Thursday, 29 September 2011

पालकमंत्री राजेंद्र मुळक यांचा दौरा


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.29 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------

     वर्धा,दि.29- राज्याचे वित्त व नियोजन, उर्जा, जलसंपदा, संसदीय कार्य आणि उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. राजेंद्र मुळक हे वर्धा जिल्ह्याचे दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
     रविवार दि. 2 ऑक्टोंबर 2011 रोजी सकाळी 10 वाजता  शासकीय वाहनाने नागपूर येथून सेवाग्राम,वर्धा येथे आगमन.सकाळी 10 ते 11-30 वा.पर्यंत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाण आयोजित महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11-35 ते 12-30 वाजेपर्यंत विकास भवन,वर्धा  येथे सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण -2011 चे उदघाटन, स्वच्छता उत्सवाचे उदघाटन, व्यसनमुक्ती तथा अंमली पदार्थ विरोधी सप्ताहाचे उदघाटन करतील. दुपारी 12-30 ते 2-30 पर्यंत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य/विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांचेसमवेत विकासात्मक कामांबाबत बैठक. त्यानंतर दुपारी 2-35 ते 3 वाजेपर्यंत आर्थिक, सामाजिक जाती गणना-2011 बाबत व शालेय पट नोंदणी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थिती. स्थळ:जिल्हाधिकारी कार्यालय,वर्धा. दुपारी 3-05 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3-30 वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी वर्धा यांचे समवेत बैठक. स्थळ: शासकीय विश्रामगृह,वर्धा. त्यानंतर सोईनुसार शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.
                        00000

हिंगणघाट येथील कृषि उत्पन्न बाजारात कापूस तारण योजना प्रायोगिक तत्वावर राबविणार - कृषी मंत्री


   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.29 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------
    वर्धा,दि.29-कापूस उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने राबविलेली कापूस तारण योजना शेतक-यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणारी ठरली असून, ही योजना यापुढे राष्ट्रीय कृषि  विकास योजनेमध्ये अंतर्भूत करुन अधिकाधिक कापूस उत्पादक शेतक-यांना या योजनेच्या माध्यमातून संरक्षण देणार असल्याने या योजनेसाठी 70 टक्के अनुदानासह शासन पुरेशी रक्कम उपलब्ध करेल.ही योजना हिंगणघाटच्या कृषि उत्पन्न बाजारात कापूस तारण योजना म्हणून प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येईल अशी घोषणा कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
     हिंगणघाट येथे काल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात कृषिमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते अभियांत्रिकेच्या व्दितीय वर्गात शिक्षण घेणा-या शेतक-यांच्या पन्नास पाल्यांना लॅपटॉपचे वितरण, शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण, हागणदारी मुक्त झालेल्या गावांना धनादेशाचे वाटप.अल्लीपूर ग्रामपंचायतीतील सदस्यांचा सत्कार व कापूस उत्पादक शेतक-यांना तारण योजने अंतर्गत धनादेशाचे वितरण करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
     यावेळी विदर्भ पाटबंधारेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रा. सुरेश देशमुख, जि.प.उपाध्यक्ष सुनिल राऊत, जि.प.सभापती मोरेश्वर खोडके, पंचायत समिती सभापती इंदिराताई उरकुडकर, सुधिर कोठारी, माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, माजी आमदार डॉ.वसंत बोंडे, दिलीप काळे व जिल्हा कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डावरे व इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.                                          

