Tuesday, 9 August 2011

ऑगस्ट 2011 महिण्याचे शिधावाटप परिमाण


                        महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि.9 ऑगस्ट 2011
---------------------------------------------------------------
                
वर्धा, दि. 13- जिल्ह्यातील सर्व कौटुंबिक शिधा पत्रिका धारकांना माहे ऑगस्ट 2011 महिण्याकरीता स्वस्त धान्य दुकानातून शिधा वस्तुचे वाटपाचे परिमाण पुढील प्रमाणे निश्चीत करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष  धान्य साठा साखरेच्या उपलब्धतेनुसार वितरण करण्यात येईल.
            दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी बीपीएल कार्ड धारकांना 25 किलो गहू प्रतीकिलो 5 रु. दराने, तांदूळ 19 किलो प्रतीकिलो 6 रु. दराने, साखर प्रति व्यक्ती 500 ग्राम 13.50 प्रती किलो दराने मिळेल.अंत्योदय कार्ड    धारकांना  25 किलो गहू 2 रु. प्रती किलो दराने, 19 किलो तांदुळ प्रती किलो   3 रु. दराने, प्रति व्यक्ती 500 ग्राम साखर 13.50 रुपये प्रती किलो दराने मिळेल. अन्नपूर्णा कार्ड धारकांना 5 किलो गहू 5 किलो तांदूळ विनामुल्य दराने , साखर प्रति व्यक्ती 500 ग्रॅम 13.50 रुपये दराने मिळेल. एपीएल कार्ड    धारकांना 10 किलो गहु 7.20 रुपये दराने, 5 किलो तांदूळ 9.60 रुपये दराने  मिळेल.
          केरोसीनचे किरकोळ विक्री दर जाहिर करण्यात आले असून, खापरी डेपोतून वितरीत झालेल्या केरोसीनचे प्रति लिटरचे दर खापरी डेपोचे कंसाबाहेर दिले असून, बोरखेडी डेपोतून वितरीत होणारे केरोसीनचे दर कंसामध्ये दर्शविण्यात आले आहे. तालुका निहाय केरोसीनचे दर पुढील प्रमाणे आहे. 
            वर्धा 14.55 (14.48),देवळी 14.81 (14.75), सेलू 14.67 (14.62),आर्वी 14.74( 14.69),आष्टी 14.95 (14.97),कारंजा 14.84 (14.93),हिंगणघाट 14.75 (14.63),समुद्रपूर 14.49 (14.40) आहे.
            शहर विभाग तालुका मुख्यालयी प्रति व्यक्ती 2 लिटर प्रमाणे जास्तीत जास्त 20 लिटर ग्रामीण भागात 15 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात येईल.तसेच 1 सिलेंडर धारकाला 4 लिटर केरोसिनचे उपलब्धतेनुसार वाटप करण्यात येईल. 2 सिलेंडर धारकांना केरोसिन देय नाही. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                                                                0000                       

Monday, 8 August 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती दि. 9/8/2011


क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
437.78 मि.मी.

2.47 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा  -405.6 (1) मि.मी.
2)सेलू - 451(निरंक) मि.मी.
3)देवळी -445.2 (1) मि.मी.
4)हिंगणघा -478.2(2.00)मि.मी.
5)आर्वी -463 (निरंक) मि.मी.
6)आष्टी -344.8 (4.06) मि.मी. 7)समुद्रपूर -524.05(3.05) मि.मी
8)कारंजा- 392.03(7.06) मि.मी.

एड्सचं चित्र धक्कादायक .... !


विशेष लेख           जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा            दि.8 आगस्ट 2011
    
     देशात एड्स झालेल्यांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हे जितकं धक्कादायक तितकच धोकादायक आहे. याला अटकाव करण्यासाठी नैतिकता आणि सुरक्षित लैंगिक संबध हे दोन प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
                                      - प्रशांत दैठणकर
  एच.आय.व्ही. आणि एड्स ही गेल्या दशकातील सर्वात मोठी आरोग्य समस्या बनली आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे देशात सर्व राज्यांच्या आकडेवारीत महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. ही बाब जितकी धक्कादायक आहे तितकीच धोकादायक देखील आहे.
नुकत्याच जारी आकडेवारीनुसार संपूर्ण देशात एड्सग्रस्तांची संख्या 4 लाखांच्या आसपास आहे. त्यात महाराष्ट्रातील 1 लाखांहून अधिक एड्सग्रस्तांचा समावेश आहे. राज्यात एड्स नियंत्रण सोसायटीच्या माध्यमातून याचा प्रसार रोखण्यासाठी प्रबोधनात्मक उपक्रमांसह विविध उपक्रम सतत राबविले जातात.
एड्स होण्याचं मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे एच.आय.व्ही. व्हायरस होय. या व्हायरसचा प्रसार तीन प्रकारांनी होत असतो.यात अनैतिक आणि सुरक्षित शारिरीक संबंध हे प्रमुख कारण आहे.
                                                                                
