Tuesday, 20 March 2012

शिक्षक व निदेशका करीता प्रशिक्षण कार्यक्रम


      वर्धा,दि.20- शासकीय व अशासकीय अनुदानित संस्‍थामधील उच्‍च माध्‍यमिक व व्दिलक्षी व्‍यवसाय अभ्‍यासक्रमाकडील शिक्षक व निदेशकाकरीता कर्मचारी प्रशिक्षण शैक्षणिक साहित्‍य निर्मिती व गुणवत्‍ता वाढ कार्यक्रम दिनांक 24  ते 30 मार्च 2012 या कालावधील आचार्य श्रीमन्‍नारायण पॉलीटेक्निक, पिपरी वर्धा येथे आयोजित करण्‍यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दि. 24 मार्च 2012 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
        प्रशिक्षणामध्‍ये शिक्षक व निदेशकांना विविध तंत्रज्ञांचे मार्गदर्शन मिळणार  आहे. शैक्षणिक साहित्‍य निर्मितीचे मार्गदर्शन व प्रत्‍यक्ष प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे.
      प्रशिक्षणार्थींना 27 मार्च 2012 रोजी नागपूर येथील शासकीय तंत्र निकेतन मधील इंडस्टि्यल  प्रयोगधाळेमध्‍ये व महिंद्रा ॲण्‍ड महिंद्रा मध्‍ये आस्‍थापना भेट  आयोजित केलेली आहे. तसेच वर्धा येथील एमगिरी व पुर्ती साखर कारखाना, पॉवर प्‍लॉंट जामणी येथे आस्‍थापना भेअ आयोजित करण्‍यात आलेली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्‍ये वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर  जिल्‍ह्यातील एमआरइडीए, आरएमआरईएम, एईटी  व स्‍कुटर मोटर सायकल दुरुस्‍ती  अभ्‍यासक्रमाकडील 107 शिक्षक व निदेशक सहभागी होणार आहेत. असे  जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,  यांनी  कळविले आहे.
                                                           000000

येत्या 2 एप्रिलला विषय समिती सभापतीची निवडणूक



           वर्धा,दि.20- वर्धा जिल्‍हा परिषदेतील विषय समिती सभापतीची निवडणूक दिनांक सोमवार दि. 2 एप्रिल 2012 रोजी जिल्‍हा परिषद, वर्धाच्‍या सभागृहात घेण्‍यात येणार आहे. तेव्‍हा सर्व  नवनियुक्‍त सदस्‍यांनी विषय समिती सभापतीच्‍या निवडणूकीत सहभागी  व्‍हावे.निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
         वर्धा जिल्‍हा परिषद विषय समिती निवडणूक सभेचे ठिकाण वर्धा जिल्‍हा  परिषद कार्यालयाचे सभागृह असून, अध्‍यासी अधिकारी   संजय भागवत, अपर जिल्‍हाधिकारी हे आहेत. सोमवार    दि. 2 एप्रिल 2012 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्‍वीकारणे तसेच दुपारी 2 वाजेपासून विषय समिती सभापती पदाची निवडणूक होईल.                                                                                                     
                                                                        000000