निसर्गाच्या अवकृपेने कृषि उत्पादनात घट वा वाढ होते याचा थेट परिणाम शेतक-यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत असल्याचे सांगून कृषि मंत्री विखे पाटील म्हणाले की, कापूस उत्पादक    शेतक-यांना कापसाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल होत असतो. त्यांच्या उत्पादक मालाला योग्य भाव मिळावा यासाठी कापूस तारण योजना राबविण्यात येत असून, या योजनेच्या माध्यमातून    शेतक-यांची होणारी पिळवणूकीला निश्चितच पायबंद बसेल व    शेतक-यांना संरक्षण मिळून आर्थिक लाभ सुध्दा पदरात पाडून घेता येईल. हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीने कापूस तारण योजना राबवून शेतक-यांच्या हिताचे नेत्रदिपक असे कार्य केले आहे. आगामी काळात पंचविस, पन्नास व शंभर शेतक-यांचा एक समुह तयार करुन रासायनिक खते व बि-बियाणे पुरविण्याचा शासनाचा संकल्प असून, या योजनेमुळे आतापर्यंत शेतक-यांची होणारी फसवणूक थांबणार असून, घरपोच रासायनिक खते व बि-बियाणे उपलब्ध होतील असेही ते म्हणाले.
पावसाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय शेतक-यांनी करावा. दुग्धव्यवसाय, शेळी व कुक्कुट पालन व्यवसाय केल्यास   शेतक-यांवर येणारी आर्थिक संकटे दूर होण्यास मदत होईल. कृषि उत्पन्न बाजार समितीने अभियांत्रीकीचे शिक्षण  घेणा-या   शेतक-यांच्या पाल्यांसाठी लॅपटॉपचा घेतलेला निर्णय निश्चितच गौरवपूर्ण असून, ही भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक ठरणारी आहे. तसेच त्यांचे कुटूंब संगणक साक्षर होतील असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले की, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपक्रम शेतक-यांच्या हिताचे व संरक्षणासाठी असून, या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे उपयुक्त कार्य होत असल्याचे त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
यावेळी आमदार सुरेश देशमुख म्हणाले की,शेतक-यांसाठी विविध योजना व उपक्रम राबवून कृषि उत्पन्न बाजार समितीने सामाजिक बांधिलकीसोबत प्रगतीच्या उज्वल भविष्याच्या दिशेने बाजार समिती मार्गक्रमण करीत आहे.
यावेळी माजी आमदार राजू तिमांडे यांनीही मार्गदर्शन केले. आपल्या प्रास्ताविक भाषणातून डॉ.सुधिर कोठारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रगतीचा आलेख विस्तारीतपणे सांगितला.
यावेळी मान्यवरांचे हस्ते शेतक-यांच्या पाल्यासाठी 50 लॅपटॉपचे वितरण , कापूस तारण योजने अंतर्गत 700 शेतक-यांना  14 हजार क्विंटल कापसाचे 1 कोटी 40 लक्ष रुपयाचे धनादेशाचे वितरण, हागनदारी मुक्त गावांना 1 लाख 50 हजार रुपयाचा धनादेश वितरण, 3 हजार 500 विद्यार्थ्यांना वर्कबूक पुस्तकाचे वितरण व शेतक-यांचा नेट सेट परिक्षेत उत्तीर्ण झालेल्याचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचलन ओम डालीया यांनी तर आभार प्रदर्शन हरिष वडतकर यांनी केले. याप्रसंगी पंचायत समितीचे व नगर पालीकेचे पदाधिकारी व अधिकारी, अडते, दलाल, व्यापारी व सामान्य नागरीक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                     00000

Wednesday, 28 September 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती,गुरुवार दि.29/9/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
967.76 मि.मी.
निरंक
3
शासनाचे मदत कार्य
सुरू आहे
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान (सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा - 947.75(निरंक)मि.मी.
2)सेलू - 996(निरंक) मि.मी.
3)देवळी -994.02(निरंक) मि.मी.
4)हिंगणघाट-857.3(निरंक) मि.मी.
5)आर्वी -1085.3(निरंक) मि.मी.
6)आष्टी -783.8(निरंक) मि.मी.
7)समुद्रपूर -1165.6(निरंक) मि.मी
8)कारंजा-920.10 (निरंक) मि.मी.

विशेष लेख     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि. 28 ऑगस्ट 2011
----------------------------------------------------------------
नवरात्र हा दुर्गा पुजनाचा काळ. दुर्गा ही शक्ती देवता आहे. या काळात केवळ रास गरबा किंवा जागरण होते असं नाही तर हा एक मोठा महोत्सव असतो. समाजात दुर्गेचं स्थान असणा-या नारी शक्ती बाबत या निमित्तानं मंथन व्हावं या उद्देशानं ही खास लेखमाला.
                                        प्रशांत दैठणकर
_____________________________________________