रक्तातून एकाचे विषाणू दुसरीकडे जाऊ शकतात परंतु देशात सर्वत्र रक्त संक्रमणापूर्वी एच.आय.व्ही.ची तपासणी सक्तीची करण्यात आलेली असल्याने या मार्गातून एच.आय.व्ही.ची बाधा शक्य राहिलेले नाही.
मातेला गर्भ धारणेच्या काळात एच.आय.व्ही. विषाणूची बाधा झालेली असेल तर तिच्या बाळालाही बाधा होत असते. मुळात मातेला होणारी अशी बाधा ही महत्वाची समस्या आहे.
आपला देश नैतिकता आणि कुटुंब व्यवस्था पाळणारा देश आहे. असे असताना देखील एच.आय.व्ही आणि एड्स बाधितांची संख्या वाएत आहे, ही खरोखरच चिंतेची बाब आहे. असुरक्षित लैंगिक संबंध ही अनैतिक संबंधांची दुसरी बाजू असते. यात विवाहबाह्य संबंध टाळला तरी एच.आय.व्ही.चा धोकाच उरत नाही हे स्पष्ट आहे.
आपल्याकडे लैंगिक शिक्षण दिले जात नाही मात्र आता एच.आय.व्ही.ची बाधा होणा-यांचे प्रमाण बघून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.
स्त्री-पुरुष संबंधातील मुक्तपणा गेल्या 2 दशकात खूप वाढला आहे. मात्र याचा गैरफायदा पुरुषच मोठ्या प्रमाणावर घेतात हे एड्सच्या आकडेवारीवरुन जाणवते. देशातील एकूण पुरुष रुग्णांची संख्या 2 लाख 28 हजारांहून अधिक आहे तर 1 लाख 71 हजार महिलांना याची बाधा झाली आहे.
आरोग्य ही मोठी संपदा आहे आणि येणारी पिढी निकोप रहावी असं वाटत असेल तर प्रत्येकाने या बाबीकडे लक्ष द्यावं आणि यापासून चार हात लांब रहावं हे उत्तम.
                           - प्रशांत दैठणकर
                000000

विशेष लेख         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा           दि.8 आगस्ट 2011
अमर्याद शिक्षण शुल्क वाढीला `ब्रेक`
      विना अनुदान तत्वावर चालणा-या शाळांच्या भरमसाठ शुल्कवाढीला नियंत्रित करणारा कायदा येत आहे. या स्वरुपाचे शिक्षण शुल्क विनियमन विधेयक नुकतेच शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी मांडले. त्या संदर्भाने अल्पसा आढावा.                       - प्रशांत दैठणकर
 राज्य सरकारने जे महत्वपूर्ण निर्णय गेल्या काळात घेतले आहेत. त्यात शालेय शिक्षणाबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांना महत्व अधिक आहे. भारताचं भविष्य म्हणून आपण ज्या मुलांकडे बघतो त्या मुलांना शिक्षण मिळणं महत्वाचं आहे. या उद्देशातून मुलांना शिक्षणाचा अधिकार देणारं धोरण आलं. त्या पाठोपाठ आता शिक्षण शुल्क विनियमनाचा कायदा प्रस्तावित करण्यात आला आहे.
भारतात दोन्ही बाजूंनी असलेल्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करुन स्वातंत्र्यानंतर निरक्षरतेचं प्रमाण घटविण्यात आपण यश प्राप्त केलं आहे असं असलं तरी आजही काही आव्हानं समोर आहेत. शाळा गळतीचं प्रमाण रोखणं हे त्यातील एक मोठं आव्हान.शाळा गळतीचा अभ्यास करता त्यात विविध कारणं समोर येतात. यात मुलींच्या शाळा गळतीचे प्रमाण अधिक आहे. मुलगी नको, मुलीला शिकवून काय करायचय अशी धारणा काही अंशी आजही समाजात दिसून येते, त्यामुळे हे प्रमाण वाढते.
घरात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यासोबत आर्थिक अडचण हे देखील शाळा गळतीचे एक कारण आहे. याकरिता शासन प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देत आहे. मुलींना शैक्षणिक शुल्काची माफी त्याच प्रमाणे शिष्यवृत्ती या माध्यमातून गळती रोखण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. याखेरीज माध्यान्ह भोज योजनेच्या माध्यमातून कधी तर तांदुळ पुरवठा योजनेच्य माध्यमातून गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अनुदानित शाळांसोबत विना अनुदानित शाळांचाही विचार आपणास करावा लागेल. शासन अनुदान देत नाही अशा शाळांना स्वत: शिक्षण शुल्क ठरविण्याचा अधिकार आहे.
गेल्या काही वर्षात विना अनुदान तत्वावर चालणा-या शाळांमध्ये शिक्षण शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे ही सर्वांची अपेक्षा असते मात्र या अमर्याद अशा वाढीमुळे पालकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. त्याचसोबत घरात उत्पन्नाचा जो भाग राहणीमान व भोजन यावर खर्च व्हायला हवा तो घटून शिक्षणावरील खर्चाची टक्केवारी वाढल्याने सा-यांचेच बजेट कोलमडायला लागले.
एका बाजूला शिक्षण शुल्काची वाढ आणि दुस-या बाजूला वाढलेली महागाई यामुळे मुलांचे शिक्षण ही सर्वांपुढे समस्या बनली. अशा स्थितीत या कायद्याच्या रुपाने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिक्षण शुल्क ठरविण्याचा अधिकार शैक्षणिक संस्थेचा होता. त्यात आता त्यांना पालक प्रतिनिधींचा समावेश करण्याचे बंधन येणार आहे. त्यामुळे एकतर्फी थोपविली जाणारी शुल्कवाढ यापुढील काळात बंद होईल. सोबतच एकदा शुल्कवाढ केल्यानंतर त्यापुढे दोन वर्षे शुल्क वाढ करता येणार नाही, अशीही तरतूद यात आहे. यामुळे सत्र संपल्यावर पुढील वर्षी किती शुल्क भरायचे हा सवाल पालकांसमोर राहणार नाही.
विना अनुदान तत्वावर शाळा म्हणजे आर्थिक उत्पन्नाचं साधन असे मानून शिक्षण क्षेत्रात शिरलेल्या व्यावसायिकांना यामुळे चांगलाच लगाम बसणार हे स्पष्ट आहे. आपण माहिती युगातून ज्ञानयुगात प्रवेश करीत आहोत. त्याचं मुळ हे शिक्षणात आहे आणि सरकारचं हे नवं पाऊल शिक्षणाची शाश्‍वती देण्यासोबतच शाळा गळती रोखणारं ठरेल असं मानायला हरकत नाही.                                    - प्रशांत दैठणकर
                   00000

