासणी दरम्‍यान तया केंद्रातीलउनिवा व अडचणीवर चर्चा करुन जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ.सोनोने म्‍हणाले की गर्भधारणपूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमा अंतर्गत सोनोग्राफी केंद्राच्‍या शुल्‍कात केंद्र सरकारने भरिव वाढ केलेली आहे. खाजगी रुगणालयांनी सोनोग्राफीच्‍या नवीन केंद्रासाइी यापूर्वी दरवर्षी तीन हजार रुपये शुल्‍क आकारण्‍यात येत होते. आता मात्र 25 हजार रुपये शुल्‍क आकारण्‍यात येणार आहे. तसेच  त्‍या केंद्राच्‍या नुतनिकरणासाठी साडे बारा हजार रुपये शुल्‍क आकरण्‍यात येईल. तसेच खाजगी मेडीकल कॉलेज  नवीन केंद्रांना यापुर्वी 4 हजार रुपये शुल्‍क आकारण्‍यात येत होते ती रक्‍कम वाढवून आता पस्‍तीस हजार रुपये शुल्‍क आकारण्‍यात  येणार आहे. नुतनीकरणासाठी त्‍या  शुल्‍काची अर्धी रक्‍कम भरावी लागेल. मुलाच्‍या तुलनेत मुलीची संख्‍या दर हजारी कमी होत असल्‍याची खंत व्‍यक्‍त करुन डॉ. सोनाने म्‍हणाले की या समितीतील सदस्‍यांनी गर्भ लिंग तपासणी व निदान करणारी एकतरी संशयीत प्रकरण उघडकीस आणावे. त्‍या रुग्‍णाला शासनाच्‍या नियमानुसार मानधन देण्‍यात येईल तसेच  जेने करुन त्‍या खाजगी रुग्‍णालयावर पि.सी.पी.एन.डी.टी. अंतर्गत कार्यवाही करता येईल. त्‍यामुळे समाजात होणा-या स्‍त्री भ्रृण हत्‍येला आळा बसू शकेल.
      यावेळी बोलातंना प्रविण हिवरे म्‍हणाले की    स्त्रिभृण   हत्‍येला आळा घालण्‍यासाठी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्‍यक असून जागृतीचा एक भाग म्‍हणून शहरात काही  महत्‍वाच्‍या जागेवर होर्डींग लावण्‍याची अनुभमती प्रदान करण्‍याचे आवाहन त्‍यांनी समितीला केले असता ती मान्‍य करण्‍यात आली.
          गेल्‍या बैठकीमध्‍ये जिल्‍ह्यातील पाच सोनोग्राफी केंद्रांना पी.सी.पि.एन.डी.सी. अधिनियमाअंतर्गत तपासणीत उणीवा आढळल्‍यामुळे  कारणे  दाखवा नोटीस बजावण्‍यात आलया होत्‍या . आता त्‍या  सोनोग्राफी केंद्रानी अधिनियमाचे पालन केल्‍यामुळे त्‍यांना केंद्र सुरु करण्‍यची अनुमती प्रदान करण्‍याचा ठराव  पारीत करण्‍यात  आला. यामध्‍ये हिंगणघाट येथील 3, वर्धा येथील एका केंद्राचा समावेश आहे. मात्र ज्‍या सोनेाग्राफी केंद्राने अधिनियमाचे उल्‍लंघन केले आहे. ज्‍यांना सोनोग्राफी केंद्र सुरु करण्‍याची अनुमती नाकारण्‍यात आली यामध्‍ये पुलगांव येथील एका केंद्राचा समावेश आहे. डॉ. जयश्री गाठे यांनी रुगणालयातून राजीनामा दिला असल्‍यामुळे त्‍यांच्‍या जागी अध्‍यक्ष म्‍हणून डॉ. शिल्‍पा पांडे यांच्‍या नियुक्‍तीला  सर्व सदस्‍यांना मान्‍यता दिली.
यावेळी स्त्रि भ्रृण हत्‍या होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करावे असे आवाहन जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक मिलिंद सोनाने यांनी केले.
            या बैठकीला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                            00000000

