| क्र. | बाब | नैसर्गिक आपत्तीचा तपशील |
| 1 | अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान | निरंक |
| 2 | अ) या वर्षी आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस | 783.54 मि.मी. 20.98 मि.मी. |
| 3 | शासनाचे मदत कार्य | निरंक |
| 4 | मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून | निरंक |
| 5 | बाधीत गावे | निरंक |
| 6 | बाधीत शहरे | निरंक |
| 7 | नुकसान झालेल्या घरांची संख्या | निरंक |
| 8 | नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या | निरंक |
| 9 | मृत झालेली जनावरे | निरंक |
| 10 | व्यापारी नुकसान | निरंक |
| 11 | आपदग्रस्त कुटूंबे व व्यक्ती | निरंक |
| 12 | पूल व रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता) | निरंक |
| 13 | जनजीवन | सुरळीत |
| 14 | इतर | निरंक |
| 15 | तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे) | 1)वर्धा -678.92(30.3) मि.मी. 2)सेलू - 766(12) मि.मी. 3)देवळी -855.24(16) मि.मी. 4)हिंगणघाट-774(27) मि.मी. 5)आर्वी -915(8) मि.मी. 6)आष्टी -682.2(10.4) मि.मी. 7)समुद्रपूर -820.2(59.2) मि.मी 8)कारंजा-777 (5) मि.मी. |
Wednesday, 31 August 2011
वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती, गुरुवार दि.1/9/2011
Tuesday, 30 August 2011
जिल्ह्यातील सहा जलाशये 100 टक्के भरलेले
महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.30ऑगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.30-वर्धा पाटबंधारे विभाग यांनी पाठविलेल्या अहवालानुसार आज दिनांक 30 ऑगस्ट 2011 रोजी जलाशयातील पाण्याच्या पातळीच्या स्थितीत सुधारणा झाली असून,सहा जलाशये 100 टक्के भरलेली आहे.
धाम प्रकल्प महाकाली जलाशय 86.73 टक्के,बोर प्रकल्प 94.02 टक्के,डोंगरगाव पंचधारा व मदन उन्नई,पोथरा प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प व सुकळी लघू प्रकल्प 100 टक्के, मदन प्रकल्प 80.12 टक्के, लाल नाला प्रकल्प 88.71 टक्के, नांद प्रकल्प 47.87 टक्के, वडगाव प्रकल्प 93.79 टक्के, उर्ध्व वर्धा धरण 92.21 टक्के, निम्न वर्धा प्रकल्प 6.08 टक्के, बेंबाळा प्रकल्प 38.46 टक्के व सुकळी लघु प्रकल्प 100 टक्के भरलेले आहेत.
पोथरा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 19 सें.मी.ने 33.28 क्युसेस, डोंगरगांव प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5 से.मी. ने 1.73 क्युसेस , पंचधारा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5 से.मी. ने 2.44 क्युसेस, मदन उन्नई धरणाच्या सांडव्यावरुन 5 सें.मी.ने 3.11 क्युसेस, वर्धा कार नदी प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 15 से.मी.ने 21.68 क्युसेस व सुकळी लघू प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 1 से.मी.ने 0.38 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.
वडगाव प्रकल्पाचे 3 व्दार 25 से.मी. ने उघडले असून, त्यातून 71.58 पाण्याचा विसर्ग होत आहे. उर्ध्व वर्धा धरणातून 11 व्दारे 15 से.मी. ने उघडले असून, त्यातून 270 घ.मीटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. निम्न वर्धा धरणाचे 30 व्दारे 20 से.मी. ने उघडले असून, त्यातून 262 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. बेंबाळा प्रकल्पाचे 2 व्दार 5 से.मी. ने उघडले असून, त्यातून 9.60 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. असे अहवालात नमुद आहे.
