वर्धा,दि.4–शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे शासन निर्णयानुसार समाज कल्याण अधिकारी गट अ जि.प. वर्धा या नावात बदल करण्यता आला असून, यापुढे विद्यमान पदनाम जिल्हा समाज कल्याण अधिकारी वर्धा असे झाले आहे.
Wednesday, 4 January 2012
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी पदनामात बदल
Tuesday, 3 January 2012
महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारीला तर जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान मंगळवार, ३ जानेवारी, २०१२
बृहन्मुंबईसह दहा महानगरपालिका, तसेच २७ जिल्हा परिषदा आणि ३०९ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मंगळवारी मुंबईत जाहीर केला. त्यानुसार महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान होईल तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान होईल. या सर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर मुख्य सचिव चाँद गोयल यावेळी उपस्थित होते.
श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या, आम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०१२ तर दहावीची परीक्षा १ मार्च २०१२ पासून सुरू होत आहे. परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि निवडणुका वेळेवर घेण्याची संविधानिक जबाबदारीही व्यवस्थित पार पडेल.
महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम
महानगरपालिका निवडणुकीसाठी २४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१२ या कालावधित नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सार्वजनिक सुट्टी व रविवारी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. १ फेब्रुवारी २०१२ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. तसेच त्याच दिवशी वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ३ फेब्रुवारी २०१२ असेल. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी मतदान केंद्रांची व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होईल. १६ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता किंवा सर्व केंद्रांवरील मतदान समाप्तीनंतर मतमोजणी होईल. अथवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेता १७ फेब्रुवारी २०१२ रोजी मतमोजणी होईल.
जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे देण्यास १८ जानेवारी २०१२ पासून सुरवात होईल व २३ जानेवारी २०१२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैध उमेदवारांची यादी २४ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशनपत्रे स्वीकारणे किंवा नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१२ असेल. या अपिलावर जिल्हा न्यायाधीशांनी निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख ३० जानेवारी २०१२ राहील. तसेच ही अपिले निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी त्याच दिवशी प्रसिद्ध होईल. जेथे अपील नसेल तेथील नामनिर्देशनपत्रे ३० जानेवारी २०१२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. तसेच जेथे अपील असेल तेथील नामनिर्देशनपत्रे १ फेब्रुवारी २०१२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. जेथे अपील नसेल तेथील उमेदवारांची यादी ३० जानेवारी २०१२ रोजी दुपारी ३.३० नंतर प्रसिद्ध केली जाईल. तसेच त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप होईल आणि जेथे अपील असेल तेथे १ फेब्रुवारी २०१२ रोजी दुपारी ३.३० नंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
१ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ७ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधित मतदान घेण्यात येईल. ८ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरवात होईल.
निवडणूक होणाऱ्या महानगरपालिका
बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर
निवडणूक होणा-या जिल्हा परिषदा
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणा-या पंचायत समित्या.
एकूण जागांचा तपशील
महानगरपालिका : एकूण जागा- १,२४४, महिला- ६२४
जिल्हा परिषदा : एकूण जागा- १,६४१, महिला- ८२८
पंचायत समित्या : एकूण जागा- ३,२५२ महिला- १,६२६
नव्या मतदारांना संधी
निवडणूक होत असलेल्या या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात संपत आहेत. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाने संयुक्तपणे १ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०११ मध्ये `मतदार व्हा` मोहीम राबविली होती. त्यात राज्यभरात एकूण २३ लाख अर्ज प्राप्त झाले असून त्यांची राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत छाननी करण्यात आली आहे. त्यानुसार ५ जानेवारी २०१२ रोजी नवीन मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीमध्ये नव्याने समावेश झालेल्या मतदारांनाही या निवडणुकांमध्ये मतदानाची संधी मिळावी या दृष्टीने महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम आखण्यात आला आहे.
उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ (रुपयांत)
• `अ`वर्ग महानगरपालिका (मुंबई)- १,३५,००० वरून ५,००,०००
• `ब`वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर)- १,००,०० वरून ४,००,०००
• `क`वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक व नवी मुंबई)- १,००,००० वरून ४,००,०००
• `ड`वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व)- १,००,००० वरून ३,००,०००
• जिल्हा परिषदा- ६०,००० वरून ३,००,०००
• पंचायत समित्या- ४०,००० वरून २,००,०००
मतदारांच्या सोयीसाठी
• राज्य निवडणूक आयोगाचे www.mahasec.com हे नवे अद्ययावत संकेतस्थळ
• मतदान केंद्र मध्यवर्ती ठिकाणी असेल
• रांगा टाळण्यासाठी मतदान केंद्रावरील कमाल मतदार संख्येत घट
• बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या १,०००
• उर्वरित महानगरपालिका, जि.प./पं.सं.साठी मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या ८००
• अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था
• अंध, अपंग, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्राधान्य
• राजकीय पक्षांच्या महत्वाच्या पुढाऱ्यांच्या प्रवास खर्चास उमेदवाराच्या खर्चातून सूट
• बाटलीतील शाईऐवजी आता मार्करपेनने मतदारांच्या बोटावर निशाणी
• मतदारांच्या ओळखीसाठी आता `आधार कार्ड`लाही मान्यता
• प्राण्यांचा क्रूरपणे वापर करण्यास प्रतिबंध

यशदाच्या वतीने तीन दिवस कार्यशाळा
आदर्श आचार संहिता लागू
वर्धा, दि. 3 – राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका जाहीर केल्या असून, दि. 3 जानेवारी 2012 पासून आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे.
तेव्हा शहरी भागात व खेडी विभागात सार्वजनिक स्थळी असलेले पताका, पोस्टर, भिंती पत्राके ज्या राष्ट्रीय पक्षाने लावले असतील त्यांनी स्वतः काढून घ्यावे. अन्यथा ते सरकारी यंत्राणे मार्फत काढण्यात येईल. संबंधीतांनी नोंद घ्यावी तसेच आचारसंहिता भंग होणार नाही, याबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी, वर्धा कळवितात. चौथ्या स्तंभाचे स्थान अबाधितच ....!
| 6 जानेवारी, मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या मराठी वृत्तपत्राने एक सशक्त अशा चौथ्या स्तंभाचा आधार लोकशाहील दिला. दर्पण दिनानिमित्त हा लेख. - प्रशांत दैठणकर |
जग तंत्राच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जवळ आलं आहे. आज हातातल्या मोबाईलमध्ये दूरदर्शन व इतर वाहिन्यांचे कार्यक्रम बघणं शक्य झालं आहे. सेाबत इंटरनेटने माहितीची दालनं खुली केली आहेत. या परिस्थितीतही वृत्तपत्रसृष्टीचे महत्व अबाधित आहे. वृत्तपत्रांनी जपलेली सामाजिक बांधिलकी आणि विश्वसनीयता यामुळे हे शक्य झालं आहे.
वृत्तपत्रांना मधल्या काळात विविध प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करावा लाला असला तरी आपल्या सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून वृत्तपत्रसृष्टीने भारतासारख्या सर्वात मोठ्या सक्रीय लोकशाहीमध्ये स्वतः होवून लोकशाहीचा चौथा स्तंभ असं स्थान प्राप्त केलं आहे.
समाजाचे कान आणि डोळ असणा-या वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणावर सामाजिक जागृती केलेली आहे. विविध चळवळींच्या माध्यमातून विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यात वृत्तपत्रांचे महत्व अनन्यसाधारण आहे.
मराठी वृत्तपत्रांमध्ये सामाजिक जाणीवा मोठ्या प्रमाणावर जपल्या जातात. बदलत्या काळात बदलत्या सामाजिक समस्यांची जाण ठेवली जाते. गेल्या काही काळापासून पर्यावरण विषयक जाणीव जागृतीचे काम वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणावर चालविलेले आपणास दिसेल. केवळ पर्यावरणास धोका आहे इतकं सांगून न थांबता पुढचं पाऊल म्हणून पर्यावरण चळवळीत काम करणारी वृत्तपत्रे आपणास दिसतील.
पर्यावरणास असणारे धोके समाजासमोर मांडण्यासेाबतच एडस् आणि एच.आय.व्ही. सारख्या संवेदनशील विषयावर वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. आपण समाजाचा महत्वाचा घटक आहोत. या नात्याने समाजातील सर्व घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात राहण्याचा अधिकार आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आण्ण्यासाठी प्रयत्न करणं व त्याबाबत प्रबोधन करणं यात वृत्तपत्रांचे योगदान खूप मोठे आहे.
समाजात घडणा-या घटनांचं प्रतिबिंब वृत्तपत्रामध्ये यावं तसं वृत्तपत्रांनी समाजाला दिशा द्यावी असा दुहेरी प्रवास सध्या वृत्तपत्रासृष्टी करीत आहे. यंत्रणांमधील त्रुटी निदर्शनास आणून देत योग्य दिशेने विकास प्रक्रिया नेण्यात मराठी वृत्तपत्राचे योगदान खूप मोठे आहे. टिव्ही, इंटरनेट आदी माध्यमे आली असली तरी वृत्तपत्राचे महत्व यामुळेच अबाधित राहिले आहे.
