Monday, 25 June 2012

पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक यांचे आज आगमन


       वर्धा दि.25- राज्‍याचे वित्‍त नियोजन  उर्जा व जलसंपादन राज्‍यमंत्री तथा पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक यांचे उद्या मंगळवार दिनांक 26 जून रोजी सकाळी 8.45 वाजता नागपूर येथून मोटारीने आगमन होईल.
           सकाळी 9.00 वाजता सामाजिक न्‍याय भवन येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज जन्‍मदिन, सामाजिक न्‍याय दिन कार्यक्रम पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक यांच्‍या प्रमुख उपस्थितीत साजरा होईल.
          सकाळी 10.30 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्‍तीबाबत बैठकीस तसेच वाजता जिल्‍हाधिकारी,उप विभागीय अधिकारी व जिल्‍हा स्‍तरीय अधिका-यांच्‍या बैठकीत पालकमंत्री उपस्थित राहतील.मंत्रालयातील कागदपत्राच्‍या झालेल्‍या नुकसानाबाबत तसेच करावयाच्‍या उपाययोजनाबाबत वरिष्‍ठ अधिका-यांच्‍या बैठकीत उपस्थित राहून मोटारीने नागपूरसाठी प्रयाण करतील.

00000

नैसर्गिक आपत्‍ती उपाययोजना पालकमंत्र्याकडून आज आढावा


वर्धा दि.25- नैसर्गिक आपत्‍ती निवारणार्थ जिल्‍हा स्‍तरावर करण्‍यात आलेल्‍या उपाय योजनाबाबत पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक उद्या मंगळवार दिनांक 26 जून रोजी सकाळी 10.30 वाजता वरिष्‍ठ अधिका-यांच्‍या बैठकीत आढावा घेणार आहेत.
         जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आयोजित बैठकीत जिल्‍हाधिकारी,उपजिल्‍हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व जिल्‍हास्‍तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11.00 वाजता मंत्रालयातील कागदपत्राच्‍या झालेल्‍या नुकसा‍नीबाबत तसेच जिल्‍हा स्‍तरावर  करावयाच्‍या उपाय योजनांबाबतही अधिका-यांच्‍या बैठकीत पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक आढावा घेणार आहेत. 

0000

सामाजिक न्‍याय दिनाचे पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते आज उदघाटन


 
  • 26 जुन सामाजिक न्‍याय दिन
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्‍मदिन
  • शिष्‍यवृत्‍ती व घरकुलाचे वाटप
 
वर्धा दि.22- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्‍मदिवस सामाजिक न्‍याय दिन म्‍हणून मंगळवार दिनांक 26 जून रोजी साजरा करण्‍यात येणार आहे.
पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक यांच्‍या हस्‍ते सकाळी 9 वाजता सामाजिक न्‍याय दिनाचे उदघाटन  सेवाग्राम रोडवरील सामाजिक भवन येथे आयोजित करण्‍यात आले आहे.यावेळी पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते लाभार्थ्‍यांना घरकुल व शिष्‍यवृत्‍तीचे वाटप करण्‍यात येणार आहे.      
कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता तसेच सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री रणजीत कांबळेप्रमुख पाहुने म्‍हणून उपस्थित राहतील ,खासदार दत्‍ता मेघे, आमदार  सुरेश देशमुख, अशोक शिंदे, दादाराव केचे,ना.गो.गाणार,मितेश भांगडिया, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, नगराध्‍यक्ष आकाश शेंडे, जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज, जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार ,मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने आदी उपस्थित राहणार आहे.
            सामाजिक न्‍याय दिनानिमित्‍त लाभार्थ्‍यांना शिष्‍यवृत्‍ती,घरकुल आदी वाटप करण्‍यात येणार आहे. यावेळी जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, महिला व बालकल्‍याण सभापती निर्मलाताई बिजवे,शिक्षण व आरोग्‍य समितीचे  सभापती प्रा. उषाकिरण थुटे,समाजकल्‍याण सभापती नंदकिशोर कंगाले आदि उपस्थित राहणार आहे.
            राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्‍मदिन व सामाजिक न्‍याय दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन सहाय्यक आयुक्‍त, समाजकल्‍याण किशोर भोयर व जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी जया राऊत यांनी केले आहे.
                                                           0000

पायका योजनेमध्‍ये ग्रामपंचायत स्‍तरावर क्रीडांगण - श्रीमती जयश्री भोज


                                 ·         52 गावांमध्‍ये क्रीडांगणासाठी प्रत्‍येकी 1 लाख
·         ज्‍युडोच्‍या राष्‍ट्रीय स्‍पर्धा नोव्‍हेंबरमध्‍ये
·         25 राज्‍यातील 350 खेळाडूंचा समावेश
·         बॅडमिंटन हॉल त्‍वरित दूरुस्‍ती करा
·         शालेय क्रिडा स्‍पर्धाचे भव्‍य आयोजन

