Wednesday, 29 February 2012

पर्यवेक्षिका पदाच्‍या मुलाखती 6 मार्च रोजी


      वर्धा,दि.29-वर्धा जिल्‍हा परिषदे अंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्‍या पर्यवेक्षिका या सवंर्गातील रिक्‍त असलेल्‍या पदाकरीता दिनांक 6 मार्च 2010 रोजी घेण्‍यात आलेल्‍या लेखी परीक्षेचा निकाल दिनांक 28.2.2012 रोजी जाहीर करण्‍यात आला असुन लेखी परीक्षेत गुणानुक्रमे पात्र ठरलेल्‍या उमेदवारांच्‍या मुलाखती दिनांक.6 मार्च 2012 रोजी मा.जिल्‍हाधिकारी वर्धा यांचे कक्षात सकाळी 11.00 वाजता पासुन आयोजित करण्‍यात आल्‍या आहेत.
     लेखी परीक्षेचा निकाल जिल्‍हा परिषद कार्यालय वर्धा व मा.जिल्‍हाधिकारी कार्यालय वर्धा चे नोटीस बोर्डवर प्रसिध्‍द करण्‍यात आला आहे. लेखी परीक्षेतून मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्‍या उमेदवारांनी दिनांक. 6 मार्च 2012 रोजी जिल्‍हाधिकारी वर्धा यांचे कक्षात स्‍वखर्चाने सकाळी 10.00 वाजता उपस्थित रहावे असे महिला व बाल विकास विभागामार्फेत कळविण्‍यात येत आहे. मुलाखतीचे पत्र स्‍वंतत्रपणे पाठविण्‍यात आले आहे. असे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (बाक)जिल्‍हा परिषद, वर्धा कळवितात.
0000

जिल्ह्यात केरोसीनचे वितरण


      वर्धा,दि.13 - जिवनावश्यक घटकात मोडत असलेल्या केरोसिचे वितरण  जिल्हाधिकारी, वर्धा यांनी एका पत्रानुसार जाहीर केले आहे.
माहे फेब्रुवारी 2012 करीता  तालुकानिहाय परवाना धारकांना केरोसिचे आवंट पुढील प्रमाणे आहे.
जी.एम.राठी वर्धा यांना 180 किलो लिटर. आर्वीचे इब्राहीमखाँ नवरखॉन यांना 156 किलो लिटर, वर्धा येथील रतलाल केला  108 किलो लिटर, देवळी येथील वंदना सुनिल गावंडे यांना 60 किलो लिटर, समुद्रपूर येथील एस.आर.शेंडे यांना 108 किलो लिटर,वर्धा येथील कांतीलाल किशोरीलाल यांना 144 किलो लिटर, वर्धा येथील इब्राहीमजी आदमजी यांना 132 किलो लिटर, आर्वी येथील बी..लाठीवाला यांना 120 किलो लिटर, हिंगणघाट येथील एफ..रहेमतुल्ला यांना 120 किलो लिटर, पुलगाव येथील टि.के.ऍ़ड न्स यांना 96 किलो लिटर केरोसिचे वितरण केल्याचे पत्रकात मुद आहे.
                                                           000000


महालोकअदालत 4 मार्च रोजी


         वर्धा,दि.29- वर्धा जिल्‍ह्यातील मुख्‍यालयी व सर्व तालुका न्‍यायालये, कामगार न्‍यायालये तसेच धर्मदाय आयुक्‍त व इतर न्‍यायालये व न्‍यायाधिकरणे येथे दिनांक 4 मार्च 2012  रोजी महालोकअदालत भरविण्‍यात  येणार आहे.
     दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे व इतर प्रकरणे सामंजस्‍याने सोडविण्‍याकरीता न्‍यायाधीश वर्ग व तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ (पॅनल) आपणास मदत करेल.
     न्‍यायालयात दाखल असलेली प्रकरणे महा-लोकअदालतीमध्‍ये ठेवणेकरीता संबंधितांनी आपली प्रकरणे ज्‍या न्‍यायालयात प्रलंबित असतील त्‍या न्‍यायालयात अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा किंवा तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करावा व दिनांक 4 मार्च 2012 रोजी आयोजित करण्‍यात येणा-या महालोकअदालतीमध्‍ये आपली जास्‍तीत जास्‍त प्रकरणे सामंजस्‍याने व आपसी तडजोडीने सोडवावीत. असे आवाहन जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्‍यक्ष अ.श्रा.शिवणकर यांनी केले आहे.
                           000000