`स्कूल बस ` ची सुरक्षा महत्वाची ....!
`स्कूल बस ` ची सुरक्षा महत्वाची ....!
रस्ते सुरक्षा पंधवड्याला सुरुवात झाली आणि हरणातल्या भीषण अपघाताची बातमी समोर आली. या निमित्ताने शालेय मुलांची वाहतूक करणा-या बस आणि सुरक्षेचे नियम याबाबत वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दिलेली ही माहिती.
लेखक – विजय चव्हाण
शब्दांकन - प्रशांत दैठणकर
हरयाणातील अंबाला जवळ शालेय विद्यार्थ्यांच्या अपघाताची जी दुर्दैवी घटना घडली त्या 12 शाळकरी मुलांचा जीव गेला. क्ष्णभर हळळळ व्यक्त करुन पुन्हा जगरहाटीला सुरुवात करण्याची आपली सवय असते. आपण या घटनेचे गांभीर्य जाणून आपल्या आसपास याबाबत जागरुकता ठेवावी ही शिकवण सा-या पालकांसाठी आहे.
शाळांसाठी मुलांना सोडताना बरेच पालक घराच्या कोप-यावर आली बस आणि दिलं मुलांना बसवून त्यात या पलिकडे फारसा विचार करताना दिसत नाहीत. केवळ स्वस्त सेवा आहे. यापेाटी खच्चून भरलेल्या स्कूलबसमध्ये मुलांना पाठवणारे अनेक पालक आहेत. बसेससाठी सुरक्षेचे नियम असे आहेत.
शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबे निश्चित करणे या बाबींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळेची एक परिवहन समिती असेल आणि ही समिती, वाहनाची कागदपत्रे जसेः नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचे लायसन, अग्निशामक, प्रथमोपचार पेटी इत्यादींची पडताळणी करील.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण हे शालेय व्यवस्थापन, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका किंवा नगरपरिषदेशी विचारविनिमय करुन, शाळेच्या वेळा आणि मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन, केवळ स्कूल बसकरिता यथोचित ठिकाणी वाहनतळ आणि वाहन थांबे विनिर्दिष्ट करील.
शाळेच्या मालकीच्या आणि मुलांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणा-या वाहनांच्या संबंधात परवाना देणे आणि त्याचे नूतनीकरण करणे याकरिता प्रत्येक अर्ज या नियमान्वये अनुसूचीमध्ये विहित केलेल्या नमुना पी.एससी,सी.ओ.एस. नुसार असेल.
शाळेव्यतिरिक्त इतरांच्या मालकीच्या असलेल्या आणि शाळेचे कंत्राटी वाहन म्हणून वापरण्यात येणा-या वाहनांच्या संबंधात परवाना देणे आणि त्यांचे नूतनीकरण करणे याकरिता प्रत्येक अर्ज या नियमांन्वये अनुसूचीमध्ये विहित केलेलया नमुना पी.सीओ.एस.नुसार असेल.
परवान्यामध्ये समावेश केलेली वाहने आणि शाळेतील मुलांचे वाहन करण्याकरिता केवळ वापर करण्यात येणारी वाहने यांना पिवळा रंग देण्यात येईल आणि वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला स्कूल बस असे लिहिलेले शब्द दिसले पाहिजे. तसेच शाळेची ओळख पटण्याकरिता वाहनाच्या खिडकीखाली सर्व बाजूंना 150 मिलीमीटर रुंदीचा विटकरी पट्टा रंगविलेला असेल ज्यावर शाळेचे नाव लिहिलेले असेल.
शालेय कंत्राटाशिवाय अन्य कोणतेही कंत्राट असलेल्या वाहनांना पिवळा रंग आवश्यक असणार नाही. परंतु वाहनाच्या खिडकीखाली सर्व बाजूंना 400 मिलीमीटर पिवळ्या पट्टीने रंगविलेले असले पाहिजे. स्कूल बस म्हणून वापरण्यात येणारे वाहन सुरुवातीच्या नोंदणीच्या दिनांकापासून 15 वर्षाहून अधिक जुनी असता कामा नये.