चवथी व सातव्‍या वर्गाचे शिष्‍यवृत्‍ती परिक्षेचे फार्म ऑन लाईन भरावे


       वर्धा, दि. 18 –पुर्व माध्‍यमिक व माध्‍यमिक शाळा  शिष्‍यवृत्‍ती परीक्षा 2013 दिनांक 17 मार्च 2013 ला होत असल्‍यामुळे महाराष्‍ट्र  राज्‍य परीक्षा परीष्‍द पुणे कडून परीक्षेचे साहीत्‍य प्रापत झाले असून, पंचायत समितीच्‍या  सर्व गट शिक्षणाधिका-यांना वितरीत केले आहेत. या वर्षी प्रथमतः इयत्‍ता 4 थी व 7 वी ची शिष्‍यवृत्‍ती  परिक्षेचे आवेदन पत्र ऑनलाईन भरायचे आहेत.
     सर्व अंक इंग्रजी मध्‍येच भरावयाचे असून, आवेदन पत्र महाराष्‍ट्र राज्‍य परिषदेच्‍या wwwmscepune.in  या संकेत स्‍थळांवर उपलब्‍ध  असून, आवेदन पात्रता शाळेचा अचूक संकेतांक नमुद केलयानंतरच पूर्ण आवेदन पत्र भरता येईल. आवेदन पत्र ऑनलाईन प्रिंट करुन घेऊन त्‍यावर मुख्‍याध्‍यापकाच्‍या स्‍वाक्षरीनिशी पंचायत समिती स्‍तरावर सादर करावे.
      आवेदन पत्र शुल्‍क सर्व विद्यार्थ्‍यांसाठी 10 रुपये असून परीक्षा शुल्‍क इयत्‍ता 4 थी साठी 22 रु. व इयत्‍ता 7 वी साठी 33 रु. आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांना  फक्‍त परीक्षा शुल्‍क माफ आहे. इयत्‍ता 4 थीसाठी  वयोमर्यादा 1 जूलै 12 रोजी 12 वर्षे पूर्ण नसावे. इयत्‍ता 7 वी साठी 1 जूलै 12 रोजी 15 वर्षे पूर्ण नसावे.
            आवेदन पत्र भरण्‍याची अंतीम दिनांक 31 जुलै 12 असून, विलंब शिुल्‍कासह आवेदन पत्र भरण्‍याची दिनांक 16 ऑगस्‍ट 12 आहे. एका परीक्षाकेंद्रावर 300 पेक्षा जास्‍त विद्यार्थी राहणार नाहीत तसेच गतवर्षी परीक्षा केंद्र असलेल्‍या  या वर्षी नव्‍याने परीक्षा केंद्र अस्‍तीत्‍वात येत असलेल्‍या शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापकांनी दिनांक 17 मार्च 2013 ला शाळा कोणत्‍याही कार्यक्रमास देण्‍यात येऊ नये. सादर परीक्षेला जास्‍तीत जासत विद्यार्थी प्रविष्‍ठ करावेत असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक)चे हरिदास बांबोडे यांनी केले आहे.
                                                            0000000

Tuesday, 17 July 2012

व्‍दार उभारण्‍यासाठी अर्ज आमंत्रित


वर्धा, दि. 17 – जिल्‍ह्यात सुशिक्षित जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार माग्रदर्शन केंद्र, वर्धा या कार्यालया अंतर्गत काम वाटप समितीकडे कार्यकारी अभियंता, प्रमुख व्‍दारउभारणी पथक क्र. 2 नागपुर यांच्‍या अधिनस्‍त असलेल्‍या  वर्धा जिल्‍ह्यातील निम्‍नवर्धा प्रकल्‍प धनोडी ता. आवी्र वक्रव्‍दारे 12/8-31 संच व विमांचन व्‍दाराचे देखभाल, परिचलन करिता विजतंत्रीची सेवा 7 महिण्‍यासाठी पुरविण्‍याची कामे बेरोजगारांच्‍या  सेवा सहकारी संस्‍था यांचे कडून  कंत्राटी पध्‍दतीने सेवा पुरविण्‍याचे आहे.
संस्‍थेने संस्‍थेचे नोंदणी प्रमाणपत्र, वाणिज्‍य आस्‍थापनेचा परवाना, संस्‍थेला कमीत कमी 2 वर्षाच अशा प्रकारचा कामाचा अनुभव असावा. सदर संस्‍था कोणत्‍याही विभागातंर्गत काळ्या यादीत नसावी.
    सदर काम हे जूलै 2012 ते डिसेंबर 2012 पर्यंत असून आपातकालीन परिस्थिती उदभवल्‍यास 24 तास विजतंत्रीची सेवेची गरज भासू शकते. कामाची अंदाजित किंमत  2.01 लक्ष रुपये आहे.
            इच्‍छूक सेवा संस्‍थांनी वरील काम वाटपाचे अटी व शर्ती पूर्ण करु शकतील अशा संस्‍थांनी सहा. संचालक, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र वर्धा यांचेशी दिनांक 20 जुलै 2012 पर्यंत संपर्क साधावा व लेखी स्‍वरुपात अर्ज सादर करावा. कामाचे स्‍वरुप व तपशिल जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांचेकडे उपलब्‍ध आहे.
                                                            0000000