क्रीडा क्षेत्रातील महिला...!
तेजस्विनी सावंत
     मधू सप्रे या महाराष्ट्रीयन सुंदरीचं विश्वसुंदरीचं पद एका प्रश्नाच्या उत्तराश्ने गेलं आणि तो प्रश्न विचारल्यावर तिनं उत्तर दिलं होतं भारताला ऑलिम्पिकच सूवर्णपदक मिहवता यावं अशी माझी इच्छा आहे. अर्थात तिचं जेतेपद हुकलं तरी तिची कळकळ प्रमाणिक होती याची जाण समस्त भारतीयांना झाली 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये तिचं हे स्वप्नं, खरं म्हणजे प्रत्येक भारतीय मनातल हे स्वप्न अभिनव बिन्द्राने नेमबाजीत पूर्ण केलं. त्याच सुमारास क्रीडा क्षेत्रात महिलांचा दबदबा देखील आता जाणवायला लागला आहे.
सानिया
ड़ें     मुली आणि खेळ हे नातं आपल्याकडे फार काळापासून नाही त्यामुळे या क्षेत्रात वाटचालही फारशी नव्हती मात्र गेल्या दशकभरात हे चित्र बदललं आहे. ब्रिटिशांनी आपल्याला क्रिकेटचं वेड लावलं मात्र तिथ आपल्या देशात त्यांनी सर्वच खेळांना जपलय आपल्याकडे फक्त क्रिकेट एके क्रिकेट असा प्रकार झाल्यानं इतर खेळांकडे दुर्लक्षच झालं सुदैवानं आता चित्र बदलत आहे.
     आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला खेळाडूंमधून भारताचं नाव उल्लेखनीयरित्या पुढे आणण्याचं काम केलं ते टेनिसपटू सानिया मिर्झाने जगभरातील माध्यमांनी तिची चांगली दखल घेतली आणि त्याच प्रेरणेतून अनेक मुली क्रीडा प्रकारांकडे वळलेल्या दिसतात.
सायना नेहवाल
ास
     सानिया मिर्झा नंतर त्याही पेक्षा उच्च कामगिरी करण्याचा मान अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ने प्राप्त केल. या खेळात तिने सर्वच मर्यादा ओलांडत जगज्जेतेपद मिळवलंय तिचीही प्रेरणा घेताना अनेकजण आपणास दिसतील महाराष्ट्राची नेमबाज तेजस्वीनी सावंतही कौतूक करावं लागेल.
     मुळात खेळाकडे बघण्याचा औद्योगिक घराण्यांचा तसेच सरकारचा दृष्टीकोण बदलला असल्याने या क्षेत्रात हा भरीव असा सकारात्मक बदल दिसत आहे. खेळासाठी राखीव गुण ठेवणे ज्याच सोबत गुणवंताना रोख पुरस्कार देणे यामुळे आता सारे इतर क्रीडा प्रकारांकडे वळत आहेत. या स्थितीत त्यांना दर्जेदार क्रीडा साहित्य आणि योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. ते पूर्णपणाने मिळाले तर भारतात नैपूण्याची कमतरता नाही त्यामुळे योणा-या काळात मुली या क्षेत्रात करिअर करु शकतील अशी खात्री वाटते.
पी. टी.उषा
     पी.टी.उषाची परंपरा चालविणा-या अनेक गुणवंत महिला खेळाडू भारतात आहेत त्यांना योग्य प्रोत्साहन मिळाले तर ते अमेरिकन ऑलिम्पिक मधलं सेकंदाच्या हजाराव्या भागाच्या फरकानं गमावलेलं एकच काय तर अशा अनेक पदकांची लयलूट येणा-या काळात भारतीय महिला खेळाडू करतील हे नक्की आहे.
-प्रशांत दैठणकर

आर्थिक सक्षमीकरण महिलांचं


विशेष लेख     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि. 28 ऑगस्ट 2011
----------------------------------------------------------------

     नवरात्र हा दुर्गा पुजनाचा काळ. दुर्गा ही शक्ती देवता आहे. या काळात केवळ रास गरबा किंवा जागरण होते असं नाही तर हा एक मोठा महोत्सव असतो. समाजात दुर्गेचं स्थान असणा-या नारी शक्ती बाबत या निमित्तानं मंथन व्हावं या उद्देशानं ही खास लेखमाला.
                                        प्रशांत दैठणकर
_____________________________________________
महिला गेल्या चार दशकात मोठ्या प्रमाणावर शिकल्या आणि त्यामुळे त्यांना नोकरीसाठी संधीही मिळायला लागली. त्यामुळे समाजातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. गेल्या 50 वर्षात या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाल्याचे दिसते.
     मुंबईत यंत्र युगाच्या काळात गिरणी कामगार मोठ्या प्रमाणावर होते. कारखाना म्हटल्यावर तिथं महिलांना काम करण्याची संधी नव्हती. नंतरच्या काळात कार्पोरट युग आल्याने महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाली मात्र ती संधी सेक्रेटरी लिपिक अशाच पदांची असायची.
     स्वातंत्र्यानंतर महिलांना चांगल्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाली तर काही कर्तबगार महिलांनी स्वत:साठी अशी संधी निर्माण करीत नवनविन क्षेत्रांत प्रवेश केला.
     स्वातंत्र्योत्तर काळात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीच्या रुपाने सत्तेचे सर्वोच्च पद महिलेकडे आले. त्यानंतर समाजात महिलांनी स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अनेकजणींना यश मिळाले.
          क्रीडा क्षेत्रात देशाचं नाव उज्‍ज्वल करणा-या सानिया मिर्झा, सायना नेहवाल, तेजस्वीनी सावंत सारख्या आजच्या पिढीच्या महिलांना 60 च्या दशकाच्या तुलनेत कमी संघर्ष सहन करावा लागला. ऐश्वर्या रॉय-बच्‍चन आणि सुस्मिता सेन यांनी 90 च्या दशकात आपल्या सौंदर्यांच्या जोरावर वै‍श्विक स्थान प्राप्त करुन देशाचं नाव उंचावलं.
     स्त्री म्हटल्यावर अमुकच करिअर हवं अशी पालकांची विचारसरणी राहिलेली नाही. पालक हल्ली मुलींना संधी देण्याचा प्रयत्न करतात याचं कारण अर्थातच घरात शिकलेली आई असणं हेच आहे. स्त्री शिक्षणाचा फायदा आजच्या पिढीला मिळत आहे. आज शहरी भागात कमावत्या स्त्रियांचे प्रमाण वाढलेले आहे.
     कल्पना चावला, इंदिरा नुवी यांनी वेगळी क्षेत्रं आपण निवडू शकतो आणि त्यात उंचीपर्यंत जाऊ शकतो हे दाखवून दिलं. पेप्सीको सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सर्वोच्य पदावर इंदिरा नुवी पोहचल्या तर कल्पना चावला अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला ठरली. पृथ्वीवरचं उंच शिखर पादाक्रांत करणारी बचेंद्री पालही यात आहे. आणि या सर्व महिला आजच्या पिढीच्या समोर आदर्श म्हणून आहेत.
     पोलिस दल व सैन्यात स्त्रिया हा विचार काही काळापूर्वी नव्हता मात्र आज चित्र बदललं आहे. देशाचं सर्वोच्‍च पद अर्थात राष्ट्रपती पद प्रतिभा पाटील यांना मिळालं  त्याच प्रमाणे लोकसभेचं सभापतीपद मीरा कुमार यांना मिळालं या पदांवर येणारी पहिली महिला असल्याचा मान त्यांनी मिळवला.
     एकीकडे आर्थिक सक्षमीकरणात वाढ झाली असली तरी दुसरीकडे घरच्या चक्रातून मात्र त्यांची सुटका झालेली नाही. म्हणूनच नारी शक्तीच्या या वाटचालीचं कौतूक करायचं.
                         00000