वाहनासोबत, ने-आण करणा-या शाळेतील मुलांची संपूर्ण यादी असेल ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग निवासाचा पत्ता, संपर्क दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक, रक्तगट आणि त्याचया किंवा तिच्या नावासमोर त्याला किंवा तिला चढण्याकरिता व उतरण्याकरिता थांबण्याचे ठिकाण त्याच्या किंवा तिच्या घराजवळील या गोष्टी नमूद केलेल्या असतील. यादीमध्ये मूळ ठिकाण, समाप्तीचे ठिकाण आणि वापरण्यात येणारा तपशीलवार मार्ग दाखवणारा शैक्षणिक संस्थेच्या मुख्य व्यक्तीकडून यथोचितरीत्या साक्षांकित केलेला मार्गदेखील नमूद केलेला असेल.
प्रत्येक स्कूल बसमध्ये चालकाव्यतिरिक्त, महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 249 मध्ये विहित केल्याप्रमाणे एक सहवर्ती असेल. तसेच मुलींची ने-आण करीत असलेलया स्कूल बसच्या बाबतीत, बसमध्ये स्त्री सहवर्ती उपस्थित असली पाहिजे जी स्कूल बसमध्ये प्रवास करणा-या मुलींच्या गरजांकउे लक्ष देईल आणि सकूल बसमधून चढताना किंवा उतरताना त्यांच्या सुरक्षेची खात्री घेईल आणि संपूर्ण प्रवासाच्या वेळी सर्वसामान्यपणे काळजीदेखील घेईल.
निकडीच्या प्रसंगी चालक आणि सहवर्ती शाळेच्या प्राधिका-यांना प्रसंगाची माहिती देतील आणि शाळेतील मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करतील.
शिशुवर्गातील मुलांच्या बाबतीत जर अधिकृत व्यक्ती (शाळा आणि पालक यांनी परस्पर सहमतीने मान्यता दिलेली व्यक्ती) बस स्टॉपवर मुलाला घ्यायला आली नाही तर, त्या मुलाला पुन्हा शाळेत पाठविण्यात येईल आणि त्याच्या पालकांना बोलावून ते मूल त्यांना घेऊन जाण्यास सांगण्यात येईल.
चढण्याची खालची पायरी जमिनीपासून 220 मिलीमीटरपेक्षा अधिक उंचीची नसावी आणि सर्व पाय-या पाय न घसरणा-या असल्या पाहिजेत.
स्कूल बसमध्ये बहिर्वक्र भिंगाचा आरसा असला पाहिजे ज्यामुळे चालक मोटार वाहनाचा बाहेर पडण्याचा दरवाजा व प्रवेश दरवाजा आणि मागील भाग स्पष्ट बघू शकेल आणि चालकाला बसच्या आतील भागातील सर्व दृश्य स्पष्ट दिसू शकेल यासाठी मोठा पॅराबोलिक आरसा देखील असेल.
स्कूल बसमध्ये पुढील दरवाजाच्या पाय-यांसांबत हाताने धरता येणा-या कठड्याची तरतूद असली पाहिजे जिचा वापर दरवाजातून आत येणे आणि बाहेर पडणे यासाठी करण्यात येईल. हाताने धरता येणा-या कठड्याची उंची, धातू, रचना शासनाने जारी केलेल्या सर्वसाधारण निर्देशांप्रमाणे असेल.
सकूल बसमध्ये उभा दांडा (स्टॅन्चियन) असेल, प्रत्येक दांडा यथोचित अंतरावर असेल आणि तो छतामध्ये आणि तळपृष्ठाला घट्ट गुंतलेला असेल आणि वाहनाची जमीन न घसरणा-या धातूने बनवलेली असेल, ते धातू शासनाने जारी केलेल्या सर्वसाधारण निर्देशांप्रमाणे असेल.
स्कूल बसमध्ये कोणताही प्रेशर हॉर्न जोडलेला नसला पाहिजे किंवा कर्कश आवाज करणारे जे ब्रेक यंत्रणेमधून हवेच्या दाबाने नियंत्रित होत असेल असे अन्य कोणतेही साधन बसवलेले नसले पाहिजे.
स्कूल बसमध्ये वरील बाजू काचेची असलेली प्रथमोपचार पेटी आणि आ.एस.आय.मार्ग असेलेली प्रत्येकी 5 किलो क्षमतेची ए बी सी प्रकारची दोन अग्निशामके ठेवणे आवश्यक असेल त्यापेकी एक चालकाच्या केबीनमध्ये असेल आणि दुसरे मागे बसच्या आणीबाणीच्या दरवाजाच्या जवळ असेल. परंतु बारापर्यंत आसन क्षमता म्हणून नोंदणी असलेल्या हलक्या चार चाकी मोटार वाहनामध्ये आय.एस.आय.मार्क असलेली 5 किलो क्षमतेचे एबीसी प्रकारचे एक अग्निशामक पुरेसे असेल.