संस्‍थात्‍मक आणि व्‍यक्तिगत ग्राहक प्रतिनिधी नियुक्‍त करण्‍यासाठी अर्ज मागविण्‍याबाबत


           वर्धा, दि. 17- महाराष्‍ट्र विद्यूत  नियामक आयोगाने, महाराष्‍ट्र विद्यूत  नियामक आयोग (प्राधिकृत ग्राहक प्रतिनिधी) विनियम 2012 हे दि. 6 जुन 2012 रेाजी अधिसूचित केले आहेत. राज्‍यातील ग्राहकांची बाजू मांडण्‍यासाठी संस्‍थात्‍मक आणि व्‍यक्तिगत ग्राहक प्रतिनिधींना प्राधिकृत करण्‍यासाठी  आयोगाने इच्‍छुक संसथा व व्‍यक्‍तींकडून  अर्ज मागविलेले आहे.
       राज्‍यातील उत्‍तर महाराष्‍ट्र आणि मराठावाडा या दोन विभागामधून प्रत्‍येक विभागातून एक याप्रमाणे एकुण दोन संस्‍थात्‍मक ग्राहक प्रतिनिधीची तसेच संपुर्ण राज्‍यभरातून पंधरा व्‍यक्तिगत ग्राहक प्रतिनिधींची निवड करण्‍यासाठी महाराष्‍ट्र विदृयुत नियामक आयोगाने इच्‍छुक  संस्‍थांकडून तसेच व्‍यक्‍तींकडून विहित नमुन्‍यात अर्ज मागविलेले आहेत. अर्ज करण्‍याची शेवटची तारीख 14 ऑगस्‍ट 2012 आहे.
     अर्जाचा  विहित नमुना आणि महाराष्‍ट्र विद्युत नियामक आयोग  (प्राधिकृत ग्राहक प्रतिनिधी) विनियम, 2012 ची प्रत आयोगाच्‍या  www.mercindia.org.in  या संकेत स्‍थळावर उपलबध आहे. इच्‍छुक संस्‍था व व्‍यक्‍तींनी अर्जाचा विहित नमुना आणि विनियमाच्‍या प्रती आयोगाच्‍या संकेतस्‍थळावरुन प्राप्‍त करुन घ्‍याव्‍यात.
                                                            000000

तालुका व जिल्‍हा स्‍तरीय शालेय क्रीडा स्‍पर्धा कार्यक्रम


         वर्धा, दि.17- क्रीडा व युवक सेवा संचालनालय व्‍दारा जिल्‍हा क्रीडा परीषद व जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांचे संयुक्‍त विद्यमाने आयेाजीत तालुका ते राज्‍यस्‍तरापर्यंतच्‍या शालेय  किंवा महिला इत्‍यादी क्रीडा स्‍पर्धाचे आयेाजन दरवर्षी करण्‍यात येत असते.
    त्‍याअनुषंगाने सन 2012-13 या सत्रात आयेाजीत करावयाच्‍या शालेय व इतर क्रीडा स्‍पर्धा कार्यक्रमाचे आयेाजन करण्‍याचे दृष्‍टीने जिल्‍ह्यातील विविध तालुका निहाय सभाचे आयेाजन गटशिक्षणाधिकारी मार्फत करण्‍यात येणार आहे.
            जिल्‍ह्यातील सर्व शैक्षणीक संस्‍थांचे मुख्‍याध्‍यापक  किंवा शा. शिक्षकांनी जिल्‍हा परिषद शाहांचे केंद्र प्रमुख सदर सभेस उपसिथत राहून या सत्रातील  स्‍पर्धा कार्यक्रमाची रुपरेषा व स्‍पर्धा कार्यक्रम पुस्‍तीका प्राप्‍त करुन घ्‍यावी.   तालुकानिहाय सभेचा कार्य पुढील प्रमाणे ...
     आर्वी तालुका दि. 17 जुलै 12 सकाळी 11-30 वाजता पंचायत समिती सभागृह, आर्वी येथे, वर्धा तालुका दि. 17 जुलै 12 रोजी दुपारी 12 वाजता न्‍यु ईंग्‍ल्‍ीश हायस्‍कूल वर्धा, आष्‍टी तालुका दि. 17 जुलै 12 रोजी दुपारी 2 वाजता पंचायत समिती सभागृह आष्‍टी, देवळी तालुका दि. 18 जुलै 12 रोजी सकाही 11 वाजता मार्या इंग्‍लीश स्‍कूल, देवळी, सेलू तालुका दि. 18 जुलै 12 रोजी दुपारी 3 वाजता दिपचंद विद्यालय, सेलू,  कारंजा तालुका दि. 19 जुलै 12 रोजी दुपारी 1 वाजता गट संसाधन केंद्र कारंजा, समुद्रपूर तालुका दि. 19 जुलै 2012 रोजी दुपारी 12-15 वाजता पंचायत समिती सभागृह समुद्रपूर, हिंगणघाट तालुका दि. 19 जुलै 12 रोजी दुपारी 2 वाजता डॉ. बि.आर. आंबेडकर विद्यालय, हिंगणघाट येथे होणार आहे. असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी वर्धा यांनी कळविले आहे.
                                                            000000