शालेय पटपडताळणीची तयारी वेगात


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.28 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------
     
वर्धा,दि.28-वर्धा जिल्ह्यात 3 ते 5 ऑक्टोंबर दरम्यान सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हजेरीपटाची तपासणी होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून सर्व यंत्रणा सज्ज होत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार वर्धा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटपडताळणी दिनांक 3 ते 5 ऑक्टोंबर 2011 या कालावधीत करण्यात येणार आहे. या पटपडताळणीसाठी एकुण 150 पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकामध्ये वर्ग 1 व वर्ग 2 अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली असून या पथकांसाठी एकुण 150 वाहने अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत.
     या पथकाव्यतिरीक्त महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी महसूल व तहसिलदार यांचे एकुण 13 भरारी पथकांव्दारे मा.जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे नियंत्रण राहणार आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातंर्गत/जिल्हाबाहेरुन विद्यार्थ्यांची वाहतून होण्याची शक्यता विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने अशा वाहतूकीवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये प्रतिबंध घातलेला आहे. अशा वाहतूकीस आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी वर्धा यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रादेशिक परिवहन आधिकारी, अप्पर जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांचे समवेत तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्हाधिका-यांनी जिल्हा अंतर्गत व जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांची वाहतूक रोखण्यासाठी आवश्यक ती नाकाबंदी करणे व विशेष पथके नियुक्त करणेबाबत आदेशीत केलेले आहे.
या पटपडताळणी मोहीमे दरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आढळल्यास संबधित वाहन मालक/चालक, संस्था चालक, मुख्याध्यापक व संबधित विद्यार्थी यांच्या विरुध्द कडक कार्यवाही करण्यात यईल असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.
     3 ते 5 ऑक्टोंबर 2011 या कालावधीत होणा-या पटपडताळणीसाठी सर्व शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षण,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हजर ठेवावे व पटपडताळणी मोहीमेस सहकार्य करावे असे अवाहन जिल्हाधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                     00000

कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचा वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रम


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.28 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------
                    
वर्धा, दि. 28- राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ हे उद्या गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत.
     त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम असा सकाळी 10-30 वाजता हिंगणघाट येथे आगमन व शहिद चंद्रशेखर कोरे यांच्या घरी भेट. 11 ते 12-30 शहिद चंद्रशेखर कोरे यांचे नाव चौकाला देण्याच्या नगर परिषद हिंगणघाटच्या कार्यक्रमास उपस्थिती. 12-30 ते   1-30 प्रा. राजू तिमांडे यांच्या निवासस्थानी राखीव, 1-30 ते   2-30 दरम्यान कामगारांच्या समस्यांबाबत कामगारांशी चर्चा तसेच पक्ष कार्यकर्त्यांसोबत चर्चा. दुपारी 3-30 ते 5-30 राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे आयोजित कामगार मेळाव्यास उपस्थित राहून ते 5-30 वाजता मोटारीने नागपूरकडे रवाना होतील.
                           00000