वर्धा,दि.7– जिल्हाधिकारी वर्धा यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये संपूर्ण वर्धा जिल्ह्यासाठी सन 2012 या वर्षाकरीता तीन स्थानिक सुट्या जाहीर झाल्या आहेत. यामध्ये मंगळवार दि. 4 एप्रिल 2012 रोजी अक्षय तृतीया, सोमवार दि. 23 जुलै 2012 रोजी नागपंचमी व सोमवार दि. 15 ऑक्टोंबर 2012 रोजी पितृमोक्ष अमावस्याचा समावेश आहे.
Tuesday, 7 February 2012
Monday, 6 February 2012
पोलीस ताफ्यासह निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना मतदान यंत्रे ठेवण्यात येणा-या संरक्षित कक्षाची पर्यवेक्षकाकडून पाहणी
वर्धा,दि.6-स्थानिक जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक दिनांक
7 फेब्रुवारी 2012 रोजी होणार असून या निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले पर्यवेक्षक महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश झाडे यांचे कालच वर्धेत आगमन झाले. त्यांनी यावेळी संपूर्ण निवडणूक कामाचा तपशिलाने आढावा घेतला.
आज दिनांक 6 फेब्रुवारी 2012 रोजी आर्वी, आष्टी व कारंजा येथील निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी वर्धा जिल्ह्याचे निवडणूक पर्यवेक्षक अविनाश झाडे यांनी तसेच जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी निवडणूक कामकाजाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी पोलीस ताफ्यासह त्यांच्या संबधित मतदान केंद्रावर रवाना झाले. मतदान यंत्र ठेवण्यात येणा-या जागेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन संबधित निवडणूक निर्णय अधिका-यांना आवश्यक त्या सुचना दिल्या.
यावेळी उपप्रादेशिक वाहतूक अधिकारी विजय चवहान, पेालीस उपअधिक्षक (गृह) तथा अप्पर पोलीस अधिक्षक मुरलीधर नळे त्यांच्या समवेत होते.
000000
जिल्ह्यातील न्यायालयांना ७ फेब्रुवारीला सार्वजनिक सुटी जाहीर
वर्धा,दि.6- वर्धा जिल्ह्यामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2012 चे अनुषंगाने वर्धा न्यायीक जिल्ह्यातील सर्व न्यायालये व त्यांच्या कार्यालयाकरिता मंगळवार दि. ७ फेब्रुवारी 2012 रेाजी सार्वजनिक सुटी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वर्धा यांनी जाहीर केली आहे.
तसेच दि. ७ फेब्रुवारी 2012 रेाजीची सुटी जाहीर केल्याने या सुट्टीच्या ऐवजी शनिवार दिनांक 10 मार्च 2012 रेाजी कार्यालय आणि न्यायालयीन कामकाजाचा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
वरील आदेशाचे वर्धा न्यायीक जिल्ह्यातील सर्व न्यायालय आणि आस्थापना यांनी काटेकोरपणे पालन करावे व त्याबाबतचा अहवाल कार्यालयास सादर करावा. असे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अ.श्रा. शिवणकर वर्धा यांनी एका आदेशाव्दारे कळविले आहे.
000000
Sunday, 5 February 2012
12 फेब्रुवारीला अधिस्वीकृती धारक पत्रकारांचे सानगडीत शिबीर
भंडारा दि.6: आदित्य अंजली लॉन सानगडी आणि विदर्भ ग्रामीण व शहरी पत्रकार संघ नागपूर यांच्या संयुक्त वतीने नागपूर विभागातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे एक दिवसीय शिबीर आदित्य अंजली लॉन सानगडी ता. साकोली जि.भंडारा येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीराचे उदघाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर- अमरावती विभागाचे संचालक भि.म.कौसल यांच्या हस्ते 12 फेब्रुवारी 2012 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. या शिबीराला मार्गदर्शक म्हणून दै. तरुण भारत चे माजी संपादक तथा जेष्ठ पत्रकार सुधीर पाठक, दै. लोकसत्ताचे माजी निवासी संपादक प्रविण बर्दापूरकर, भंडारा व गोंदिया जिल्हयाचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, दै. युवाराष्ट्र दर्शनचे मुख्य संपादक प्रकाशजी तागडे आणि सानगडी येथील जेष्ठ पत्रकार मनोहरजी लोथे यांची उपस्थिती राहणार आहे.
तरी नागपूर विभागातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनी या शिबीराला आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन जेष्ठ पत्रकार व निमंत्रक भागवत लांडगे आणि विदर्भ ग्रामीण व शहरी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण खोब्रागडे यांनी केले आहे.
0000000
Saturday, 4 February 2012
७ फेब्रुवारीला मतदानाचे दिवशी सुट्टी जाहीर
वर्धा,दि.4- वर्धा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदान दिनांक ७ फेब्रुवारी 2012 रोजी होणार आहे. सदर क्षेत्रातील मतदारांना मतदान करणे शक्य व सुलभ व्हावे याकरीता राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2012 चे पत्रान्वये वर्धा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका होणा-या क्षेत्रामध्ये दिनांक ७ फेब्रुवारी 2012 रोजी स्थानिक सार्वजनीक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी, वर्धा कळवितात.
000000
Friday, 3 February 2012
सोमवार 6 (सहा) फेब्रुवारी रोजीचा लोकशाही दिन होणार नाही
वर्धा, दि.3 – राज्यात जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, राज्यात दिनांक 3 जानेवारी 2012 पासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे सोमवार दि. 6 (सहा)फेब्रुवारी 2012 रोजी होणारा लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही. याबाबत जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
0000
पुलफैल येथे पोषण आहार कार्यक्रम
वर्धा,दि.2-राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान नागरी प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत नागरी भागातील मागास व झोपडपट्टी परिसरातील लोकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी नगर पालिका क्षेत्रामध्ये सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये नागरी आरोग्य केंद्र क्र. 2 पुलफैल वर्धा येथे नुकतेच (20 जानेवारी 2012) पोषण आहार कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शोभा सेलकर तसेच प्रमुख अतिथी नगरसेविका रिना सहारे,वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला कांबळे,अंगणवाडी पर्यवेक्षीका किन्हेकर व परिसरातील माता उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवर मार्गदर्शन करताना म्हणाले की, आहारविषयी प्रत्येक मातेने घ्यावयाची काळजी, पोषक आहाराचे महत्व व फायदे, गरोदर माता व बालक यांच्याकरीता असलेल्या विविध आरोग्य विषयक शासकिय योजना तसेच 0 ते 5 वयोगटातील मुलांचे आरोग्य सुदृढ राहण्याकरीता पोषण आहाराचे महत्व, समाजावून सांगीतले. मुलांच्या वाढीसाठी ज्या पोषण आहाराची आवश्यकता आहे ते योग्य वेळेत मिळाले नाही तर मुलं कुपोषणाकडे वळतात. त्याकरीता पोषण आहारामध्ये काय पदार्थ व किती प्रमाणात घ्यायला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन अंजली थुल तर आभार प्रदर्शन डॉ.उज्वला कांबळे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील माता उपस्थित होत्या.
000000
Subscribe to:
Posts (Atom)