Tuesday, 28 February 2012

सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान 17 मार्च रोजी


          वर्धा,दि.28- महाराष्‍ट्र सुवर्ण महोतसवी वर्षानिमित्‍य राज्‍यात महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करण्‍याकरीता महत्‍वाकांक्षी योजना म्‍हणून सुवर्ण जयंती राज्‍स्‍व अभियान या नावाने राबविण्‍याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. जिल्‍ह्यातील सर्व तालुकयात 17 मार्च रोजी सुवर्ण जयंती राजस्‍व अभियानाला प्रारंभ होईल.
      जिल्‍ह्याने याआधी समाधान योजनेची अंमगलबजावणी केलेली असून त्‍यास मोठे यश देखील प्राप्‍त झालेले आहे. त्‍याच धर्तीवर या अभियाना अंतर्गत आतापावेतो जिल्‍ह्यामध्‍ये विविध प्रमाणपत्राचे वाटप करणे, प्रलंबित फेरफार, प्रलंबित महसुल प्रकरणे निकाली काढणे अशी कामे हाती घेण्‍यात आलेली आहेत. आता या अभियाना अंतर्गत जिल्‍ह्यात प्रत्‍येक तालुक्‍यामध्‍ये दिनांक 17 मार्च 2012 रेाजी मेगा कॅम्‍प घेण्‍याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
     तालुकास्‍तरीय कॅम्‍पमध्‍ये खालील प्रमाणे कार्यवाही करुन प्रकरणे निकाली काढल्‍या  जाणार आहेत व जनतेला विविध दाखले कॅम्‍पचे ठिकाणी उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.
     तलाठी दप्‍तर  अद्यावत करणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, सात बारा वाटप करणे, महसुल अभिलेखातील नकला देणे, विविध प्रमाणपत्राचे वितरण (जात,उत्‍पन्‍न,वारसान,रहिवासी, हैसियत व इतर प्रमाणपत्रे), जमिन मोजणी प्रकरणे, इंदिरा आवास योजने अंतर्गत भुखंड वाटप, शिधा पत्रिकेसाठी अर्ज, शिधा जिन्‍नस मिळत नसल्‍याबाबत तक्रारी, राज्‍य व केंद्र शासनाच्‍या सहाय्य योजनेतील लाभ, आम आदमी विमा योजना, गावठान विसतार योजने अंतर्गत भुखंड वाटप, जलपुर्ती सिंचन विहिरीसाठी अनुदान वाटप करणे, कृषी विषयक योजनेचे विविध लाभ देण्‍याचे योजना, नविन विज जोडणी,आदिवासी विभागाच्‍या विविध योजनेचे लाभ व समाज कल्‍याण  विभागाच्‍या योजनेचे विविध लाभ देण्‍यात येईल.
     जिल्‍ह्याच्‍या आठही तालुक्‍याच्‍या कार्यालयात दिनांक 12 मार्च रोजी अर्ज करण्‍याचा अंतीम दिनांक असून वर्धासाठी उपविभागीय अधिकारी वर्धा , सेलूसाठी जिल्‍हा नियेाजन अधिकारी,वर्धा, देवळीसाठी जिल्‍हा पुरवठा अधिकारी वर्धा, आर्वीसाठी उपविभागीय अधिकारी आर्वी, आष्‍टीसाठी खजांची विशेष भुसंपादन अधिकारी, कारंजासाठी मेश्राम, विशेष भुसंपादन अधिकारी, हिंगणघाटसाठी उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट व समुद्रपूरसाठी संगितराव उपविभागीय अधिकारी यांच्‍या नेमणूका प्रभारी अधिकारी म्‍हणून करण्‍यात आल्‍या आहेत.
     जिल्‍ह्यातील सर्व नागरिकांनी त्‍यांच्‍या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेच्‍या शिबीराचा पुरेपूर लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                               00000
                                               

हत्‍तीरोग दूरिकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्‍हा आरोग्‍य अधिका-यांचे हस्‍ते संपन्‍न


