Tuesday, 27 March 2012

ई-स्‍कॉलरशीपचे प्रस्‍ताव


        वर्धा, दि. 27- जिल्‍ह्यातील ज्‍या महाविद्यालयानी  ई-स्‍कॉलरशिप व्‍दारे ऑनलाईन शिष्‍यवृत्‍तीचे प्रस्‍ताव सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण कार्यालयाकडे सादर केलेले नाही त्‍या महाविद्यालयांनी शिष्‍यवृत्‍तीचे  ऑनलाईन प्रस्‍ताव तात्‍काळ सादर करावे. 
        अन्‍यथा मागासवर्गीय विद्यार्थी शिष्‍यवृत्‍तीपासून वंचित राहिल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील. असे आवाहन सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण,  यांनी केले आहे.
                                                            000000

सुवर्ण जयंती राजस्‍व अभियाना अंतर्गत जिल्‍ह्यात मेगा कॅम्‍प सफल


     वर्धा, दि. 27- राज्‍याच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्षानिमित्‍य महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्‍याकरीता महत्‍वाकांक्षी योजना म्‍हणून `सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान `  हा नाविण्‍यपूर्ण उपक्रम  महसूल प्रशासनाने राबविला आहे.  
           या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. जिल्‍हा महसूल प्रशासनाने नुकतेच  जिल्‍ह्यातील सर्व तालुक्‍यात महाशिबिराचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांना वर्धा- 8268, देवळी – 2714, सेलु – 2379, आर्वी – 911, आष्‍टी– 433, कारंजा -1170, हिंगणघाट -1804, समुद्रपूर-3419 असे  एकूण 21118 प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले.
      वाटप करण्‍यात आलेल्‍या प्रमाणपत्रामध्‍ये बाब निहाय तलाठी दप्‍तर अद्यावतीकरण 68, प्रलंबित फेरफाराच्‍या नोंदी 2778, सात बारा वाटप करणे 5302, महसुल अभिलेखाच्‍या नकला देणे 1262, विविध प्रमाणपत्राचे वितरण 5474, जमिन मोजणी प्रकरणे 204, इंदिरा आवास योजने अंतर्गत भुखंड वाटप 48, शिधा पत्रिका 1226, राज्‍य व केंद्र शासनाच्‍या सहाय्यक योजनेचे लाभ 940, राज्‍य व केंद्र शासनाच्‍या सहाय्य योजनेचे अपात्र लाभार्थी 252, आम आदमी योजना 2666, गावठाण विस्‍तार योजने अंतर्गत भुखंड वाटप 110, कृषी विषयक योजनेचे लाभ 181, नवीन वीज जोडणे 294 तसेच इतर 313 असे एकूण 21118 प्रमाणपत्राचे वाटप    करण्‍यात आले.
                                                           00000

मुलाखतीची सूचना


         वर्धा, दि. 27- आय.टी.आयमधून फिटर, इलेक्‍ट्रीशियन, वेल्‍डर, मेकॅ.मोटार व्‍हेईकल या व्‍यवसायामधे उत्‍तीर्ण उमेदवारासाठी फेब्रुवारी 2012 मध्‍ये शिकाऊ उमेदवार भरती परिसर मुलाखतीचा कार्यक्रम दिनांक 31 मार्च 2012 रोजी आय.टी.आय. वर्धा येथे आयोजित करण्‍यात आलेला आहे.
          मुलाखती करीता लॉयड्स स्टिल इंडस्‍ट्रीज लिमिटेड, भुगाव, आर.एस.आर.मोहोता मिल्‍स लिमिटेड, हिंगणघाट, गिमा टेक्‍स इंडस्टि्ज लिमिटेड, हिंगणघाट इत्‍यादी आस्‍थापना हजर राहून, उमेदवारांची निवड करणार आहेत.
          इच्‍छुक उमेदवारांनी आपले मुळ प्रमाणपत्रासह दि. 31 मार्च 2012 रोजी सकाळी 10.30 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, वर्धा येथे स्‍वःखर्चाने हजर रहावे.
असे अंशकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र व्‍दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था  यांनी कळविले आहे.
                                                                 00000

लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे पुरस्‍कारासाठी अर्ज आमंत्रित


       वर्धा, दि.27- सामाजिक न्‍याय विभागामार्फत मातंग समाजातील कलावंत व समाज सेवक यांना लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे पुरस्‍कार देण्‍यात येतो. हा पुरस्‍कार व्‍यक्‍ती व संस्‍था अशा दोन गटात देण्‍यात येतो.
         पुरस्‍काराचे स्‍वरुप व्‍यक्तिगत पुरस्‍कार 15,000 रुपये रोख व सन्‍मानपत्र व स्‍मृतिचिन्‍ह तसेच संस्‍थात्‍मक पुरस्‍कार 25,000 रुपये रोख व सन्‍मानपत्र व स्‍मृतिचिन्‍ह देण्‍यात येतो.
           व्‍यक्तिगत पुरस्‍कारासाठी अर्जदार व्‍यक्‍तीने मातंग समाजाकरीता समाज कल्‍याण कलात्‍मक व साहित्यिक क्षेत्रात किमान 10 वर्ष कार्य केलेले असावे. अर्जदार पुरुषाचे वय किमान 50 वर्षे व स्त्रियांचे किमान 40 वर्षे इतके असावे. पुरस्‍कारासाठी मातंग समाजातील व्‍यक्‍तीचाच विचार करण्‍यात येईल.
      संस्‍थात्‍मक पुरस्‍कारासाठी संस्‍था नोंदणीकृत असावी. स्‍वयंसेवी संस्‍थेने समाज कल्‍याण क्षेत्रात मातंग समाजाच्‍या उन्‍नतीसाठी अन्‍याय निर्मूलन, अंधश्रध्‍दा निर्मूलन इत्‍यादी क्षेत्रात किमान 10 वर्षे काम केलेले असावे. स्‍वयंसेवी संस्‍था राजकारणापासून अलिप्‍त  असावी.
     अटी व शर्ती पूर्ण करणा-या व्‍यक्‍ती व संस्‍थानी विहीत नमून्‍यातील अर्ज तीन प्रतीत दिनांक 15 एप्रिल 2012 पूर्वी  कार्यालय सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण सेवाग्राम रेल्‍वे स्‍टेशन रोड, हिम्‍मतसिंगका विद्यालय जवळ वर्धा येथे अर्ज नमुना व अधिक माहितीसाठी  कार्यालयात प्रत्‍यक्ष संपर्क साधावा.
                                                        000000

Monday, 26 March 2012

मायक्रो फायनान्‍सवर मार्गदर्शन


         वर्धा, दि.26- महाराष्‍ट्र राज्‍य विधी सेवा प्राधिकरण, व जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण, तसेच बँक ऑफ महाराष्‍ट्र शाखा, जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक, देवळी व बँक ऑफ इंडिया शाखा यांचे संयुक्‍त विद्यमाने Micro Finance Scheme या विषयावर  सर्वसामान्‍य व शेतमजूर लोकांमध्‍ये जन-जागृती निर्माण करण्‍यासाठी नुकतेच जिल्‍ह्यातील बोरगांव (नांदोरा) व देवळी अशा दोन ठिकाणी शिबीर आयोजित करण्‍यात आले  होते.
          या शिबीरामधे  उपस्थित लोकांना  Micro Finance Scheme  या विषयावर  प्रमुख वक्‍त्‍यांनी मार्गदर्शन केले.  
                                                00000000

