Tuesday, 10 July 2012

14 वर्षावरील सर्व सहभागीसाठी व्‍यवसाय अभ्‍यासक्रम


        वर्धा,दि. 10 – शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळा, हिंगणघाट येथील संस्‍थेत 14 वर्षावरील सर्व सहभागीसाठी व्‍यवसाय अभ्‍यासक्रम अंतर्गत निरनिराळे सेक्‍टर  अंतर्गत उमेदवारांना ऑटोमोबाईल, इलेक्‍ट्रीकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इन्‍फॉरमेशन अॅन्‍ड कम्‍युनिकेशन टेक्‍नॉलॉजी यामध्‍ये प्रशिक्षण देण्‍यात येईल. हे कमीत कमी कालावधीसाठी  प्रशिक्षण असुन, लवचिक माध्‍यमातुन प्रशिक्षण तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्‍यांना 100 टक्‍के प्रशिक्षण शुल्‍कात सुट, प्रशिक्षणाअंती इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग दिल्‍ली तर्फे परिक्षा घेण्‍यात येवून व उत्‍तीर्ण झाल्‍यावर भारत सरकारचे प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात येईल.
        वरील अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश घेण्‍यास प्रशिक्षणार्थ्‍यांनी संस्‍थेमध्‍ये प्रत्‍यक्ष संपर्क साधुन प्रवेश निश्‍चीत करुन घ्‍यावा, असे आवाहन मुख्‍याध्‍यापक, शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळा केंद्र, कनिष्‍ठ महाविद्यालय, हिंगणघाट  कळवितात.
                                                            00000

तीन गुन्‍हेगारांवर तडीपाराचा आदेश


          वर्धा, दि. 10-  वर्धा तालुक्‍यातील चितोडा येथील  दोन व धोत्रा येथील एका गुन्‍हेगाराला दोन वर्षासाठी वर्धा ,यवतमाळ व अमरावती जिल्‍ह्यातून तडीपार करण्‍याचे आदेश उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी एका आदेशान्‍वये आज दिले आहे.
         गुन्‍हेगारी  स्‍वरुपाचे तीनही व्‍यक्‍तींची नावे रणधिर चंद्रबल गौतम रा. चितोडा त.जि.वर्धा, संजय रामकृष्‍णाजी  मांदाडे रा. चितोडा त.जि.वर्धा व  विष्‍णू  काशिनाथ मलीये रा. धोत्रा (रे.) त.जि.वर्धा   असून त्‍यांना दोन वर्षासाठी  तीन जिल्‍हयामधून तडीपार करण्‍याचे आदेश बजावण्‍यात आले आहे.

                                                            00000

अनुसूचित जाती व नवबौध्‍द युवक युवतींना सैन्‍य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण


       वर्धा, दि.10- सामाजिक न्‍याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्‍द युवक , युवतींना सैन्‍य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र श्री. हनुमान व्‍यायाम प्रसारक मंडळ, अनुमान व्‍यायाम नगर, अमरावती येथे आयोजित केलेले आहे. सैन्‍य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण वर्गातील दुसरी बॅच दि. 1 ऑगस्‍ट 2012 पासुन सुरु करण्‍यता येत आहे.याकरीता विहीत नमुण्‍यात अर्ज मागविण्‍यता येत आहे.
     सदर प्रशिक्षणाचाकालावधी हा तीन महिन्‍याचा असून, सदर प्रशिक्षण हे निवासी स्‍वरुपाचे राहणार आहे. संबंधीत संस्‍थेमध्‍ये प्रशिक्षणार्थ्‍यास  स्‍वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. त्‍यासाठी कोणतही प्रवास भत्‍ता देण्‍यात येणार नाही.
     सदर प्रशिक्षणाकरीता शेक्षणिक पात्रता व शारीरिक क्षमता पुढील प्रमाणे असावी.  शैक्षणिक पात्रता सैन्‍य भरतीसाठी  10 वी पास, शारीरिक क्षमता, उंची 168 से.मी. च्‍या पुढे, छाती 79.84 से.मी., वजन 50 किलो, वयोमर्यादा 18-23 वर्ष, पोलिस भरतीसाठी  शैक्षणिक पात्रता 12 वी पास, उंची 165 से.मी. च्‍यापुढे, छाती 79.84 से.मी., वजन 50 किलो आणि वयोमर्यादा 18-23 वर्ष असेल.
     सदर प्रशिक्षण पूर्ण करण्‍याबाबतचे व प्रशिक्षण अर्धवट सोडल्‍यास त्‍याच्‍यावर खर्च करण्‍यात  आलेली रक्‍कम वसुल करण्‍यात  येईल अशा खर्चाचे हमीपत्रक रु. 100 च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर लिहून घेण्‍यात येईल. अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकातील सैन्‍य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकरीता इच्‍छुक  युवक युवतींनी आपले अर्ज सहायक आयुक्‍त, समाज कल्‍याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, सेवाग्राम रेल्‍वे सटेशन रोड, वर्धा येथे दिनांक 27 जुलै 2012 पर्यंत सादर करावेत. असे सहाय्यक आयुक्‍त समाज कल्‍याण, वर्धा कळवितात.
                                                              00000