विजय कुलसंगे यांच्‍या मृत्‍युची दंडाधिका-या मार्फत चौकशीचे आदेश


            वर्धा, दि. 17- पोलीस स्‍टेशन, देवळी तहसिल देवळी जिल्‍हा वर्धा येथील विजय जयवंतराव कुळसंगे रा. कोहोणा (चोरे)  ह.मु. यवतमाळ कैदी क्र. 6325/12 याचा दिनांक 19 जून 2012  रोजी सामान्‍य रुग्‍णालय भिडी येथे उपचार दरम्‍यान मृत्‍य झाला.
          या प्रकरणात कोणाचे आक्षेप असल्‍यास त्‍यांनी दिनांक 4 ऑगस्‍ट 2012 पर्यंत या कार्यालयास  लेखी स्‍वतः अथवा त्‍यांच्‍या अभिकर्त्‍या  मार्फत कळवावे. विहित मुदतीत प्राप्‍त न झालेले आक्षेप तसेच जाहिरनामा निघण्‍यापूर्वी तसेच जाहीरनाम्‍याची मुदतीनंतर प्राप्‍त  झालेल्‍या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. असे उपविभागीय दंडाधिकारी, वर्धा कळवितात.
                                                     0000

Monday, 16 July 2012


   पिण्‍याच्‍या  पाण्‍याचे नमुने घेवून तात्‍काळ उपाययोजना करा
                                                   - शेखर चन्‍ने
                                   
*आर्वी  येथे गॅस्‍ट्रोची साथ  नियंत्रणात
          * एकाही रुग्‍णाला लागण होणार नाही  याची खबरदारी घ्‍या.
                    * 8 हजार 500 घरांची  तपासणी
                    *  मेडीक्‍लोअरच्‍या 2 हजार बॉटल वितरीत करणार
                    * उपचारानंतर 33 रुग्‍णांना सुटी