कोरडवाहू शाश्वत शेतीविकास कार्यक्रमाअंतर्गत शेतक-यांना प्रशिक्षण


         वर्धा, दि. 26- देवळी तालुक्यातील मौजा तळणी भागवत येथे आत्‍मा अंतर्गत कोरडवाहू शाश्‍वत शेती विकास कार्यक्रमांतर्गत  गावातील लाभार्थी शेतक-यांचे दुधाचे मुल्‍यवर्धन या विषयावर प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले होते.
मार्गदर्शन करताना जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी 
    यावेळी  जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, कृषि विकास अधिकारी आर.के.गायकवाड, देवळीचे पशुसंवर्धन विकास अधिकारी गायधने, तालुका कृषि अधिकारी एस.डब्‍लु . निगोट आदि उपस्थित होते.
    कोरडवाहू शाश्वत शेती विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्‍यात येणा-या विविध उपक्रमाअंतर्गत गाई,म्‍हशी खरेदी, आत्‍मा अंतर्गत शेतकरी  अभ्‍यास दौरे, शासनाच्‍या विविध योजनांचा समन्‍वय इत्‍यादी बाबींवर मार्गदर्शन करण्‍यात आले.   
                                                000000

सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान 1200 शेतकरी उपस्थित


       वर्धा,दि.26 – राज्‍यात महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्‍याकरीता महत्‍वाकांक्षी योजना म्‍हणून राज्‍याच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्षा निमित्‍त 1 मे 2011 पासून सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान राबविण्‍याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्‍या अनुषंगाने हिंगणघाट तालुक्‍यात नुकतेच (दि. 24 मार्च2012) रोजी मेगा कँपचे आयोजन तहसिल कार्यालयात करण्‍यता आले.
          शिबिराचे उदघाटन जिल्‍हा परिषद  अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे  यांचे हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाला जिल्‍हा परिषद सदस्‍य व पंचायत समिती सदस्‍य तसेच तालुका स्‍तरावरील विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे प्रमाणपत्राचे वितरण करताना 
या शिबीरात तालुक्‍यातील जवळजवळ 1200 शेतकरी, विद्यार्थी  तसेच   लाभार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्‍यांच्‍या व लाभार्थ्‍यांच्‍या तक्रारीचे निराकरण करुन सोडविण्‍यात आले. तालुक्‍यात 33 तलाठ्यांची दप्‍तरे अद्ययावत करण्‍यात आली आहे. 173 फेरफार मंजूर करण्‍यात आले. तसेच संबंधितांना 514 सातबा-यांचे वाटप करण्‍यात आले.
मोजणी प्रकरणामध्‍ये 60 लाभार्थ्‍यांना  क प्रतिचे वाटप करण्‍यात आले. राष्‍ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत एकूण 7 लाभार्थ्‍यांना  प्रत्‍येकी 10000 रु. चे  धनादेशाचे वितरण करण्‍यात आले. याव्‍यतिरीक्‍त  312 प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले. तालुक्‍यातील एकूण 150 लाभार्थ्‍यांचे आम आदमी विमा योजने अंतर्गत अर्ज घेण्‍यात आले असून अर्जावर लवकरच कार्यवाही करण्‍यात येईल असे उपविभागीय अधिकारी श्री. काळे यांनी सांगितले.
तालुक्‍यात एकूण 304 लाभार्थ्‍यांना शिधापत्रीचे वाटप करण्‍यात आले. या कार्यक्रमामध्‍ये एकूण 1602 प्रकरणे प्राप्‍त झालेली होती त्‍यापेकी मेगाकॅम्‍प मध्‍ये 1568 प्रकरणांचे निराकरण करण्‍यात आले असून उर्वरीत 34 प्रकरणे लवकरच निकाली काढण्‍यात येईल   असे सांगितले.
     कार्यक्रमामधे तहसिलदार जी.टी.पुरके, नायब तहसिलदार सुरेन्‍द्र दांडेकर, तालुक्‍यातील मंडळ अधिकारी, तलाठी तसेच कार्यालयीन कर्मचारी प्रामुख्‍याने उपस्थित होते.

                                                00000000