रिडर पदासाठी शिफारस बातमीचा खुलासा


       वर्धा, दि.20- जिल्‍हा माहिती अधिकारी यांनी दिनांक 29 फेब्रुवारी 2012 च्‍या पत्रान्‍वये लोकराज्‍य मासिक वार्षिक वर्गणीदार करण्‍यासाठी आदिवासी अनुसूचित जमातीच्‍या इयत्‍ता 10 वी ते पदवीधर शेक्षणिक पात्रतेच्‍या एकूण 3500 उमेदवारांची नांव व संपूर्ण पत्‍यासह यादीची मागणी या कार्यालयाकडे केली होती. त्‍यास अनुसरुन या कार्यालयाने यदिनांक 16 मार्च 2012 रोजी या कार्यालयाच्‍या पदावरील 10 वी ते पदवीधर शैक्षणिक पात्रतेच्‍या 1973 उमेदवारांची नाव व पत्‍याची यादी जिल्‍हा माहिती कार्यालयास सादर केली आहे.
      अशी यादी तयार करण्‍यासाठी रिक्‍त पदासाठी पाठवणी करण्‍याच्‍या ऑप्‍शनमधून यादी तयार तयार करणे आवश्‍यक असल्‍यामुळे या ऑप्‍शनमधून ही यादी तयार करुन जिल्‍हा माहिती कार्यालयास सादर केलेली आहे. आणि त्‍यामुळे सद्याच्‍या प्रचलित सुविधेनुसार यादीतील ज्‍या उमेदवारांचे मोबाईल नंबर्स या कार्यालयाकडे नोंद आहेत. त्‍या उमेदवारांना रीडर पदासाठी शिफारस असे एसएमएस आलेले आहेत.
      संबंधित उमेदवारांनी हा एसएमएस संदेश नोकरीच्‍या शिफारसीसाठी नसून लोकराज्‍य मासिकाच्‍या सदस्यत्वासाठी  आहे याची  नोंद घ्‍यावी. असे सहाय्यक संचालक, जिल्‍हा रोजगार व सवयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा हे कळवितात.
                                                            000000000

मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी ई-स्‍कॉलरशिप योजना ऑन लाईन अर्ज येत्या 27 मार्च पर्यंत भरावा


       वर्धा,दि.20-  महाराष्‍ट्र शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी ई-स्‍कॉलरशिप योजना कार्यान्वित केलेली आहे. या याजनेमूळे शिष्‍यवृत्‍तीची रक्‍कम थेट मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांच्‍या खात्‍यात तर शिक्षण फी, परीक्षा फी व इतर अनुषंगिक फी संबंधित महाविद्यालयाच्‍या खात्‍यात जमा होणार आहे. जे मागासवर्गीय विद्यार्थी ऑन लाईन अर्ज भरतील त्‍यांनाच मॅट्रीकोत्‍तर शिष्‍यवृत्‍तीचा आणि संबंधित महाविद्यालयांना शिक्षण फी  व परीक्षा फी चा लाभ देण्‍यात येणार आहे.
यासाठी इयत्‍ता 10 वीच्‍या पुढील शिक्षण घेत असलेल्‍या  सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांनी http://mahaeschol.maharashtra.gov.in/scholarship/login.aspx या  वेबसाईटवर  दिनांक  15  फेब्रुवारी 2012  पर्यंत  अर्ज भरण्‍याची अंतिम मुदत देण्‍यात आली  होती. तथापि दि. 15 फेब्रुवारी 2012 नंतर सुध्‍दा अनेक विद्यार्थी व महाविद्यालयाकडून  ऑनलाईन अर्ज  भरण्‍याचे राहून गेलेले आहे. त्‍यामूळे अनेक विद्यार्थी , विविध संघटना व महाविद्यालयांनी  याविषयी विनंती  केल्‍याने आता ऑनलाईन  फॉर्म भरण्‍याची  मुदत  दि. 27 मार्च 2012 पर्यंत  वाढविण्‍यात आलेली आहे. वाढीव मुदतीत ऑनलाईन अर्ज भरणा-या विद्यार्थ्‍यांना शिष्‍यवृत्‍ती किंवा शिक्षण फी, परीक्षा फी एप्रिल किंवा मे 2012 नंतर मिळेल याची विद्यार्थ्‍यांनी तसेच प्राचार्यांनी नोंद घ्‍यावी. याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. तसेच विहित मुदतीनंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही. विद्यार्थ्‍यांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्‍याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील.
 ऑन लाईन अर्ज भरताना इयत्‍ता 10 वी च्‍या परीक्षेचा आसन क्रमांक (Seat Number) आणि उत्‍तीर्ण झाल्‍याचे वर्ष ( Year  of Passing)  ही माहिती सोबत ठेवणे अत्‍यावश्‍यक आहे.
याविषयी काही अडचणी असल्‍यास जिल्‍ह्याचे सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण किंवा प्रादेशिक उपायुक्‍त, समाज कल्‍याण विभाग यांचेशी संपर्क साधावा.                                                                
                                                    0000000