00000
Monday, 29 August 2011
वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती मंगळवार दि.30/8/2011
| क्र. | बाब | नैसर्गिक आपत्तीचा तपशील |
| 1 | अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान | निरंक |
| 2 | अ) या वर्षी आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस | 732.47 मि.मी. 0.13 मि.मी. |
| 3 | शासनाचे मदत कार्य | निरंक |
| 4 | मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून | निरंक |
| 5 | बाधीत गावे | निरंक |
| 6 | बाधीत शहरे | निरंक |
| 7 | नुकसान झालेल्या घरांची संख्या | निरंक |
| 8 | नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या | निरंक |
| 9 | मृत झालेली जनावरे | निरंक |
| 10 | व्यापारी नुकसान | निरंक |
| 11 | आपदग्रस्त कुटूंबे व व्यक्ती | निरंक |
| 12 | पूल व रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता) | निरंक |
| 13 | जनजीवन | सुरळीत |
| 14 | इतर | निरंक |
| 15 | तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे) | 1)वर्धा -638.22(निरंक) मि.मी. 2)सेलू - 746(निरंक) मि.मी. 3)देवळी -824.04(1.04) मि.मी. 4)हिंगणघाट-730(निरंक) मि.मी. 5)आर्वी -886(निरंक) मि.मी. 6)आष्टी -631.8(निरंक) मि.मी. 7)समुद्रपूर -700(निरंक) मि.मी 8)कारंजा-721(निरंक) मि.मी. |
जिल्ह्यातील जलाशये लबालब
महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.29 ऑगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.29-वर्धा पाटबंधारे विभाग यांनी पाठविलेल्या अहवालानुसार आज दिनांक 29 ऑगस्ट 2011 रोजी जलाशयातील पाण्याच्या पातळीच्या स्थितीत सुधारणा झाली असून,जलाशये लबालब झाली आहे.
धाम प्रकल्प महाकालीच्या जलाशयातील पूर्ण संचय पातळी 328.60 मिटर असून, पाण्याचा उपयुक्त साठा 62.51 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 52.51 द.ल.घमी. असून, उपयुक्त साठ्याची वास्तविक टक्केवारी 84.01 आहे. पोथरा प्रकल्प धरणाची पूर्ण संचय पातळी 229.40 मिटर असून, पाण्याचा उपयुक्त साठा 34.72 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 34.72 द.ल.घ.मीटर असून, उपयुक्त साठ्याची वास्तविक टक्केवारी 100 टक्के आहे.सांडव्यावरुन 24 सेमी 47.25 क्सुसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.बोर प्रकल्प जलाशयातील पूर्ण संचय पातळी 330.40 मीटर असून, पाण्याचा उपयुक्त साठा 127.42 द.ल.घ. मिटर आहे. जलाशयातील साठा 119.74 द.ल.घ.मीटर असून, उपयुक्त साठ्याची वास्तविक साठयाची टक्केवारी 94.2 आहे.
डोंगरगाव प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 297.95 मीटर असून, उपयुक्त साठा 4.44 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 4.44 द.ल.घ.मीटर असून, वास्तविक साठ्याची टक्केवारी 100 टक्के आहे. सांडव्यावरुन 3 सें.मी.ने 0.80 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. पंचधारा प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 305.50 मीटर असून, उपयुक्त साठा 8.75 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयाचा साठा 8.75 द.ल.घ.मीटर असून, वास्तविक साठ्याची टक्केवारी 100 टक्के आहे. सांडव्यामध्ये 5 से.मी. ने 2.44 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.मदन प्रकल्प पूर्ण संचय पातळी 329.90 मीटर असून उपयुक्त साठा 10.56 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 8.29 द.ल.घ.मीटर असून,वास्तविक साठ्याची टक्केवारी 78.59 टक्के आहे. मदन उन्नई धरणाची पूर्ण संचय पातळी 273.65 मीटर असून,उपयुक्त साठा 2.70 द.ल.घ.मीटर आहे.जलाशयातील साठा 2.70 द.ल.घ.मिटर असून, साठ्याच्या वास्तविक टक्केवारी 100 टक्के आहे. सांडव्यावरुन 5 सें.मी.ने 3.11 से.मी. क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. लाल नाला प्रकल्प संचय पातळी 234.15 मिटर असून, उपयुक्त साठा 27.613 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 24.49 द.ल.घ.मीटर असून, टक्केवारी 88.71 आहे. नांद प्रकल्पातील साठा 247 मीटर असून, उपयुक्त साठा 53.18 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 24.63 द.ल.घ.मीटर असून, साठ्याची टक्केवारी 46.32 आहे.
