Saturday, 3 March 2012

पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांचा दौरा



      वर्धा, दि.3- पर्यावरण आणि सांस्‍कृतीक कार्य मंत्री संजय देवतळे रविवार दिनांक 4 मार्च 2012 रोजी दुपारी 2 वाजता शासकिय विश्रामगृह, वर्धा येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता राष्‍ट्रभाषा समिती, वर्धा व्‍दारा आयोजित 27 वा अखिल भारतीय दिक्षांत समारोह 2012 आणि 22 वा अखिल भारतीय राष्‍ट्रभाषा प्रचार संमेलनास उपस्थिती. स्‍थळ राष्‍ट्रभाषा प्रचार समिती,वर्धा. सोयीनुसार वर्धा येथून शासकिय वाहनाने नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.

राज्‍य शासकीय निवृत्‍तीवेतन धारकांना आवाहन


     वर्धा,दि.3-वर्धा कोषागार कार्यालयातुन निवृत्‍ती वेतन, कुटुंब निवृत्‍तीवेतन धारकांना सुचित करण्‍यात येते की ज्‍या निवृत्‍ती  वेतन धारकांना निवृत्‍तीबाबत काही अडचणी असल्‍यास त्‍या अडचणीचे निराकरण करण्‍यासाठी दिनांक 9 मार्च 2012 रोजी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत कोषागार कार्यालय, वर्धा येथे मेळावा आयेाजित केलेला आहे. या मेळाव्‍याला  हजर राहुन अडचणीचे निराकरण करुन घ्‍यावे. असे कोषागार अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                              0000

माजी सैनिकांचा मेळावा


      वर्धा, दि. 3- कर्नल सुहास शं. जतकर (निवृत्‍त), संचालक, सैनिक कल्‍याण विभाग, महाराष्‍ट्र राज्‍य यांचे अध्‍यक्षतेखाली बुधवार दिनांक 14 मार्च 2012 रोजी विकास भवन वर्धा येथे सकाळी 11 वाजता माजी सैनिकांचा मेळावा आयोजीत केला आहे. माजी सैनिकांनी मोठ्या संख्‍येने मेळाव्‍यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                             000000

किमान कौशल्‍यावर आधारीत व्‍यवसाय अभ्‍यासक्रम विना अनुदान तत्‍वावर मान्‍यता देण्‍याकरीता प्रस्‍ताव आमंत्रित विलंब शुल्‍कासह अंतिम दिनांक 31 मार्च 2012


      वर्धा, दि. 3- व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांचे मार्फत सन 2012-13 पासुन जिल्‍ह्यातील शासकीय व अशासकीय संस्‍थांमधुन पुर्व व्‍यावसायिक अभ्‍यासक्रम (तंत्रिका शाळा) + 2 स्‍तरावरील व्दिलक्षी व्‍यवसाय अभ्‍यासक्रम किमान कौशल्‍यावर आधारित व्‍यवसाय अभ्‍यासक्रमाच्‍या नवीन तुकड्यांना कायमस्‍वरुपी विना अनुदान तत्‍वावर मान्‍यता देण्‍याकरीता प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहे. त्‍याकरीता जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, वर्धा यांचे कार्यालयात इच्‍छुक संस्‍थांकडून अर्ज स्विकारण्‍याची कार्यवाही सुरु करण्‍यात आली आहे., प्रस्‍ताव  दि.15 मार्च 2012 पर्यंत सादर करावयाचे आहे. विलंब शुल्‍कासह दि. 31 मार्च 2012 पर्यंत अर्ज प्रस्‍ताव स्विकारले जातील. यासाठी प्रती तुकडी, प्रती अभ्‍यासक्रम नियमित शुल्‍क रु. 2000 असून विलंब शुल्‍कासह प्रती तुकडी प्रती अभ्‍यासक्रम रु. 3000 भरावयाचे आहे.
    पुर्व व्‍यावसायिक अभ्‍यासक्रम (तांत्रिक शाळा), + 2 स्‍तरावरील व्दिलक्षी व्‍यवसाय अभ्‍यासक्रम (बायफोकल), + 2 स्‍तरावरील किमान कौशल्‍यावर आधारित व्‍यवसाय अभ्‍यासक्रम (एम.सी.व्‍ही.सी.) अंतर्गत येणा-या विषयासाठी प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहे.
     या संबधातील अधिक माहितीसाठी संबधितांनी दुरध्‍वनी क्र. 07152-243443 अथवा सौ. एम.व्‍ही.सरोदे, कार्यालय अधिक्षक, सौ. एन. डब्‍लु. ठाकरे, लेखापरीक्षक यांचेशी संपर्क साधावा. असे जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, आर.डी.भोयर, वर्धा यांनी कळविले आहे.
                           0000000 