           वर्धा दि.25- जिल्‍हयातील ग्रामीण भागातील मुलांना विविध खेळाबद्दल प्रोत्‍साहन मिळावे व गावातच क्रीडांगणासह आवश्‍यक सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी  पायका अंतर्गत यावर्षी 52 गावामध्‍ये प्रत्‍येकी एक लाख रुपये खर्च करुन क्रीडांगणासह  क्रीडासाहित्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
          जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात जिलहाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा क्रीडा परिषद,वर्धा जिल्‍हा क्रीडा संकुल कार्यकारीणीची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्‍या प्रसंगी मागदर्शन करतांना त्‍या बोलत होत्‍या.
          पंचायत युवा खेळ व क्रीडा अभियान  (पायका) अंतर्गत मागील तीन वर्षापासून जिल्‍हयातील प्रमुख गावात खेळाडूसाठी क्रिडांगण तयार करण्‍यासाठी  प्रत्‍येकी  अेक लाख रुपये उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहेत. दरवर्षी 52 गावामध्‍ये ही योजना राबविण्‍यात येत असून क्रीडांगणासाठी ज्‍या गावाची निवड झाली आहे. तथील कामाचा आढावा घेवून ग्रामीण भागातील उपलब्‍ध झालेल्‍या सुविधांचा आढावा घेण्‍याच्‍या सूचनाही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिल्‍यात.
            जिल्‍हा क्रीडा परिषदे मार्फत जिल्‍हयात तालुका,जिल्‍हा विभाग तसेच राज्‍यस्‍तरीय विविध स्‍पर्धा आयोजित करण्‍यात येणार आहे. राष्‍ट्रीय स्‍तरावरील ज्‍युडोच्‍या स्‍पर्धा नोव्‍हेंबर मध्‍ये वर्धा येथे आयोजित करण्‍यात येणार असून या स्‍पर्धांच्‍या आयोजना बाबतही यावेळी आढावा घेण्‍यात आला.
            राष्‍ट्रीय स्‍पर्धेसाठी 25 राज्‍यातून 350 खेळाडू सहभागी होणार असून स्‍पर्धांचे आयोजन, निवास व भोजन व्‍यवस्‍था आदिबाबतही यावेळी संबंधित विभागांना त्‍यांनी सूचना दिल्‍यात.
            तालुका स्‍तरावर  दहा खेळांचे तसेच जिल्‍हा स्‍तरावर 62 खेळांचे विविध वयोगटातील मुले व मुलीसाठी आयोजन करण्‍यात येणार असून जिल्‍हयातील सर्व प्राथमिक व माध्‍यमिक शाळा,कनिष्‍ठ महाविद्यालयातील खेळाडूसाठी वेळापत्रक तयार करण्‍यात आले आहे. या स्‍पर्धांच्‍या आयोजनासाठी आवश्‍यक निधी तसेच तालुका व जिल्‍हा स्‍तरावर आयोजनासाठी कराव्‍या लागणा-या पूर्व तयारीचाही यावेळी आढावा घेण्‍यात                                 
                                                    जिल्‍हा क्रीडा संकुल
            वर्धा जिल्‍हयातील खेळाडूसाठी खेळाच्‍या दर्जेदार सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासोबत सुमारे 44 लाख 92 हजार रुपये खर्च करुन शुटींग रेंज विकसित करणे,मुला,मुलींच्‍या वसतिगृहाची सुधारणा करणे, जुन्‍या बहुउद्देशिय हॉलची सुधारणा करणे, तसेच तालुका क्रीडा संकुलाबाबतही यावेळी आढावा घेण्‍यात आला. वर्धा जिल्‍हयात आठ तालुक्‍यापैकी पाच तालुक्‍यात क्रीडा संकुल मंजुर करण्‍यात आले असून आर्वी,आष्‍टी, सेलू, देवळी या चार तालुक्‍यात प्रत्‍यक्ष कामाला सुरवात झाली आहे. हिंगणघाट येथील जागेचा प्रस्‍ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्‍यात आल्‍याची माहिती यावेळी देण्‍यात आली. प्रारंभी जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी स्‍वागत करुन वर्धा जिल्‍हा क्रीडा संकुल तसेच पायका जिल्‍हा क्रीडा परिषदे अंतर्गत जिल्‍हयात सुरु असलेल्‍या विविध प्रकरणांची माहिती दिली. पायका अंतर्गत यावर्षी 52 गावांची निवड करण्‍यात आली असून लोकसंखेनुसार व तालुका प्रमाण ठेवून गावांची निवड केल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.
            विविध क्रीडा स्‍पर्धा आयोजनासाठी निधीची उपलब्‍धता व खर्चाचा आढावाही त्‍यांनी यावेळी सादर केला.
यावेळी प्रा.सुरेश भोंगाडे, वर्धा नगरपरिषदेचे मुख्‍य कार्यपालन अधिकारी श्री.खोराटे, जिल्‍हा माहिती अधिकारी  अनिल गडेकर,शिक्षणाधिकारी लक्ष्‍मीकांत सोनटक्‍के,क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, घनशाम वरारकर,सार्वजनिक बांधकाम,पोलीस आदी विभागाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
00000