बसमध्ये आसनाखाली बँग ठेवण्याच्या रॅकची तरतूद असली पाहिजे आणि परिवहन आयुक्तांमार्फत त्यांच्या आदेशाने वेळोवेळी विनिर्दिष्ट केलेलया अशा इतर गोष्टींची तरतूद असली पाहिजे. अशा वाहनाच्या चालकाकडे 5 वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव असला पाहिजे आणि तो परिवहन अनुज्ञप्तीधारक असला पाहिजे आणि स्कूल बस चालविण्याच्या सेवेत असताना वैध बिल्ला धारण करीत असला पाहिजे. स्कूल बसमध्ये धोक्याचे इशारे देणारी प्रकाशयोजना (लाईट) असल्या पाहिजेत ज्यामुळे जेव्हा मुले चढताना किंवा उतरताना असे वाहन थांबेल तेव्हा त्या चालू होतील.
शैक्षणिक संस्थेची बस आणि मध्यम किंवा जड प्रवासी मोआर वाहने शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्याच्या प्रयोजनासाठी वापरण्यात येत असतील त्या बाबतीत, खिडकीला 3 आडवे स्टीलचे दांडे बसच्या बाहेरील बाजूने जोडलेले असले पाहिजेत त्या कोणत्याही दोन दांड्यांमधील अंतर हे पाच सेंटीमीटरपेक्षा अधिक असणार नाही अशारीतीने ते जोडलेले असले पाहिजे. वाहनाला वेगनियंत्राक जोडलेले असले पाहिजे त्यामुहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वाहनाचा वेग 40 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक असणार नाही आणि महानगरपालिकाव्यतिरिक्त हद्दीमध्ये तो 50 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक असणार नाही.
वाहन शालेय प्रयोजनासाठी वापरण्यात येत आहे ही वस्तुस्थिती दर्शविण्याकरिता वाहनाच्या पुढच्या व मागच्या बाजूस घट्टपणे चिकटवलेला 350 मिलीमीटर x 350 मिलीमीटर आकाराचा फलक असला पाहिजे. त्या फलकावर काळ्या रंगाच्या 250 मिलीमीटरपेक्षा कमी नसेल इतक्या उंचीच्या शाळेत जाणा-या दोन मुलांची (एक मुलगी व एक मुलगा) चित्रे रंगविलेली असली पाहिजेत. चित्रांच्या खाली काळ्या रंगांमध्ये स्कूल बस असे लिहिलेले असले पाहिजे आणि त्या अक्षरांची उंची किमान 100 मिलीमीटर इतकी असली पाहिजे आणि जाडी (रुंदी) किमान 11 मिलीमीटर इतकी असली पाहिजे.
आसनक्षमता बारापर्यंत असलेलया चार चाकी हलके मोटार वाहन याव्यतिरिक्त असलेलया प्रत्येक स्कूल बसवर शाळेची ओहख दर्शविणारा एक फलक दिसेल असा असावा ज्यावर मार्ग क्रमांक लिहिलेला असावा आणि तो फलक 30 इंच आकाराचा आणि 8 इंच उंचीचा असावा जो पुढे वरच्या बाजूस आणि मागे वरच्या बाजूस दिसेल असा असावा आणि प्रवेशव्दार /बोहर पडण्याच्या दरवाजावरील फलकाची लांबी 18 इंचाच्या आकाराची आणि उंची 8 इंचाची असावी.
शाळेतील मुलांची ने-आण करण्याकरिता वापरण्यात येणारे बारापर्यंत आसन क्षमता असलेले प्रत्येक चार चाकी हलके मोटार वाहन यावर शाळेची ओहख दर्शविण्यासाइी आणि वाहनाचा मार्ग क्रमांक ओळखता येण्यासाठी एक फलक असेल जो पुढील बाजूच्या वरच्या भागावर आणि मागच्या बाजूच्या वरच्या भागावर दिसेल. या फलकाची लांबी 18 इंचाच्या आकाराची आणि उंची 8 इंचाची असेल.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 याच्या नियम 20 च्या तरतुदींचे परवानाधारकाकडून तसेच चालकाकडून काटेकोरपणे पालन करण्यात येईल. स्कूल बस म्हणून वापरण्यात येणा-या वाहनाची संपूर्ण स्टील बॉडीसह बंद स्वरुपाची बॉडी असेल. कोणत्याही कॅनव्हास हूड असलेलया वाहनास स्कूल बस म्हणून मान्यता देण्यात येणार नाही. वाहनामध्ये मुलांसाठी लॉक यंत्राणा जोडलेली असावी.