Thursday, 1 March 2012

कोरडवाहू शाश्वत शेती प्रकल्‍पाच्‍या तळणी (भा) गावाला कृषी सहसंचालक यांची भेट


      वर्धा, दि. 1 – विभागीय कृषि सहसंचालक जे.सी.भुतडा व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी कोरडवाहू शाश्र्वत शेती विकास कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्‍या देवळी तालुक्‍यातील मौजा-तळणी (भा) गावाला भेट दिली.
     मान्‍यवरांनी भेटी दरम्‍यान प्रकल्‍पांतर्गत म्‍हशी खरेदी केलेल्‍या लाभार्थ्‍यांशी चर्चा केली. प्रकल्‍पाचे उद्दिष्‍ट, महत्‍व, फायदे व कोरडवाहू क्षेत्रामध्‍ये शाश्र्वत उत्‍पन्‍न घेण्‍यासाठी पारंपारीक पिका व्‍यतिरिक्‍त जोडधंदे जसे गाई, म्‍हशी, शेळ्या, मेंढ्या, कुक्‍कुटपालन इत्‍यादी व्‍यवसायाची जोड देणे अत्‍यंत आवश्‍यक असल्‍याचे सांगितले. तसेच जे दुध उत्‍पादित होते त्‍या दुधापासुन इतर दुग्‍धजन्‍य पदार्थ जसे दी, तूप, लोणी, ताक, पनीर, खवा इ. पदार्थ केल्‍यास जास्‍तीचा पैसा मिळू शकतो. या व्‍यतिरिक्‍त शेडनेट हाऊस, विहिर पुर्नभरण, शेततळे, बांधबंदिस्‍ती इ. शेतामध्‍ये उपचार केल्‍यास पाणीसाठा वाढवून बागायती खाली क्षेत्र वाढविता येते. आतापर्यंत या गावामध्‍ये 40 शेतक-यांना 37 हेकटर क्षेत्राकरीता गतिमान कडधान्‍य उत्‍पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा बियाणे जॉकी वाण 80 किलो, रायझोबियम 1 किलो, बिव्‍हेरीया 3 किलो, पीएसबी 1 किलो, ट्रायकोडर्मा अर्धा किलो, झिंक सल्‍फेट 20 किलो, डीएपी 100 किलो, फेरस सल्‍फेट 10 किलो, एचएनपीव्‍ही 500 मि.ली., अॅझोडिरेक्‍टीन 1 लिटर, फेरोमन सापळे 15 नग, हेलिलुर्स 45 नग असा रुपये 5400 प्रती हेक्‍टर प्रती शेतकरी करीता लाभ दिलेला आहे.
     वैरण विकास कार्यक्रमांतर्गत 25 शेतक-यांना 7.20 हेक्‍टरसाठी चा-याचा मका, ज्‍वारीचा लाभ दिलेला आहे. आतापर्यंत 35 शेतक-यांनी शासकीय अनुदानावर म्‍हशीची खरेदी केलेली आहे व त्‍याचा व्‍यवसाय सुरु झालेला आहे.
     गावामध्‍ये पायाभूत सवर्हे करुन 100 शेतक-यांची निवड केलेली आहे. त्‍यांना गाई, म्‍हशी, शेळ्या व कृषि विभागाच्‍या इतर योजनांचा सुध्‍दा लाभ मिहणार आहे. यावेळी डॉ. भुतडा यांनी या सर्व उपक्रमाची पाहणी केली. व शेतक-यांशी चर्चा सुध्‍दा केली. व राबवित असलेल्‍या  प्रकल्‍पाबद्दल समाधान व्‍यक्‍त केले. सदर भेटीच्‍या वेळी उप विभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, देवळीचे तालुका कृषि अधिकारी सुभाष निगोट, मंडळ कृषि अधिकारी कऊटकर, कृषि सहाय्यक राठोड व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
                                00000     

अपंग अनुशेष अंतर्गत प्रत्‍यक्ष मुलाखती 12 रोजी


      वर्धा,दि.1-महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा विभागातर्फे अपंग अनुशेष भरती अंतर्गत लिपीक-टंकलेखक (कनिष्‍ठ) पदासाठी प्रत्‍यक्ष मुलाखत दिनाक 12 मार्च 2012 रोज सोमवार सकाळी 8-30 वाजता प्रादेशिक कार्यालय, नागपूर, मध्‍यवर्ती बसस्‍थानकाजवळ, गणेशपेठ, नागपूर येथे आयोजित केलेली आहे.
    संबधित उमेदवारांना प्रत्‍यक्ष मुलाखत पत्रे पाठविण्‍यात आले आहे. सदर उमेदवारांची निवड गुणवत्‍तेनुसार होणार असुन, पारदर्शकता राहावी म्‍हणुन उमेदवारांनी कोणत्‍याही प्रलोभनाला बळी पडू नये. प्रलोभने दाखविणारी व्‍यक्‍ती आढळल्‍यास किंवा पैशाची मागणी करीत असल्‍यास त्‍यांच्‍या विरुध्‍द त्‍वरीत रा.प. महामंडळाचे अध्‍यक्ष, म.रा.मा.प. महामंडळाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक, मुख्‍य सुरक्षा व दक्षता अधिकारी, महाव्‍यवस्‍थापक (क. व. औ.स. रा.प.मुंबई प्रादेशिक व्‍यवस्‍थापक, रा.प.नागपूर विभाग नियंत्रक, रा.प. वर्धा तसेच संबंधित पोलीस स्‍टेशन व अॅन्‍टी करप्‍शन ब्‍युरो, वर्धा यांचेकडे तक्रार करावी. असे विभाग नियंत्रक राज्‍य परिवहन, वर्धा कळवितात.
                                 000000

राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांचा दौरा


      वर्धा, दि. 1- पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता, पर्यटन, अन्‍न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्‍यमंत्री दिनांक 1 मार्च 2012 रोजी सायंकाळी वर्धेत आगमन होणार असून, शुक्रवार दिनांक 2 मार्च  व शनिवार दिनांक 3 मार्च 2012 रोजी स्‍थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. राखीव व मुक्‍काम करतील.