पुरस्‍कारासाठी 30 जून पर्यन्‍त प्रस्‍ताव पाठवा


                 ·         राजीव गांधी मानव सेवा पुरस्‍कार
·         राष्‍ट्रीय बालकल्‍याण पुरस्‍कार
·         विशेष नैपुण्‍य पुरस्‍कार
·         राष्‍ट्रीय बाल शौर्य पुरस्‍कार
·          
वर्धा दि.25- राष्‍ट्रीय पुरस्‍कारासाठी जिल्‍हयातील इच्‍छुक व्‍यक्‍ती महिला,स्‍वयंसेवी संस्‍था कडून 30 जून पर्यन्‍त प्रस्‍ताव मागविण्‍यात आले आहे.
या पुरस्‍कारामध्‍ये राजीव गांधी मानव सेवा पुरस्‍कार 2012, राष्‍ट्रीय बालकल्‍याण पुरस्‍कार 2012, विशेष नैपुण्‍य पुरस्‍कार 2012 या पुरस्‍कारा करीता प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहे.पुरस्‍काराची नियमावली व निकष केंद्र शासनाच्‍या वेबसाईट www.wcd.nic.in वर उपलब्‍ध आहे.
           तसेच राष्‍ट्रीय बाल शैर्य पुरस्‍कार 2012 या पुरस्‍काराकरीता सुध्‍दा प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहे. सदर पुरस्‍काराची नियमावली व विहित अर्जाचा नमुना तसेच योजनेची माहिती शासनाचे वेबसाईट www.iccw.org वर उपलब्‍ध आहे.
          जिल्‍हयातील पुरस्‍कारासाठीचे प्रस्‍ताव 30 जून 2012 पर्यन्‍त जिल्‍हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, आरती टॉकीज चौक, विद्या नगर, नागपूर रोड,वर्धा येथे सादर करावे.अधिक माहितीसाठी जिल्‍हा महिला बालविकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
                                                        0000 

डी.टी.एड.ची प्रथम वर्षची पडताळणी यादी 26 जून रोजी जाहीर


        वर्धा दि. 25- सन 2012-13 च्‍या डी.टी.एड. प्रथम वर्ष प्रवेशा करीता आवेदन पत्रा सादर करण-या जिल्‍हयातील सर्व उमेदवारांची पडताळणी यादी (चेकलिस्‍ट) दिनांक 26 जून,2012 रोजी जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍था, जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयामागे वर्धा या कार्यालयात जाहिर करण्‍यात येणार आहे.
             उमेदवारांनी चेकलिस्‍ट पाहून त्‍यातील सर्व माहिती बरोबर असल्‍याची खात्री करावी. यादीतील माहितीच्‍या संदर्भात आक्षेप असल्‍यास ते विहित नमून्‍यात लेखी स्‍वरुपात या कार्यालयात दिनांक 26 जून,2012 ते दिनांक 28 जून,2012 पर्यन्‍त कार्यालयीन वेळेत सादर करावे. उशिराने प्राप्‍त होणारे आक्षेपाचे अर्ज कोणत्‍याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाही. आक्षेप नोंदणीचे काम सर्व सुट्याचे दिवशी सुरु राहील.उमेदवारांनी डी.टी.एड. प्रवेश अर्जासोबत जोडलेल्‍या सहपत्राच्‍या संदर्भातच चेकलिस्‍ट मध्‍ये दुरुस्‍ती करता येईल. नव्‍याने कोणत्‍याही प्रकारचे प्रमाणपत्र सादर करता येणार नाही.याची नोंद घ्‍यावी असे प्राचार्य, जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍था,वर्धा कळवितात.
                                                     00000

मंत्रालयात जळालेल्‍या संचिका प्रकरणाच्‍या पुर्नबाधनिला तातडीने प्रारंभ-जयश्री भोज