सहकारी सेवा संस्थाना कामे वाटपाबाबत सुचना


  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.8 ऑगस्ट 2011
------------------------------------------------------------------------
    वर्धा,दि.8- जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्था स्थापन झालेल्या सर्व सेवा संस्थांनी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केन्द्र,वर्धा या कार्यालया अंतर्गत काम वाटप समितीकडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा जिल्हा प्रकल्प अधिकारी (सशिअ) जिल्हा परिषद, वर्धा यांचेकडून सर्व शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण अंतर्गत अस्थिव्यंग साहित्य साधने तालुका स्तरावर वितरीत करण्याचे काम व वर्धा जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे कडील प्रत्येकी एक सफाईगार सफाईचे कामे करण्यास्तव कामे प्राप्त झाली आहे.
     इच्छूक सेवा संस्थांनी काम वाटपाचे अटी व शर्ती पूर्ण करु शकतील अशा संस्थांनी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केन्द्र, वर्धा यांचेशी दि. 12 आगस्ट 2011 पर्यंत संपर्क साधावा व लेखी स्वरुपात अर्ज सादर करावा. कामाचे स्वरुप व तपशिल जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केन्द्र, वर्धा यांचेकडे उपलब्ध आहे.
इच्छूक संस्थांनी अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केन्द्र, वर्धा यांचेशी संपर्क साधावा.
                 00000

प्रसिध्दी पत्रक     वर्धा जिल्ह्यात 37(1) 3 कलम जारी
     वर्धा, दि.8- वर्धा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि 3 कलम जारी केले आहे.
     या कलमाचा अंमल 16 आगस्ट 2011 च्या रात्री 24 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्यक्ती विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.

                              00000

वर्धा जिल्ह्यात आतापावेतो 435 मि.मी. पावसाची नोंद


                     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.8 ऑगस्ट 2011
-----------------------------------------------------------------------------
   वर्धा,दि.8-वर्धा जिल्ह्यात आतापावेतो 435.37 मि.मी. सरासरी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली असून, तालुकानिहाय कंसातील आकडे हे एकूण पावसाचे असून, कंसाबाहेरील आकडे हे आज पडलेल्या पावसाचे आहे.
     वर्धा 1.8 (404.6) मि.मी., सेलू निरंक (451) मि.मी., देवळी 4.4 (444.2) मि.मी., हिंगणघाट 10 (476) मि.मी., समुद्रपूर 10.02 (521) मि.मी., आर्वी 9 (463) मि.मी., आष्टी 4.2 (340.2) मि.मी., कारंजा 1.2 (384.16) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
     आज जिल्ह्यात एकूण 40.8 मि.मी. पाऊस पडला असून आतापावेता एकूण 3483.2 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सरासरी पडलेला पाऊस 5.07 मि.मी. असून, आतापर्यंत 435.37 मि.मी. एकूण सरासरी एवढा पाऊस पडला आहे.
                                       000000