वडगाव प्रकल्पातील संचय पातळी 255.10 मीटर असून, उपयुक्त साठा 136 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 127.20 द.ल.घ. मीटर असून, जलाशयाची साठ्याची टक्केवारी 93.53 आहे. उर्ध्व वर्धा धरणाची संचय पातळी 342.50 मीटर असून, उपयुक्त साठा 548.14 द.ल.घ.मीटर आहे. धरणात 540.11 द.ल.घ.मीटर साठा असून, साठ्याची टक्केवारी 95.79 टक्के आहे. 11 दारे 71 से.मी. उघडली असून 1257 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. वर्धा कार नदी प्रकल्पात पूर्ण संचय पातळी 432.65 मीटर असून, उपयुक्त साठा 21.063 आहे. जलाशयाचा साठा 21.06 द.ल.घ.मीटर असून, साठ्याची टक्केवारी 100 आहे. सांडव्यावरुन 35 सें.मी. ने 77.28 क्युसेस पाणी विसर्ग होत आहे. निम्न वर्धा प्रकल्पाची संचय पातळी 283.60 मीटर असून उपयुक्त साठा 216.87 द.ल.घ. मीटर आहे. जलाशयातील साठा 769 द.ल.घ.मीटर असून, टक्केवारी 7.44 आहे. या धरणातून 900 क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत असून, धरणाचे 30 दरवाजे 70 सेंमी.ने उघडले आहे. बेंबाळा प्रकल्पात संचय 269.50 मीटर असून, उपयुक्त साठा 302.67 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 118.62 द.ल.घ.मीटर असून, साठ्याची टक्केवारी 39.19 आहे. पाण्याचा विसर्ग 288 क्युसेस ने होत असून 6 (सहा) गेट 50 से.मी.ने उघडले आहे.सुकळी लघू प्रकल्पात संचय पातळी 286.15 मीटर असून, उपयुक्त साठा 10.27 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयाचा साठा 10.27 द.ल.घ.मीटर असून, त्यांची टक्केवारी 100 आहे. सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग 5 से.मी.ने 4.32 क्सुसेस होत आहे. अशी माहिती वर्धा पाटबंधारे सिंचन विभागाच्या अहवालात नमूद आहे.
000000
सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात
महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.29 आगस्ट 2011
------------------------------------------------------------------------
वर्धा, दि.29- गेल्या चोविस तासात कारंजा तालुक्यात 46 मि.मी. सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. तालुकानिहाय कंसातील आकडे हे एकूण पावसाचे असून, कंसाबाहेरील आकडे हे आज पडलेल्या पावसाचे आहे.
वर्धा 4.9 (638.22) मि.मी., सेलू निरंक (746) मि.मी., देवळी निरंक(823.93) मि.मी., हिंगणघाट 32 (730) मि.मी., आर्वी 34 (886) मि.मी., आष्टी 8.2 (631.8) मि.मी.,समुद्रपूर 3 (700) मि.मी., कारंजा 46 (721) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
आज जिल्ह्यात एकूण 128.1 मि.मी. पाऊस पडला असून, आतापावेता एकूण 5858.77 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सरासरी पडलेला पाऊस 16.01 मि.मी. असून, आतापर्यंत 732.34 मि.मी. एकूण सरासरी एवढा पाऊस पडला आहे.
000000
प्रतीमा हटविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.29ऑगस्ट2011
--------------------------------------------------------------
वर्धा, दि. 29-वर्धा नझुल ब्लॉक क्रमांक 17 मधील भुखंड क्रमांक 13/0 जागेवर अतिक्रमण करुन त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धाकृती प्रतीमेची (पुतळा) स्थापन केलेली आहे.
याबाबत उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ,नागपूर यांचे आदेशातील निर्देशानुसार उपरोक्त नमुद अतिक्रमण काढून टाकण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. करीता सदर अतिक्रमीत जागेवर ज्या कोणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापीत केलेला आहे. त्यांनी तो स्वत:तिथून 2 सप्टेंबर 2011 पावेतो काढुन घ्यावा. अन्यथा उपरोक्त नमुद अतिक्रमण प्रशासनामार्फत काढण्यात येईल. याची सर्व नागरीकांनी व हितचिंतकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन तहसिलदार, वर्धा यांनी केले आहे.
000000
Subscribe to:
Posts (Atom)