मंत्रालयात जळालेल्‍या संचिका प्रकरणाच्‍या पुर्नबाधनिला तातडीने प्रारंभ
                                                -जयश्री भोज
-सेतु सुविधा केंद्रामार्फत तातडीने प्रकरणे स्विकारणार
-प्रकरण स्विकारण्‍याचा कालावधी 15 दिवस
-नागरीकांनी सहकार्य करण्‍याचे आवाहन
वर्धा दि.24-  मंत्रालयाच्‍या इमारतीला 21 जून रोजी आग लागल्‍यामुळे मुख्‍यमंत्री , उपमुंख्‍यमंत्री , राज्‍यमंत्री व मुख्‍यसचिवाच्‍या कार्यालयातील व  विभागातील महत्‍वाची कागदपत्रे जळलेली आहे. या घटनेतील जळालेल्‍या कागदपत्राची पुनर्बाधनीचे काम शासनाने युध्‍द स्‍तरावर हाती घेतलेले असून ज्‍या  नागरीकांनी अर्ज केले असतील तसेच जिल्‍हा जिल्‍हयात पाठविलेले प्रकरणे व कार्यालयाने संबधीत मंत्रालयात प्रलबिंत असल्‍यास त्‍या  प्रकरणाची संचिका प्रत्‍येक तहसिल कार्यालयात उघडण्‍यात  आलेल्‍या सेतू संबंधी मार्फत स्विकारुन त्‍या शासनाला पुर्नबांधनीसाठी पाठविण्‍यात येतील . या कार्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
            आज जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात मंत्रालयातील इमारतीत लागलेल्‍या आगीमुळे जळालेल्‍या संचिका बाबत पुर्नबाधनी व करावयाच्‍या उपायोजने बाबत जिल्‍हाधिकारी भेाज यांनी मार्गदर्शन केले. त्‍या प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या यावेळी  अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, अप्‍पर पोलीस अधिक्षक टि.एस.गेडाम, निवासी उपजिल्‍हाधिकारी जे.बी. संगितराव, उपजिल्‍हाधिकारी शैलेश मेश्राम, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक व इतर विभागाचे विभाग प्रमुख उपस्थितीत होते.
            मंत्रालयाला लागलेल्‍या आगित मुख्‍यमंत्री , उपमुख्‍यमंत्री, व मंत्र्याच्‍या विभागामध्‍ये  आदिवासी विभाग, पर्यावरण पदुम व राज्‍य उत्‍पादन शुल्‍क, आणि  अपारंपारीक उर्जा विभाग,याचा समावेश असून  राज्‍यमंत्री कार्यालयातील,विभागामध्‍ये  गृह विभाग, वित्‍त , सार्वजनिक बांधकाम, सास्‍कृतीकार्य, उच्‍च व तंत्रशिक्षण, पदुम पर्यावरण व सामान्‍य प्रशासन विभाग मुख्‍य सचिव यांच्‍या कार्यालयांतील विभागामध्‍ये नगर विकास विभाग, महसुल विभाग, मदत व पुनंर्वसन , वन विभाग, गृह विभाग, पर्यटन विभाग, परिवहन जलसंधारण विभागातील संचिका प्रकरणे जळाल्‍यामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे त्‍यामुळे जिल्‍हयातील  संबधित विभागानी मंत्रालय स्‍तरावर संचिका प्रकरणाची एक यादी तयार करुन ती जिल्‍हाधिकारी कार्यालयाला दोन दिवसात  सादर करावी तसेच मंत्रालयातील संबधित विभागांना 15 दिवसाच्‍या आत पाठविण्‍यात यावी अशा सुचना जिल्‍हाधिकारी भोज यांनी दिल्‍या.
            ज्‍या नागरीकांनी मंत्रालयातील संबधित विभागाकडे अर्ज प्रकरणे सादर केली आहेत. त्‍या सादर केलेल्‍या  अर्ज प्रकरणाची प्रत तसेच संलग्‍न  कागदपत्रे व पोच पावती येत्‍या 15 दिवसात संबधित तहसील कार्यालयातील सेतु सुविधा केंद्रामध्‍ये सादर करुन पोच पावती प्राप्‍त करुन घ्‍यावी प्राप्‍त प्रकरणे मंत्रालयातील संबधित विभागाला जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्‍यात येणार आहे.
येत्‍या काही दिवसात पावसाळी अधिवेशन होणार आहे. पावसाठी अधिवेशनाला फारमोठा अवधी उरलेला नाही विधीमंडळा मार्फत  करुन किंवा शासनाकडून विचारणा करण्‍यात आलेले प्रश्‍नाचे उत्‍तर संबधित विभागाने यापुर्वी पाठविलेले असल्‍यास अशी प्रकरणे या घटनेमुळे नव्‍याने  तयार करुन दोन दिवसाच्‍या आत जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करुन संबधित विभागाला तातडीने पाठविण्‍यात यावे अशा सुचना त्‍यांनी यावेळी केल्‍या.
            याप्रसंगी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000