या प्रवर्गाखाली नोंदणी करण्यात आलेली वाहने ही मोटार वाहन अधिनियम 1988 व त्याखाली करण्यात आलेले नियम यांच्या तरतुदीनुसार योग्यतेच्या चाचणीच्या अधीन असतील. जेथे जेथे उपलब्ध असेल तेथे शाळेचे प्राधिकारी, शाळेतील मुलांना वाहनांमधून सुरक्षितपणे उतरण्यासाठी शाळेच्या परिवास्तूमध्ये जागेची तरतूद करतील. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 याच्या नियम 106 च्या तरतुदींनुसार स्कूल बसमध्ये परवानगी देण्यात आलेल्या मुलांची संख्या निर्धारित करण्यात येईल.
स्कूल बस म्हणून वापरण्यात येणा-या बसमध्ये राज्य परिवहन प्राधिकरणाने वेहोवेळी विनिर्दिष्ट केलेले संकटकालीन बाहेर पडण्याचा दरवाजा किंवा बाहेर पउण्याची खिडकी जोडण्यात येईल. सर्व स्कूल बस, केंद्र सरकार वेळोवेळी विनिर्दिष्ट करेल त्याप्रमाणे बस बॉडी संकल्प चित्र आणि मान्यता एआयएस 063 आणि एआयएस 052 याकरिता व्यवसाय संहिता याव्दारे विहित केलेलया आवश्यकातांचे आणि विनिर्देशांचे अनुपालन करतील.
परिवहन आयुक्त, स्कूल बस म्हणून वापरण्यात येतील अशा सर्व वाहनांच्या प्रतिमानांना मान्यता देईल. तसे करताना, परिवहन आयुक्त, मुलांच्या सुरक्षा लक्षात घेऊन उत्पादकाने पुरविलेल्या सुरक्षाविषयक तरतुदींची खातरजमा करील. राज्य शासनास लेखी कारणे दिल्यानंतर एका किंवा त्यापैकी कोणत्याही शर्तीमधून स्कूल बस म्हणून नोंदणी झालेल्या वाहनांना सूट देता येईल.
शालेय बस संदर्भात जे नियम आहेत त्याचे पालन होते की नाही यासाठी शासनाने समिती बनविलेली आहे. राज्यात शाळेच्या मुलांची वाहतूक करणा-या एकूण 5688 बसेस आहेत. त्यापैकी सुरक्षा नियमांची पूर्तता करणा-या बसेसची संख्या 1780 आहे. नियमावली लागू झाल्यानंतर नोंदणी झालेल्या बसेसची संख्या 1215 इतकी आहे.
वर्धा जिल्ह्यात एकूण 36 बसेस शालेय मुलांची वाहतूक करतात पैकी 9 बसेसनी नियमांची पूर्तता केली आहे. परिवहन विभागातर्फे याबाबत सातत्याने पाठपूरावा होत आहे तथापि शाळेतील समित्या आणि सर्व पालकांनी याबाबत आग्रही भूमिका ठेवण्याची गरज आहे.
विजय चव्हाण
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,वर्धा

Sunday, 1 January 2012
प्रमोद नलावडे माहिती महासंचालक पदी रुजू
शनिवार, ३१ डिसेंबर, २०११
प्रमोद नलावडे (भा.प्र.से.) यांनी शनिवारी माहिती महासंचालक पदाचा कार्यभार प्रभारी महासंचालक राजेश अग्रवाल यांच्याकडून स्वीकारला. श्री.नलावडे हे १९९६ च्या भारतीय प्रशासन सेवेच्या तुकडीतील असून ते यापूर्वी मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा या विभागात सह सचिव या पदावर कार्यरत होते.
श्री.नलावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग, विक्रीकर सह आयुक्त नरिमन पॉईंट विभाग, विक्रीकर सह आयुक्त अन्वेषण विभाग, अपर विक्रीकर आयुक्त (आस्थापना) महाराष्ट्र राज्य अशा विविध पदावर उल्लेखनीय काम करुन आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

Subscribe to:
Posts (Atom)