     वर्धा, दि. 28- हत्‍तीरोग दूरीकरण मोहीमेचा शुभारंभ आज सकाळी नालवाडी येथील आरोग्‍य उपकेंद्र येथे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड यांनी हत्‍ती रोगाची बाधा होऊ नये यासाठी डि.ई.बीच्‍या गोळ्या लाभार्थ्‍यांना देवून मोहिमेचा शुभारंभ केला.
    यावेळी नालवाडीच्‍या सरपंच संजिवनी उरकुडे, अतिरीक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सोमलकर, जिल्‍हा हिवताप अधिकारी मोनीका चारमोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.झोडे, डॉ. सुनितकरी व डॉ.पि.आर. धाकटे उपस्थित होते.
     याप्रसंगी बो्लताना डॉ. राठोड म्‍हणाले की हत्‍तीरोग हा आजार गंभिर स्‍वरुपाचा असून, त्‍यापासून शरिरावर विकृती निर्माण होऊ शकते. हा आजार होऊ नये यासाठी हत्‍तीरोग दूरीकरण मोहीम सुरु करण्‍यात आली असून, त्‍याचा लाभ सर्व ग्रामीण व शहरी जनतेनी करुन घ्‍यावा जेणेकरुन भविष्‍यात आरोग्‍य  अधिक सुदृढ राहील.
     यावेळी चारमोडे म्‍हणाल्‍या  की 2 वर्षाखालील मुले गर्भवती स्‍त्री व गंभीर आजार रुग्‍ण सोडून लाभार्थ्‍यांना घरोघरी गोळ्या खाऊ घालण्‍याकरीता आरोग्‍य कर्मचारी येतील, त्‍यांच्‍या समक्ष डि.ई.सीच्‍या गोळ्याचे सेवण करावे. ह्या मोहिमे अंतर्गत जिल्‍ह्यात 1642 कम्रचारी तसेच 400 पर्यवेक्षक कार्यरत आहेत. सदर मोहिमेत 34 लाख 67 हजार डी.ई.सी. गोळ्या जिल्‍हास्‍तरांपासून गांवपातळीस्‍तरावंर पोहचविण्‍यात आलेले आहेत. ह्या आजाराचा प्रसार डासापासून सुक्ष्‍मकृतीमुळे होतो. प्रथम अवस्‍थेतील हत्‍तीरोग या आजाराचे लक्षण विरहित असून जंतू आपल्‍या शरीरात राहू नये व भविष्‍यात कधीही हत्‍तीरोगाची बाधा होवू नये म्‍हणून प्रत्‍येकाने गोळ्या खाणे गरजेचे आहे. एकदा रोग बळावल्‍यावर उपाय नाहीच. परंतू हत्‍तीरोग होवू नये म्‍हणून डी.ई.सी.गोळ्यांची फक्‍त एकच मात्रा वर्षातून एकदा सतत 5 वर्ष घेतल्‍यास, हत्‍तीरोग होत नाही. डी.ई.सी.गोळ्या  सुरक्षित असून, गोळ्यांचे सेवन केल्‍यानंतर एखाद्या व्‍यक्‍तीला ताप किंवा पुरळ आल्‍यास त्‍यांच्‍या शरीरात मॉयक्रोफायलेरीयाचे जंतू आहेतच असे समजावे.असेही त्‍या म्‍हणाल्‍या
    या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व आभार डॉ. झोडे यांनी केले.
    कार्यक्रमाला मोठ्यासंख्‍येने परिसरातील लाभार्थी तसेच आरोग्‍य कर्मचारी उपस्थित होते.
                                    000000 

आठवडी बाजाराचा लिलाव


      वर्धा, दि.28- जिल्‍हा परिषद, वर्धा अंतर्गत आठवडी बाजाराचा फेरलिलाव (चौथ्‍यांदा लिलाव) दिनांक 5 मार्च 2012 रोजी ठिक 11.30 वाजता जिल्‍हा परिषद, वर्धाचे सभागृहात आयेाजीत केलेला आहे. ज्‍या कुणाला या बाजाराचा लिलाव घ्‍यावयाचा आहे त्‍यांनी वरील तारखेला नियेाजीत वेळी उपस्थित रहावे. त्‍याचप्रमाणे ज्‍या बाजाराचा लिलाव करावयाचा आहे ते खालील प्रमाणे आहे.
      पंचायत समिती वर्धा अंतर्गत सालोड (हिरापुर), मदनी , पंचायत समिती  देवळी अंतर्गत सावंगी (येंडे), शिरपुर (होरे), सोनोरा (ढोक), नागझरी, पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत खानगांव, पंचायत समिती समुद्रपुर अंतर्गत वायगांव नि., कांढळी रोडवरील आंबा फळबहार व पंचायत समिती आर्वी अंतर्गत यदहेगांव मु रोडवरील आंबा फळबहार.
     वरील बाबतीत सर्वच बाजाराची सन 2012-2013 ची सरासरी , अटी व शर्ती ग्राम पंचायत विभाग, जिल्‍हा परिषद, वर्धा तथा पंचायत समिती कार्यालयामध्‍ये कार्यालयीन वेळेमध्‍ये पहावयास मिळु शकेल असे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिलहा परिषद, वर्धा कळवितात.
                                00000
    

शिधापत्रिकेवर गॅसची नोंद आवश्‍यक


       वर्धा, दि. 28 – जिल्‍ह्यातील सर्व शिधा पत्रिकाधारकांचे सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थे अंतर्गत संपुर्ण यंत्राणेची संगणीकृत आज्ञावली तयार करण्‍याची कार्यवाही सुरु असून, सर्व गॅस एजन्सिमध्‍ये गॅस स्‍टँपींगचे काम प्रगती पथावर आहे.
    सर्व जनतेस याव्‍दारे जाहिर आवाहन करण्‍यात येते की, त्‍यांनी आपल्‍या शिधापत्रिका संबंधित गॅस एजंन्सि मध्‍ये जावून शिधापत्रिकेवर एक किंवा दोन गॅस सिलेंडरची नोंद करुन घ्‍यावी. तसेच ज्‍यांचेकडे शिधापत्रिका नाही त्‍यांनी विहित नमुन्‍यातील बंधपत्र संबंधित गॅस एजन्सिमध्‍ये जमा करुन आपला दुरध्‍वनी क्रमांक वा भ्रमणध्‍वनी क्रमांक नोंद करुन द्यावा.
    ज्‍या गॅस धारकांनी आपलेकडील गॅसची नोंद शिधापत्रिकेवर घेतली नसेल वा बंधपत्र भरुन दिले नसेल अशा गॅस धारकांना त्‍यांचेकडील रिकामे झालेले सिलेंडर भरुन मिळणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्‍यावी. असे आवाहन जिल्‍हा  पुरवठा अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                                0000