            वर्धा, दि. 16 – आर्वी येथे  दूषित पाणी  पील्‍यामुळे  झालेल्‍या  अतिसाराची (गॅस्‍ट्रो) साथ लागनमुळे  पुर्णपणे  नियंत्रणात असून, यापुढे एकाही  नागरीकाला अतिसाराची लागन होणार नाही  या दृष्‍टीने दूषित पाणी  आढळलेल्‍या  सर्व घरांची  तपासणी करुन  मेडीक्‍लोअर  या औषधाचे  वाटप करा अशा सुचना जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी आज आरोग्‍य, पाणी पुरवठा व  नगर परिषदेच्‍या अधिका-यांना दिल्‍या.
       आर्वी येथील स्‍टेशन वार्डात  अतिसाराची लागन  झाल्‍याचे  निदर्शनास  आले असून  या परिसरातील  41 रुग्‍णांना  लागन होताच तात्‍काळ  वैद्यकीय उपचार देण्‍यात आले.  त्‍यापैकी केवळ  आठ रुग्‍ण  उपजिल्‍हा‍ रुग्‍णालयात  केवळ तपासणीसाठी  भरती असून त्‍यांना त्‍यांची  प्रकृती  उत्‍तम  असून, लवकरच सुटी देण्‍यात येणार आहे.  अतिसारामुळे रुग्‍ण दगावले नसल्‍याचेही  जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.
            जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी  आज तातडीने आर्वी येथे भेट देऊन आरोग्‍य, पाणी पुरवठा, महसूल तसेच आर्वी नगर परिषदेच्‍या  मुख्‍याधिका-यासह  सर्व संबंधित अधिका-यांचे बैठक घेवून  अतिसाराची लागन  झालेल्‍या  वार्डाची तसेच  तेथील पिण्‍याचे पाण्‍याचे स्‍त्रोत, दुषि‍त पाण्‍याचे नमुने व औषधाच्‍या उपलब्‍धतेबाबत  माहिती घेतली.
            आर्वी येथे महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणासह 19 विहीरी व 42 हातपंपाव्‍दारे पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍यात येतो. तसेच स्‍टेशन वार्ड, शिवाजी वार्ड , दादाजी वानखडे वार्ड, वलीसाहेब वार्ड व गणपती वार्ड या  भागात  पिण्‍याच्‍या पाण्‍याचे  नमुने दूषित असल्‍याचे आढळून आल्‍यामुळे तेथील घरांची  तपासणी करावी  व मेडीक्‍लोअर  औषध  त्‍यांना उपलब्‍ध करुन द्यावे अशी सुचना यावेळी  जिल्‍हाधिका-यांनी   केली.
            उपजिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी  अतिसाराची लागन झालेल्‍या भागात  तात्‍काळ वैद्यकीय  उपचारासाठी  तात्‍पुरती  सुविधा सुरु करावी तसेच प्रत्‍येक घरातील  नागरिकांना पिण्‍याचे पाणी  उकळून प्‍यावे  तसेच पाण्‍यात मेडीक्‍लोअर  औषध  टाकूनच पाणी प्‍यावे अशा सुचना करतानाच  पिण्‍याचे पाण्‍याचे नमुने घेण्‍यासाठी  वैद्यकीय चमू  सज्‍ज ठेवावी  असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
            आर्वी शहरातील ज्‍या  भागता पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या पाईपलाईन नादुरुस्‍त आहेत त्‍या तात्‍काळ दुरुस्‍त कराव्‍यात. ड्रेनेजचे पाणी वाहून जाण्‍यासाठी  जेसीपी व्‍दारे नाल्‍या खोल कराव्‍यात, तसेच टँकरव्‍दारे पाण्‍याचा पुरवठा करावा व पाण्‍याचे क्‍लोरीनेशन करुनच नागरिकांना पिण्‍याचे  पाणी उपलब्‍ध करुन द्यावे अशा सुचनाही त्‍यांनी यावेळी दिल्‍या. स्‍टेशन वार्डासह इतर वस्‍त्‍यांनाही जिल्‍हाधिका-यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला तसेच पिण्‍याचे पाणी नियमितपणे उकळून प्‍यावे असे आवाहनही शेखर चन्‍ने यांनी यावेळी नागरिकांना दिले आहे.
                        उपजिल्‍हा रुग्‍णालयास भेट
            अतिसाराची लागन झालेल्‍या रुग्‍णांपैकी आठ रुग्‍ण उपजिल्‍हा रुग्‍णालयात भरती असून  जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी  रुग्‍णांची  भेट घेऊन त्‍यांच्‍या प्रकृतीची चौकशी केली. 
            जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी विश्रामगृहात उपविभागीय अधिकारी सुनिल कोरडे, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलींद सोनुने ,जिल्‍हा  आरोग्‍य अधिकारी डॉ. दिलीप माने यांचेसह  वरिष्‍ठ अधिका-यांची  बैठक घेवून  अतिसाराची लागन झालेल्‍या  वस्‍त्‍यांची  तसेच दूषित पाणी , औषधोपचार आदी बाबत माहिती घेतली. महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाच्‍या जलशुध्‍दी  केन्‍द्रासही भेट देऊन पिण्‍याच्‍या पाण्‍याचे क्‍लोरीनेशन  बाबत प्रत्‍यक्ष पाहणी केली.  
         यावेळी त्‍यांच्‍या समवेत   उपविभागीय अधिकारी सुनिल कोरडे, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलींद सोनुने , जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दिलीप  माने, तालुका वैद्यकीय अ‍धिकारी डॉ. व्हि.आर. देवकाते, गटविकास अधिकारी डॉ. एस.डी. वानखेडे, नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी श्री. सुर्यवंशी , डॉ. प्रविण ठाकरे, डॉ. सुशिल पानपुरे, जिवन प्राधिकरणाचे अभियंता सी.बी. खासबागे, तहसिलदार  अजय चरडे आदी उपस्थित होते.
                                                            0000000