Saturday, 7 July 2012

उपविभागीय दंडाधिका-या मार्फत स्‍पोटाची चौकशी


     वर्धा दि.7- मेसर्स अरावली एक्‍सफलोझिव्‍ह अॅण्‍ड केमीकल कंपनी,तळेगांव रघुजी ता.आर्वी येथे दिनांक 23 मे,2012 रोजी स्‍पोट होवून 2 मजुर मृत्‍यू पावले असून 5 मजुर गंभीर जखमी झालेले आहे.सदर प्रकरणाची दंडाधिकारीय चौकशी करण्‍यासाठी जिल्‍हादंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी वर्धा यांनी उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आर्वी यांची नियुक्‍ती केलेली आहे.
          सदर प्रकरणाची चौकशी उपविभागीय कार्यालयात सुरु आहे.या घटनेविषयी कोणाला काही माहिती किंवा पुरावे द्यायचे असल्‍यास त्‍यांनी दिनांक 16 जुलै,2012 पर्यन्‍त कार्यालयीन वेळेत द्यावे असे उपविभागीय दंडाधिकारी,आर्वी यांनी कळविले आहे.
0000

तलाठी रिक्‍त पदे सरळसेवेने भरती 24 जुलै पर्यंत अर्ज स्विकारले जातील


         वर्धा दि.7- तलाठी रिक्‍त पदांची सरळ सेवेने भरती होणार असून दिनांक 12 जुलै पर्यन्‍त अर्ज मागविण्‍यात आले होते..आता अर्ज स्विकारण्‍यास मुदतवाढ  दिली असल्‍यामुळे उमेदवारांनी 16 जुलै,2012 पर्यन्‍त अर्ज विहीत नमून्‍यात सादर करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी वर्धा यांनी केले आहे.
         ज्‍या उमेदवारांना तलाठी पदाकरीता घेण्‍यात येणा-या लेखी परिक्षेसाठी नामनिर्देशन करावयाचे आहे.त्‍यांनी hptt://colwardha.applyjobz.com या संकेत स्‍थळावर शर्ती व अटी पाहाव्‍या..अर्ज स्विकारण्‍याचे तारखेत वाढ करण्‍यात येवून ऑन लाईन अर्ज दिनांक 16 जुलै,2012 पर्यन्‍त उपलब्‍ध राहतील.तसेच स्विकारण्‍यात येतील.  त्‍यानंतर प्राप्‍त होणा-या अर्जचा विचार केला जाणार नाही. संकेत स्‍थळावरुन अर्जाची घेलेल्‍या प्रिंटची प्रत तसेच  डी.डी.सह अर्ज या कार्यालयास दिनांक 24 जुलै,2012 पर्यन्‍त स्विकारले जातील याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्‍यावी असे जिल्‍हाधिकारी वर्धा कळवितात.
00000

जिल्‍ह्यांतील पर्जनमान समुद्रपूर येथे 51 मि.मी. पावसाची नोंद


         वर्धा, दि. 7- जिल्‍हयामध्‍ये सर्वाधिक पावसाची नोंद समुद्रपूर तालुक्‍यात झाली असून तेथे 51 मि.मी.पाऊस पडला आहे.   आतापर्यंत जिल्‍ह्यातील एकूण पावसाची सरासरी 177.2 मि.मि.नोंद झाली आहे.
       तालूका निहाय पडलेला पावसाचे आकडे कंसा बाहेर असून कंसामधील आकडे हे एकून पडलेल्‍या पावसाचे आहे.
            वर्धा 38.6 (172.4) मि.मि., सेलू 9.00 (75) मि.मि.,देवळी 8.2 (139.8) मि.मि.,हिंगणघाट 17.1 (230.4) मि.मि.,आर्वी 16 (267.) आष्‍टी 3.8 (111.8) समुद्रपूर 51 (260.) कारंजा 19 (160) मि.मि. पावसाची नोंद करण्‍यात आली आहे.. आज पडलेला एकूण पाऊस 162.7 ( 1416.7) मि.मि. असून  पावसाची प्रत्‍यक्ष सरासरी 20.4 मि.मि. असून एकूण पावसाची सरासरी 177.2 एवढी नोंद करण्‍यात आली आहे.
0000

Friday, 6 July 2012

कुंडी गावाच्‍या मतदार याद्या तयार करण्‍याचा कार्यक्रम जाहिर


         वर्धा दि.6- पंचायत समितीमधील रिक्‍त पदांच्‍या पोट निवडणूकीसाठी  मतदार याद्या तयार करण्‍याच्‍या कार्यक्रम जाहिर झाला असून तो पुढील प्रमाणे आहे.
         वर्धा जिल्‍ह्यात पंचायत समिती कारंजा निर्वाचन गन क्रमांक 12- कुंडी हे पद रिक्‍त आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्‍याचा दिनांक 1 जून,2012 शुक्रवार असून  राज्‍य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्‍या तारखेस अस्तिवात असलेल्‍या विधानसभेच्‍या  मतदार यादीवरुन जिल्‍हा परिषद,पंचायत समिती निवडणूका करीता तयार केलेली मतदार यादी हरकती व सूचना मागविण्‍याकरीता प्रसिध्‍दी करण्‍याचा दिनांक 6 जुलै,2012 आहे.
         मतदार यादी संदर्भात हरकती व सूचना दाखक करण्‍याचा अंतिम दिनांक 10 जुलै,2012 मंगळवार राहणार असून निवडणूक विभाग व निर्वाचन गणाच्‍या छापील मतदार याद्या अधिनियमाच्‍या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्‍याचा दिनांक 16 जुलै,2012 सोमवार असेल.
         निवडणूक विभाग व निर्वाचन गणाच्‍या मतदार याद्या  लोकांच्‍या माहितीसाठी ठेवण्‍यात आल्‍या आहेत.याबाबतची सूचना प्रसिध्‍द करण्‍याची तारीख 16 जुलै,2012 सोमवार राहील. असे जिल्‍हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000